बुधवार, २ जून, २०१०

एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे.

२६ जून २०१० साली होणारे सूर्यग्रहण :-


जगातील काही नामवंत ज्योतिषानि सूर्यग्रहणा विषयी भाष्य केले आहे. काही जण नुसते शनी-मंगळाच्या युतीने योगात देशाचे व ज्यांच्या पत्रिकेत कन्या रास षष्ठ अष्टम स्थानी आहे म्हणजे मेष आणि कुंभ लग्नाच्या कुंडल्यांना विकार होतील. ह्या बद्दल भविष्य वर्तविण्यास सुरुवात केली आहे. पण ही शनि मंगळाची युती मेदनीय ज्योतिष्यशास्त्रा दृष्टीनी आज आपण बघणार आहोत. तसेच ह्या बाबत श्री राजीव उपधाय आपल्याला वेळोवेळी मेदनीय जोतिषाच्या दृष्टी कोणातून मार्गदर्शन त्याच्या साईटवरुन ( http://rajeev-upadhye.blogspot.com ) करत आहेत. त्याचा लाभा वाचकानी द्यावा. तसेच श्री. सुहास डोंगरे यांनी सुध्दा मेदिनीय ( राष्ट्रिय ) ज्योतिष शास्त्रा बद्दल अनेक पुस्तके जातकाच्या वाचनात भर घालण्या साठी प्रसिध्द केली आहेत.

कोणत्याही ग्रहाच्या युतीचा परिणाम हा जातकाला तो ज्या स्थानात राहात असतो त्या स्थांनाच्या अनुसंधाने होत असतो. हा पहिला नियम येथे घेणे महत्वाचे आहे. पुथ्वी वरिल लग्न बिंदूहा प्रत्येक राज्यात देशात नेहमी वेगवेगळा असू शकतो. तसेच घातचक्रा मधिल माहितीची सागड घातली तर प्रत्येकाचे कारण आपणास समजणे अवघड जाणार नाही. प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीच्या भवति फ़िरण्याची एक सीमा ठरलेली आहे. त्या सीमेरेषेच्या बाहेर कोणताही ग्रह जाणार नाही. आपल्या जोतिष्यशास्त्रात २७ ( अधिक एक ) २८ नक्षत्रे व १० ग्रह व अधिक राहू व केतू मिळवून १२ ग्रह आहेत हे सर्व ग्रह व नक्षत्रे पृथ्वी सभोताली सतत एक ठराविक मार्गक्रमाने फ़िरत असतात. ते पृथ्वी भवती फ़िरताना प्रतेक लग्नाशि विशिष्ठ योग करतात. तसेच गोचरीचे ही योग करत असतात. ह्या योगाचा अभ्यास जर का केला तर आपल्याला योग ते भाष्य करण्यास कधिही अडचण येणार नाही.

प्रत्येक देशातील / शहराला ग्रहाची तसेच नक्षत्राची बघण्याची दृष्टी / वेध हे वेगवेगळ्या कोणातून होत असते. यालाच आपण ग्रहाचे व नक्षत्राचे योग असे संबोधतो. या मध्ये जातक हा ज्यावेळी जन्मलेला असेल त्या प्रमाणे त्याचे आपण भविष्य सागण्यास सुरुवात करतो. पण हे जरी खरे असले तरी जातकाचा झालेला जन्म लग्ना प्रमाणे आपण त्याचे भविष्य सागत असतो. पण हे माझ्या दृष्टी कोणातून चूकीचे आहे. कारण पहिल्यादा जातक हा एका ठराविक विभागात राहात होता, तो जरी बाहेर गेला तरी काही ठराविक अतंर जाणार हे ज्योतिष्याला माहीत होते, त्यामुळे साधारण अदांज घेउन ज्योतिष्या जातकाला त्याच्या आयुष्यातील घटणा क्रमांचा अंदाज देत असत. आता आपण आधुनिय युगात आलो आहोत. जेव्हा आपण एखाद्या जातकाचे भविष्य वर्तवितो त्या वेळी जातकाचा ठावठिकाणा आपल्यास माहिती असलेला पाहिजे तसेच जातकाचे प्रवास व देशपर्यंटन सुध्दा माहित असले पाहिजे म्हणजे आपल्याला मेदनीय ज्योतिष्याच्या सुंसगतीने योग्यते भाष्य करता येते.

जातकाच्या लग्नकुंडली प्रमाणे तसेच त्याच्या दशा व गोचरीच्या ग्रह व नक्षत्र आणि मेदनिय म्हणजे जातक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणाचा सर्वसार विचार करुन जातकाला त्याचे भविष्य सागितले पाहिजे. हा एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे. कारण के.पी पध्दतीत जातक ज्या स्थानात राहून प्रश्न विचारतो त्या स्थांनाची कुंडलीचा आपण विचार करुन जातकाच त्याचे भविष्य सागतो. हा मुद्दा आता के. पी. पध्दतीने भाष्य करणा-या ज्योतिष्याच्या लक्षात आलेला नाही. हे कटु सत्य के.पी पध्दत अवलंब करणा-या ज्योतिष्यानी मान्य करावयास हवे.

आता आपण मेदिनीय ज्योतिष्यशास्त्र म्हणजे काय ते पाहू :-

मेदिनीय ज्योतिष वर्तविताना प्रामुख्याने दोन भाग पडतात. अ) नैसर्गिक घटना ब) मानवी घटना
सुख व दु:ख या जीवनरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण अनुभव असा की सुखाची बाजू सहजपणे विसरली जाते, दु:खाची बाजू मात्र सतत जीवनभर सलत राहाते.

मेदिनी याचा अर्थ पृथ्वी. या पृथ्वीतलावर सर्व चराचर सृष्टीवर होणार्यात अनेक विविधरंगी घटनांचा मागोवा घेणारे शास्त्र म्हणजेच “मेदिनीय॑ ज्योतिषशास्त्र” होय. सर्व पृथ्वीचा विचार केल्यास सर्वसामान्य माणसे म्हणजे जणुकाही नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्याच आहेत. नियतीच्या एकाच तडाख्यात कित्येक माणसे क्षणार्धात भूकंप, ज्वालामुखी, वादळे, पूर यांत बेचिराख होतात. नागासाकी व हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बने लक्षावधी माणसे क्षणार्धात खलास झाली होती. यावरुन पृथ्वी व सर्वसामान्य माणसे यांचा विचार करता पृथ्वी, तिच्या विशिष्ट भागाला व विशिष्ट परिस्थितीला साहजिकच जास्त महत्त्व आहे.
समस्त पृथ्वी अक्षांश-रेखांश या पद्धतीने विभागली गेली आहे. त्यामुळे कोणते गाव, कोणते शहर नेमके कोठे आहे, कोणत्या दिशेला आहे याचा उलगडा होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हे अक्षांश-रेखांश महत्त्वाचे आहेत. तसेच ते मेदिनीय ज्योतिषात अतिशय महत्त्वाचे आहेत, किंबहुना त्याखेरीज मेदिनीय ज्योतिषामध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. जगामधील निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळ्या प्रमाण वे़ळा सूर्याच्या भ्रमाणाप्रमाणे आधारभूत धरल्या जातात. भारताचा विचार केल्यास ८२ संश ३० मिनिटे ( पूर्व ) हे रेखांश आधारभूत पकडून भारतीय प्रमाण वेळ काढण्यात आली आहे. समस्त॑ जगाचा विचार करताना लंडान शहराचे शून्य संश रेखांश पकडून सर्व जगातल्या प्रदेशाची विभागणे केलेली आहे. साहजिकच मोठमोठ्या प्रदेशात उदा. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया येथील एकाच प्रदेशात निरनिराळ्या प्रमाण वेळा राज्याप्रमाणे आहेत.
अंदाजे दुसरे शतकात पश्चिमात्य ज्योतिषी टॉलेमी यांनी लिहिलेल्या "टिट्राबोक्तास" या नावाजलेल्या ग्रंथात निरनिराळी राष्ट्रे व शहरे यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण करताना त्याने त्या त्या विशिष्ठ देश, राष्ट्र याची नैसर्गिक वैशिष्ट्ये व इतिहास लक्षात घेतला आहे. पृथ्वी ही विविधरंगी विविढंगी असल्यामुळे "मूर्ती तितक्या प्रकृती" या न्यायाने निरनिराळे नैसर्गिक भेद पृथ्वीवर आढ्ळून येतात. त्यातील उत्तर गोलार्ध हे तर महत्त्वाचे आहेच.

टॉलेमीने देश व शहरांची विभागणी निरनिराळ्या राशींमध्ये नेमकी कोणत्या निकषांवर घेतली त्याचप्रमाणे कोणत्या आयनांश पकडून काढली, ( सायन व निरयन भविष्य कथनाच्या पद्धतीमधील अंशात्मक भे म्हणजे अयबांश होय ) त्याचाही नीट्सा उलगडा जुन्या ग्रंथामध्ये सुस्पष्टपणे सापडत नाही. त्याने वसंतसंपात बिंदूपासून ३६० अंश रेखांशाची विभागणी १२ राशीत करुन प्रत्येक रास ३० अंशाची या मापाने शहरांचे व देशांच्या राशी त्यांच्या वर्गीकरणापरत्वे केले आहे. त्याप्रमाणे मेष राशीचा अंमल इंग्लड, जर्मनी, डेन्मार्क, पॅलेस्टाईन , सिरीया या देशांवर तर नेपल्स, बर्मिगहॅम या शहरांवर आहे असे मानलेले आहे तर समस्त भारत, पंजाव, अफगाणिस्तान, ग्रीस या देशांचे वर्गीकरण त्याने मकर राशीमध्ये दिलेले आहे.
तथापि त्या टॉलेमीच्या वेळच्या देश व शहरे यांच्या सीमारेखांमध्ये (प्रामुख्याने देश ) खूपच फरक पडलेला आहे. त्या वेळचा महाभारत आता फक्त भारत उरलेला आहे कारण टॉलेमीच्या वेळेला पाकिस्तानचा जन्म झालेला नव्हता थोडक्यात सर्वच प्रदेशांच्या सीमारेखा ज्या टॉलेमीच्या वेळच्या होत्या त्या आता राहिल्या नाहीत. तसेच टॉलेमीनंतर अंदाजे १८०० वर्षे झाली असल्यामुळे (त्य वेळी सायनच पद्धत असावी असा तर्क आहे. ) टॉलेमीने देश व शहरे यांच्या राशीचे जे वर्गीकरण केलेले आहे त्या राशीचे अंश त्याने दिलेले नसल्यामुळे काही माहिती अपूर्ण व लंगडी आहे. ( सायन व निरयनमध्ये आजकाल अंदाजे २३ अंशाचा फरक असतो. टॉलेमीच्या वेळी हा फरक नगण्य असेल) याबद्दल नेमके व निश्चितपणे सांगणे केवळ कठीण आहे. कारण मेदिनीय ज्योतिषाशास्त्र हे अजून तसे अपूर्णावस्थेत आहे.

साहाजिकच त्यानंतर निरनिराळ्या तज्ञ ज्योतिषांनी उदा. सेफेराईल, राफेल ते आजपर्यंतचे डॉ. बी. व्ही, रामन, कै श्री. केळकर, श्री सुहास डोंगरे यांनी काही तुरळक देशांचे, राशींचे निरनिराळे वर्गीकरण त्यांची वुध्दिमत्ता व अनुभव यांच्या जोरावर केलेले आहे. तथापि विद्वानात एकमत फारच क्वचित होत असल्यामुळे नेमकी कोणती पत्रिका ज्योतिष अभ्यासकांनी घ्यावी याबद्द्ल साहजिकच संभ्रम निर्माण होतो.
देश व शहरांच्या पत्रिका व त्यावर अंमल करणार्या राशी यांचा विचार करताना आजची पत्रिका आधारभूत पकडली आहे. त्याप्रमाणे त्या देशातील इतिहासातील ठळक घटना जमणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्या प्रत्रिकेप्रमाणे देशातील आगामी घटनांचे भविष्य तंतोतंत बरोबर येणे किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रचंड चिकाटी अविरत परिश्रम, ऐतिहसिक घटनांचा मागोवा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, बुध्दिकौशल्य व ज्योतिष शास्त्रातील वरवर क्षुल्लक वाटणार्यान पण महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांचे प्रभुत्व व मोदिनीय ज्योतिषाची जाण हे खुपच महत्त्वाचे आहे. इतिहासातील घटना लक्षात घेतल्या तर या घटनासुद्धा इतक्या विविध स्वरुपाच्या व विविध रंगी परंतु ठळक व नजरेत भरणार्याे असतात की त्यामधून नेमकी कोणती घटना प्रमाणभूत म्हणून पकडावयाची हे अखेर ज्या त्या ज्योतिषांच्या कल्पनेचा, बुध्दिकौशल्याचा, अनुभवाचा परिपाक असतो. भारताच्या बबतीत विचार केल्यास टॉलेमीने भारताची रास सायन मकर पकडली आहे. कै श्री के केळ्कर हे भारताची रास निरयन मकर पकडूनही त्यांची कित्येक भविष्ये अचूक आलेली आहेत, तर ज्योतिषांमधील आधुनिक वराहमिहीर असा ज्यांचा उल्लेख आदराने करता येईल असे डॉ. बी. व्ही. रामन हे भारताची रास निरयन कन्या पकडतात व त्याप्रमाणे त्यांचीही अनेक भविष्ये पहिल्या महायुध्दापासून ते आजपर्यंत आश्चर्यकारकरीत्या खरी ठरली आहेत.
ज्योतिष शास्त्रात प्रामुख्याने भारतीय ज्योतिषा जर कोणी अननोल भर घातली असेल तर तो ज्योतिषी म्हणजे वराहमिहीर होय. याने "बृहत्तहसंहिता" या ज्योतिष ग्रंथामध्ये निरनिराळ्या देशांची विभागणी राशीवार केलेली होती, तसेच वराहमिहिर यांनी राहू व केतू हे दोन कल्पितबिंदू ग्रह म्हणून मानलेले आहेत. वराहमिहिरच्या पूर्वी राहू व केतू हे ग्रह मानले जात नव्हते. त्याचप्रमाणे वराहमिहीर यांनी कूर्मचक्राच्या आधारे देशांची विभागणी करुन अनेक आश्चर्यकारक विधाने केलेली आहेत. ( वराहमिहिरांचे योगदान इतके प्रचंड आहे की, वराहमिहीर एकच आहे की दोन याबद्द्ल संभ्रम निर्माण व्हावा. ) कोणत्या नक्षत्रात ग्रहण असल्यास त्याचे परिणाम काय होतात याचे सुध्दा त्याने सूक्ष्मपणे भविष्यकथन केले आहे. ते सगळेच प्रकरण आश्चर्यकारक आहे कारण त्यावेळेला आजच्यासारखा सुसज्ज यंत्रणाही नव्हत्या. असे वाचनात आले आहे की पाश्चात ज्योतिषी सेफेरेल यांनी असे भविष्य कथन केले होते. ते म्हणतात की, एका पाठोपाठ एक प्रदेश बळकावीत जगज्जेता सिकंदर जेव्हा विशिष्ट रेखांश ओलांडून पुढे जाईल त्या क्षणापासून त्याचे पतन होण्यास सुरुवात होईल. अर्थातच ते भविष्य त्यांनी कोणत्या आधारे केले याबद्दल नीटसा पुरावा उपलब्ध दिसत नाही.

