राहू केतू हे ग्रह आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणित सिध्द बिंदू आहेत. मृथ्वीच्या भ्रमण मार्गास चंद्राच्या भ्रमण मार्ग उत्तरेकडे जातांना जेथे छेदतो त्या बिंदूस राहु म्हणतात. व त्या विरुध्द बिंदूस केतू म्हणतात. हे छाया बिंदू आहेत. त्यांना चंद्रचे पात म्हणतात. ( Moons Nodes, Ascending Nodes, Decending Noes अगर Dragon Head or Dragon Tall ) हे ग्रह नेहमी गक्र गतीने भ्रमण करतात. पाराशरी, सर्वार्थ चिंतामणी, बृहद्द जातक, सारावली ह्या मुळ ग्रंथात ह्याचा उल्लेख आहे. ह्यांना राशी दिलेल्या नाहीत पण अनुभवाने काही राशी ठरविलेल्या आहेत. त्यालाही मत मतांन्तरे फ़ार आहेत. पाराशर मते राहू वृषभेत उच्च, केतू वृश्चिकेत उच्च, राहु मिथुन कर्केत मुलत्रिकोणी व केतू धनु मकरेत मुल त्रिकोणी, राहू कन्येत स्वग्रही असतो. सर्वार्थ चिंतामणी मते राहू केतू उच्च वृषभ / वृश्चिक, मुल त्रिकोण कर्क / मकर,स्वगृह, काही नाही. मित्र राशी मेष/तुला. जातकभरण अमते उच्च राशी मिथुन/धनु, स्वगृह कन्या/मीन. जौमिनीय सुत्रात: रहू स्वगृह कुंभ, केतू-वृश्चिक.
साधारण पणे राहुला वृषभ, मिथुन, कर्क आणि कन्या ह्या राशी शुभ आहेत व केतूला वृश्चिक, धनु मकर आणि मीन ह्या राशी शुभ आहेत. हे तमोग्रह उपचय स्थानात बलवान असतात. हे छाया ग्रह रोज ठराविक गतीने ( ३ कला ११ विकला ) राशी चक्रांत उलट गतीने फ़िरत असतात. राहुला ३६० अंश भ्रमण करण्यास साधारण १९ वर्षे लागतात. राहू एका वर्षात साधारण १९ अंश जातो. ह्या ग्रहाची फ़ले शनी सारखी असतात. व केतू ग्रहाची फ़ले मंगळासारखी असतात. राहु वक्री दृष्टीने ५-७-१२ स्थानावर पाहातो. राहुची दृष्टी पुष्कळ ज्योतिषी ध्यानात घेत नाही. पश्चिमात्य लोक कुंडलीत राहु केतूचा विचार ध्यानात घेत नाही. अलिकडे त्याचा विचार फ़लीताकरता ते लोक घेऊ लागले आहे. विंशोंत्तरी महादशेत राहुला १८ वर्षे व केतूला ७ वर्षे दिली आहेत. त्यामुळे विशोंत्तरी महादशेत त्यांना महत्व प्राप्त झाले आहे.
राहू आणि केतू :- संपत्ती, संतती, वातव्यार्धीपासून अचानक आजार, दु:ख, अडचणी, विधवा स्त्रियांशी संबंध अथवा अन्य श्य्द्र जातीतील स्त्रीलाभ, सांपात्तिक नुकसान, पिशाच्च्चबाधा, मोक्षप्राप्ती इत्यादि गोष्तीचा हा ग्रह कारक असून राहूचा मुख्य अंमल गावाची वेस व तीर्थक्षेत्रातील बाहेरची जागा यावर असतो. केतूचा अंमल स्मशान, घरातील कोपरे व गावातील कोठ्याच्या जागा यावर असतो. राहूपासुन आजोबा आणि केतूपासून आईचे वडील यांचा बोध होतो. देवी, गोवर यासारखे रोग, विषारी प्राण्यांपासून पीडा, शत्रूची गूप्त कारस्थाने, हलक्या जातीच्या लोकांपासून पीडा, यासंबधी प्रश्नकुंडलीवरुन विचार करावयाचा असता राहू आणि केतू यावरून ही फ़ले पाहावीत. राहू नैऋत्य, केतू वायव्य ह्या त्यांच्या दिशा आहेत.
राहू केतू चे शुभ भाव म्हणजे क्रेंद्र स्थाने विशेष करुन चतुर्थ व दोन त्रिकोण स्थाने पंचम व नवम ही होत. ह्या स्थानात हे तमो ग्रह असता ते शुभ फ़ल देण्यास समर्थ होतात. ते स्वत: मात्र पाप प्रकृती ग्रह आहेत. इतर स्थानात त्यांची स्थिती, ते एकटेच असल्यास अनिष्ट फ़ल देणारी असते. पण ससे स्थित असून शुभफ़ले देणा-या ग्रहांबरोबर युक्त असतील तर शुभ फ़ल देतील तसेच जर केंद्राअत व त्रिकोणात असून पाप युक्त असतील तर पाप फ़लेही देतील.
हे ग्रह केंद्रात असून त्रिकोणाधिपती बरोबर संबंध करीत असतील किंवा त्रिकोणात असून केंद्राधिपती बरोबर संबंध करीत असतील तर राजयोग कारक होतात. पण केद्रेश युक्त व त्रिकोणात असून त्रिकोणेश युक्त असता राज योग होत नाही तो फ़क्त शुभ योग होईल. संबंध चार प्रकारे आहेत. सह योग, द्दष्टी योग, परिवर्तनयोग, व एकतर द्दष्टी योग अशा परिस्थितीतले छाया ग्रह असता ते संबंधामुळे त्या ग्रहाचे प्रतिनिधीत्व ( Agent ) स्विकारतात व अ त्या ग्रहांपेक्षा जोरदार फ़ले, बरे वाईट फ़ले देतात.
राहूचा स्वभाव, गुण व अवगुण व प्रभत्व:- संमेलने, भ्रम देणारा वर्मी बोलणारा, पाखंडी, जुगारी, संधिकालात बलवान, गुप्त कारस्थानी, तुरुंगवास देणारा, परदेश गमन करणारा, अपवित्र, अशुध्द, पांथरी वाढणे, खोटारडा, खालीपाहुन चालणारा, गोधळ्या, संशयग्रस्तता, यात्रा करणारा, दक्षिणेकडे राहणारा, पर्वत द-या अरण्ये यात राहणारा, ओबडधोभड जागेत राहणारा, वात कफ़ कारक, इंद्रजाल, मंत्रतंत्र जाणाणारा अथवा त्यावर विश्वास ठेवणारा, भुतपिशाच्च यांनी झपाटलेला, पोटात वायुविकार असणारा, दाहक व भिती वाटणारा, तीव्र, दु:ख मातामह, दुर्गा भक्त, डोळ्यात टिक येणे, वेड, उन्माद, मानसिक विकृती, संतती दोष असणारा, भाडोत्री घरात राहाणारा, दुस-याच्या पैशावर चैन करणारा.
राहूची दशा:-
राहूच्या दशेत काही शुभ ग्रहांची अंतरदशा चालू असेल अथवा अशुभ ग्रहांची अंतरदशा चालूअ असेल, तर प्रत्येक कामात आडकाठी, मघार घ्यावी लागेल. या राहूच्या दशेत रवी, मंगळ आणि केतू यांची अंतरदशा नुकसानीकारक जाईल.
जर राहू नीच असेल व चंद्रही नीच असेल, तर राहूची दशा चंद्राचे अंतरदशेमध्ये व्यक्तीस मिरगी नावाचा रोग होईल किंवा चक्कर आल्यासारखे वाटेल, याप्रमाणे बुध व शुक्र नीच असेल तर राहूचे दशेत शरीरावर कोड किंवा डाग होण्याचा संभव आहे.
जर केतू नीच असेल तर व्यक्तीस मुख्यत्वे करुन केतूच्या प्रत्येक द्र्हाच्या अंतरदशेमध्ये कोणत्या नाकोणत्या रोगास वळी पडावे लागेल. जर केतूची दशा असेल, जर शुक्र नीच असून त्याची अंतरदशा चालू असेल तर योनीचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. किंवा योनीचा दाह, पीडा, शक्यता आहे. जर केतुच्या दशेत चंद्राची अंतरदशा चालू असेल, तर गुप्त रोगाची चिंता वाढेल. रवीची अंतरदशा असेल तर शरिराचे आतील बाजूस हाड मोडेल. केतू व मंगळ दोन्ही नीच असतील किंवा दोन्ही ग्रहापैकी कोणताही एक ग्रह तूळेत असेल, केतूच्या दशेत मंगळाचे अंतरदशेत रक्तदाब विकार होईल, जर केतूमध्ये शनीची अंतरदशा असेल, तर व्यक्तीस चर्मरोग होतात. केतूमध्ये राहूची अंतरदशा चालू असेल तर शत्रूच्या दृष्ट कारवाया वाढतात.
जन्मकुंडलीत मूळचे ग्रहयोग त्य त्या व्यक्तीची शारिरीक आरोग्यकारक स्थिती कशी राहणार हे दर्शवितात. त्याचप्रमाणे शरिरातल्या कोणत्याही विभागास व इंद्रियास पाप ग्रहाच्या प्राधान्ययोगामुळे विकार उत्पन्न होणे शक्य व संभवनीय आहे. जन्मत: कोणत्याही विभागार विकृती आहे. शरिरातील अस्थी रक्त मांस इत्यादी त्याच प्रमाणे सप्तधातूपैकी कोणत्या धातूचा अधिक उणेपणा आहे. शरीर पुष्ट व सकस राहणार की कृश आणि सामान्य राहाणार इत्यादि सुखाच्या व आरोग्याच्या बाबतीतील स्थूल सूक्ष्म अशा महत्वाच्या सर्व गोष्टीचा बोध जन्मस्थ ग्रह आणि स्थाने यावरुन फ़ार बारकाईने सूक्ष्म विचार केल्यास होतो. विशेषत: शरिरातील कोणत्या विभागात विकृती व दु:ख निर्मांण झाले आहे आणि विकाराचे व रोगाचे मूळ कोणत्या ठिकाणी आहे हे कळल्याने व त्याचे स्थाननिदर्शक स्पष्टीकरण झाल्याने उपाययोजनेस सौलम्य येते. ह्या गोष्टीचा विचार प्रत्येकाने केला पाहीजे
असे बरेच सांगण्या सारखे आहे पंरतु वेळे अभावि शुध्द लेखनातील चुका दुरुस्त केल्या नाहीत तसेच लेखन करु शकत नाही. अधिक माहीती पाहीजे असल्यास कुंडलीची भाषा खण्ड दुसरा ग्रंथाचा अभ्यास करावा ग्रंथ मिळण्याचे ठिकाण ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक
वर्ग क्रंमाक चार
आपण जी सुरुवात केली आहे ती नवमांश पध्दतीने आहे. नवमांश म्हणजे काय? नवमांश म्हणजे एका राशीचा नववा भाग होय. नुसत्या राशीवरुन भविष्य कथन अडचणीचे व अवघड झाल्यामुळे राशीचे भाग करुन व त्यांच्या होरा, द्रेष्कण, सप्तमांश, नवमांश, द्वादशांश व त्रिशांश कुंडल्या तयार केल्या व त्या वरुन सप्तवर्ग तयार झाले. भविष्य कथनात त्याचा फ़ार उपयोग होऊ लागला. होरा:- संपत्ती विचार, द्रेष्काण:- भांवड विचार, सप्तमांश:- संतती विचार, नवमांश :- पती-पन्ती विचार ( याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार ), द्वादशांश:- माता पिता, त्रिशांश:- अरिष्टाचा विचार करतात.
या सर्वात नवमांश कुंडलीस अनन्य साधारण महत्व आहे. नवमांश कुंडलीमध्ये पती-पन्ती विचारा याखेरीज इतर पुष्कळ गोष्टीचा विचार होतो. एक नवमांश म्हणजे राशीचा ९ वा भाग तो तीन अंश २० कलेचा चा असतो एक राशीत २ नक्षत्रे येतात. म्हणजे त्या राशीतील नक्षत्राचे एकेक चरण हा नवमांश चरण असतो.
जन्म लग्न राशी व नवमांश लग्न राशी एकच असली म्हणजे ते लग्न वर्गोत्तम असते. त्याने कुंडलीचा दर्जा वाढतो. जन्म कुंडलीतील स्वगृहीचा ग्रह जर नवमांसह कुंडलीत स्वगृही आला तर तो वर्गोत्तम ग्रह होतो. त्याचे शुभ फ़ल चांगले मिळते. या प्रमाणे ग्रहाचे बलाबल पाहाण्यास नवमांशाचा फ़ार उपयोग होतो. ग्रहांना मिळणा-या विविध बलामध्ये नवमांश बलाला विशेष मानाचे स्थान आहे. नुसत्या राशीवरुन निर्णय न घेता त्याचे नवमांश बलाचा विचार करावा. ते करत असताना ग्रहांच्या अवस्था सुध्दा महत्वाच्या आहेत प्रत्येक ग्रहाला महत्वाच्या तीम अवस्था असतात. १. जागृत २. स्वप्न, ३. सुप्त.
१. जागृत अवस्था :- जे ग्रह स्वराशीत किंवा उच्च राशीत येतात त्यांची जागृत अवस्था असते.
२. स्वप्न अवस्था :- जे ग्रह मित्र नवमांशात असतात ते आपल्या मित्राच्या डोक्यावर आपला भार सोडुन स्वप्नामध्ये राहातात.
३. सुप्त अवस्था :- जे ग्रह शत्रु किंवा नीच नवमांशी असतात ते सळर ध्यांनस्त बसतात. त्यामुळे त्याचा उपयोग होत नाही.
सर्व नवमांश हे चर राशीपासून सुरु होतात. तसेच चर राशीचे नवमांश लग्न स्थानापासून स्थिर राशीचे नवमांश पंचम स्थानापासून व द्विस्वभाव राशीचे नवमांश नवम स्थानापासून सुरु होतात.
मेषांशस्वरुप:- गेल्या वेळी आपण सर्वतोभद्र चक्रा मधिल मेषराशीचा पहिला तस्करांश पाहिला. आता मेषांशस्वरुप कसे असते ते बघु. आकाशात जे नक्षत्र तारका समुहनी बनलेले असते त्यामधील काही मुख्य तारका समुहाच्या सानिध्यात काही मंद प्रकाशाच्या तारका असतात. त्यांचा विचार भविष्य कथनात आजकालचे ज्योतिषी घेतनाहीत. त्या सर्व ग्रह व दशा योग्य असताना सुध्दा अपघातासारख्या घटना घडताना दिसतात.
उदा. रस्ता ओलांडताना आपण मध्ये उभे असताना एखादे वाहन जर नकळत आपल्या पाठिमागून किंवा समोरुन जोरात गेल्यास आपला तोल जातो किंवा क्षणभर आपण आपले भान हरवुन बसतो.
राशीत व नक्षत्राच्या भ्रमण मार्गात अनेक तारका समुह व उल्का, धुमकेतु असतात त्यातिल काहीचे मार्ग ठरलेले असतात. ह्यचा जर विचार भविष्य कथनात केला तर आपण जास्त प्रमाणात अचुकतेने भविष्य फ़ल कथन करु शकतो.
मेषराशीतला पहिला अंश तील
राफ़ेल:- उजव्या हातात विळा व डाव्या हातात लढण्याचे शस्त्र धारण करणारा पुरुष.
चारुबेल :- एका अमर्याद मैदानाच्या मध्यभागी नागरीत असलेला पुरुष.
सेफ़ारिअल :- एक वलवान पुरुष उभा आहे. त्याचा पोषाख चामड्याचा किंवा जाड्याभरड्या जड व सैल अशा जिनसांचा आहे; त्याचे खांदे बहुतेक उघडेच आहेत व त्याच्या हातात एक जबर सोटा आहे. या व्यक्ति वरुन मारुतीची ( हर्क्युलिसची ) आठवण होते.
वरिल सर्व गोष्टीच्या उपयोग भविष्य कथनात आपण करु शकतो.