घराला घरपण देणारा उंबरठा हा नेहमी बाहेरील निगेटिव्ह ऊर्जेला घरात येण्यास मज्जाव करत असतो. पंरतु आज काल लोंक लाकडाचा उंबरठा न बसवता मार्बलचा किंवा दगडाचा उंबरठा बसवतात. ह्याच गोष्टीचा त्रास आपल्या दररोजच्या जीवनात होत असतो.
आपल्याला एक महत्वाची सुचना करावी वाटते. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला चिर पडली आहे का? पहिल्यादा उंबरठा तपासा व आपल्या घरातील मुख्य व्यक्तिला अपघात होण्या पासुन वाचवा. आपला जर ह्या गोष्टीवर विश्र्वास नसेल तर आपण आपल्या संकुलातील किंवा नातेवाईकाचे उंबरठे तपासुन खात्री करा.
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते. ह्या गोष्टीची खात्री करुन घ्या, व आम्हांला आपला अभिप्राय कळवा. नुसते वाचत बसु नका आपले विचार लिहा.
आम्ही एकदा डि.एन. नगर अंधेरी येथे कँपला गेलेलो असतानाची एक गोष्ट, एक जातक दु:खी अंत:कर्णाने आमच्या स्टाँलवर आला. त्यांनी माझ्या सहकारी श्रीमती चव्हाण व चौघुले यांना टेरोच्या माध्यमातुन जातकाने प्रश्न विचारला कि माझ्या घरात काही बाधा आहे का? माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना? त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो! पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली “भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे” त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार व एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला, ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा व घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता? मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय! काम करताना घरातील शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या पट्ट्यानी तो खिळे मारुन सुंदर उंबरठा बसवला होता. ह्या कारणाने त्यांचा मोठा ११ वर्षाच्या मुलगा अपघातात मरण पावला होता. दुस-या मुलाच्या अभ्यासातील लक्ष उडाले होते. तो घरात चिरचिर करत राहात होता.
आपण घर सुंदर दिसण्यास हजारो रुपये खर्च करतो. मुख्य द्वाराची सजावट करताना आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. पहिल्यादा संगणकासमोरुन उठा. आपला उंबरठा कसाआहे तो तपासा. तसेच वरिल दिलेल्या उदाहरण तपासण्या साठी आजुबाजुच्या घरात न जाता त्यांचे उंबरठे तपासा व खात्री करुन घ्या. मला कळवण्यास विसरु नका; तसदि घ्या, आपला अभिप्राय सर्व वाचका साठी उपयुक्त ठरेल.
ह्या वर्गातील आपले हे पहिले पाऊल असेल या नंतर प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी ON LINE CODE असेल. ह्याची सर्व वाचकांनी दक्षता घ्यावी. विरार येथे वास्तुशास्त्र व ज्योतिषशास्त्र वर्ग सुरु झाले आहेत. काही दिवसात दादर येथे वास्तुशास्त्र वर्ग घेण्यात येईल. प्रवेश मर्यादित असेल आपली नांवे लवकरात लवकर नोंदवा. ईमेल करा vastuclass@gmail.com astro@sancharnet.in धन्यवाद........
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा