बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

प्रश्नकुंडली म्हणजे ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारला जातो

प्रश्नकुंडली


प्रश्नकुंडली म्हणजे ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारला जातो. त्याच दिवसाची, त्यावेळेची व प्रश्न ज्या ठिकाणी विचारला गेला असेल त्याठिकाणची कुंडली मांडून प्रश्नाची उत्तरे दिली जातात. त्या कुंडलीस प्रश्नकुंडली असे म्हणतात. प्रश्नकुंडली मांडण्याची किंवा तयार करण्याची पद्धत जन्मलग्न कुंडलीप्रमाणेच आहे. मात्र प्रश्नकुंडली वरुन फलादेश व कालनिर्णय केला जातो ते सर्व नियम जन्मलग्न कुंडलीपेक्षा फार वेगळे असतात जन्मलग्नकुंडलीतील ग्रहाचे व राशींचे कारकत्व प्रश्नकुंडलीतही सारखेच असते. थोडक्यात प्रश्नकुंडली ही जन्मकुंडलीचे छोटे भांवड होय. ह्यालाच कृष्णमूर्ती पद्धती या नावाने संबोधले जाते.

प्रश्नकुंडलीची आवश्यकता :-

१. काही वेळा प्रश्नाची उत्सुकता किंवा महत्त्व तसेच जातकाच्या प्रश्नाची तीव्रता जास्त असल्याने तत्काळ फलादेशाची अपेक्षा असते. अशावेळी जातकाकडे जन्मकुंडली नसल्यास प्रश्नकुंडलीची मदत घ्यावी लागते.

२. जेव्हा जातकास स्वतःची प्रश्नकुंडलीची मदत घेऊन त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते.

प्रश्नकुंडलीचे फायदे :-

१. प्रश्नकुंडली ही एक सोपी पद्धत आहे. जन्मकुंडलीप्रमाणे प्रश्नकुंडली मांडण्यास सूक्ष्म गणिताची जरुरी नसते.

२. स्पष्ट ग्रह तसेच सर्वभाव स्पष्ट करुन भावचलीत कुंडली करावयास लागत नाही. त्यामुळे प्रश्नकुंडली मांडण्यास फारच थोडा वेळ लागतो.

प्रश्नकुंडलीच्या मर्यदा:

१. प्रश्नकुंडलीवरुन जातकाच्या दोन किंवा तीन प्रश्नांचीच उत्तरे देता येतात. संपुर्ण जीवनचा फलादेश सांगता येत नाही.

२. जातकाच्या जीवनाशी निगडीत अशाच प्रश्नांची उत्तरे देता येतात.

प्रश्नकुंडलीसाठी इष्टकाळ कसा ठरवावा ?

१. एखाध्या प्रश्नाचा उद्बोध ज्यावेळी जातकाच्या मनामध्ये प्रथम होतो ती वेळ. परंतु व्य्वहाराच्या दृष्टीने अशी वेळ लक्षात ठेवणे किंवा लक्षात येणे अत्यंत कठीण असते. ही वेळ जातकास माहिती नसते. त्यामुळे त्या इष्ट कालावरती ज्योतिषास विसंबुन राहता येत नाही.

२. ज्यावेळी जातक जोतिषास प्रश्न विचारतो ती वेळ.

३) एखादा प्रश्न पत्राव्दारे विचारला गेला असल्यास. नेमका मजकूर ज्यावेळी ज्योतिषी वाचतो ती वेळ.

४. हरवलेल्या वस्तुं संबंधी प्रश्न असल्यास ती वस्तु नेमकी कधी हरवली ती वेळ. काहीवेळा वस्तु हरविल्यानंतर काही तासांनी किंवा काही दिवसांनी जातकाच्या लक्षात येते ती वेळ.

जातक किंवा पृच्छक ज्यावेळी ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारतो त्यावेळी त्यांच्या चेहर्यातकडे पाहून किंवा त्याच्या हालचाली बघून तो खरोखरच निगडीत असे प्रश्न विचारीत आहे का ते प्रथम ठरवावे. त्यासाठी पुढिल गोष्टी पहाव्यात. जातकाच्या तीन अवस्था असतात.

१. आंनदी अवस्था := ज्यावेळी जातक आनंददायक गोष्टीसंबधी प्रश्न विचारतो त्यावेळी तो ज्योतिषाच्या नजरेला नजर लावून प्रश्न विचारीत असतो.

२. दु:खी अवस्था := या अवस्थेत जातक जनिनीकडे नजर लावून केविल वाण्या अवस्थेत प्रश्न विचारीत असतो

३. विचारी अवस्था := या अवस्थेत पृच्छक आकाशाकडे नजर लावून प्रश्न विचारीत असतो.

प्रश्नकुंडलीवरुन फलादेश देण्यासाठी कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक असते.

१. ग्रह, भाव, राशी व नक्षत्रे फलादेश.

२. ग्रह, राशी व भावांचे नैसर्गिक कारकत्व.

३. भावात असलेला ग्रह, भावाचा धिपति, भावाचा कारक ग्रह.

४. भावावर दृष्टी टाकणारे ग्रह.

५. राशी, ग्रह व स्थाने ह्यांच्या दिशा.

६. नक्षत्राच्या लोचनसंज्ञा.

प्रश्नकुंडली वरुन उत्तरे कसे देतात त्याचे नियम :=

१. प्रथम आपल्याला ज्या गोष्टीविषयी किंवा ज्या वस्तुविषयी प्रश्न विचारला असेल ती गोष्ट किंवा वस्तु कोणत्या भावावरुन पाहावे ते ठरविणे.

२. नंतर नेहमीच्या फलादेशाच्या पद्धतीप्रमाणे त्या भावामध्ये असलेला ग्रह, त्या स्थानामध्ये असलेली राशी, त्या स्थानाचा भावेश, भावावरती दृष्टी टाकणारे ग्रह आणि त्या भावाचा कारक ग्रह ह्यांचा विचार करुन फलादेश सांगणे.

३. या सर्व गोष्टींचे लग्नाचे लग्नाशी व लग्नेशाशी होणारे शुभ / अशुभ योग, बलवान / बलहीन स्थिती, शत्रु / मित्रत्व तसेच चंद्राशी होणारे योग यांनाही महत्व द्यावे.

प्रश्नकुंडलीची विश्वसनीयता :=

१. प्रश्नकुंडलीवरुन फलादेश सांगताना इष्टकालावरुन जी कुंडली मांडली जाते ती कुंडली पृच्छकाची असते. या कुंडलीतील लग्नस्थानावरुन पृच्छ्काची असते. या कुंडलीतील लग्नस्थानावरुन पृच्छकाची शरिरयष्टी बांधा व रंग-रुपाचा बोध होतो. जर हे वर्णन जुळत नसेल तर ती कुंडली विश्वसनीय नसते. याउलट जर वरील माहिती जुळली तर प्रश्न्कुंडली विश्वसनीय ठरते.

२. पृच्छकाचा प्रश्न एखाद्या व्यक्तिशी संबधित असेल व ती व्यक्ति कुंडलीतील त्या स्थानावरुन दर्शविली जात असेल; तर त्या स्थानाचा अभ्यास करुन त्या व्यक्तिचे वर्णन करावे ( जमल्यास राफेलच्या अंशाचा वापर करावा जास्त अचूकता येते ) हे वर्णन संबंधित व्यक्तिशी जुळले तर प्रश्नलुंडली विश्वसनीय आहे असे समजावा.

पुढील भाग प्रश्नकुंडलीची कार्यक्षमता, नक्षत्रे, अपेक्षापूर्तियोग. कृष्ण्मूर्ति पध्दतील काही झालेल्या चुकाची सुधारणा.....

संदर्भ :- श्री रविंद्र दत्ताराम धुरी सचिव- संजीवनी वैद्यक ज्योतिष्य संशोधन मंडळ मुंबई. ज्योतिर्विवेक. कृष्णमूर्ति पद्धतीचा बेसिक अभ्यासक्र ( श्री सुनील गोंधळेकर )

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१२

धोंडोपंत उवाच: पडदा लाजचा, लाजचा फेकला.... नमस्कार पंत खुप दिवसानी खाऊ मिळाला म्हणुन ध्यनवाद... निदकाचे घर असेल शेजारी ! प्रत्येक ग्रह स्थिती ही नेहमी काही वर्षात परत येते, जातक तुमच्या ओळ्खीचे आहे. जातकाचा जन्म २५/०९/१९७८ वेळ ०८:०५ ते १०:१६ मध्ये असलीच पाहिजे, तसेच लग्न बिंदु ०८.२९ ते ०९.०० च्या मधिल असणारच जास्त अभ्यास करीत बसलो नाही.

रविवार, १५ जानेवारी, २०१२

Love marriage with Astrology


 
Love marriage with Astrology 

 
          प्रेम ( LOVE ) या अडीच अक्षरी शब्दाची ताकद प्रंचड आहे.  प्रेम अनुभण्याजोगाच प्रकार आहे. प्रेमी माणसाला प्रेमापुढे सर्व झाघा तुच्छ वाटते. प्रेम आंधळे असते असे उगीच म्हणत नाहीत. प्रेमा खेरीज पंचमस्थाना वरुन संतती, कोणत्या खेळात प्राविण्य मिळवेल का? कला क्षेत्रात नावलौकिक होईल का? लाँटरी लागेल का? उच्च शिक्षण मिळेल का? याचाही बोध होतो.

 
            पंचमस्थानावरुन  प्रेमविवाह बघताना ( SIX HOUSE ) साव्याघराचा ही विचार केला पाहिजे. पंचम स्थान मधिल शुक्रहा ग्रह वृत्तीने कोमल तरुण मनाचा, रसीक, उत्साही, भावना जपणारा व परालिंगी आकर्षण दाखविणारा आहे. एखाद्याचे परालिंगी माणसाशी वागणे कसे असेल, त्याची भावना काय असेल तसेच तो जातक प्रेमाचा पुजारी असेल की शिकारी, हे शुक्र ग्रह कुंडलीत कसा बसला आहे. ह्यावरुन समजते. तसेच प्रेमाच्या व्यापारात तो कोणते डावपेच खेळेल हेही शुक्रावरुन सांगता येते. तसेच ह्या सर्व गोष्टी पंचस्थानावरुन समजून येतात. येथील पापग्रह फ़सवणूक करतात, धोका देतात.

  
          पंचम स्थानावरुन प्रत्यक्ष प्रेमाची स्वभाव, रंगरुप, व्यक्तिमत्व, राहाणी याबद्द्ल काही सांगता येत. पण एखादी व्यक्ती चार पाच जणांशी प्रेमाचे लपंडाच खेळेल, पण विवाह त्यातील एखाद्याशी अगर व्यक्तीलासोडून इतराशी होऊ शकेल किंवा विवाह होणारही नाही प्र्त्येक प्रेमाची परिणीती विवाहात होते असे थोडेच आहे? असे जत असते तर कुणाला “विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही, मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही” असे म्हणण्याची वेळ आली नसती.

  
          ज्यांच्या पत्रिकेत पंचमस्थानाचा संबंध व्दितीय व सप्तम व लाभ स्थानाशी होतो, त्याच्यां बाबतीत प्रेमविवाह होण्याची जास्त शक्यता असते. प्रेमविवाह होण्याची काही ठळक योग खाली दिलेले आहेत तसेच अधिक माहिती साठी ( श्री सुहास डोंगरे लिखीत “आपले नशीब – आपले ग्रहयोग” हे पुस्तक वाचावे ).

 
 •         पंचम स्थानाचा स्वामी सप्तमात व सप्तम स्थानाचा स्वामी पंचमात
 •         पंचमेश व सप्तमेश व्दितीय किंवा पंचम किंवा सप्तम किंवा लाभ स्थानात एकत्र.
 •         पंचमेशाची सप्तम स्थानावर दृष्टी व सप्तमेशाची पंचमस्थानावर दृष्टी.
 •         पंचमेश व सप्तमेश एकाच ग्रहाच्या दृष्टीत.
 •         गुरु-शुक्र-नेपचून नवपंचम व शुक्रे-शनी युती अथवा समसप्तक.
 •         शुक्र-मंगळ शनि-नेपचून समोरा समोर.

  

 •             कृष्ण्मूर्ति पद्धतीत पंचमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीच्या व्दितीय पंचम, सप्तम व एकादश स्थानाशी संबध असणे असे उद्दगार नेहमी धोंडपत आपटे त्यांच्या लिहण्यात करत असतात अधिक माहिती साठी त्यांचा BOLG पाहण्याची विनंती http://dhondopant.blogspot.com/
 
  

प्रेमविवाहास उशीर ( Time consuming Love Marriage )

  

      ज्यांच्या पत्रिकेत चंद्र-शनि युती किंवा समोरा समोर असतात, चंद्र शनिच्या नक्षत्रात व शनि चंद्राच्या नक्षत्रात त्याच प्रमाणे सप्तम स्थानात शनि-मंगळ-हर्षल सारखे ग्रह असल्यास विवाहाची तारीख अकल्पित कारणा मुळे लांबणीवर पडते. विवाहात नाना प्रकारचे विघ्ने अचानक उभी राहातात.

 
  

प्रेमविवाह नंतर अपयश (  Un-successful Love Marriage )

 
  

      सप्तमस्थाना पेक्षा सष्ठस्थान पापग्रहाच्या प्रभावामुळे बलवाण असल्यास तसेच शुक्रग्रहावर पापग्रहाचा अमंल असल्यास प्रेमविवाहाची चकाकी अल्पावधित निघुन जाते. व कटूसत्याला सामोरी जावे लागते. जर का सष्ठस्थानात शनि असेल तर विवाह होऊन सुधा फ़ारकाळ टिकून राहात नाही.

 
      त्याचप्रमाणॆ ज्यांच्या चर्थुतस्थानात शनि-मंगळ, शनि-रवि, चंद्र-शनि अशा प्रकारच्या युत्या असतात त्यांना वैवाहिक सौख्य अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. जोडीदाराचा मृत्यु, जोडीदाराचा वियोग, जोडीदाराची शारिरिक अथवा मानसिक दुरबलता ही त्यातील काही प्रमुख कारणे.

 
  

विजोड जोडी ( Un-match couple’s )

 
  

       सप्तमस्थानाशी शनिचा संबध असल्यास पती-पत्नी मध्ये रंग, रुप, आकार, वय, शिक्षण, राहाणी व स्वभाव हा मुख्यता फ़रक आढळतो. प्रवासात, पत्राव्दारे, दुराध्वनीव्दारे सहवासामुळे ज्यांप्रेम जमते त्यांच्या पत्रिकेत तृतीयस्थानाचा पंचम स्थानाशी संबध असतो. केवळ शारीरीक आकर्षणामुळे जे एकत्र येतात व प्रेमात पडतात त्यांच्या पत्रिकेत पुरुषाच्या बाबतीत शुक्र वक्री व स्त्रीयांच्या बाबतीत मंगळ बिघडलेला असतो.  ( LOVE AT FIRST SIGHT )किंवा प्रथम दर्शनी जे प्रेमात पडतात त्यांच्या पत्रिकेत शुक्राचा हर्षल किंवा नेपचूशी संबध असतो.

  

      ज्याच्या पत्रिकेत पंचमस्थानाचा दशमस्थानाशी संबध येतो त्याचा जोडीदार व्यवसायिक वर्तृळातील असतो. पंचमस्थानाशी संबध असणा-या शुक्रामुळे प्रेमविवाहस विरोध होत नाही.

 
      विरोध होण्यासाठी असणारी प्रमुख कारणे, म्हणजे जातीमधील, राहाणीमधील भिन्नता, तसेच दोघांची भिन्नपातळी वय, बीजवर वगैरे. सप्तम व तृतीयस्थानात राहू केतू हर्षल नेपचून सारखे पापग्रह असल्यास विरोधाला तोडद्यावे लागते. आणि गुरु बिघडला असल्यास नैतिक अध:पतन होऊन विवाह होतो. तसेच गुरु व शिष्य किंवा आदरणीय व्यक्ती व दुर्लक्षित व्यक्ती ह्यांच्यात खळबळजणक प्रेम विवाह होतो.

 
अनेक प्रेमविवाह ( another marriage’s )

 
     सप्तमस्थानात मिथुन, कन्या, धनु, मीन रास असून सप्तमेशही व्दिस्वभाव राशीत बुधाबरोबर असल्यास एका पेक्षा जास्त प्रेम विवाह होतात. शुक्र-मंगळ वक्रि असने हे महत्वाचे असते.

 
परस्पर आकर्षण ( Physical Attraction )

 
     पुरुषाच्या पत्रिकेतील शुक्र व स्त्रीपत्रिकेतील मंगळ ह्याच्या मध्ये साम्य आढळल्यास ते दोघेही आपोआप एकमेकाकडे ओढले जातात. ह्याग्रहाच्या जोडीला चंद्र असल्यास मानसिक, हर्षल असल्यास वैचित्र्यामुळे रवि असल्यास आकस्मिक, तर नेपच्युन असल्यास अनाकलनीय कारण असते. वरवर पाहाता हे समजणे केवळ कठिण असते. काही वेळेला पूर्वजन्माच्या दुव्यामुळे ते दोघे एकत्र चाललेले असतात.
 
 •   प्रेमविवाह होण्यासाठी पत्रिकेत खालील योग असावे लागतात. 
 
 ( As per Astrology following Plant’s conditions are required for Love marriage )

  
 •   पंचमेश सप्तमात व सप्तमेष पंचमात
 •   पंचमेश व सप्तमेश यांची युती किंवा प्रतियोग.
 •   पंचमेश व सप्तमेश व भाग्येष याची एकमेकाशी संबध.
 •   शनि-शुक्र क्रेंद्रयोग व शनिच्या दशमात शुक्र.
 •   चंद्र-गुरु नवपंचम किंवा गज केसरी योग.
 •   शुक्र-हर्षल युती किंवा प्रतीयोग किंवा शुक्र नेपच्यून संबध.
 •   शुक्र-रवि युती
 •   शुक्र-मंगळ युती किंवा प्रतीयोग.
 •   मकरेचा शुक्र शनिच्या नजरेत.
 •   भाग्यस्थानाचा नैसर्गिक पापग्रहाशी संबध.
 •   मकरेचा शुक्र रविने व शनिने संबधित असता अनैतिक संबध दाखवितो.
   

     विवाहकाळा ठरविण्यासाठी गुरु व शुक्र या मातबर ग्रहाची मद्दतघ्यावी लागते. गुरुवरुन वर्ष, मंगळावरुण साधारण महिना, व रवि शुक्रावरुन निश्चित काळ ठरविता येतो. तथापी विवाह निश्चित पणे कधीहोणार व कोणाशी होणार हे ठामपणे वर्तविने सोपे नाही. त्यासाठी अभ्यासू व अनुभवि ज्योतिषि हवा.
विवाह काळाचे काही नियम
 • गोचर गुरुची मुळचा चंद्र शुक्रावर नजर ( गुरु सर्वसाधारण सर्व ( १२ राशी ) राशी फ़िरण्यास १३ महिने घेत असतो.)
 • गोचर गुरुचे एक दोन पाच सात नऊ व अकरा स्थानात भ्रमण.
 • गोचर राहूचे मुळच्या चंद्र,शुक्र वरुण भ्रमण.
 • सप्ततेसशाशी गोचर गुरुचे योग.
 • शुक्रावंर गोचर शनिची नजर.
 
( महत्वाचा मुद्द म्हणजे शनि-मंगळ युती किंवा सष्टमस्थानात शनी असल्यास प्रेम विवाह किंवा लग्न करताना सावधान राहीले पाहिजे )

 

 

शुक्रवार, २६ ऑगस्ट, २०११

"अणणा" का 'आदर्शलोक' यह कभी एक विशाल मदिरालय था...........आज एक प्रगतिशील गांव है

किन्तु............

वर्ष १९७५ तक विशाल मदिरालय था वह गाव.

हमारी चर्चा का आधार है अण्णा की पुस्तक "रालेगणसिद्धि : एक कायाकल्प'

रालेगणसिद्धि की पिछली यात्रा में पाया था कि अण्णा का आदर्शलोक साकार होने जा रहा है
१९९८ आज में एक वास्तविक आदर्शलोक के प्रत्यक्ष दर्शनों के लिए निकला था...
इस बार रास्ते के पेड उदास थे... अंधे को आंखे मिली, परन्तु...... एक विशिष्ट गांव में पहुचंने के रोमांच का अनुभव नही हुसा...... तपती दोपहर में सडक पर अकेला था......
अतिथी-निवास पर सरकारी तंत्र-सा व्यवहार.... प्रदर्शनी-हॉल... लगा, यह गांव वर्ष १९९४ में अटककर रह गया है...... तपती दोपहरी में पुनः एक वार असली रालेगण जे दर्शनो को अकेला निकलना पडा.. गाव केए गलियों में पेंडों की गैर मोजूदगी बडी खली.... यह कैसा पागल है! का भाव दिखा जन-मन में.. अण्णा का कमरा उअन जैसा ही सादवीपूर्ण था, लेकिन चोर-उचक्कों का भय वहां भी था....
मंदिर-परिसर में भी गंदगी थी...गाव को घेरे नंगे-बूचे पर्वत जल-संग्रहण क्षेत्र के विकास और वृक्षारोपण अभियान पर प्रश्नचिह्न लगाते है
रालेगण का कायाकल्प हुआ है, लेकिन सीमित अर्थो मै
अभी तक का परिर्वतन अण्णा के त्याग और तपस्या का परिणाम् है और ग्रामवासियों के स्वार्थ पर आधारित है....शुक्रवार, १२ ऑगस्ट, २०११

शनिवारची १३/०८/२०११ पोर्णिमा तुम्हीच ठरवा केव्हा राखीबंधना साठी योग्य वेळ????????
॥ श्री ॥
नमस्कार संजीवजी,

आपले ब्लॉग मी नियमित वाचतो.तुम्ही ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्राबद्दल लिहिलेले ब्लॉग खुपच उल्लेखनीय व मार्गदर्शक असतात.

संजीवजी आपण कुंडलीतील द्वितीय स्थानी शनि-मंगळ युती बद्दल ब्लॉगमध्ये लिहावे हि विनंती.
धन्यवाद !

आपला,
संदेश चोरगे
08446407140


fromसंजीव Sanjeev नाईक Naik vastuclass@gmail.com


toSandesh Chorge
date12 August 2011 13:15

subjectRe: आपले अनमोल ब्लॉग

mailed-bygmail.com

hide details 13:15 (18 minutes ago)

संदेश चोरगे

thanksa for your regs..............कुंडलीतील व्दितीयस्थान म्हणाजे धनस्थानांतील मंगळ हा “धनगे कदही” म्हणजे हलक्या अन्नाचा आहार करण्यचा त्या जातकास लावतो. अर्थात् त्यास दारिद्र्यांत ठेवतो, ह्या स्थानातील मंगळ हा त्या जातकाचे दांत फ़ार वाईट अवस्थेत असतात. हा जातक धातूंचा धंदा करणारा, कर्ज काढणारा, जुगार खेळणारा, सह्नशील, शेतकी करणारा व पराक्रम गाजविण्याची फ़ार आवड ठेवणारा असतो. मेषेत असेल तर रक्त वस्तूंपासून , वृषेभेत असेल तर सुवर्णापासून, मिथुनेत चांगल्य वर्णाच्या लोकांअकडून, कर्केत स्वधर्माच्या धंद्यात, सिहेत वाईट आचणाने, कन्येत कर्ज घेऊन, तुलेंत देशत्याग करुन म्हणजे परदेशांत गेल्याने, वृश्चिकेत मित्र व भागीदारांच्या साह्यांने, धनेत बंधुवर्गाच्या वचनापासून, मकरेत गुरुदेवतांच्या आराधनेने, कुंभेत हीन कर्माने व मीनेंत स्वजनाशी वैरभाव ठेवल्याने त्या जातकास धनप्राप्ती होत असते ह्या स्थानातील मंगळ उच्च किंवा स्वगृही असेल तर त्यास चांगला लाभ होतो तो निच असेल तर नुकसान मात्र फ़ार होते या मंगळामुळे त्यास निर्धनत्व दृष्टांचा आश्रयी दयाहीन व कृपण बनावे लागते जातक फ़ार वादशील असतो. धूत खेळणारा व कृशांग राहातो, जातकास मुखपीडा व नेत्रपीडा होत असतेबातील मंडळीकडून सुख-दु:ख विद्येत बक्षिसे, दातृत्व उदारपणा, बायोकांच्या कुंडलीत नव-य़ाचा मुत्यू विधुरावस्था, सौभाग्ययोग, भागीदार व शत्रू यांचा मृत्यू पूर्वर्जित धन गोधन्ब, मृत्युदायक प्रसंग ,भाऊ बंदकीचे वैर, पित्याची विद्या, डावा डोळा, सुवर्णरत्नदिकांची प्राप्ती, द्रव्यसंग्रह किंवा खार्चिक वाणीतील दोष तोतरेपणा वगैरे, आवाज मुलांच्या सासवा ( विहिणी ) संस्कार, शेअर्स गहाणखत, उन्नती किवा यांचा अमंल मान गळा यावर असतो.

कुंडलीतील व्दितीय स्थानात कृत्तिका, रोहिणी मृग ही नक्षत्रे येतात त्या नक्षत्राचे अमंल ह्या मंगळ शनि युतीवर असते . कृतिकेचा मंगळ रोहिणीचा चंद्र, मृगशिर्षेचा मंगळ ह्याचा अंमल कालपुरुषाच्या कुंडलीत होत असतो नुसती युती असून जातकाचे भविष्य सांगता येत नाही ह्या साठी आपण जर जोतिशी असाल किंवा अधिका माहिती आपणास हवी असेल तर आपण रविवारी खालील पत्यावर येऊन प्रत्यक्ष भेटावे ही विनंती

B/301 Vandana Sadana, Manvalpada Road, Virart, East cont No 02505251797 / 9869008263


2011/8/12 Sandesh Chorge <>

संजीव नाईक
वास्तुशास्त्र आणि ज्योतिशास्त्र समोपदेशक