ज्योतिष अभ्यासकांना सोयीसाठी टोलेमीने दिलेले प्रदेश व शहरे यांचे वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे. त्या राशी सायन आहेत की निरयन आहेत हे ज्योतिष अभ्यासकांनाच ठरवून देत.

राशी प्रदेश

मेष रास प्रदेश :- इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी, लेसर, पोलंड, पॅलेस्टाईअन व सिरिया.

वृषभ रास प्रदेश :- आयर्लंड, इराण, पोलंड, आशिया मायनर, जॉर्जिया, कासेशस, ग्रेशिअन, आर्किपेलगो, आयप्रस व श्वेत रशिया.

मिथुन रास प्रदेश :- अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ( यू.एस.ए ) वेल्जमब्रॅक्ट, लांबार्डी, इजिप्त, सार्डानिया, इंग्लंडचा पश्चिम भाग, आर्मोनिया, त्रिपोली, फ़्लन्डर्स आणि वेल्स.

कर्क रास प्रदेश :- स्कॉटलंड, हॉलंड, न्यूझिलंड, आफ़िकेचा उत्तर व पश्चिम भाग, मॉरिशस बेटे आणि पाराग्वे.

सिंह रास प्रदेश :- फ़्रान्स, इटली, बोहेमिया, सिसिली, काल्डियापासून बसरा प्रांतापर्यंतचा भाग, रुमानियाचा उत्तर भग, पाल्प्स पर्वतातील प्रदेश.

कन्या रास प्रदेश :- युरोपीय तुर्कस्थान, स्वित्झरलंड, वेस्ट इंडीज, बाबीलोनिया, मोरिया, थेसली, कुर्डीस्थान, ग्रीस देशातील काही भाग, व्हर्जीनिया आणि ब्राझिल.

तूळ रास प्रदेश :- ऑस्ट्रिया, इंडोवायना, चीन मुख्यत्वाने उत्तरेकडचे प्रांत व भारताचा चीनजवळचा प्रदेश, तिबेट, कास्पियन समुद्राच्या बाजूचा प्रात, उत्तर इजिप्त जपान, ब्रह्मदेश आणि अर्जेटिना.

वृश्चिक रास प्रदेश :- अल्जेरिया, बव्हेरिया, मोरोक्को,नॉर्वे, उत्तर सीरिया क्कीन्सलंड.

धनु रास प्रदेश :- अरबस्तान, ऑस्ट्रेलिया, केप फ़िनिस्टर, डालमॅशिया, हंगेरी, इस्त्रिया, मोरॅव्हिया, स्क्लव्होनिया, स्पेन, टस्कनी, फ़्रान्स देशातील सिअएन व ग्यॅरोन ते केप फ़िनिस्टर पर्यंतचा प्रदेश आणि मादगास्कर.

मकर रास प्रदेश :- भारतवर्ष, पंजाब, पर्शियामधिल सिराकत व मारकनजवळील प्रदेश, अफ़गाणिस्तान, थ्रेस, अल्बेनिया, बोस्निया, बल्गेरिया, ग्रीस, मेक्झिको, लुथिआनिया.

कुंभ रास प्रदेश :- खडकाळ अरबस्तान, प्रशिया, रशिया, पोलंड, स्वीडन.

मीन रास प्रदेश :- पोर्तुगाल, सहाराचे वाळवंट.


शहर किंवा प्रदेशांच्या पत्रिका तयार करण्यासाठी ज्या निरनिराळ्या पध्दती तज्ञ ज्योतिषी अवलंबितात त्यामध्ये एक पध्दत ही आर. व्ही. वैद्य यांची आहे. त्यांच्या मते प्लुटो हा ग्रह राष्ट्रामधील ठळक घटना म्हणजेच क्रांतिकारक घटनाण्चा मुख्य कारक ग्रह आहे.
श्री. सुहास डोंगरे सिव्हिल इंजिनिअर,ज्योतिषी, वास्तु ज्योतिष्य अभ्यासक ह्यांचे खापरपजोबा श्री व्यंकटेश बापूजी केतकर यांनी प्रथम प्लुटो ग्रहाचा शोध लावला आणि तेही कोणत्याही प्रकारची सुसज्ज यंत्रणा नसताना, ते लोकमान्य टिळकांच्या समकालीन होते. त्यांनी केतकर शुध्द पंचाग याचा प्रथम अवलंब केला. या प्लुटो ग्रहाचे सामर्थ प्रचंड असून संहारक शक्ती व नवनिर्मितीचा कारक आहे. हे लोंकाना पटवून दिले.

त्यामुळे एखाधा देश / शहरातील ठ्ळक घटना ज्या कालावधीत झाल्या तो कालावधी व प्ल्टो कोणत्या राशीत आहे हे लक्षात घेऊन ती रास दशबिंदूपाशी घेऊन त्याप्रमाणे लग्नबिंदू ठरवावा असे त्याचे मत आहे. या प्लुटो ग्रहाच्या जोडीला हर्षल व नेपच्यून याची मदत घ्यावी.

मेदिनीय निभागात फलादेश करताना सर्वात कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते म्हणजे ग्रहणे होय, ग्रहणे हे प्रामुख्याने आधारभूत आहेत तर ग्रहणांची पत्रिका ही मेदिनीय फलीत करण्यासाठी आधारपत्रिका, भारतीय ज्योतिर्विदांनी राहू व केतू यांची वराहमिहिरांच्या काळापासून पूर्णपणे ओळख आहे. त्याकाळी दळणवळण पध्दती फार मागासलेली होती त्यामुळे सर्व जण जेव्हा एकमेकाना भेटत असत त्यावेळी त्याचे संवाद व लिखाण एकमेकाशी देवाण घेवाण होत असे. त्यातील चुका व वेळेचे बंधन असल्यामुळे फारसे मेदनिय शास्त्र प्रचलित नव्हते.

जेव्हा एखादे ग्रहण किंवा ग्रहाचा युती योग होत असतो त्या प्रमाणे ते ग्रहा वसुधरेच्या प्रत्येक भागाला काय फ़ळे देतात हे महत्वाचे आहे. त्या प्रमाणे ज्योतिष्याने भाष्य करताना ह्या सर्व सामान्य गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. नुसते ग्रहाच्या किंवा ग्रहणाच्या योगाने आपणास हे रोग होतील किंवा अपघात होतील हे म्हणजे फ़ार चुकीचे आहे, कारण देशात अनेकाचे लग्न एकच असते, पण च्याच्या वर ग्रहाच्या व नक्षत्राच्या दृष्टीचे परिणाम हा वेगवेगळा असू शकतो. तो परिणाम नवनविन नियम करुन मोजने आवश्यक आहे.

लिहण्यस फ़ार आहे. परंतु येथे वेळेचे व नित्य कामाचे बंधन असल्याने लिहता येत नाही. तसेच वेळेचे बंधन असल्याने शुध्द लेखन तपासणे सुध्दा जमत नाहे. तरी चुका सुधारुन घ्याव्या ही विनंती.
कुंभ राशीत शतरारका नक्षात्र जन्मलेला
संजीव