विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा !
मंगळवार, १९ जानेवारी, २०१०
श्री पत्री गणेशाची - पुजा निसर्गाची या २१ प्रकारच्या वनस्पतीची पाने मिळविण्यासाठी तरी निदान गणपती उत्सवाच्या काळात लोक, घराच्या आसपास शेतांमध्ये व जंगलांमध्ये माळरानांवर फिरतात त्यामुळे विशिष्ट झाड कोणत्या ठिकाणी आहे ह्याची त्यांना माहिती होते व अशाप्रकारे प्रत्येक झाडाशी आपले भावनिक नाते जडते.
श्री गणेशाला पुजा करताना लागणारी पत्री
१. मधुमालती २. माका, ३. बेल, ४. पांढर्या दुर्वा, ५. बोर, ६. धोतरा, ७. तुळस. ८. शमी ९. आघाडा, १०. डोरली, ११. कण्हेर, १२. रुई १३. अर्जुन, १४. विष्णुक्रांत, १५. डांळीब, १६. देवदार, १७. पांढरा मरवा, १८. पिंपळ, १९. जाई, २०. केवडा, २१. अगस्ता.
ह्या बद्दल अधिक माहीती साठी श्री प्रकाश काळे मु. मालकरी पाडा- सफाळे, पो. उंबरपाडा, ता. पालघर, जि. ठाणे पिन ४०११०२ ( महाराष्ट्र ) ह्याच्याशी संपर्क साधावा.
संजीव
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा