आपल्या पुर्वजांनी व भारत देशातील ग्रंथात उलेख केल्या प्रमाणे भारतीय वास्तुशास्त्रात घरातील देवघर किंवा शहरातील (नवनिर्माण) घरातील देवघर / देव्हारा हा सुध्दा आपल्या जीवनात / वास्तुत पॉझिटिव्ह् किंवा निगेटिव्ह उर्जा ( घन, ॠण ) प्रसारीत करीत असतो. वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र दृष्ट्या घरातील देव्हारा हा नेहमी ईशान्य कोनात असला पाहिजे. ( होकायत्राच्या ४५ अंशा मघ्ये ).
ज्योतिषशास्त्रा नुसार
प्रथम आपण ज्योतिषशास्त्राच्या नियमा नुसार विचार करुया. कालपुरुषाच्या कुडंली प्रमाणे पूर्व-ईशान्य म्हणजे द्वितीय स्थान. या स्थानाची रास वृषभ तीचा अधिपती शुक्र ग्रह, नक्षत्र मृगर्शीषचे पहिले व दुसरे चरण, वृषभेचा पहिला नवमांश, सिंहचा रवि सर्वतोभद्र चक्राचा १७ वा राज्यांश ( राज्यांश= मृग नक्षत्र हे अतिशय शुभ व कर्तव्यदक्ष नक्षत्र असल्याने बुध्दिमान आहे. सत्ता, जबाबदारी, सत्ता मिळाल्यावर त्याचे पालन करणे, कर्तबगारी दाखवणे आणि राजनैतिक जबाबदार्यां पार पाडणे राजसमान वागणूक ठेवणे आणि यशस्वीरीत्या आपले अधिकार पद संभाळणे. मानसन्मान या राज्यांशात प्राप्त होतात. हा अतिशय चांगला सुक्ष्मांश असल्याने जातक यशस्वी होतो.) व वृषभेचा दुसरा नवमांश कन्याराशीचा बुधग्रह सर्वतोभद्र चक्राचा १८ वा चंडांश ( चंडांश= मृग नक्षत्राच्या दुसर्याळ चरणाचे नाव चंडांश आहे. हा कन्या नवमांशह असला तरी बुध चांगली फळे देत नाही. कारण चंडांश हा अतिशय कोपी व रागीट आहे. ह्या ठिकाणी कोणतेही ग्रह चांगली फळे देत नाही. ) मृगर्शीष नक्षत्राचा तिसरा चरण म्हणजे मिथुन राशीचा पहिला नवमांश तुलेचा शुक्र व सर्वतोभद्र चक्राचा १९ वा अभयांश ( अभयांश- मिथुन राशीचा पहिला नवमांश व मृग नक्षत्रातील तुळराशीचा नवमांश याचे नाव अभयांश म्हणजे सर्व संकटातुन सहीसलामत बाहेर पडणे. मिथुन राशीचा पहिला सुक्ष्मांश असल्याने शनि उच्च नवमांशात आल्यास कायद्याच्या बाजुने नेहमी अभय मिळण्याची शक्यता. इथे नेहमी चंद्र भ्रमणाच्या वेळी मनासारखी कामे व पुजा अर्चणा होईल. चंद्र, शुक्र, बुध, राहु यांची नेहमी चांगली फळे प्राप्त होतात.)
ह्या स्थानातुन नेहमी सांपतिक स्थिती, पूर्वर्तित, द्रव्यलाभ, सोने चांदी इत्यादिची प्राप्ती, कौटुबिक सुख, धन, विद्धता व वकृत्व, वाक्-सिध्दि, वाणी, देवाण्-घेवाणातील नफा-नुकसान, लेखन कला, व्यापार आप्तवर्ग, मान, गळा. कंठ, उजवाडोळा ह्या गोष्टीचा प्रामुखाने विचार होतो.
वास्तुशास्त्रा नुसार
सर्वप्रकारच्या वास्तुमध्ये सर्व धर्मानुसार आपल्या देवावर व गुरुवर श्रध्दा व भक्ति असते. जागेअभावी जाणता-अजानता आपल्या आवडीनुसार किंवा जागेअभावी म्हणुन देव्हाराच्यी सोय काहीजण दिशेचा विचार न करता आपल्या आवडी नुसार सोय करतात. त्याचा परिणाम त्यांना ठराविक कालखंडा नंतर मिळतो किंवा त्यांच्या ग्रहाच्या अंतर दशेत होतो. शहरी भागात प्रामुख्याने देवाचा देव्हारा स्वयंपाक घरात किंवा आपल्या बेडरुम मध्ये करतात. बेडरुम मध्ये देव्हारा असल्यास रात्री झोपतांना त्या समोर तात्पुरते पार्टिशन किंवा पडद्याचा वापर करावा.
वास्तुशास्त्रात ईशान्य दिशेला फार महत्त्व दिले आहे. पूर्व-ईशान्य किंवा उत्तर-ईशान्य दिशेला तोंड करुन पुजा, ध्यानधारणा, पाठ, जप, अभ्यास, उपासना इत्यादि क्रिया केल्यास लवकर सिध्दिप्रद होता॑त. म्हणून ईशान्य दिशेला देवघर/ देव्हारा करावा.
कोणत्या दिशेला देवघर व देव्हारा असल्यास काय फळे प्राप्त होतात.
१. पूर्व दिशा ९० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास ऐश्वर्यलाभ, समाजात मान प्रतिष्ठाची वाढ, इंद्रदेव, मेषेचा मंगळ व रवी ( सुर्यनारायण) ची पुजा आपल्या हातुन नकळ्त होते. त्यामुळे मनाला स्फुर्ती येते.
२. आग्नेय दिशा १३५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास केलेली पूजा जप, ध्यान धारणा अग्निमध्ये स्वाह होतात. या ठिकाणी ऐश्वर्यलाभ प्राप्तिसाठी, इंद्रदेवतेच्या आराधने साठी, धान्यलक्ष्मी, बुधग्रह, शुक्रग्रह, अग्निउपासना इत्यादिच्या प्रसन्नेसाठी केलेली होम्-हवण अनुष्ठान शुभ फले देतात.
३. दक्षिण दिशा १८० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, कर्करास, मंगळ ग्रह ह्याची नकळत उपासना होउन शत्रुपीडा इत्यादि गोष्टी वास्तुत घडताना दिसतात.
४. नैऋत्येला २२५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास आदिलक्ष्मी, यमदेव, सिंहरास, मंगळ्ग्रह, धैर्यलक्ष्मी, नैॠत्तीराक्षस, कन्यारास, राहु व केतु ह्यांना नमस्कार तसेच पूतनाराक्षसीची पुजा म्हणजे भुतबाधा, शत्रुपीडा इत्यादि गोष्टी कारणीभुत होतात.
५. पश्चिम दिशा २७० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास पूर्व कडेपाठ म्हणजे ऐश्र्वर्यहानी धननाश, गजलक्ष्मी , वरुणदेव, शनिमहाराज, जम्बुक राक्षस ह्यंना नमस्कार परंतु देवस्थांन, मठ, मंदिर पूर्वाभिमुख करुन पश्चिमेस मंदिर बाधतात ह्यात देवाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्टा झालेली असते. ( उदा. माहिम मध्ये सितलादेवी मंदिर बघा आज पर्यंत र्जिणोउद्दार झालेला नाही. अशी अनेक मंदिरे आपणास माहीत असतील. )
६. वायव्य दिशा ३१५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास गजलक्ष्मी व विजयलक्ष्मी वरुणदेव, वायुदेव धनु व वृश्चिकरास, चंद्र शनिदेव, पापराक्षसीची पुजा म्हणजे रोगाला आमंत्रण रोगबांधा.
७. उत्तर दिशा ३५९-०० अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, कुबेरदेवता, मकररास, बुधग्रह म्हणजे साक्षात घनाची व कुबेराची पुजा धनलाभ ऐश्वर्यलाभ.
८. ईशान्य दिशा ४५ अंश देवघर किंवा देव्हारा असल्यास धनलक्ष्मी, संतानलक्ष्मी, कुंभ व मीन रास, गुरुग्रह व बुधग्रह संसारासाठी लागणार्या४ धनाची व वंशवृध्दीसाठी पुजा, कुंभराशीचा स्वामी शनीची पुजा म्हणजे साडेसाथीत व माहादशेत स्वामीची नकळत पूजा. मीनराशीचा स्वामी गुरु म्हणजे योग्य मार्गदर्शन. ईशान्य दिशेला देव्हारा करणे हितकारक आहे. जर आपणास देव्हारा करता येत नसल्यास आपल्या गुरुचा व शिवाचा फोटो फ्रेम ह्या ठिकाणी जरुर लावा.
वास्तुशास्त्राच्या दुष्टी ह्या कोनातुन संतानलक्ष्मी, दिशाधिपती परमेश्वर, मीनरास, कारतत्व- ज्ञानवृध्दी, वंशवृध्दी, सुसंतान, ऐश्र्वर्य, भाग्य वास्तु पुरुषाचे डोके, वास्तु एकाशितीपद व वास्तुपद मंडळ्तील रक्तवाहीणी हिरण्या, सुव्रता व शांता यशोवती ह्याचा मेळ ह्या ठिकाणी होतो. म्हणजे सुख्य समृध्दी शांतता आरोग्य ऐश्वर्य चा लाभ. (क्रमश..)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा