रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्राणायाम”

आज पर्यंत लोक स्व:स्वार्थासाठी प्राणायाम करत असतात. पंरतु आपण ज्या वास्तुत राहात असतो त्या वास्तुमध्ये राहाणा-या लोकांसाठी व वास्तुमध्ये शुभ परिणाम घडवण्यास वास्तु प्राणायमाची आवशकता असते. प्राणायम करण्यासाठी वेळेचे बंधन पाळण्याची आवश्यकता नाही. पंरतु जर आपण सकाळी पाच ते सहा ही वेळ निवडावी तर फ़ार उत्तम आहे. देवपुजा झाल्यानंतर जर वास्तु प्राणायम केले तर वास्तुबरोबर आपल्या मनाचीही प्रसन्नता वाढते.


वास्तु प्राणायम करतान वास्तुमधिल पश्चिमेची मोकळी भिंत प्रामुख्याने निवडावी, शक्यझाल्यास "देवघर व देव्हारा" या लेखा मधिल दिलेल्या माहिती प्रमाणे स्व:स्वार्थ साधनेसाठी जागेची निवड करावी. निवड झाल्या नंतर बसण्यासाठी लोकर किंवा दर्भासन आसनासाठी वापरावे. आपली चेतना संस्था ज्या अस्थिबधंनात बंदिस्त आहे. त्याच्या सातव्या मणिबंधापासुन ते २६ व्या मणिबंधापर्यंत समांतर रेषेत भिंतीला टेकुन बसावे बसताना मणिबंध भिंतिला जर समांतर रेषेत बसत नसतिल तर काही हरकत नाही काळजी करुनये, सुखासनात टेकुन किंवा टेबलावर बसण्यास सुध्दा परवागी आहे. पाठ जरुर भिंतीला लावावी. शक्यझाल्यास पदमासनात बसावे या पदमासनाला खुप महत्व आहे. त्याचा परिणाम मूलाधार चक्रावर होतो. पदमासनाने प्राणायम क्रिया सुलभ होऊन इच्छित सिध्दी लवकर साध्य होतात.

वास्तुप्राणाय करताना आपला सुध्दा प्राणायाम होतो हे विषेश आहे. माझ्या जवळ शिकलेल्या विध्यार्थि तसेच मार्गदर्शन घेतलेल्या लोंकाना याचा चांगला अनुभव आहे. वास्तुप्राणायमाची सुरुवात वास्तुच्या नक्षत्रा पासुन केल्यास जास्त लाभ होतो. विषेश म्हणजे वास्तुचे नक्षत्र घरातील मुख्य व्यक्ति ज्याच्या नावावर घर आहे त्याचे व वास्तुचे नक्षत्र एक असल्यास त्यास दुहेरी फ़ायदा मिळतो. वास्तुचा नक्षत्राधिपती व लग्नाधिपती आणि जातकाचा नक्षत्र-लग्नाधिपती जर समान असल्यास "सोनेपे सुहागा" .

वास्तुप्राणायाम करताना पद्दमासन किंवा सुखासन घालुन, नंतर मांड्यांवर हात ठेऊन, डोळे मिटून घावेत. मनातील विचार काढून टाकावेत. मन निर्विकार, निर्विचार करावे. रेचक करुन फ़ुफ़्फ़ुसातील सर्व हवा काढून टाकावी. श्वास हळूहळू आत घ्यावा. ह्या वेळी आपली कोणती नाडी चालत आहे हे बघणे अंत्यत महत्वाचे आहे .नाडीचे दोन प्रकार आहेत. एक चंद्रनाडी व दुसरी सुर्यनाडी ज्यांलोकांना अंगमेहनतीची कामे आहेत त्यांनी सुर्यनाडी वापरावी व ज्या लोकांना निर्णय घेण्याची कामे आहेत त्यांनी चंद्रनाडीचा वापर करावा. श्वास घेताना पहिल्यादा आठवेळा अष्टदिशाचा विचार करुन अष्टदिशाच्या नावे श्वास घ्यावा. नंतर  ओम विष्णवे नम: , ओम महालक्ष्म्यै: नम: , ओम कुलदेवतायै: नम: , ओम आकाशाय नम: , ओम वायुय नम: ,ओम पृथिव्यै नम: , ओम जलाय नम: , हे करताना मनात विचार आणावेत की वरील अष्टदिशाच्या देवता व पंचमहाभुते यांची शक्ति माझ्या शरीरात व माझ्या वास्तुत दाखल होत आहे. ,माझे विचार आणि शरिर आणि वास्तु चैत्यन्य व सर्वसार्मथ्यांनी प्रफ़ुल्लीत झाले आहे. असा आत्मविश्वास ज्यावेळी मनात निर्माण होईल त्यावेळी आपणास वास्तुसुख व सर्व सुख प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.

वास्तुप्राणाय हा तुमचे वय + पाच वेळा नियमीत एकाच जागी व ठरलेल्या वेळी करावा. जर आपण काही कामा निमित्त्त परगावात असाल तर ठरलेल्या वेळी आपल्या वास्तुपुरुषाची आठवण काढून वास्तुप्राणायम करावा. या कारणाने परगावात ज्या स्थांनात आपण राहात असाल तेथील ऋण ऊर्जा आपल्या सोबत येणार नाही. ज्याला आपण शास्त्राच्या भाषेत निगेटिव्ह ऐनर्जि म्हणतात ती.

वास्तुप्राणायामामुळे आरोग्यदेवता-धन्वंतरी व वास्तुदेवता यांचा नित्य तुमच्यावर वरदहस्त राहील. पैसा मिळाल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार शास्त्रोक्त पध्दतिने आपण आपली नविन वास्तु निर्माण करु शकाल व जुन्या वास्तुमधिल दुषित स्थानातील दोष कमी करुन आनंदाने वास्तव्य कराल.

टिप:- वास्तुप्राणायम करताना आपणास शारीरीक त्रास असल्यास वैद्यकिय सल्याशिवाय वास्तु प्राणायम करुनये. त्या ऐवजी आपणास जमेल त्या पध्दतीने प्राणायाम करावा. जास्त शारिरीक कष्ट घेऊनये.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: