शनिवार, ७ नोव्हेंबर, २००९

३० दिवसात दोन वेळा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात?


र्वग क्रंमाक तीन:- अश्विनी नक्षत्र


कुंडलीशास्त्रात गोचर ग्रहांचा जसा आपण विचार करतो तसा गोचर नक्षत्राचा विचार करुन जर जातकास सल्ला का देऊ नये? साडेसाती आपण चंद्र-शनी भ्रमणाचा विचार करतो. पण ३० दिवसात दोनदा आपल्याला साडेसाती येते त्याला काय म्हणतात? हा विषय सष्टकरुन सांगण्यास बराच अवकाश आहे. फ़क्त शनि मंगळ ज्या स्थानात असतात त्या स्थानाची फ़ळे देताना विरुध घटना का घडतात?
आकाशात २७ नक्षत्र भ्रमणाचा मार्ग ठरलेला आहे.
उदा. मूळ नक्षत्रास सर्वजण घाबरतात, पण ह्या नक्षत्राचे काही चांगले परिणाम आहेत. हे नक्षत्र फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या वेळी पाताळी असते. आषाढ, अश्विन, माघ, भाद्रपद ह्या वेळी स्वर्गी असते. श्रावण कार्तिक, चैत्र, पौष ह्या वेळी नक्षत्र मृत्यूलोकी असते. त्या प्रमाणे प्रत्येक नक्षत्र डोक्यावरती, पायाखाली, उजव्याबाजूस, डाव्याबाजूस असल्याने आपणास वेगवेगळी फ़ळे देताना दिसतात.


ज्या जातकाची जी दशा चालु असते त्या प्रमाणे त्या जातकास फ़ळे मिळतात, जरा दशा बद्दल झाला म्हणजे कळेल. दिलेल्या फ़ळाचे कसे विपरीत परिणाम होतात ते. नक्षत्राचे किती महत्व असते ते तुम्हीच स्वतावर प्रयोग करुन बघा. आपल्या जन्मपत्रिकेत ताराचक्र ते कसे बघायाचे ते आज पर्यत काही ज्योतिष मंडळी आपल्या जातकास सांगत नाही ह्याचा जर उपयोग आपल्या दैनदिनी जिवनात केल्यास कसा चागला परिणाम साधता येतो ते बघा. उदा. श्रीमती सोनिया गांधी चे ताराचक्र आपणास दिले आहे. (नक्षत्राचा समाप्ती काळ प्रत्येक दिनदर्शिकेत तसेच काही वर्तमान पत्रात आपणास मिळेल). 



ताराचक्राची सुरुवात आपल्या जन्मनक्षत्रापासुन होते. १. उत्पत्तीकारक २. संपत्तीकारक ३. विपत संकटदायक ४. शुभकारक ५. अशुभ ६. साधक, ७. वधकारक ८ मित्रता दर्शक, ९. परम मैत्री ह्या प्रमाणे प्रत्येक घरात तीन नक्षत्रे ज्याचे स्वामी एक आहे असे येतात. यातील ३,५,७ या घरातील नक्षत्रात कोणताही निर्णय घेताना विचार पुर्वक निर्णय घ्यावा.


उदा. कार्यालयातिल एकद्या प्रश्नाला उत्तर देऊद्या.  कोणताही विषय समाप्त करावयाचा असेल तर या दिवशी आपण पत्र देऊन बघा, त्याचा योग्य परिणाम आपणास मिळेल. व काही वाद न होता केस सामोपचार किंवा ती केस बंद केली जाईल. पण ह्याच बरोबर आपली दशा व ग्रह पाठबळ सुध्दा महत्वाचे आहे. (पण या शास्त्राच्या मते वध नक्षत्राच्या दिवशी आपणास कमीत कमी ९०% फ़ळे आपल्या बाजुनी मिळतात.)

अश्विनी नक्षत्र आज आपल्या पुर्व ईशान्य दिशेकडे आहे. श्री सचिन पिळणकर ह्याच्या लेखातील माहीती व काही फ़ोटो आपणास देत आहे त्याचा अभ्यास करावा. 



 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: