मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

मंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्तुवर होणारे परिणाम.

सर्व साधारण मंगळ ग्रह म्हटला की सर्वाना मंगळीक कुंडलीची आठवण होते किंवा मंगळाचे नाव ऐकुण धडकी भरते. मंगळ साधारण प्रत्येक कुंडलीच्या एका घरात किंवा एका राशीत आपला मुक्काम साधारण ४५ दिवसाचा करत असतो, पण त्याला दोन वर्षातुन एकदा कोणाच्यातरी घरे म्हणजे राशीत किंवा कुंडलीतील एका घरात जास्त दिवस पाहुणाच्यार आवडल्याने तो घेण्याच्या दिर्घकाळ आपला मुकाम त्या घरात करत असतो. ह्या वर्षितो कर्कराशीत राहाणार आहे. त्याचा मुक्काम दिनांक ०५ ऑक्टोबर, २००९ पासुन ते २६ मे, २०१० पर्यंतचा आहे.
कर्करास ही काल पुरुषाच्या चैथ्या घरात येत असुन. त्याच्या परिवारात तीन नक्षत्र पुनर्वसु (४था चरण), पुष्य, आश्लेषा ह्या तीन नक्षत्रा बरोबर त्याचे दैनैदिनी व्यवहार या पुढे चालणार आहेत. त्यात बिचारी पुनर्वसु सर्वात भाग्यवाण तीचा नक्षत्र स्वामी-गुरु, योनी-मार्जर, गण-देव, आराध्यवृक्ष-पिंपळ, दान- उडीद-तीळ, देवता-आदिती, मुख-तिर्यक, दृष्टी-सुलोचन, तत्त्व-वायु, संज्ञा-चर, चरणाक्षर-ही, चरणांक-४, चरणस्वामी-चंद्र, नवांश समाप्ति ०३-२०, नवांश राशी-कर्क, ह्या नक्षत्राचे अ.व.क.ह्.डा. चक्रा तिल मिळालेले हे गुण, पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी गुरु आपल्या नक्षत्राला कसा संभाळुन मंगळाच्या तावडीतुन लवकरात लवकर बाहेर काढून त्या नक्षत्राची सुटका करतो.






कर्करास :- राशी चक्रात ९० ते १२० अंशापर्यंतचे क्षत्रे कर्क राशीचे मानले जाते. या राशीचे चिन्ह आहे खेकडा ( आकृती पाहा )

 खेकडा जलचर प्राणी आहे. या राशीत पुनर्वसुचा एक चतुर्थाशं भाग, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांचा समावेश असतो. कर्क रास आणि जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा अगदी जवळचां संबंध मानला जातो. या राशीवर संक्रमण करताना रवी उत्तर गोलार्धाकडून दक्षिणेकडे जाताना जाणवतो. त्यावेळी सूर्याची तप्त किरणे समुद्रावर पडतात आणि श्रावणात घनघोर पावसाचे वातावरण तयार होते. ही रास सहानुभूती, सुकुमारता आणि मनमिळावूपणाचे प्रतीक मानले जाते.

पुथ्वीवर या राशीचे स्थान उत्तरेकडे विषुवरेषेपासून २४ ते २० अंशापर्यंत निश्चित केलेले आहे. कर्क रास स्त्री रास असून, सम शरीर, प्रवासी, घातुसंज्ञक आहे. तीचे निवास स्थान उत्तर दिशेला, सरोवर, बाध, जलाशय, समुद्र या ठिकाणी असते. ही रास चंचल, कोमल पण सौम्य, अस्थिर स्वभावाची बालवस्थेत प्रखर, लाल व पांढर्याा वर्णाची, रजोगुणी, जलतत्त्वयुक्त, रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, ब्राह्मण जातीचे प्रतिनिधित्व करणारी, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. कर्क रास पृष्ठोदयी आणि सजीव लक्षणांनी युक्त असून उत्तर दिशेकडे विशेष बलवान आणि क्रियाशील असते.

या जलचर सम राशीचे निवासस्थान चोल देशात असून स्वामी चंद्र आणि तिचा वार सोमवार, भाग्यांक २ आणि ७ आहेत. या राशीचे गुण म्हणजे प्रयन्त, शीलता, लज्जा आणि विवेक. या राशीचे मुख अंग ह्र्दय ते खेकड्याच्याच आकाराचे असते.

चीन,स्कॉटलंड, न्यूझीलंड, कॅनडा, रशिया, अल्जिरिया, न्यूयॉर्क, सिंध, काठेवाड कच्छ या देशावर आणि विभागावर तीचे अधिपत्या आहे. या राशीची मुख्य द्रव्ये :- उत्तम प्रकारचे अन्न, फळे, किराणा सामान, चहा, चांदी, पारा. हा आहे. वाणिज्य, जलवाहातूक आणि नौसेना विभागविषयक कार्याचे प्रतिनिधित्व कर्क रास करते. रवि या राशीत श्रावण महिन्यापर्यंत असतो. रवि १६ जुलै ते १५ ऑगस्टच्या दरम्यान या राशीत असतो. या राशीत दोन पंधरवड्यात एकदा चंद्र सव्वादोन दिवस असतो. हे झाले या काल चक्रा मधिल ४था राशी कर्कची ओळख परेड.

आता बघुया या राशीत मंगळाचा पराक्रम.

मंगळ या राशीचा मित्र आहे त्याबरोबर रवि आणि गुरु सुध्दा मित्र आहेत. ह्याचे शत्रु- बुध व राहु, सम( उदासीन) ग्रह शुक्र आणि शनि. प्रत्येक ग्रहाला उच्चरास आहे. त्या राशीत तो अंत्यत बलवान होतो. स्वगृही जसा बलवान असतो तसाच उच्च राशीत तो बलवाण असतो. नीचरासः- ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्या राशीपासून सातव्या राशीत तो नीच असतो. नीच राशीतील ग्रह बलहीन असतो, अशुभ असतो.



(क्रमश)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: