कलियुगातील कल्पतरु
कलियुगात भक्ताला सत्संग व गुरुसेवा या दोन्हीची प्राप्ती कशी होऊ शकते, या बाबतचा कोणता उपाय श्रीपाद वल्लभांनी सुचविला आहे. हा उपाय श्रद्धा व भक्ती या दोन्हीवर आधारीत असल्यामुळे अर्जुनाला भक्ती व भक्तीमार्ग किती श्रेष्ठ आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी ती १० वा अध्याय प्रथम आपण पाहावा. भक्तीचे महत्वाने दैत्याने देवांनाही मागे टाकले. या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. ज्या भक्त प्रल्हादाला जो मोठेपणा मिळाला तो इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. जात वर्ण, कुळ कुठले ही असो मला प्राप्त करुन घेण्यास एक भक्ती पुरेशी आहे.
या नरसिंह अवताराच्या प्रसंगी जेव्हा नरसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडतात त्यावेळेस त्यांच्या नखांना हिरण्यकश्यपूच्या पोटातील विष लागते. त्यामुळे नरसिंहाना तीव्र दाह होऊ लागतो. तो शांत करण्यासाठी त्याण्च्या मागोमाग आलेली लक्ष्मी त्यांना औदुंबराची फळे आणून देते. नरसिंह आपली दाह शांत वाटू लागते. त्यांचा दाह शांत होतो. दाह शांत झाल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात ते लक्ष्मीला आलिंगन देतात, दोन्ही देव औदुंबरवर प्रसन्न होतात व उभयता औदुंबराला आर्शीवाद देतात.
तया समयी औदुंबरासी ! देती वर हषीकेशी । "सदा फळित तू होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ।
जे जन भजती भक्तीसी । काम्य होय त्वरितेसी । तुज देखतांचि परियेसी । ऐ
उग्र विष शांत होय । जे सेवितील मनुष्य लोक । आखिल काम्य ( सर्व इच्छा ) पावोनी ऐक ।
फळ प्राप्त होय निके ( निश्चित ) । पापवेगळा होय नर । वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता ।
जे नर असतिल दैन्यपिडीता । सेवितां होतील श्रेयायुक्त ( श्रीमंत ) । तुझे छायी बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
अनंत फळ होय ज्ञान । कल्पिले फळ होय त्यासी । तुझे छायी जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथी स्नान करित ।
तितके पुण्य परियेसा । तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसी । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होई परियेसा ।
जे जे कल्पूनि मानसी । तुझ सेविती भावेसी । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तुंचि । सदा वसो तुझपाशी । लक्ष्मीसहीत शांतीसी ।
म्हणोनी वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी । ऐसा वृक्ष औदुंबरु । कलियुगी तोची कल्पतरु ।
त्यानंतर म्हणजे सद् गुरु दत्तात्रय अवताराच्या वेळी सुध्दा जेव्हा जेव्हा त्यांना संताप होत असे त्यावेळेला ते औदुंबराच्या खाली वसल्यामुळे त्यांना शांत वाटत असे. दत्तात्रय अवतारात ब्रह्मा, विष्णु, मेहश भक्तजनांच्या मार्गदशेनासाठी तीर्थाटन करताना त्याचा वास नेहमी औदुंबरखाली असे त्यांच्यामुळे ह्या वृक्षाचे फारच महत्व आहे.
गुरु दत्तात्रयाप्रमाणेच गुरु श्रीपाद वल्लभाचे वास्तव्यही नेहमी औदुंबर वृक्षखालीच असे. अवतार काळी कृष्णा नदीच्याकाठच्या नरसोबाचीवाडी या ठिकाणी अशाच एका औदुंबर वृक्षाखाली त्यांचे वास्तव्य असताना, दररोज दुपारच्यावेळी ६४ योगीनी ( जलदेवता ) नदीचे पात्र दुभंगून अवतीर्ण होत असत. त्या श्रीपाद वल्लभांची प्रथम आरती करुन नंतर ह्या नदीच्या पात्राखाली असलेल्या एका नगरात नेत असत. तेथील लोकही त्यांची पुजाअर्चा करुन नंतर त्या योगिनी गुरुंना वेगवेगळ्या पदार्थाचे भोजन देत व नंतर त्यांची पूजा अर्चा करुन परत त्यांना औदुंबर वृक्षाखाली आणून सोडत. असा क्रम बरेच दिवस चालला होता. काही दिवसानंरत गुरु श्रीपाद वल्लभांना आपल्या पुढील कार्यासाठी गाणगापूरला जाण्याची वेळ जवळ आली. त्यावेळेस या जलदेवातांना फार दु:ख झाले. आपल्या हातून घडणारी गुरुसेवा आता खंडीत होणार, ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्या सर्व गुरुचरणी रडू लागल्या. त्यावेळेस त्यांचे सांत्वन करताना श्रीपादवल्लभांनी त्यांना सांगितले, "मी जरी लौकिक दृष्ट्या गाणगापूरला जात असलो तरी माझा इथे सदैव वास असेल. माझ्याप्रमाणेच तुम्हीही इथे वास करावा व जे भक्त येथे काही इच्छा घेऊन येतील त्यांना तुम्ही सहाय्यभूत व्हावे. त्याच्या दर्शनासाठी मी माझ्या पादुका इथे ठेवत आहे. भक्तांनी त्याचे व औदुंबराचे पूजन करुन औदुंवराला अभिशेक करावा."
त्याचप्रमाणे चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी किंवा संक्रातीच्या महिन्यात भक्तीभावपूर्वक स्नान केल्यावर अनंत अश्र्वमेघ केल्याचे पुण्य मिळेल त्याच प्रमाणे सोमवती अमावस्येला या क्षेत्रात स्नान केल्यामुळे खुर व शिंगे सोन्याने मढवीन सहस्त्र कपिल गायी ब्राम्हणाला गंगातीरी दान केल्याचे फळ मिळेल. त्याचप्रमाणे एका ब्राम्हणाला आपण जेवू घातल्यास एक कोटी ब्राम्हणाना भोजन दिल्याचे फळ मिळेल्.औदुंबर वृक्षतळी जप अथवा होम केल्यास ( या ठिकाणी अग्निहोत्रासारखा सोपा होम करावा. ) रुद्र जपोनी - एकादशी ( एकादशिनीचा विधी बहुतेक वे़ळा ब्राम्हण बोलवून करतात ) रुद्र जपसाठी रुद्र गायत्री मंत्र ॐ श्री तत्पुरुक्षाय विदमहे महादेवाय धिमही तन्नो रुद्रा प्रचोदयात.' रुद्र हा प्राणवाचक शब्द आहे. या जपाला सुरवात करावयाच्या आधी जम्त असल्यास कपालभाती व प्राणायाम करावा. जप झाल्यावर फक्त प्राणायाम करावा. त्याच प्रमाणे मंदगतीने प्रदक्षिणा घातल्यास पदोपदी वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते. असे गुरु श्रीपाद वल्लभांनी चौसष्ट योगिनींना औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले व नंतर ते औदुंबर वृक्षाखालीच गाणगापूरात प्रकट होण्यासाठी अंतर्धान पावले.
आधिच्या प्रकरणार शेवटी सांगितल्याप्रमाणे कलियुगातील भक्ताला सत्संग व गुरु सेवा प्राप्त करुन घेण्याचा उपाय गुरुचरित्रातील १९ व्या अध्यायात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत निर्देश केलेला आहे. तो म्हणजे गुरु श्रीपाद वल्लभांच्या नरसोबाच्या वाडीतील औदुंबराअचे प्रतिक म्हणून औदुंबर वृक्षाचे छोटेसे रोप रोपवटिकेमधून विकत आणणे हा होय.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत दिलेल्या सुचनेचा अवलंब लगेचच करण्यात आला होता. त्या काळी बहुतेकांच्या अंगणात, शेतामध्ये, अथवा जागा असेक तेथे हा वृक्ष औदुंबर क्षेत्राचे प्रतिक म्हणून, गुरु दत्तात्रयाचा वास असतो या भावनेने त्याची पूर्जाअर्चा होऊ लागली होती.
कालांतराने नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे सारख्या शहरांची वस्ती वाढू लागली. विभक्त कुटुंब पध्दती प्रचलित होऊ लागली. शहरात जागेची टंचाई असल्यामुळे औदुंबर वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कलीच्या प्रभावाने तर हळूह्ळू हा वृक्ष फारच दुर्मिळ होऊ लागला. परंतु आता सत्संग व गुरुसेवेची प्राप्ती करुन घेण्यासाठी, आपण जसे प्रत्यक्ष गणपतीलाच घरी आणत आहोत या भावनेने गणेशेउत्सवाच्या वेळी जसा आपण गणपती आणतो. त्याचप्रमाणे आपण प्रत्यक्ष सद् गुरु दत्तात्रयांना श्रीपादवल्लभांना विभूती रुअपाने म्हणजेच औदुंबरच्या रुपाने घरी घेऊन येत आहोत या भावनेने छोटे रोप नर्सरीमधून आणावयाचे आहे.
नर्सरी मधून या रोपाबरोबरच बिना खत मिश्रीत माती व शेणखत घेऊन यावे. औदूंबराचे रोप घरात आणल्यावर त्याची माती बदलून टाकावी व मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये नवीन आणलेल्या मातीमध्ये थोडे शेणखत मिसळून हे औदुंबराचे छोटे रोप लावावे. आपल्या इतर इन डोअर फ्लॅट प्रमाणे त्यास सकाळ संध्याकाळ अर्धा तास ऊन द्यावे. ( दोन्ही वेळा ऊन जमत नसल्यास एक वेळ तरी ऊन द्यावे किंवा ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावे ) हे छोटे रोप बोनसाय वगैरे करण्याचा कुठलाही प्रयोग न करता मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये ज्याप्रमाणे आपण हल्ली नारळाचे इन डोअर फ्लॅट ठेवतो, त्याप्रमाणे तीन चार वर्षे पर्यंत हा छोटा कल्पतरु वास्तूमध्ये सहज ठेवू शकतो. तीन वर्षानंतर फारच मोठे होत आहे असे जाणवू लागल्यास; आपल्या गावाकडील घरात, अथवा एखाद्या मंदिरात वगैरे व्यवस्थित लावून टाकावे आपल्या घरासाठी नवीन रोप घेऊन यावे. रोप घरी आणल्यानंतर चार आठ दिवसांनी शुद्ध प्रतिपदा, सोमवार, गुरुवार, संकष्टी अशा एखाद्या चांगल्या दिवशी या वृक्षाची आपल्या घरातील देवाबरोबर प्रथम पूजा करावी. त्या दिवशी ही औदुंबराची कुंडी एखाद्या थाळी अथवा ट्रे मधे ठेवून त्यास पळीने अभिषेक करावा, तुपाचे निरांजन ओवाळून कापूर, उत्तबत्ती वगैरे लावून गणपतीची, पांडुरंगाची व दत्ताची अशा आरत्या म्हणाव्यात.
कामाच्या गडबडीत, बाहेर गाची जाताना, जेव्हा जेव्हा आपल्या घरातील देवच्या पूजेला दांडी असेल, त्या दिवशी व इतर दिवशीही ज्या प्रमाणे आपण आपल्या इतर इन डोअर फ्लँटची काळजी घेतो त्याप्रमाणे काळ्जी घ्यायची आहे. या वृक्षासाठी काही कडक सोव्ळे ओवळ वगैरे न पाळता मनात श्रध्दा भाव व सहजता ठेवावी. शक्यतो गुरुवारी संध्याकाळी किंवा जेवणाच्या आधी गणपतीची व दत्ताची आरती म्हणावी, जमल्यास सणावाराला अभिषेक करावा. पाने स्वच्छ करावीत दोन मिनिटे शांत बसून नंतर चार पाच मनाचे श्लोक म्हणावे एवढ्या उपायांनीही सत्संगाचा लाभ मिळेल. अभिषेक आरते या साधनानी सद् गुरु सेवा घडेल.
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लागे दोषु । धैर्य धरोनी अंतकरण । शुध्द बुध्दी वर्तती जन । दोष न लागती कधी जाण । गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुला न लागे दोषु ( गुरु २ रा )
वर ब्रह्मदेवांनी कलीला सांगितल्याप्रमाणे एकादा घरात गुरुसेवा सुरु झाली की, त्याघरात कलीचा प्रभाव पडू शकत नाही. आपल्या व आपल्या कुटुंबियाच्या अंतकरणात धैर्य आपोआप निर्माण होऊ लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. वास्तूशास्त्र ज्याकडे आपण वास्तूची प्रसन्नता व शांती या हेतूने वळतो तो हेतू कुठलीही भींत न फोडता, स्वयंपाकाचा ओटा कुठेही न हालवता साध्य करता येईल.
ज्याच्या घरात पाळणा हलत नसेल त्यांनी आपल्या घरात जरुर औदुंबर लावावा व त्यास रोज १०८ प्रदक्षिणा घालाव्यात, तसेच श्री गुरुचरीत्राच्या २२ व्या अध्यायाचे रोज पारायण रावे. सुख आणि समृद्धी साठी ह्या वृक्षा समोर गुरुचरित्राचे पारायण करावे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा