बुधवार, २० जानेवारी, २०१०

श्री पंत ( http://dhondopant.blogspot.com/ ) याच्या विनंतीला मान देऊन शोध 'मंत्र पुष्पांजलीच्या' मराठी भाषांतराच्या शोधात असताना सापडलेला दुवा मी आपल्या माहीती साठी देत आहे. ’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य) गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्‍यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्‍या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्‍या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते. मध्यंतरी आमचा एका तरूण मित्र राममोहन याला अचानक साक्षात्कार झाला आणि हा प्रश्न मनात आला की आपण आयुष्यभर वारंवार ईश्वराला उद्देशून म्हणत आलेल्या या प्रार्थनेचा अर्थ काय? त्याने आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हा प्रश्न रिंगणात टाकला. आम्ही सर्व मित्रांनी खूप प्रयत्न केले, महाजालावर तपासले, पण समाधानकारक अर्थ काही सापडला नाही. शेवटी आमच्यापैकी सर्वाधिक वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध मित्र म्हणजे प्रा० राईलकर यांनी त्यांच्या गावचे (चौलचे) बालपणीपासूनचे मित्र प्रा० मा० ना० आचार्य यांच्याकडून तो अर्थ मिळवला. प्रा० आचार्य संस्कृत आणि मराठीचे प्राध्यापक होते आणि दोन्ही भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व आहे. संस्कृतमधील अनेक पुरातन ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असून त्यातील काहींवर त्यांनी लिहिलेल्या टीकात्मक लेखांचे संस्कृत तज्ज्ञांनीही कौतुक केलेले आहे. मंत्रपुष्पांजलीच्या त्यांनी विशद केलेल्या अर्थाच्या छोट्याशा टिपणावरूनसुद्धा त्यांची कुशाग्र बुद्धी, त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन तिचा उलगडा करण्याचा स्वभाव यांची चुणूक दिसून येते. संस्कृत भाषेची आवड आणि आपल्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा-प्रेम-अभिमान असणार्‍या मंडळींना हे टिपण नक्कीच आवडेल. प्रा० मा० ना० आचार्य यांनी प्रस्तुत केलेला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ खालील दुव्यावर पहावा. किंवा चित्रावर टिचकी मारावी http://amrutmanthan.files.wordpress.com/2009/11/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a4aee0a482e0a4a4e0a58de0a4b0e0a4aae0a581e0a4b7e0a58de0a4aae0a4bee0a482e0a49ce0a4b2.pdf

मंगळवार, १९ जानेवारी, २०१०

श्री पत्री गणेशाची - पुजा निसर्गाची या २१ प्रकारच्या वनस्पतीची पाने मिळविण्यासाठी तरी निदान गणपती उत्सवाच्या काळात लोक, घराच्या आसपास शेतांमध्ये व जंगलांमध्ये माळरानांवर फिरतात त्यामुळे विशिष्ट झाड कोणत्या ठिकाणी आहे ह्याची त्यांना माहिती होते व अशाप्रकारे प्रत्येक झाडाशी आपले भावनिक नाते जडते. श्री गणेशाला पुजा करताना लागणारी पत्री १. मधुमालती २. माका, ३. बेल, ४. पांढर्‍या दुर्वा, ५. बोर, ६. धोतरा, ७. तुळस. ८. शमी ९. आघाडा, १०. डोरली, ११. कण्हेर, १२. रुई १३. अर्जुन, १४. विष्णुक्रांत, १५. डांळीब, १६. देवदार, १७. पांढरा मरवा, १८. पिंपळ, १९. जाई, २०. केवडा, २१. अगस्ता. ह्या बद्दल अधिक माहीती साठी श्री प्रकाश काळे मु. मालकरी पाडा- सफाळे, पो. उंबरपाडा, ता. पालघर, जि. ठाणे पिन ४०११०२ ( महाराष्ट्र ) ह्याच्याशी संपर्क साधावा. संजीव

रविवार, १० जानेवारी, २०१०

राहू व केतू या दोन छेदन बिदूंना फलज्योतिषात तसेच कुष्णमूर्ती शास्त्रात ग्रहांना फार महत्व असते. पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षा ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूना राहू व केतू अशी संज्ञा दिलेली आहे. राहू व केतू कडे फलज्योतिषांत काही विशिष्ट गोष्टींची जबाबदारी सोपवली आहे. ह्याचा फायदा किंवा तोटा यांचा विचार करून जर का आपण ह्या संधीचा योग्य फायदा करुन घेतला तर जिवनात आपल्याला फार मोठे मानाचे स्थान प्राप्त होईल. सर्वसाधारण आपल्याला कालसर्प योगा बध्दल माहीती असेल किंवा नसेल पण कालसर्पयोग आपल्या जिवनातील अनेक शुभगोष्टी साठी फार महत्त्व पुर्ण मानला जातो. राहू केतू या ग्रहांचा विचार करता अमृत प्रांशनासाठी देवांच्या रांगेत बसलेल्या विधुवंत राक्षसाचा श्री विष्णूने शिरच्छेद केला. त्यानंतर त्याचे धड राहिले देवतांच्या रांगेत तोच नवग्रहातील केतू ग्रह, राहूचे मित्र बुध, शनि, शुक्र, तर केतूचे मित्र रवी, चंद्र, मंगळ गुरु. कालपुरुषाच्या कुंडलीत ह्या दोन छेदन बिंदू पासून जर रेषा ओढली तर त्या रेषेला राहू केतू अक्ष असे म्हणावे लागेल. या अक्षाच्या एकाच बाजूला म्हणजेच राहू ते केतू किंवा केतू ते राहू पर्यंत ग्रह असतील तर त्यास ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग म्हणतात. शुन्य अंश ते १८० अंश ह्या मध्ये जर का रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि असे एका रांगेणे ग्रह आले तर त्याला ज्योतिषाच्या भाषेत ग्रहमाला योग असे म्हणतात. जसे गायन वादनात सात स्वर असतात तसेच ग्रहाच्या ग्रहमालेत सात ग्रह एका पाठेपाठ आले तर त्याला ग्रहमाला योग असे म्हणतात. ह्याच योगाला जोतिषाच्या भाषेत "कालर्सप योग" असे म्हणता. जसे संगीतात शेवटी "सा" येतो तसाच कालसर्प योगात "सा" म्हणजे राहू किंवा केतू तो कसा जरी आला तरी तो शेवटीचा किंवा पहीला "सा" तरीपण कालसर्प या योगाची भीती जनमानसात रुढ झाली आहे. संगीतात रागाचा चढ-उतार हा आहे त्या प्रमाणे प्रकृतीचा सुद्घा चढ-उतार हा धर्म आहे. तसाच धर्म या कालर्सप योगाचा भूतलावरील प्रत्येक जातकास त्याचा अनुभव घावा लागतो. या कालसर्प योगाचा विचार केला तर भावानुसार बारा आणि लग्नबिंदूनुसार बारा १२ X १२ = १४४ उदित भागातील सर्प योगानुसार १४४ आणि अनुदित भागातील सर्प योगानुसारही १४४ असे २८८ प्रकारचे सर्प योग आकारास येतात. जेव्हा सर्प योग राहूपासून केतूपर्यत या अवस्थेत असतो तेव्हा त्याला उदित गोलार्धातील सर्पयोग म्हणतात व केतूपासून राहूपर्यत असा सर्पयोग असतो त्याला अनुदित गोलार्धातील सर्पयोग म्हणतात. जर राहू-केतू मधून एखादाच ग्रह बाहेर असेल तर त्याला अर्धसर्प योग म्हणतात २८८ X ७ = २०१६ प्रकारचे अंशतः कालसर्प योग बनतात. कालसर्प योग हा नवग्रहातील राहू-केतूमुळे आकारास येतो. राहू, केतू हे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणित सिद्ध बिंदू आहेत. चंद्राची रवी भोवती क्रांतिवृत्तामधून फिरण्याची कक्षा सर्पकार असल्याने त्या कक्षेमधील चलन पावणारे हे पात बिंदू असल्यामुळे या राहू व केतूंना सर्पाकार मानले आहे राहूला सर्पाचे तोंड व केतूला सर्पाची शेपटी असे समजले जाते. सर्पाचे तोंड हे ग्रहणकाली भयानक दिसते व त्याच्या शेपटीत तडाखा मारण्याची प्रचंड शक्ति असते. म्हणून ग्रहण काळात जन्म झालेला असल्यास राहू-केतू बरोबर असणार्‍या ग्रहांचे अशुभ फल भोगावे लागते. अन्यथा इतर वेळी हाच राहू ऐश्वर्यकारक व केतू मुक्तिकारक म्हणून काम करतो. कालसर्प योगाचा उल्लेख पाराशरी, सारावली, सर्वार्थ चिंतामणी अशा काही ग्रंथामध्ये ह्या योगा संबधी अधिक माहीती मिळते तसेच श्री व सौ बेलसरे या दोघा उभयतांनी ह्य संबधी बरेच संशोधन केले आहे. तसेच त्याचे लेख ग्रहांकित दिवाळी अंक २००९ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. कुंडलीच्या १२ स्थानातून १२ प्रकारचे कालसर्प योग तयार होतात ते खालील प्रमाणे आहेत. १२ प्रकारच्या कालसर्प योगाचे प्रकार आणि त्याचे परिणाम   कालसर्पाचे प्रकार  राहू- केतूचे स्थान परिणाम १.अनंत कालसर्प योग लग्न - सप्तम ( १ आणि ७ ) अतिशय संघर्ष, मानसिक अशांतता. २.कुलिक कालसर्प योग धन - अष्टम स्थान ( २ आणि ८ ) पैशाचा अपव्यय अधिक, बोलण्यात कटुता, कौटुंबिक भांडणे, अंतदु:खात ३.वासुकी कालसर्प योग तृतीया - नवम ( ३ आणि ९ ) भावंडाना कष्टदायक, मित्रांमुळे नुकसान, भाग्योदयात अडथळे. ४.शंखपाल कालसर्प योग चतुर्थ - दशम ( ४ आणि १० ) संतती नसणे, गुंतवणुकीमुळे नुकसान, नोकरी-उद्योगात नुकसान. ६. महापद्म कालसर्प योग पष्ठ - व्यय ( ६ आणि १२ ) बिंधास्तपणा, नेहमीच जिंकण्याची वृत्ती, शत्रूंना भय, पैशाची उधळण. ७. तक्षक कालसर्प योग सप्तम - लग्न ( ७ आणि १ ) वैवाहिक जीवनात अशांतता स्वतःचे म्हणे खरे करण्याची वृत्ती. ८. कार्केटक कालसर्प योग अष्टम - धन ( ८ आणि २ ) वंश परंपरागत धन मिळण्यासाठी भांडणे, आयुष्यात दुर्घटना अधिक, धननाश ९. शंखचुड कालसर्प योग नवम - तृतीय ( ९ आणि ३ ) भाग्यवृध्दीत अडचणी, वंशवेल वाढवण्यात बाधा, प्रगती नाही. १०. घातक कालसर्प योग दशम - चतुर्थ ( १० आणि ४ ) आई-वडिकांपासून दूरत्व, व्यवसायापेक्षा नोकरीत यश. ११. विशधर कालसर्प योग लाभ - पंचम ( ११ आणि ५ ) संघर्षमय सामाजिक जीवन, राजकारणाची विशेष आवड, अभ्यासात उत्तम प्रगती. १२. शेषनाग कालसर्प योग व्यय - षष्ठ ( १२ आणि ६ ) गुप्त शत्रूंपासून त्रासझ, आजारांचे निश्चित कारण न कळणे, बदनामी होणे. कालसर्प योगात राहू या ग्रहाला महत्त्व दिले आहे. राहू गुरुप्रमाणे द्वितीय, पंचम, सप्तम, नवम या स्थानावर दृष्टी टाकतो. त्यामुळे कालसर्प योगात राहूच्या दृष्टीचा स्थानंच्या फलितावर परिणाम होऊन त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टीत प्रंचड वाढ होते किंवा गडबड घोटाळा निर्माण होतो. उलट केतूने दर्शविलेल्या स्थानाचे अशुभ फलित मिळते. काही व्यक्तिच्या कुंडलीत हा कालसर्पयोग किती महत्त्वाचा आहे ते आपण अभ्यासून पाहावे. काही व्यक्तिची नावे देत आहे. कुलिक कालसर्प योग एडवर्ड हे ६० व्या वर्षी इंग्लंडच्या राज्य सिंहासनावर बसले. राजेश पायलट जन्म गरीब घरण्यात झाला. अतिशय संघर्षमय परिस्थितीत त्यांनी वायुसेनेत प्रवेश मि़ळवला. नंतर राजकरणात प्रवेश करुन केंद्रिय मंत्रीपद मिळवले. धनस्थानातील राहू ऐश्वर्य प्रदान करु शकतो तर धन स्थानातील केतू माणसाला गरिबीत ढकलतो. या नियमामुळे राजेश पायलट गरिबीतून वर आले इतकेच नाही तर ते उच्च अशा आर्थिक स्थितीत पोचले सुध्दा परंतु केतूने आपल्या अष्टम स्थानातील प्रताप त्यांना दाखविला त्याचा दुर्घटनामय मृत्यू झाला. शंखपाल कालसर्प योग हर्षद मेहता राहू चतुर्थात आणि केतू दशमात दशमातील केतू मुळे स्वतःनेच रचलेल्या मायाजालात तो फसला. दशम स्थानातील केतुचे अशुभ फलित त्यास कारणीभूत ठरली त्याच्या विरुध्द सचिन तेंडुलकर याच्या पत्रिकेत शंखपाल कालसर्प योग आहे. राहूमुळे स्वकर्तृत्वाने क्रिकेट विश्वात यश आणि प्रसिद्धी मिळून शकला. परंतु दशमातील केतूमुळे त्याला अनेकदा अपयशही आले आहे. पद्म कालसर्प योग सर दोराबाजी टाटा पंचम स्थानातील राहूच्या शुभ फलितामुळे हे साते घडत आहे हे निर्विवाद सत्य असले तरी कधी कधी भासणारी पैशाची चणचण, समाजात वावरताना येणारी बंधने यासारखी लाभस्थानाच्या फलितातील कमतरता, या पत्रिकेत केतू लाभस्थानात असल्याने दिसते. नेल्सन मंडेला यांच्या कुंडलीतही हा पद्म कालसर्प योग आहे. केतू सामाजिक पतमध्ये चढ-उतार दर्शवतो. महापद्म कालसर्प योग थोर ज्योतिषी बी. रमण यांचे आजोबा पंडित सूर्यनारायण व्यास यांच्या कुंडलीत हा कालसर्प योग आहे वासुकी कालसर्प योग उद्योगपती धिरुभाई अंबानी यांच्या कुंडलीत राहू तृतीया स्थानी. अत्यंत गरिबीतून वाटचाल करीत धिरुभाई आणि कोकिलबेन उद्योगविश्वात अत्यंत उच्चपदी आरुढ झाले. केतूमूळे नशिबाची पुण्यसंचयाची पुंजी कमी असल्याने लहानपण गरिबीत गेले. कारण कालसर्पयोगात केतू ज्या स्थानात असेल त्या स्थानात फलितामध्ये कमतरता येते. शंखपाल कालसर्प योग हर्षद मेहता राहू चतुर्थात आणि केतू दशमात दशमातील केतू मुळे स्वतःनेच रचलेल्या मायाजालात तो फसला. दशम स्थानातील केतुचे अशुभ फलित त्यास कारणीभूत ठरली त्याच्या विरुध्द सचिन तेंडुलकर याच्या पत्रिकेत शंखपाल कालसर्प योग आहे. राहूमुळे स्वकर्तृत्वाने क्रिकेट विश्वात यश आणि प्रसिद्धी मिळून शकला. परंतु दशमातील केतूमुळे त्याला अनेकदा अपयशही आले आहे. पद्म कालसर्प योग सर दोराबाजी टाटा पंचम स्थानातील राहूच्या शुभ फलितामुळे हे साते घडत आहे हे निर्विवाद सत्य असले तरी कधी कधी भासणारी पैशाची चणचण, समाजात वावरताना येणारी बंधने यासारखी लाभस्थानाच्या फलितातील कमतरता, या पत्रिकेत केतू लाभस्थानात असल्याने दिसते. नेल्सन मंडेला यांच्या कुंडलीतही हा पद्म कालसर्प योग आहे. केतू सामाजिक पतमध्ये चढ-उतार दर्शवतो. महापद्म कालसर्प योग थोर ज्योतिषी बी. रमण यांचे आजोबा पंडित सूर्यनारायण व्यास यांच्या कुंडलीत हा कालसर्प योग आहे.  त्याच्या कुंडलीत राहू षष्ठतून म्हणजे प्रतिस्पर्धा भावातून दशमकर्म द्वादश व्यय उलाढाल आणि द्वितीय म्हणजे उच्चशिक्षणाच्या स्थानावर दृष्टी टाकतो. याचे फलित म्हणजे पंडित सूर्यनारायण व्यास यांनी उज्जैनसारख्या छोट्या गावात राहून विक्रम विश्व विद्यालय, विक्रम कीर्ती मंदिर, सिंधीया प्राच्याविद्या शोध प्रतिष्ठान आणि कालिदार अ‍ॅकॅडमी यासारखा महान संस्थाची स्थापना केली इत्यादी... परंतु व्यय स्थानातील केतूमुळे स्वतःसाठी काहीच गुंतवणूक करता आली नाही. तक्षक कालसर्प योग सम्राट अकबर याच्या कुंडलीत असायोग होता त्याच्या कुंडलीतील राहू हा नव्या कल्पना आकारास आणणारा ग्रह असल्याने जनता व राज्याच्या उन्नतीसाठी अकबर बादशाहा स्वतः अनेक प्रगतीपर गोष्टीची आखणी करत. पण केतूमुळे यशस्वी सम्राट असलेल्या अकबराचे लहानपण मात्र अत्यंत हलाखीत व वैभहीन गेले. त्याच बरोबर कौटूंबिक कटकटीनाही त्यांना तोंड द्यावे लागले. धर्म आणि तत्त्वनिष्ठेमुळे सलीम आणि जोधाबाई यांच्याबरोबर त्यांचे मतभेद सर्वाना माहीत आहेत. कार्कोटक कालसर्प योग प्रसिध्द अभिनेत्री स्मिता पाटील तीच्या कुंडलीत राहू अष्टमात मृत्यू स्थानत होता. केतू धनस्थानात त्याची दुष्टी बघितली तर परधर्मीय व्यक्तिबरोबर विवाह. राहूने आपले कार्य केले व तिला उत्तम अभिनेत्री बनविले परंतु केतुमाहाराजाने तीला सारी सुखे जवळ असताना काही खाऊ दिले नाही तीचा मृत्यू लवकर आला. ( कुंडली पाहून नंतरच राहू व केतूची फळे बघावित नाहीतर नसता गैरसमज होईल ) शंखचूड कालसर्प योग नवम स्थानात राहू व तृतीय स्थानात केतू श्रीराम कथाकार श्री मुरारी बापू च्या कुंडलीत हा योग आहे. अब्राहम लिंकन संसारी असूनही त्यांचे जिवन समाजासाठी खर्च होते. पण केतू मुळे मुत्यू कसा होईल ते सांगता येणार नाही आश्चर्यकारक घटना घडुशकतात.   घातक / पातक लाकसर्प योग दशम स्थानात राहू व चतुर्थ स्थानात केतू ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर दुसर्‍यास उत्तम मार्गदर्शन करुन प्रगतीपथावर चालावयास लावणे. त्याच्या कुंडलीत शश योगाचे फलित म्हणजे कार्यात वाढ झाल्यावर वैयक्तिक जीवनात अधिक लक्ष न देता येणे, परंतु दशमतील राहू हा छत्रधारी असल्याने तो राजकारणी लोकांना शुभ फलित प्रदान करतो. चतुर्थातील केतू मु़ए सुखाचा उपभोग कमी दर्शवितो. विषधर कालसर्प योग एकादश स्थानात राहू व पंचम स्थानात केतू असेल तर हा योग होतो कॉग्रेसचे जेष्ठ नेते श्री नारायण दत्त तिवारी सुरुवातीला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बनलेले पुढे केंद्रिय मंत्रिमंडळात मंत्री झाले. सतत राजनैतिक संकटांचा सामना करावा लागत आहे. दुसरे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जॉर्ज ड्ब्ल्यू बुश ह्या दोघांनी अस्तित्व अबाधित राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या या कारकितर्तीत घेतलेले निर्ण्य स्तुत्य म्हणावे लागतील. शेषनाग कालसर्प योग व्यय स्थानी राहू व षष्ठात केतू हा योग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कुंडलीत हा योग प्रामुखाने अभ्यास करण्या सारखा आहे. पुत्र संतती झाली नाही. पत्नीही लवकर सोडून गेली जावयाकडुन दु:ख देशासाठी अनेक वेळा तुरुंगावास झाला. आजकाल सर्वजन कालसर्प योगाची शांती करण्याचा सल्ला देतात. परंतु हाच कालसर्प योग आपल्याला उच्च स्थानाला घेऊन जात असतो. शांती करण्या पेक्षा ह्या योगाची चागली फळे कशी मिळविता येतील याची अधिक माहीती आपल्या ज्योतिष सल्लागारा कडुन घ्या ही विनंती. तसेच आपली दशा आणि वास्तू सुध्दा आपल्याला सर्व गोष्टीचा लाभ मिळविण्यास कारणीभुत होत असते ह्याची जाणिव सुध्दा लक्षात राहु द्या. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच कालसर्प योगाचेही आहे. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे जसा अशुभ कालसर्प योग तयार होतो तसा शुभ योग सुध्दा तयार होतो. कुंडलीत सर्पयोग आकारस आल्यावर ग्रह जर राहूच्या मुखात ( राहूकडे ) जात असतील आणि मुखात जाणारा पहिला ग्रह हा त्याच्या मित्र गटातील म्हणजे बुध, शुक्र, शनि यापैकी एक असेल तर तो शुभ मालायोग होतो हे लक्षात घेतले पाहीजे. संजीव

मंगळवार, ८ डिसेंबर, २००९

 कुंडली आणि वास्तु


आकृतीत दाखवल्या प्रमाणे जातकाची चंद्ररास मकर असून सुर्यरास (पाश्चात) धनु आहे. जेव्हा जातक आपली कुंडली घेऊन येतो तेव्हा आपण त्यांच्या कुंडलीच्या आधारे जातकाच्या वास्तुचे परीक्षण करावे लागते. श्री सहस्त्रबुध्दे ह्यांनी ह्याविषयी बरेच संशोधन करुन एक ग्रंथ लिहला आहे. आज आपण एका जातकाच्या कुंडलीची त्याच्या वास्तुशी सांगड घालणार आहोत.




दिलेल्या कुंडलीच्या आधारे आपण जातकाचे सुख-दुखः पाहु.

१. लग्न मिथुन लग्नस्वामी सप्तमात मंगळ + रवी + केतु युक्त म्हणजे त्याची सप्तमात दुष्टी लग्नात आहे. राहु लग्नी म्हणजे पुर्वभाग दुषित किंवा बंद आहे.

२. लग्नीराहु म्हणजे पुर्व-ईशान्य, पुर्व, पुर्व आग्नेय भागात संडास, बाथरुम नक्की असणार.

३. धनेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त राहाते घरची कमी जागा पण इतर जागा जास्त असणार. शनी मुळे बाह्य जागा बिल्डींगचे कंपाऊड यांचे (र्माझिन) अंतर पश्चिम व पुर्व बाजुस कमी असणार आहे.

४. द्वितीयेश सप्तमात मंगळ + बुध + केतु अधिक हर्षल + प्लुटो युक्त घराला उत्तर ते पुर्व दिशेला अनेक कट असणार.

५. चतुर्थ स्थान चंद्रनाडीच्या प्रभावाखाली येत असल्याने व त्याचा राशीस्वामी बुध, मंगळ + केतु युक्त झाल्याने दशमातील स्वगृही गुरु त्यांची चतुर्थात सातवी दुष्टी घराच्या उत्तरेस मंदीर असणार किंवा घरातुन मंदिर दर्शन होणार.

६. तसेच चतुर्थची बुधरास व गुरुची सप्तमात दुष्टी असल्याने मुख्य करुन घराचे प्रवेश व्दार उत्तरेस आणि संकुलाचे मुख्य प्रवेश द्वार दक्षिणेस असणार व मुख्य जीना पश्चिमे कडुन पुर्वकडे असणार कारण कु़ंडलीचा चंद्र मकर राशीत आहे. मकर शनी प्रधान रास असल्याने जीना पश्चिमेस असणार.

७. पंचमातील राशीस्वामी (शुक्र) पंचमेश अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त म्हणजे पश्चिम दिशा मोकळी, तेथे कचरा, झाडे-झुडपे, गटार असण्याची जास्त शक्यता आहे. तसेच घर गच्चीवर असण्याची जास्त शक्यता आहे.

८. सप्तम स्थांनात मंगळ + रवी + केतु + बुध सप्तमेश दशमस्थानात स्वगृही म्हणजे पश्चिम दिशा मोकळी तसेच पश्चिमेचा रवीचे किरणे पश्चिमे कडुन घरात प्रवेश. व पश्चिमेत खिडक्या असणार.

९. अष्टमेश अष्टमात शुक्र + चंद्र युक्त घरात सर्व प्रकारच्या सुखसोई असणार पण त्याचा योग्य उपभेग जातकाला स्वता: न मिळता त्याच्या परिवाराला मिळेल.

१०. भाग्येश शनी अष्टमात शुक्र + चंद्र युक्त भाग्येश च्या व्ययात भागेश म्हणजे घरातील सर्व पैसा घरातील सुखसोईवर खर्च झालेला असेल. शिल्लक राहाणार नाही. तसेच घरामधील सर्व उपकरणे जरुरी पेक्षा अधिक असणार त्यामुळे सुध्दा खर्च अधिक प्रमाणात होईल.

११. कार्यस्थानातील गुरु मुळे खर्चजरी जास्त झाला तरी आवकसुध्दा व्यवस्थित असणार, दशमातील गुरु स्वराशीचा स्वगूही जातकाच्या घरात कधीही काहीही कमी पडु देत नाही.

कारण दक्षिणेच्या सुर्यनाडीतील गुरु स्वराशीत बसल्याने चंद्रनाडीचे दोष गुरुकृपेने कमी होतात. तसेच घरात व परिवारात गुरुसेवा परपरा असणार.

१२. लाभेश सप्तमात रवी + बुध + केतु युक्त घरचा मालकच्या सप्तमात मंगळ + रवी + बुध + केतु म्हणजे जातकाच्या पती/पत्नी चा स्वभाव रागीट पण बुधामुळे मनमिळावू कतृत्वशील, रवीमुळे सदासर्वदा कार्यरत, केतुमुळे गुरुसेवा + धार्मिकसेवा करणार असणारा आहे.

१३. व्यायातील वृषभ राशीचा स्वामी अष्टमात शनी + चंद्र + शुक्र युक्त घरातील स्वयपाकघरात अन्नजास्त शिजवत जात असणार, अन्न विपुल प्रमाणात ( चंद्र+शुक्र ), शनीमुळे त्यातील काही भागाची नाशाडी होण्याची शक्यता आहे. पण ह्या जागी शिजवलेले अन्न फार रुचकर आणि स्वादिष्ट मनाला तृप्त करणारे तसेच दहाजणाचा स्वयपाक वीस जणाना पुरेल इतका वरद हस्त दक्षिणेच्या गुरु व सप्तमातील व अष्टमातील ग्रहा मुळे अनुभवास येणार.

१४. सप्तमातील व अष्टमातील ग्रहाची संख्या दाटीवटीने असल्याने जातकाची जागाफार कमी असणार पण जातक त्याजागेत आंनदाने राहात असणार.

वास्तुस्थितीत जातकाचे घर :-

१. बिल्डींगचे प्रवेश द्वार दक्षिणे कडे आहे.

२. घराचे प्रवेशव्दार उत्तरे कडे आहे.

३. ईशान्य ते उत्तर भागातुन मंदिराचे दर्शन होते.

४. ईशान्य पुर्व भागात बांथरुम व पुर्व आग्नेय भागात संडास आहे.

५. अग्नेय दक्षिण भागार स्वयपाक घर आहे.

६. चंद्रराशी स्वामी शनी व दक्षिणेचा गुरु असल्याने दक्षिण पश्चिम या स्थांनात देवघर असणार ( ज्या स्थांनात गुरु असतो त्या स्थांनात मुख्य करुन जातकाचे देवघर असते. )

७. घराचे क्षेत्रफळ ३८५ फुट आहे. तसेच जातकाचे घर सर्व सोईयुक्त व वातानुकुलीत आहे.

८. ईशान्य ते वायव्य पश्चिमेकडील घराबाहेरचा सर्व भाग मोकळा आहे. जातकाला गच्चीचा हा भाग मिळालेला आहे तसेच बिल्डींगच्या बाहेर सुध्दा मोकळे पंटागण आहे.

९. पश्चिमेस कचरा, व झाडेझुडपे आहेत. तसेच त्यामध्ये गटाराचे पाणी सोडलेले आहे.

१०. दक्षिणेला गेटच्या बाजुला कचरा कुंडी आहे.

९. जातकाचे घर गच्चीत आहे व ते संकुलाच्या दक्षिण प्रभागात आहे.

१०. जातकाचे घर विदिशेत आहे.

इतर अनेक गोष्टी आपणास जातकाच्या घरी नजाता कुंडली वरुन पाहाता येतात. वेळे अभावी जास्त लिहत नाही. चुकाची दुरुस्ति करुन घ्यावी

संजीव

रविवार, २२ नोव्हेंबर, २००९

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास

ग्रहांच्या परिभ्रमण पध्दतिचा अभ्यास


           ज्योतिषशास्त्रामध्ये कालानिर्णयपध्दति जर समजेल तरच फ़ल-ज्योतिषाचे महत्व आहे नाही तर हे शास्त्र हस्तसामुद्रिकाचे दर्जाचे होईल, ज्याप्रमाणे सामुद्रिक जाणणारांनी हात पाहून अंत:करणरेषा, मस्तकरेषा, आयुष्य रेषा व ग्रहांचे उंचवटे पाहून आयुष्यात मुख्य मुख्य गोष्टीचे वर्णन करावे. परंतु कालनिर्णयाचे कामी हस्त सामुद्रिक अतिशय लंगडे पडते. अमुक एक गोष्ट अमुक वेळी होईल हे मुळीच सांगता येते नाही, जे सामुद्रिक लोक कालनिर्णय सांगतात त्याला काही आधार नाही. अंदाजाने राम भरोसे काहीतरी थापा मारत असतात. त्या थापांनी ग्राहक थोडावेळ फ़सतो, पंरतु पुढे हस्तसामुद्राबद्दल त्याचा आदर कमी होऊन तो करमणुकीचा विषय आहे असे त्यास वाटू लागते. ( सामुद्रिक ज्योतिषानि वाईट वाटून घेऊनये ..क्षमस्व )

             फ़लज्योतिषाला कालनिर्णय समजला नाही तर हे शास्त्र सामुद्रिकासारखे झाले असते. परंतु फ़लज्योतिषशास्त्र, कालनिर्ण याचे कामी अतिशय सूक्ष्म जाऊ शकते. प्रत्येक दिवस चांगला आहे किंवा नाही हे सुध्दा सांगता येते, आज आपण एखाद्या कामास जात आहोत, तेव्हा ते काम फ़त्ते होईल किंवा नाही हे सांगण्यास फ़ल-ज्योतिषशास्त्रात जसा शास्त्रशुध्द मार्ग आहे, तसा मार्ग हस्त सामुद्रिकांमध्ये कोणता आहे हे आम्हांस सामुद्रिक जाणाकारांनी दाखवावे.

         कालनिर्णयाच्या अनेक वर्षफ़लपध्दति आहेत. ताजिक पद्धत, गोचर पद्धत, अंगिरस पद्धत, दिनवर्ष पद्धत, तात्काळ ग्रह-नक्षत्र पद्धत, कुष्णमूर्ति पद्धत व प्रायमरी डीरेक्शन पद्धत. त्यांपैकी आम्हांस दिनवर्ष व गोचर पध्दतीचा चांगला शिकवण्याचा अनुभव आहे.

        आता परिभ्रमणा पध्दतीचा विचार करु. कै. श्री जीवनराव चिटणीस या पद्धतीचा फ़ार उपयोग करीत असत व त्या पद्धतीवर त्यांचा फ़ार विश्वास होता, ही पद्धत परदेशातील ज्योतिषी उपयोगात आणतात. ही पद्धत वैद्य सीमोनाईटच्या “ अर्कना “ नामक पुस्तकात दिली आहे.

          रवि १९ वर्षे, बुध १० वर्षे, शनि ३० वर्षे, चंद्र ४ वर्षे, गुरु १२ वर्षे, हर्षल ८४ वर्षे, मंगळ १५ वर्षे, शुक्र ८ वर्षे, नेपच्यून १६४ वर्षे.

         इतक्या वर्षात ह्या ग्रहांचा एक फ़ेरा सर्व राशिचक्रामध्ये पुरा होतो. त्यात गुरु, हर्षल, नेपच्यून, शनि हे खरोखर इतक्या वर्षात राशिचक्राचा फ़ेरा पुरा करतात. म्हणून त्या ग्रहांचे परिभ्रमण सोपपत्तिक आहे. हे स्पष्ट होते. परंतु रवि एक वर्षानी राशिचक्र पुरे करीत असून त्याला १९ वर्षे कां धरावी हा प्रश्न शिल्लक राहतो, त्याची उत्पती खालीलप्रमाणे दिली आहे.

         मनुष्याचे पूर्ण आयुष्य १२० वर्षे असते ( हे आपल्या विंशोत्तरी दशेवरुन सिध्द होते ) गतीचे न्यूनधिक्याप्रामाणे ग्रहांचा क्रम चंद्र, शुक्र, बुध, मंगळ, गुरु व शनि असा आहे. ( ग्रहाची एका नंतर एकाची दशा सम ग्रहाच्या अधिकार क्षेत्रात) त्यात चंद्र अति शीग्र गतीचा आहे व शनि मंद. शनिची प्रदक्षिणा ३० वर्षाने होते म्हणून पूर्ण आयुष्य १२० वर्षे भागिले ३० म्हणजे ४ वर्षे ही चंद्राला दिली. गुरुची प्रदक्षणा बारा वर्षाची आहे. म्हणून १२० ÷ १२ = १० वर्षे ही बुधाला दिली. मंगळाचे परिभ्रमण १५ वर्षे. ( कित्येकवेळा १९ वर्षे मानतात त्याचे उत्पती लागत नाही ). १५ वर्षे मानली तर १२० ÷ १५ = ८ वर्षे ही शुक्राची. हा आकडा १९ चा वर्गाच्या जवळपास येतो ( १९ X १९ = ३६१ ) म्हणून रविचा काल १९ वर्षाचा ठरविला. सूर्य-चंद्र ग्रहणाचा पुर्ण फ़ेरा १९ वर्षाचा आहे. त्यानंतर तीच ग्रहणे पुन्हा येतात.

          एखादा ग्रह कुंडलीत ज्या ठिकाणी जन्मत: असेल त्याच ठिकाणी प्रत्येक ग्रहाचे एक एक परिभ्रमण झाल्यानंतर येते. कल्पाना करा की, चंद्र जन्मत: चतुर्थ स्थानी आहे तर त्याच राशीत त्याच अंशामध्ये पाचवे वर्षाचे वर्षकुंडलीमध्ये चंद्र तेथेच येईल. एकविसावे वर्षी आरंभी येईल. याप्रमाणे सर्व ग्रहांचे समजावे.

          एखादा ग्रह कुंडलीमध्ये जन्मत: बलिष्ठ असेल तर त्या स्थानाचे व त्या ग्रहाचे फ़ल परिभ्रमणपध्दतीने त्या ग्रहाच्या परिभ्रमणाच्या वेळी मिळेल. रवि दशमस्थानी जन्मत: आहे तर विसावे व चाळिसावे वर्षी दशमात येईल म्हणून विसावे व चाळिसावे ही दोन्ही वर्षे नोकरी, दर्जा, मानमान्यता या बाबतीत उत्तम जातील. वर्ष-कुंडली काढून त्रेराशिक पध्दतीने परिभ्रमण पध्दतीच्या ग्रहांची गति काढून वर्षकुंडली मध्ये ग्रह भरावे व ते जन्मकुंडलीशी व आपसात कसे योग करतात ते पाहून त्यांची फ़ले, ग्रहांची स्थाने व राशि यांच्या अनुरोधाने ठरवावी. पुढील उदाहरणावरुन परिभ्रमणपध्दतीची वर्षकुंडली कशी काढावी हे समजेल.

अभ्यास करावा.

जन्मकुंडली :- ता. ३१/०७/१८८३ वेळ ०९.४८ मुंबई रात्री जन्म ( माहीम, मुंबई जवळ )

( क्रंमश )

शुक्रवार, २० नोव्हेंबर, २००९

वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे

चिनूक्स यांस


प्रश्न :- वास्तुशास्त्राला कोणत्या भारतीय ग्रंथांचा आधार आहे, हे कृपया सांगाल का?

उत्तरः- मयानं वास्तुशास्त्रावर मयमतम नावाचा अफलातून ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ पॉडिचेरीच्या आश्रमात धूळ खात पडून होता. ब्रुनो डॉन्जेस नामक फ्रेंच तत्वचेत्त्याला हा ग्रंथ सापडला आणि ग्रंथाचं भग्य उजळ्लं डॉन्जेसनं हा ग्रंथ फ्रेंचमध्ये भाषांतरित केला. फ्रान्समध्ये खूप गाजावाजा झाल्यानंतर त्यांच इंग्रजीत भाषांतर झांल. त्यानंतर भारतीयांचं त्याच्याकडे लक्ष गेलं.

१. सुज्ञान जन्म रहित्यम् २. गंटल पंचांगम् ३. गुप्ता पंचागम्, ४. गुप्ता वास्तु, ५. गुप्ता वास्तु सम्राट, ६. गृहवास्तु ( काकिनाडा ) ७. वास्तुशास्त्र विवेकम् ४ भाग ८. श्री रामराय वास्तु शास्त्रम् ९. जातक परिजातम्, १०. बृहत्पराशर होरा शास्त्रम् ११. श्रीकृष्ण वास्तू शास्त्रम् १२. वास्तु दर्पणम् १३. वास्तु नारायणीम् १४. सनत्कुमार वास्तुशास्त्रम् १५. उत्तर काळमृत् १६. पेध्दबाल शिक्षा १७. आंध्रज्योति सचित्र वार पत्रिका १८. मनदेशम् पाक्षिक वार पत्रिका १९. गृहवास्तू दीपिका २० गृहवास्तू रहस्यम् २१ गृहवास्तू दर्पणम् २२. वास्तु दुंदुभि / टुंटुभि २३ वास्तु पद्माकरम् २४. वास्तु विज्ञान सर्वस्वम् २५. सुब्बराय वास्तु शास्त्रम् २६. श्री दत्तात्रेय वास्तुशास्त्रम २७ कृष्णा यजुर्वेद तैत्तरीय संहिता ५ भाग २८ याजुषा पुर्वप्रयोगचंदिका,

२९ निर्णयसिंधु ३० धर्मसिंधु ३१, अश्वलायन गृह्यसूत्रम् ३२. समारांगण- सूत्रधार ३३. ऋग्वेद ३४ यजुवेद ३५ सामवेद ३६ अथवेद ३७ शांति कमलाकरम् ३८ शांति रत्नाकरम् ३९ सर्व देव प्रतिष्ठा प्रकाश ४० श्रीविमानार्चना कल्पम्

४१ बृहत्संहिता ४२ वास्तु रत्नाकर ४३ वास्तु रत्नावली ४४ बृहद्वास्तुमाला ४५ गृहवास्तु शांती प्रयोग ४६ मुर्हर्त चिंतामणी ४७ वराह पुराण ४८ सूर्य पुराण ४९ भविष्य पुराण ५० विष्णु पुराण ५१ विष्णु धर्मोत्तर पुराण ५२ विश्वकर्मा पुराण ५३ विश्वकर्मा प्रकाश

५४ वास्तुवैभव ५५ मातृस्मृती १२ भाग ५६ वास्तु सम्राट ५७ वास्तुशास्त्र, ५८ शिल्पशास्त्र ५९ मेदिनीय ज्योतिष ( ५७ ते ५९ प्रत्येकी १२ भाग ) ६० मयमतम् ६१ मशिल्प ६२ मयशिल्पशतिका ६३ सूर्यसिध्दान्त ६४ वास्तुप्रवेश ६५ अजित वास्तु ६६ वास्तुशुभा ६७ मस्त्यपुराण ( १९०६) ६८ स्कंद पुराण ६९ वेद पुराणे समालोचन ७० श्री अग्निमहापुराण ७१ श्री गरुड पुराण ७२ श्री विश्वकर्मा पुराण ७३ सार्थ मुहूर्तमार्तंड


अशी अनेक पुस्तके आपणास मिळतील वरील सर्व पुस्तकांचे संदर्भ आपणास पाहिजे असता माफक शुल्लकात उपलब्द होईल.

वास्तु विज्ञान प्रेमी संजीव


बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते.

राहू आणि केतू


भागवताच्या मते कश्यप व धनी यांचा पुत्र ( ६,६,३०) आकाराने वाटोळा (म.भा.भीष्म १९ ) राहू व केतु मिळून मुळात एकच पुरुष होता, त्या एकाचेच दोन जाहाले. देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून अमृत बाहेर निघाले मोहिनीरुपी विष्णु ते अमृत देवांना वाटत असता हा देवाच्या पंगतीत चोरुन येऊन बसला. सुर्य-चंद्रानी त्याचे कपट उघडे केले असता विष्णूने त्याचे शीर तोडले. धडाचा झाला राहू व शिराचा झाला केतु त्यादोघांनी सुर्य-चंद्राविषायी राग धरला. त्या रागाने अद्यापि पर्वकाळी राहु-केतू हे सूर्य चंद्रांना गिळू पाहतात. त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.

राहू-केतु हे सूर्यमालिकेतील ग्रह नाहीत. किंबहुना ’ग्रह’ संज्ञेत ते मोडत नाहीत. पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ह्या दोन कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू म्हणजे राहू व केतू आहेत. ज्योतिषशास्त्रा ह्या गणिताच्या बिंदूना प्राचीन काळापासून ग्रहाइतकेच महत्व देण्यात आले त्यांच्या फ़लाचा अभ्यास प्राचीन ज्योतिषी उत्कृष्ट स्वरुपात केला आहे हे दोन छेदन बिंदू ज्या स्थानात पडातात जे ग्रह ह्या दोन बिंदूजवळ असतात, त्या स्थानाच्या दृष्टीने त्या ग्रहाच्या परिणामाच्या दृष्टीने त्यात फ़ेरबदल करावे लागतात.

वास्तुत: राहू आणि केतू हे दोन इतर ग्रहांप्रमाणॆ दिसणारे ग्रह नाहीत. किंबहुना त्यांना व्यक्तित्वच नाही. हे दोघे आहेत दोन संपात बिंदू, ज्या वर्तुळ मार्गाने चंद्र फ़िरतो तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फ़िरते, तो मार्ग हे दोन मार्ग अवकाशात परस्पराना ज्या दोन भिन्न स्थळी छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राहू आणि दुस-या छेदन बिंदूला केतू म्हणतात. या दोन्ही छेदन बिंदूना गती आहे. म्हणून त्याला फ़लज्योतिषशास्त्राने स्वतंत्र ग्रह मानून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर काल्पिली आहेत. मेषादी राशीत पुढे-पुढे जात नसून मागे-मागे येत आतात म्हणजे वक्र गती असते. सूर्याभोवती प्रदक्षिणा करावयास राहूला १८ वर्षे लागतात. त्याचा तपशील असा:-

राहूची दैनदिन गती ३ कला २१ विकला आहे. या गतीने राहूला १२ राशी आक्रमण करण्याला ६७८५ दिवस २० घटी २५ फ़ळे ७ विपळे इतका काल लागतो. ३६० दिवसांच्या प्रमाणे १८ वर्षे १० महिने २ दिवस व ३६५ दिवसाच्या प्रमाणे १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो.

राहूबद्दल पाश्चात्य ज्योतिषी काय म्हणतात ते पाहू: आग्न ज्योतिषी बिलाप लिळी म्हणतो – राहू हा पुरुष प्रकृतीचा असून तो गुरु-शुक्राच्या स्वभावधर्माचा व भाग्यवृध्दी करणारा आहे, तो गुरु-शुक्राच्याप्रमाणे फ़लदायी आहे. हा जेव्हा शुभ ग्रहाच्या बरोबर असतो, तेव्हा तो आपले अशुभ धर्म कमी करतो. जेव्हा तो शुभ ग्रहाने युक्त असतो , तेचा त्याच्य शुभ धर्माची वृध्दी करतो.

पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात राहू-केतू सर्पाकार मानले आहेत. राहूच्या उच्च व स्वक्षेत्रासंबंधी एकवाक्यता नाही, प्रवासाची वेळ, सर्प, शत्रु, द्यूत, यश, प्रतिष्ठा, छत्रचामरादी राजयोग यांचा राहू कारक मानले आहे.

राहूचे मित्र – बुध, शुक्र, शनि, सम- गुरु, शत्रु- रवि, चंद्र, मंगळ, लिंग–स्त्री ग्रह, तमोगुणी, जात चांडाळ, अशुभग्रह,

दृष्टी:- आपल्या स्थानापासून ५,७,९,१२ स्थानावर पुर्ण २,१० या स्थानावर अर्धी, ३,६, स्थानावर पापदृष्टी आणि स्वग्रही असला, तर संध असतो असे पराशर सांगतात. त्याच्या दृष्टीबद्दल कोणत्याच शास्त्राकाराने कोठे सांगितल्याचे आढळत नाही, पण आपले ज्योतिषी ७ व्या दृष्टीशिवाय कोणतीच दृष्टी मानावयास तयार नाहीत.

याची उच्च-नीच राशी संबधाचे एकवाक्यात नाही. पंरतु आपले ज्योतिषी मानतात ते–राहू मिथुन व कन्या राशीत बलवान असतो. त्याची स्वराशी कन्या आहे मिथुन राशीत १५ संशावर उच्च असतो. काहीच्या मते वृषभ राशीत १५ अंशावर उच्च असतो व काहींच्या मते वृश्चिक राशीवर नीच असतो. ( ब्रहतपराशर्यमध्ये वृषभ ही व्याची उच्च राशी मानली आहे. कन्या ही स्वग्रह मानली आहे. )

हा वर्णाने निळा-काळा, उंच, सडपातळ, आदी खालच्या जातीचा, खरजेने व्याप्त जाहलेला पाखंडी, उचक्या लागणारा, खोटे बोलणारा, कपटी, कुष्टरोगी, नेहमी दुस-याची निंदा करणारा, बुध्दीहीन असतो. तांबूस, उग्र चेह-याचा, दृष्टी उग्रम विषवाणी, शरीरबांधा उंच, सशक्त, कर्तव्यभ्रष्ट, धुरकट रंग व नेहमी तंबाखू ओढणारा. शरीरावर व्रण, स्वभावाने दुष्ट असे याचे वर्णन पराशर करतत.

स्वभाव- तमोगुणी, दिशा- नैऋत्य, बर्बर देशावर याची सत्ता असते, वाहन – काळा सिंह, काहींच्या मते घोडा, धातू – शिसे, गोमेद हे तत्न ( स्त्रीयांनी हे रत्न वापरु नये ), तीळ हे त्याचे धान्य आहे, नीलवस्त्र व कृष्णपुष्प या त्याच्या दानवस्तु आहेत.

राहू अशुभ असता:- म्हणजे अशुभ स्थानी असता माणसाने काळ्या रंगाचे कपडे वापरु नयेत त्याच प्रमाणे नैऋत्य दिशेकडील माणसांशी संबंध ठेवू नये.

राहूच्या आवस्था:-

मिथुन, कन्या, कर्क, धनू राशीत असता – बाल

मेष, वृश्चिक, वृषभ – तरुण

मकर, कुंभ, मीन, सिंह – वृध्द

राहूशी इतर ग्रहांशी होणारे योग:-

ग्रहण विचारात रवि, चंद्र व राहू यांची फ़ळे आहेत असे समजावे, फ़रक इतकाच आहे की, ग्रहणाची फ़ळे प्रसंगवशात मिळतात व तीही कडक मिळतात आणि दर महिन्याला ग्रहण नसता हिणारी राहू-चंद्राची युती व वर्षातून एकाच वेळी राहू बरोबर होणारी रविची युती साध्य आहेत. तसेच कोणताही ग्रह चंद्र कक्षेच्या पातात येईल तर त्या ग्रहांची शुभ फ़ळे फ़ार जोराने मिळतात.

राहूकेतू-धक्का

राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते. मनावर सतत दडपण राहते. मानसिक कोंडमारा होतो. प्रकृतिस्वास्थ्य नसल्याने कामसुखात बाधा येते. विवाह ठरतानाही विलंब होतो. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. पत्रिकेत सप्तमस्थान अथवा चंद्र केतुने बिघडला असल्यास्स वैवाहिक जीवनात उदासीनता निर्माण होते. जीवनसाथीदाराचा वियोग सहन करावा लागतो. कामसुखातील चैतन्यही हरवून जाण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.

राहूधक्का जन्मलग्न तुला किंवा वृश्चिक असीन शनि हा ग्रह, कर्क, वृश्चिक, अथवा मीन राशीत असून त्यापासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी असला म्हणजे त्या जातकाला राहू धक्का पोचेल असे निदान करता येईल.

केतुधक्काही जन्मलग्न तुला किंवा वृश्विक असून शनि हा ग्रह मात्र वृषभ, कन्या, मकर या राशीत असून त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी जर का केतु हा ग्रह पडलेला दिसेल तर त्या जातकाला केतुधक्का त्रास देईल असे म्हणता येईल.

राहू हे धड आहे आणि केतु हे शिरकमल आहे असे भारतीय शास्त्राज्ञांचे मत आहे. अर्थात राहू धक्क्याचा परिणाम आडदांपणाच्या कृत्यात भाग घेणारा, त्यातून नुकसानीचे योग जातकाला दर्शवील तर केतु धक्का कुटिल बुध्दीने डाव रंगात आणणारा. पण यशाच्या ऐन प्रसंगी डावातील रंग निघून जाऊन सहजगत्या साध्या चुकीने एकाएकी बाजी करण्याचा प्रसंग केतु धक्का मानवाला आणील.

राहू हा ग्रह भावंडांचा कारक मानला जातो तर केतु हा ग्रह नातलग मंडळीचा वृध्द मंडळीचा कारक समजला जातो. हे दोन्हीही ग्रह प्रवासाचेही कारक आहेत. त्यातल्यात्यात केतु हा ग्रह महान प्रवासी आहे-पण या ग्रहांच्या गुणधार्माची गंमत ही दिसते की, राहू वा केतु मानवाला प्रवासी करतील खरे पण हा प्रवास अत्यंत विरक्त वृत्तीने किंवा बेफ़िकीरपणे ते करतील हे दोन्हीही ग्रह स्वजनाकरता प्राणपणाला लावणारे महान मुत्सद्दी असे आहेत. शनीइतकाच यांचा मुत्सद्दी आणि कारस्थानीपणामध्ये क्रम लागेल. पण पराजय पदरी पडला तर शनितत्वाचा माणूस धैर्य धरुन पुन्हा प्रयत्न करील, तर राहू केतु तत्वाचा माणूस नेस्तनाबूद होऊन जाईल एवढाच फ़रक आहे. अर्थातच हे ग्रह ज्यांना धक्का देतील त्यांचा अगदी संपूर्णपणे विनाश करुनच मोकळे होतील यात संशय नाही. हे जातीने दैत्यवंशीय आपल्या कृतीने व अमृतप्राशनाने यांनी देवत्व पचनी पाडलेले आहे. यामुळे यांचे ठिकाणी दुविचारधारेचा प्रवाहही संतत प्रसवत असतो. पण यांचे सुविचाराचे बोल कुणीही ऐकत नाही. जेव्हा का स्वजनच त्यांचा तिरस्कार करु लागतात, तेव्हा यांना संयम पाळणे कठीण जाते आणि मग महाप्रलयकाल ओढवतो. स्वजनांचाच संहार, स्वकृतीचाच सर्वनाश, स्वधर्माचाच स्वाहाकार या राहूकेतूच्या धक्क्यातून बाहेर पडतो.

ज्या व्यक्तिच्या कुंडलीत असा धक्कादायक योग असेल त्यांनी स्वजनांपासून अत्यंत सावध राहावे हे बरे. तुला लग्नी कर्केचा शनि राहू धक्क्याला जास्त जोराने चालना देऊन भावंडाचा प्रलयकाल त्याचेवर ओढवील. प्रवासात अपघातांचे संभव अशाच व्यक्तींचे जीवनात उद्दभवतील. घरातील वडीलधारी माणसे पटापट थोड्याच काळात दगावण्याचे योगही याच धाक्यातून येतात. हीच स्थिति केतुधक्यात तुला लग्नी मकरेचा चतुर्थातील शनि दाखवील. राहू धक्का पुर्वभाग्य नष्ट करील तर केतु धक्का भावंडांचा नाश करील, तुला लग्न असून वृश्चिकेचा शनि असताना दीर्घ मुदतीची दुखणी, आज्याच्य वेळची स्थिति जातकाची न राहणे, नेत्रपीडा, करभी, देवस्की यांपासून त्रास, जाणूनबुजून मार बसण्याची शक्यता राहूधक्का दाखवील. मीनेचा शनि राहू धक्क्याला थोडा कमी चालना देईल. फ़क्त प्रवासात वा अनोळखी लोंकाकडून धोके, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यात विषप्रयोगाची शक्यतादर्शक योग, हीच स्थिति केतु धक्क्याची तुला लग्नी अष्टमातील वृषभेचा शनि असताना जातकाला दाखवील.

राहू अथचा केतु धक्का पोचेल की नाही हे पाहात असताना हे ध्यानात ठेवा की, जन्मकाली तुला वा वृश्चिक लग्न आहे किंवा नाही. असलेच तर शनि तुला, कर्क, वृश्चिक अथचा मीनेत आहे का? वृश्वित लग्नीही वरील राशीत आहे का आणि असला तर या शनीपासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी जन्मकाली आहे का? असेल तरच राहू पोचेल, नाहीतर नाही आणि केतुधक्क्याकरिता लग्नं तीच लागतात पण शनि मात्र कन्या, मकर किंवा वृषभेत लागतो व त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी केतु लागतो, तरच केतु धक्का पोचू शकतो.

अर्थात या दोन महान प्रभावी ग्रहांचे धक्के एकाच व्यक्तिला जीवनात मिळणार नाहीत हे सिध्द होते आणि हे त्यांचे मानवजातीचर उपकारच असेच मानले पाहिजे

वृश्चिक लग्नी किंवा मीनेतील वा कर्केतील शनि मानवाला भावंडांकडून मरणासम यातना देववील, स्वशरीरावर शस्त्रक्रीयेची पाळी आणील, हा योग राहू धक्का दाखवील, तीच गत वृश्चिक लग्नी केतु धक्का असताना जेव्हा का शनि ग्रह वृषभ, मकर वा कन्येत असेल तेव्हा मानवाची करील. सट्टॆबाज व्यक्तींना राहू व केतु धक्काच जास्त जाणवतो. राहू धक्क्यात वृश्चिक लग्नी शनि स्थलांतराचे सतत प्रसंग, विभक्तीकरण, मेदूला दुखणी, उपासमार व वेडाचे झटके येणे वगैरे परिस्थिति जोरदारपणे दर्शवील, तर मीनेचा शनि संततीला त्रास दाखवील.

सर्वसाधारणपणे केतु धक्का मानवाला लोकपवादाने, भावंडांच्या अघोरी कारस्थानाने नेस्तबूद करण्यास कारणीभूत ठरतो. कुटिल कारस्थान हे केतूचे कार्य असल्याने केतुधक्कावाल्या व्यक्तींनी कोर्टकचे-यांच्या लफ़ड्यात जास्त पडू नये हेच बरे. राहू हा मातेकडील स्थितिनिदर्शक ठरेल तर केतु हा ग्रह पितृकुळाचा दर्शक ठरेल. अर्थात यावरुन मातृपितृकुळाची पंरपरा आपले धानी येईल. अस्तु.



१. मंगळ राहु योग संततिसुखासाठी चांगला नसतो.

२. बुध-शुक्र-राहु (त्रिग्रह) योग कलेच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकतो.

३. कुंडलीतील कोणताही भावेश केतु युक्त झाल्यास फ़लात कमतरता निर्माण करतो.

४. गुरु-केतु योगात आध्यात्मिक धारणा उच्च दर्जाची असू शकते.

५. चंद्राच्या चतुर्थात राहु असता घराच्या प्रवेशद्वारासाठी नैऋत्य दिशा योग्य अशी असते.

६. केतुची दशा सामान्य पणाने कोणत्याही लग्नांना वाईट जात असते.

७. लग्नातील राहु व्यक्तीतील निर्दयीपणा वाढवीत नेतो.

८. लग्नातील राहु व्यक्ति उपासक असू शकतात.

९. लग्नीतील केतु व्यक्तिचे आतोग्य चांगले ठेवत नाही.

१०. धनस्थानातील केतुमुळे माणसाला दंतरोग असू शकतात.

११. धनस्थानातील राहुमुळे व्यक्ति आक्रमकपणे पैसे मिळविताना दिसते..

१२. तृत्तीय स्थानात राहु असता व्यक्तिची वागणूक उर्मट असू शकते.

१३. तृतीय स्थानात केतु असता व्यक्तिला नातेवाईकां कडून त्रास होऊ शकतो.

१४. चतुर्थातील राहु असता शिवाउपासना केल्याने शांती मिळू शकते.

१५. पंचमातील राहु संततिच्या प्रगतीस अडथळा आणू शकतो.

१६. पंचमातील राहु कठोर उपासना घडवू शकतो.

१७. पंचमातील राहु निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.

१८. पंचमेश राहुकुक्त निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.

१९. पंचमेश राहुयुक्त शिक्षणात अडथळा आणू शकतात.

२०. पंचमात मंगळ –राहु संततीस तापदायक.

२१. कुंडलीतील राहु सदासर्वकाळ वाईट फ़ले देईल असे नसते.

२२. गुरु-केतु नवपंचम योग व्यक्ति निखळ अध्यात्मिक असू शकते.

२३. कुंडलीतील चंद्राच्या चतुर्थात केतु असता घराजवळ गणपतीचे देऊळ असते.

२४. सुखस्थानात केतु असता सुखात कुठेतरी मिठाची चिमुट असू शकते.

२५. मुखरोगासाठी रवि-केतु महत्वाचे ग्रह असू शकतात.

२६. विषबाधा, स्फ़ोट यासाठी रवि-राहु महत्वाचे ग्रह असू शकतात.

२७. सप्तमात राहु असता जोडिदाराच्या स्वभावात क्रुरता असू शकते.

२८. सप्तमात केतु असता जोडिदाराची प्रकृती चांगली असत नाही.

२९. भाग्यशानातील चंद्र-राहु युती शिक्षणासाठी अडथळे निर्माण करु शकते.

३०. सर्व प्रकारच्या जातकांच्या कुंडल्यांतुन बदलीचा प्रश्न सोडविताना राहुला महत्व द्यावे लागते.

३१. वृश्चिकेतील राहु डूख धरणारा असू शकतो.

३२. रवि-राहु पण मार्गी बुध असताना बाजार तेजी आणतात.

३३. अश्विनी नक्षत्रातील केतु कठोर उअपासना करुन घेत असतो.

३४. रोहीणी नक्षत्रातील केतु मानसिक त्रासानंतर फ़ायदा देतो.

३५. रोहीणी नक्षत्रातील केतु सदा-सर्वदा स्त्रीकडुन लाभ दाखवत नाही.

३६. मृग नक्षत्रातील राहु जातकाला संघर्ष करावयास लावतो.

३७. गुरु-राहु युतियोग जातकाच्या स्वभावात दुष्टता असू शकते.

३८. गुरु-राहु युतियोग स्वत:च्या संततीचे फ़ारसे लाड करतान आढळणार नाहीत.

३९. गुरु-राहु युतियोग शिक्षणात मोठी प्रगती होत नाही.

४०. आर्द्रा हे राहुचे नक्षत्र आहे हेच जन्म नक्षत्र असता जातकाल राहुमहादशा सुरु असते.

४१. राहु हा कुंडलीत दोन्ही पध्दतीत काम करत असलेला दिसतो.

४२. घराण्याचे शाप घराण्याचे पाप या दोन्हीचेही सुचन राहु करत असतो.

४३. राहु हा आजोबांचा कारक आहे.

४४. राहु हा छत्रकारकही होऊ शकतो.

४५. आर्द्रा नक्षत्रातील राहु चांगली अथवा वाईअट फ़ले तिव्रतेने देतो.

४६. आर्द्रा नक्षत्रातील केतु सर्व प्रकारच्या साधनेसाठी चांघला असतो..

४७. पुनर्वसु नक्षत्रात राहु अत्यंत शुभ असू शकतो.

४८. पुनर्वसु नक्षत्रात केतु साधनेसाठी चांगला असतो.

४९. आश्र्लेषा नक्षत्रातील राहु पित्यास त्रास असू शकतो.

५०. आश्र्लेषा नक्षत्रातील केतु विषबाधा- पिशाच्चबाधा असे त्रास होऊ शकतात.

५१. मद्या नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.

५२. मद्या नक्षत्रात चंद्र असता नन्मत: केतुची महादशा असते.

५३. मद्या नक्षत्रातील राहु वडिलांकडून त्रास दाखवितो.

५४. मद्या नक्षत्रातील केतु गणपती उपासेनस चांगला असतो.

५५. पुर्वा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ कुंडलीतील राहुला महत्व द्यावे.

५६. पुर्वा नक्षत्रातील राहु दुस-या तिस-या चरणांवर शुभफ़ले देऊ शकतो.

५७. पुर्वा नक्षत्रातील केतु उपासनेस सर्वत्र चांगला.

५८. उत्तरा नक्षत्रातील राहु पहिल्या तिस-या चवथ्या चरणांवर बराच मिश्र होऊ शकतो.

५९. उत्तरा नक्षत्रातील केतु उपासनेस चांगला

६०. ह्स्त नक्षत्रतील राहु जन्मस्थ बुधा प्रमाणे फ़ले देऊ शकतो.

६१. हस्त नक्षत्रातील केतु आरोग्यच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकतो.

६२. चित्रा नक्षत्रातील राहु कुंडलेत मंगळा ज्या राशीत आसेल त्याप्रमाणे फ़ले देतो.

६३. वित्रा नक्षत्रातील केतू आरोग्याला हानिकारक असतो.

६४. स्वाती नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.

६५. स्वाती नक्षत्रात जन्म्स्थ चंद्र असता जातकाला राहुची म्हादशा असते.

६६. स्वाती नक्षत्रात राहु कठोर उअपासना करवून घेतो.

६७. विशाखा नक्षत्रातील राहु जन्मस्थ शुक्र कोणत्या राशीत आहे यावर ठरत असते.

६८. विशाखा नक्षत्रातील केतु दंतरोग यादृष्टीने पहावा लागतो.

६९. अनुराधा नक्षत्रातील केतु मुखरोगासाठी हानीकारक ठरतो.

७०. जेष्ठा नक्षत्रातील राहु जन्मस्थ मंगळाप्रमाणे फ़लदायी होतो.

७१. जेष्ठा नक्षत्रातील केतु आरोग्यासाठी चांगला नाही.

७२. मूळ नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.

७३. मूळ नक्षत्रात जन्मस्थ चंड्र असता जन्मत: केतुची महादशा सुरु असते.

७४. उत्तरषाढा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ रवि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे फ़लेदायी होतो.

७५. उत्तरषाढा नक्षत्रात केतु असता आरोग्यला हानिकारक होतो.

७६. श्रवण नक्षत्रात राहु जन्मस्थ चंद्राला मह्त्व द्यावे लागते.

७७. धनिष्ठा नक्षत्रातील राहु फ़क्त दुस-या तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.

७८. शतातारका नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.

७९. शततारका नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जातकाला राहु महादशा असते.

८०. शततारका नक्षत्रातील राहु उपासनेला चांगला असतो.

८१. शततारका नक्षत्र विपत म्हणून असेल तर जन्मस्थ राहुला महत्व द्यावे लागते.

८२. पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातील राहु तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.

८३. रेवती बक्षत्रातील राहु शेवटच्या चरणात अशुभ फ़ले देऊ शकतो.

८४. गोचर राहु केतु यांचे राशीतून अथवा सप्तमातुन भ्रमण होत असता वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.

८५. मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.

८६. राहुचे बुध, शुक्र व शनि मित्र गुरु सम आणि रवि,चंद्र व मंगळ शत्रु आहेत.

८७. केतुचे मित्र सम व शत्रु राहुप्रमाणे समजावे वस्तुत: राहु व केतु याचे मित्र सम शत्रुत्व कांही ज्योतिषी मानीत नाहीत त्याचे कारण ते गोल नसून बिंदूरुपी आहेत हे होय. ग्रहांचे हे नैसर्गिक मित्र-सम-शत्रौत्व आहे.

८८. प्रथम स्थानी राहू असता जप-जाप्याची आवड

८९. राहू-चंद्र एकत्र असता एकदा तरी आयुष्यात मोठ्या संकटास तोंड द्यावे लागते.

९०. राहु शनी लग्नात असता पिशाच्चबाधा. / क्षीण चंद्र शनीसह अष्टमात असता पिशाच्चबाधा.

९१. राहू प्रथम किंवा पंचम स्थानी असता मनुष्याचे दात वेडेवाकडे, मोठे व दंतपीडा.

९२. तृतीय स्थानी राहू असता ( कोणत्याही राशीचा ) लाहानपणी कान फ़ुटण्याची व्यथा.

९३. षष्ठस्थानी राहू-चंद्र असता पोटाचे विकार.

९४. राहू-मंगळ एकाच स्थानी प्रतियोगात असतील, तर ऒपरेशन संभव अगर अपघात किंवा मंगळाचे राहु वरुन भ्रमण असता अपघात होण्याची संभवना.

९५. राहू रवि लग्नात असता दृष्टीनाश संभवतो ( नक्षत्र व इतर योग महत्वाचे असतात )

९६. राहू चतुर्थात पापग्रहाने दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल, तर रुधिर रोग.

९७. मूळ राहुवरुन गोचरीचे राहूचे भ्रमण होत असता आजार अ दंतरोग दात काढण्याची पाळी येते.

९८. राहूवरुन मंगळाचे, मंगळावरुन राहूचे भ्रमण चालू असता प्रकृती बिघाडते.

९९. राहू षष्ठात असता किंवा केतू षष्ठात असता दंतरोग ओठ मोठे असतात.

१००. राहूचे किंवा शनीचे द्वितीयात किंवा सप्तमात गोचरीने भ्रमण चालु असता दंतपीडा

१०१. राहू द्वितीय स्थानी असता वाणी दोष असतो.

१०२. राहू तृतीयात असता जन्म देवस्थानाजवळ होतो.

१०३. धनात पापग्र्ह व तृतीयात राहू असता बंधुसौख्य नाश होते.

१०४. चतुर्थात राहू असता प्रथम संतती मृत होते.

१०५. राहू लाभात असता म्हातारपणी पुत्राकडून सुख मिळते.

१०६. राहू-मंगळ सप्तमात असतावैवाहिक सुखाचा बोजबारा उडतो.

१०७. अष्टमात राहू अगर हर्षल असता अनेक वेळा विवाह फ़िसकटतात.

१०८. अष्टमात राहू-हर्षल असता स्त्री धन मिळणार नाही.

१०९. ज्या लोकांन लिहिताना तोंड वेडे-वाकडे करण्याचे सवय अस्ते त्यांचा राहू सम्राशीत असतो, पण १/९ स्थानात असता हा नेम चुकत नाही.

११०. षष्ठात राहू मामाचे सुख लागू देत नाही, भांडखोर वृत्ती असते.

१११. राहू आपल्या राशीत किंवा ९ अगर १० व्या स्थानी असेल, तर मनुष्याला उच्चदशा प्राप्त होते.
हे एक संशोधन आहे. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा व जे जे अनुभव पटले असतील वा नसतीलही ते माला कळवावे. म्हणजे माझ्या संशोधनाचे कामाला उत्तेजन मिळेल ही विनंती.
संजीव

संदर्भ ग्रंथ:- नवग्रहांची फ़ळे (श्री. वि,श्री. देशिंगकर), ग्रहांचे धक्के (श्री पदमाकर जोशी (शांडिल्य)), सहस्त्रावली ( श्री ज्योतिषभूषण उदयराज साने )