गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

गृहारंभ / वास्तु मुहूर्त

भारतीय विद्यां पैकी एक विद्या आहे ती म्हणजे वास्तुशास्त्र विद्या. नविन वास्तुच्या बांधकामास किंवा नविन वास्तुत प्रवेश करण्यापुर्वी मुहूर्त पाहणे आवश्यक असते. योग्य सुमुहूर्तावर वास्तुप्रवेश आणि वास्तुचे बांधकाम करणे ही महत्त्वाची घटना असते. भारतीय कालगणेनुसार मुहूर्त काढण्यासाठी उपयुक्त साधन “ पंचाग” आपल्या साठी भारतीयांनी (गणिती) परिश्रम घेउन बाजारात उपलब्द करुन दिले आहे. अशा पंचांगानुसार मुहूर्त काढले असता अशुभ फ़ळांची तीव्रता कमी होऊन शुभ फ़ले लाभतात. तसेच अनेक दोषांचा परिहार होतो. धार्मिक व्यवहार म्हणजे वास्तुचे भुमीपूजन, भूमीशांती, शीलान्यास, वास्तुशांती करताना योग्य व अयोग्य दिवस व वेळ ठरवली गेली आहे यालाच मुहूर्त असे म्हणतात.


वास्तुचा कार्यारंभ करण्यासाठी शुक्लपक्ष आणि सुर्य उत्तरायणात असला पाहिजे. त्यांचप्रमाणे गृहस्वामीचे चंद्रबल – ताराबल – शुभलग्न - शुभदिन सुध्दा असला पाहिजे. कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षाच्या पंधरा तिथि नामा नुसार पाच प्रकारच्या तिथि असतात. त्या अशाप्रकारे नन्दा ( १,६ व ११ ), भद्रा ( २,७ व १२ ), जया ( ३,८ व १३ ), रिक्ता ( ४,९ व १४ ), पुर्णा तिथि ( ५,१० व १५ अथवा ५,१० व ३०) ह्या तिथी आपल्या नावानुसार फ़ल देतात.

शुक्रवारी नन्दा तिथि ( १,६ व ११ ), बुधवारी भद्रा तिथि ( २,७ व १२ ), मंगळवारी जया ( ३,८ व १३ ) शनिवारी रिक्ता ( ४,९ व १४ ), आणि गुरुवारी पुर्णा तिथि ( ५,१० व १५ ) तर त्या तिथि आणि वार सर्वसिध्दिप्रद्ययक असतात.

शुक्ल पक्षात २,३,५,७,१०,१३,१५(पौर्णिमा) या तिथि श्रेष्ठ होय. चतुर्थि, नवमी, चतुर्दशी या तिथि त्याज्य आहेत, अष्टमी, अमावस्या या तिथि अशुभ आहेत. तसेच वारालाही महत्व आहे. गृहरंभासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे वार शुभ आहेत. शनिवार मध्यम आहे. रविवार आणि मंगळवारी त्याज्य आहेत. त्याज्य व अशुभ तिथिंना गृहारंभ केल्याने दारिद्र, धनहानी, उच्चाटन, धान्यनाश, राजभय, असते म्हणून या तिथिना गृहारंभ टाळावा

रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपद आणि रेवती ही नक्षत्रे श्रेष्ठ आहेत. अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजीत ( उत्तरषाढाच्या शेवटच्या १५ घटिका आणि श्रवणाच्या आधिच्या १५ घटिका ), श्रवण, धनिष्ठा, शततारका ही नक्षत्रे शुभ आहेत. मूळ, ज्येष्ठा, आर्द्रा, आश्लेषा ही उग्र नक्षत्रे आहेत. पूर्वाफ़ाल्गुनी, पूर्वाभाद्रपद, कृत्तिका व विशाखा ही वर्ज्य नक्षत्रे आहेत.

२७ योगा पैकी व्यातिपात, वैधृति, विष्कंभ ( पहिल्या तिन घटिका ) वज्र ( पहिल्या नऊ घटिका ), व्याघत ( पहिल्या पाच घटिका ), गंड व अतिगंड ( पहिल्या साहा घटिका ), शुल ( पहिल्या १५ घटिका ) अशुभ मानल्या गेल्या आहेत.

तिथिच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात, ११ करणा पैकी विष्टि व नाग ही करणे अशुभ आहेत. गृहारंभ करताना रवी, चंद्र, बुध, गुरु व शुक्र बलवान असावेत, रवी हा मेष, वृषभ, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक आणि कुंभ राशीत असताना शुभ फ़ले देतो, व इतर राशीत असताना अशुभ फ़लेदायी असतो.

नविन चुल / शेगडी प्रज्वलीत करताना (वास्तुशांती) त्यासाठी बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस उत्तम आहेत, नव्या घरात शनिवारी, मंगळवारी, सोमवारी व रविवारी अग्नि प्रज्वलित केल्यास दारिद्र लाभते, धननाश होतो, रोग जडतात, स्त्रिया शारिरीक दृष्ट्या क्षीण किंवा अकार्यक्षम होतात.

सर्वात चांगला योग सकारां म्हणजे :- शनिवार, स्वाती नक्षत्र, सिंह लग्न, शुल्क पक्ष, सप्तमी तिथि, शुभ योग आणि श्रावण महिना असेल तर हे सातही सकाराने युक्त आहेत आणि या सातही सकारांच्या योगात गृहारंभ केला तर वाहन सौख्य, धन-धान्य वृध्दी, पुत्र व गृहस्वामीला विविध प्रकारचे लाभ आणि सौभाग्य प्राप्त होते.

वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर लग्नावर केलेला वास्तुप्रवेश अथवा गृहारंभ शुभफ़लदायी ठरतो, कार्य सिध्दिस जाते. मिथुन, कन्या, धनु, मीन या द्विस्वभावी राशीचा पूर्वार्ध स्थिर लग्नाचा व उत्तरार्ध चर लग्नाचा असतो. त्यामुळे चर लग्नावर गृहारंभ केल्यास तो हानिकारक होतो. मेष, कर्क, तूळ, मकर ही चर लग्ने वास्तुच्या शुभकार्याला वर्ज्य आहेत.

गृहप्रवेश करताना चंद्राची दिशा व त्यांचे समोरील दिशा वर्ज्य करुन घराच्या द्वाराने प्रवेश करावा, कृतिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे, अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्वदिशेला किंवा पश्चिम दिशेला असतो म्हणुन या दिशेच्या उलट उत्तर व दक्षिण दिशेने गृहप्रवेश करावा. मघा ते विशाखा व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण दिशेकडे किंवा उत्तरेस असतो या कारणा ने पूर्व किंवा पश्चिम दिशेकडुन गृहप्रवेश करावा.

शुभद्वार करण्यासाठी शुभ नक्षत्रे नेहमी बघण्याची पध्द्त आहे. रवि नक्षत्रा पासुन चार नक्षत्रे शुभ, फ़ल लक्ष्मी प्राती, त्यापुढील आठ नक्षत्रे अशुभ घराच्या चार कोनावर प्रत्येकी दोन-दोन नक्षत्रे अशुभ घरात कोणी राहत नाही, त्यापुढील आठ नक्षत्रे घरावर शुभ व द्वाराचे बाजुस घरात सुख देतात. त्यापुढील तीन नक्षत्रे अशुभ घराच्या उंबरठ्यावर अशुभ मृत्यू, शेवटची चार नक्षत्रे शुभ व मध्यगतीने शुभ फ़ले देतात.

गृहारंभ करताना कुशल विद्वानाला विचारावे व गृहारंभ शुभ मुहूर्तावर करावा अन्यथा अशुभ मुहूर्तावर अथवा आपल्या मनाने शुभ मुहूर्त न पाहता ग्रुहारंभ केला तर ते कार्यत अडचणी, आर्थिक समस्या निर्माण होऊन मानसिक अशांती राहते. म्हणुन वास्तुप्रवेश करताना विचारपुर्वकच करावा व त्यासाठी विद्वानाचे मार्गदर्शन घ्यावे.

संजीव

३ टिप्पण्या:

साहित्यसंस्कृती म्हणाले...

tumcha blog pahilaa,aavadalaa.tumchya comment la uttar dile aahe mazya blogvar jaroor vachaa.

अनामित म्हणाले...

Tumacha blog prathamach vachala..chan mahitipurna ahe...vastusathi 8 no ashubha asato ka...ase me purvi kadhitari vachale hote

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

Anonymous & सोनाली जोशी
आपल्या दोघाना धन्यवाद
संजीव