शुक्रवार, ३० ऑक्टोबर, २००९

धडा पहिला कुंडलीची ओळख:-

धडा पहिला कुंडलीची ओळख:- गणितात आपण “क्ष” हे नाव घेऊन किंवा सुत्र घेऊन गणिताचे समिकरण सोडवितो त्याच प्रमाणे माणसाच्या जिवणाचे समिकरण सोडवण्यास ज्योतिष पध्दतीत १२ घराचे समिकरण किंवा सुत्र विकाशीत करण्यात आले आहे. कोणते ही मोजमाप करताना परिमाणाची आवश्यकता असते. त्या प्रमाणे ज्योतिषशास्त्रात सुध्दा परिमाणाची आवश्यकता असते. ज्या माननिय लोकांनी ही पध्दत आपल्याला उपलब्द करुन दिली आहे त्याचे आपण ऋणी आहोत. काही समीकरण किंवा योग्य सिध्दांत न मांडल्यामुळे ह्या विद्येवरील समाजामध्ये काही लोकांची श्रध्दा योग्य प्रमाणात बसली नाही. आपण जो हा विषय शिकणार आहोत त्या विषयी माझ्या संत्तगुरु व इतर गुरुवर्या कडुन जे जे प्राप्त झाले आहे ते मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणा आहे.


अभ्यासाला सुरुवात करण्या पुर्वी प्रथम आपण आपल्या भक्तिपुर्वक देवाला किंवा आपण ज्या गोष्टीला अभिवादंन करतात त्याचे स्मरण करुण ज्योतिषशास्त्र या विषयाला सुरुवात करुया. ह्या अभ्यास क्रमात नावाजलेल्या लेखाकाची व प्रकाशकाच्या पुस्तकाचा संदर्भ देण्यात येईल. अधिक माहीती साठी जमल्यास आपण ती विकत घेऊ शकतात. कॊपीराईट मुळे सर्वगोष्टी आपणास येथे देण्यात येणार नाही. ह्या गोष्टी शिकवताना ज्या लेखकांनी किंवा प्रकाशकानी संमती दिली असेल अशा गोष्टी आपणास त्याचा मुळ लेखनाची प्रत उपलब्ध होईल या गोष्टीची नोंद घ्यावी.

पदविच्या परिक्षेसाठी खालील ठकाणी आपण संपर्क करु शकता. माझ्या कडे फ़क्त शिकवणी वर्ग आहे. आपल्या कडुन कोणत्याही प्रकारे शिकवण्याचे मानधन घेतले जाणार नाही. फ़क्त गुरुदक्षिणा म्हणुन आपण कोणलाही गरजु मुलांना किंवा गरिबला औषधासाठी आपल्या ऐपती नुसार माझी गुरुदक्षिणा म्हणुन आपण त्यांना पैसे (नकद) न देता लागणारी वस्तु खरेदी करुन द्यावी हि विनंती.

१. पोस्टाद्वारे ज्योतिष शिक्षण देणारी संस्था “फ़ल ज्योतिष अभ्यास मंडळ/संस्था, पुणे, महाराष्ट्र अध्यक्ष पं विजय श्रीकृष्ण जकातदार दुरध्वनी +91 020 24455826 ( सकाळी १० ते दुपारी ०२ ).

२. फ़लज्योतिष प्रबोधिनी, नाशिक ( सलग्न महराष्ट्र ज्योतिष परिषद, मुबंई ) श्री किरण देशपांडे मो. क्रंमाक 9421507583. श्री श्रीनिवास कृ. रामदास मो.क्रंमाक 09422268321

३. ज्योतिर्विद्या संशोधन मंडळ, नाशिक. (महाराष्ट्र) 0253-2507178 वेळ दुपारी ०२ ते ०७ पर्यंत.

वरिल ठिकाणी मुक्त विद्यापिठाचे प्रवेश सुरु आहे आपण आपल्या जबाबदारी वर प्रवेश घ्यावा. इतर काही संस्थेची माहीती आपणास वेळोवेळी देण्याचा प्रयत्न करीन.

आजचा वर्गातील अभ्यास क्रंमाक १.

कुंडली ओळख, सर्व साधारण मी प्रथम माहीती दिल्या प्रमाणे कुंडलीचे स्वरुप आहे. परंतु काही विभागात वेगवेगळ्या पध्दतीने कुंडली माडण्याते येते. ती कशी असते ते आपण नंरत पाहू. सर्व साधारण लोक चौकोनाला प्राधान्य देतात. प्रथम आपण एक चौकोनाची आखणी करु. त्यां चोकोनाचे चारही कोन एकमेकांना जोडुन आकृतीत दाखवल्या प्रमाणे त्यांच्या चारही रेषेच्या मध्य बिंदु पासुन त्या मध्ये एक चौकोनाची आखणी करुन घेऊ. नेहमी प्रत्येक गोष्टीला परिणामाचे बंधन असते. कुंडली शिकताना मनात येईल असा चौकोन न काढता एका विशिष्ठ मापामध्येच त्याची आखंणी करण्याचे मी आपणास बंधन घालणार आहे. त्यांच बंधनात राहुन आपण ही गोष्ट आत्मसात करावयाची आहे.

सर्वात प्रथम आपल्याला काही साहित्य खरेदि करावे लागेल. त्याची सुची खालील प्रकारे आहे.

१. सफ़ेद पेपर साईज 57 cm X 38 cm किंवा त्यापेक्षा मोठी साईज सुध्दा चालेले पण लाहान नको.

२. फ़ुटपट्टी ( Ruler ), पेन्सिल, रबर,

३. पंचाग ( आपल्या विभागा प्रमाणे )

आकृतीत दाखवल्या प्रमाणे 30 X 30 cm चा चौकोन कागदाच्या मध्यावर आखुन घ्या. व कुंडली तयार करावी आता त्याचे ऎकुन बारा भाग झाले त्यातिल प्रतेक भागाला एक विशेष नाव दिले गेले आहे. पंचागा बद्दल बरीच माहीती नेटवर प्रसिध्द करण्यात आली आहे त्यां मुळे मी ती येथे देत नाही. मीसळपाव ( www.misalpava.com ) वर आपण ती शोधल्यास सापडेल.

बारा घरातील पहिल्या घराला तनु व लग्न स्थान असे संबोधतात. ह्या विभागाचे क्षेत्र ०० ते ३० अंशा पर्यंत विभागले आहे. असे प्रत्येकी ३० अंशाचे १२ भाग म्हणेजे एक काल पुरुषाची कुंडली म्हणून संबोधले जाते. ह्या ३० अंशात कमी जास्त प्रमाणात नक्षत्राची दादागीरी चालते प्रत्येक नक्षत्र हम दो हमारे दो ह्या नियमा नुसार चालते. त्यातिल काही नक्षत्रे दोन घरात ( कुंडलीतील दोन भागात ) आपले हक्क सांगतात तर काही नक्षत्रे फ़क्त २५% हक्काची अंमल बजावणी एका घरात करताना दिसतात व दुस-या घरात ७५% हकाची अंमल बजावणी करतात.

प्रत्येक घराच्या आतमध्ये नऊ खोल्या असतात. त्यातिल प्रत्येक खोलीला एक विशिष्ठ महत्व प्रप्त झाले असते त्यालाच नंवमाश असे म्हणतात. आता आपण १२ पैकी पहिल्या घराची ओळख करु घेवु. ह्या घराचे नामकरण “ मेष “ असे करण्यात आले आहे. याच्या बरोबर तीन नक्षत्राचा सहवास असतो. ती म्हणजे १. अश्विनी १००% २. भरणी १००%, ३. कृतिका २५% ह्याची दादागीरी येथे चालते. त्यांच्या नऊ खोल्यांचे नामकरण चू चे चो ला ली लू ले लो आ अशा प्रकारे केले गेले आहे. प्रतेक खोल्याचे मापे सुध्दा आखुन दिलेली आहेत. पहिले खोली ०० ते ०३.२० अंशा पर्यत २. ०३.२० ते ०६.४० अंश ३. ०६.४० ते १०.०० अंश ४. १०.०० ते १३.२० अंश. ५. १३.२० ते १६.४० अंश ६, १६.४० ते २०.०० अंश. ७. २०.०० ते २३.२० अंश ८. २३.२० ते २६.४० अंश. ९. २६.४० ते ३०.०० अंश अशा प्रकारे त्याचे वाटप झाले आहे. त्या प्रत्येक घारामध्ये एक विशिष्ठ ग्रहाला व राशीना स्थांने वाटुन दिली गेली आहेत. हा सगळा नवांशचा घोळ कुंडली चे वाचन करताना कामाला येतो. पहिल्या घराच्या प्रत्येक खोलीत त्यांचा चरणस्वामी व नवांश राशीचा अधिकार असतो उदा. पहिल्या खोलीत चू कडे चरणस्वामी मंगळ व नवांश राशी मेष. २ चे कडे शुक्र-वृषभ, ३. चो कडे बुध-मिथुन ४. ला कडे चंद्र-कर्क असे अश्विन नक्षत्रा कडे १ ते ४ चरणाचे २५% चे चार भाग दिले आहेत. आत आपण अश्विन नक्षत्राची ओळख करु घेऊ.

अश्विन नक्षत्र :-

पहिले नक्षत्र, याचे क्षेत्र ० अंश ते १३ अंश २० कला मेषराशीत आहे . याचा राशी स्वामी मंगळ असुन ऩक्षत्र स्वामी केतु, योनि अश्व, नाडी आद्य, गण देव, नामाक्षर चू,चे,चो,ला कुंडलीतील घर क्रंमाक १ खोली क्रंमाक १ ते ४ वर आपला अधिकार. वेगवेगळ्या खोलीत वेगवेगळे चांगले किंवा वाईट परिणाम देण्याची क्षमता आलेल्या गोचरीच्या ग्रह पाहुण्याच्या स्वभावा नुसार फ़ळे.

शरीर भाग :- मस्तक आणि मोठया मेंदुच्या कार्यशमतेवर होतो.

नक्षत्रात होणारे रोग :- डॊळ्याला इजा, चक्कर येणे ( मिरगी ), शीतपित्त सर्दि, डोक्याला गंभिर वेदना, विसरणे, पक्षघात, मलेरिया, निद्रानाश, पोटवृध्दी,

नक्षत्राचा स्वभाव:- लोभी, विचारशुन्य, संतापी, संपती विषयी चिंत्ता, घरातील भावडा मध्ये विषेश, मंत्र-तंत्र जाणणारा, ईश्र्वरभक्त, साम्यवादी, दाग-दागिण्याची आवड ( पुण्यातील म.न.से.चा एक आमदार ), वागायला चतुर आणि बोध्दिक, कार्याने प्रतिष्ठित.

व्यवसाय:- कारखाण्यात नोकरी, पोलिस, सेना, चिकित्सा, सर्जरी, तुरुंगात नोकरी, अपराध, न्यायालय, रेल्वे, यंत्र, लोखड, पुस्तक संग्रालय, घोड्याचा व्यापार, पर्यवेक्षक, नेतृत्वप्रधान, प्रतिष्ठित अध्यक्ष.

अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये वर्ग क्रंमाक दोन मध्ये.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २००९

चला स्व:ता करुया आपल्या जन्म कुंडलीचे वाचन.

कुंडली शास्त्रातील कुंडली बनवण्याची एक नवीन पध्दत मी विकसीत केली आहे. ज्याने आपले ग्रह एका दृष्टीत आपण पाहु शकतो व गोचरी ग्रह भ्रमनात त्याचे परीणाम या पासुन स्वताचे आत्मरक्षण व होणारी हानी व यातना थोड्याफ़ार प्रमाणात कामी करु शकतो. ज्या वाचकांना कुंडलीशास्त्राची माहिती आहे त्यांनी दिलेल्या कुंडलीत जन्मग्रह त्या त्या अंशाला मांडून आपले प्रश्न सोडून पहा. बघा कुंडली वाचनाचा आंनद कशा अनोख्या पध्दतीने घेता येतो. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी थोडा धीर धरा ही कुंडली प्रिंट करुन घ्या व नव्या लेखाची वाट पहा एक एक गोष्ट मी आपणांस स्पष्ट स्वरुपात सांगणार आहे.टिप :- आपल्या लग्न कुंडली नुसार न भरलेली कुडंली अभ्यास करण्या साठी मिळू शकेल. ज्यांने आपणाला स्पष्टग्रह भरण्यास व वाचन करण्यास सोपे जाईल.

कुंडलीशास्त्र उपभोक्ता

संजीव

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २००९

भाडेकरुंनी वास्तुदोष कसा घालवावा..

जेव्हा आपण सरकारी, करार पद्दतीच्या किंवा कंपनीच्या गृह संकुलात राहात असतो त्यावेळी आपणास कोण्यताही प्रकारे वास्तु मध्ये तोडफ़ोड किंवा बद्दल करता येत नाही. अशावेळी काही गोष्टी चे व्यवस्थित पालन केल्यास काही प्रमाणात वास्तुदोषावर मात करुन शुभ परिणाम साधता येतात.


१. आपल्या आवडत्या देवाचे स्मरण करावे.

२. रोज सकाळी दारासमोर रांगोळी घालावी व सकाळी तुपाचा दिवा व संध्याकाळी तीळाच्या किंवा तुपाचा दिवा लावावा.

३. घरातील पडद्याचे रंग आपल्या दशा स्वामी नुसार किंवा प्रबंल ग्रहानुसार असावेत.

४. घरातील ईशान्य कोन रिकामा ठेवुन त्या ठिकाणी जमल्यास ईशान्य पात्र ठेवावे किंवा चांदिच्या वाटीत पाणी, फ़ुले, मोती, पोवळे ठेवावे. देव्हारा असल्या उत्तम.

५. दक्षिण दिशेला तोंड करुन जेवू नये.

६. घरातील मुख्य कपाट शक्यतो नैऋत्य दिशेला ठेवुन उत्तरे कडे उघडेल यारितीने त्यांची व्यवस्था करावी किंवा कपाटाचे तोंड उत्तरेकडे करावे.

७. दारासमोर कोणत्या ही प्रकारे द्वारवेद्य होणार नाही ह्याची काळजी घ्यावी. कचरा किंवा कोठल्याही प्रकारे चिखल, पाणी साठु देऊनये.

८. नैऋत्य कोनात नेहमी जडवस्तु ठेवावी तो कधीही रिकामा ठेवुनये.

९. जर घरात पाण्याची साठवण करवयाची असल्यास ती उत्तरेकडॆ किंवा ईशान्याला करावी.

१०. श्रृंगार नैऋत्य दिशेकडे पाठे करुन व उत्तरेकडे तोंड करुन करावा.

११. नेहमी पुर्व-पश्चिम झोपावे तसे जमत नसल्यास प्रामुख्याने दक्षिणे कडेपाय करुन झोपणे टाळावेत.

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

वर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.

दिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात " वैकुंठ चतुर्दशी" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी? हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.


मी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.

३१ ऑक्टोबर २००९ शनिवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.

प्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखऊन उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.

आवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.

ज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.

अधिक माहिती साठी संपर्क करा. ०९७६८२५४१६३ / +91 09768254163

http://vastuclass.blogspot.com Email:- Astro@sancharnet.in / vastuclass.gmail.com

श्री विष्णु पूजा यादी --

चौरंग १ आसन ३

लाल पीस १ तांदुळ २ किलो

नारळ ३ फळे ५

विड्याची पाने ३० सुपारी ३०

कलश २ ताम्हण २

पळी-पंचपात्र १ समई २

निरांजन १ कापूर आरती १

अगरबती १ पुडा कापूर १ ड्बी

काडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट

अत्तर बाटली १ जान्वे जोड १

हळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट

अभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट

रांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे

ताट २ वाट्या ८

पातेले १ तेल , तूप पंचाम्रुत

पंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा फुली ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा

आंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४

सुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि

घरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण

गुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.

तुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे.

प्रसाद तयार करुन ठेवणे.

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २००९

मंगळाचा कुज्स्तंभ आणि कालपुरुषाच्या कुंडली व वास्तुवर होणारे परिणाम.

सर्व साधारण मंगळ ग्रह म्हटला की सर्वाना मंगळीक कुंडलीची आठवण होते किंवा मंगळाचे नाव ऐकुण धडकी भरते. मंगळ साधारण प्रत्येक कुंडलीच्या एका घरात किंवा एका राशीत आपला मुक्काम साधारण ४५ दिवसाचा करत असतो, पण त्याला दोन वर्षातुन एकदा कोणाच्यातरी घरे म्हणजे राशीत किंवा कुंडलीतील एका घरात जास्त दिवस पाहुणाच्यार आवडल्याने तो घेण्याच्या दिर्घकाळ आपला मुकाम त्या घरात करत असतो. ह्या वर्षितो कर्कराशीत राहाणार आहे. त्याचा मुक्काम दिनांक ०५ ऑक्टोबर, २००९ पासुन ते २६ मे, २०१० पर्यंतचा आहे.
कर्करास ही काल पुरुषाच्या चैथ्या घरात येत असुन. त्याच्या परिवारात तीन नक्षत्र पुनर्वसु (४था चरण), पुष्य, आश्लेषा ह्या तीन नक्षत्रा बरोबर त्याचे दैनैदिनी व्यवहार या पुढे चालणार आहेत. त्यात बिचारी पुनर्वसु सर्वात भाग्यवाण तीचा नक्षत्र स्वामी-गुरु, योनी-मार्जर, गण-देव, आराध्यवृक्ष-पिंपळ, दान- उडीद-तीळ, देवता-आदिती, मुख-तिर्यक, दृष्टी-सुलोचन, तत्त्व-वायु, संज्ञा-चर, चरणाक्षर-ही, चरणांक-४, चरणस्वामी-चंद्र, नवांश समाप्ति ०३-२०, नवांश राशी-कर्क, ह्या नक्षत्राचे अ.व.क.ह्.डा. चक्रा तिल मिळालेले हे गुण, पुनर्वसु नक्षत्राचा स्वामी गुरु आपल्या नक्षत्राला कसा संभाळुन मंगळाच्या तावडीतुन लवकरात लवकर बाहेर काढून त्या नक्षत्राची सुटका करतो.


कर्करास :- राशी चक्रात ९० ते १२० अंशापर्यंतचे क्षत्रे कर्क राशीचे मानले जाते. या राशीचे चिन्ह आहे खेकडा ( आकृती पाहा )

 खेकडा जलचर प्राणी आहे. या राशीत पुनर्वसुचा एक चतुर्थाशं भाग, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रांचा समावेश असतो. कर्क रास आणि जलप्रदेश, समुद्र, नदी किंवा समुद्र किनारा यांचा अगदी जवळचां संबंध मानला जातो. या राशीवर संक्रमण करताना रवी उत्तर गोलार्धाकडून दक्षिणेकडे जाताना जाणवतो. त्यावेळी सूर्याची तप्त किरणे समुद्रावर पडतात आणि श्रावणात घनघोर पावसाचे वातावरण तयार होते. ही रास सहानुभूती, सुकुमारता आणि मनमिळावूपणाचे प्रतीक मानले जाते.

पुथ्वीवर या राशीचे स्थान उत्तरेकडे विषुवरेषेपासून २४ ते २० अंशापर्यंत निश्चित केलेले आहे. कर्क रास स्त्री रास असून, सम शरीर, प्रवासी, घातुसंज्ञक आहे. तीचे निवास स्थान उत्तर दिशेला, सरोवर, बाध, जलाशय, समुद्र या ठिकाणी असते. ही रास चंचल, कोमल पण सौम्य, अस्थिर स्वभावाची बालवस्थेत प्रखर, लाल व पांढर्याा वर्णाची, रजोगुणी, जलतत्त्वयुक्त, रात्री बलवान असणारी, कफ प्रकृतीची, ब्राह्मण जातीचे प्रतिनिधित्व करणारी, स्त्री प्रधान आणि बहुसंततीयुक्त आहे. कर्क रास पृष्ठोदयी आणि सजीव लक्षणांनी युक्त असून उत्तर दिशेकडे विशेष बलवान आणि क्रियाशील असते.

या जलचर सम राशीचे निवासस्थान चोल देशात असून स्वामी चंद्र आणि तिचा वार सोमवार, भाग्यांक २ आणि ७ आहेत. या राशीचे गुण म्हणजे प्रयन्त, शीलता, लज्जा आणि विवेक. या राशीचे मुख अंग ह्र्दय ते खेकड्याच्याच आकाराचे असते.

चीन,स्कॉटलंड, न्यूझीलंड, कॅनडा, रशिया, अल्जिरिया, न्यूयॉर्क, सिंध, काठेवाड कच्छ या देशावर आणि विभागावर तीचे अधिपत्या आहे. या राशीची मुख्य द्रव्ये :- उत्तम प्रकारचे अन्न, फळे, किराणा सामान, चहा, चांदी, पारा. हा आहे. वाणिज्य, जलवाहातूक आणि नौसेना विभागविषयक कार्याचे प्रतिनिधित्व कर्क रास करते. रवि या राशीत श्रावण महिन्यापर्यंत असतो. रवि १६ जुलै ते १५ ऑगस्टच्या दरम्यान या राशीत असतो. या राशीत दोन पंधरवड्यात एकदा चंद्र सव्वादोन दिवस असतो. हे झाले या काल चक्रा मधिल ४था राशी कर्कची ओळख परेड.

आता बघुया या राशीत मंगळाचा पराक्रम.

मंगळ या राशीचा मित्र आहे त्याबरोबर रवि आणि गुरु सुध्दा मित्र आहेत. ह्याचे शत्रु- बुध व राहु, सम( उदासीन) ग्रह शुक्र आणि शनि. प्रत्येक ग्रहाला उच्चरास आहे. त्या राशीत तो अंत्यत बलवान होतो. स्वगृही जसा बलवान असतो तसाच उच्च राशीत तो बलवाण असतो. नीचरासः- ग्रह ज्या राशीत उच्च असतो त्या राशीपासून सातव्या राशीत तो नीच असतो. नीच राशीतील ग्रह बलहीन असतो, अशुभ असतो.(क्रमश)

रविवार, ११ ऑक्टोबर, २००९

"मन करा रे प्रसना सर्व सिध्दीचे कारण “वास्तु- प्राणायाम”

आज पर्यंत लोक स्व:स्वार्थासाठी प्राणायाम करत असतात. पंरतु आपण ज्या वास्तुत राहात असतो त्या वास्तुमध्ये राहाणा-या लोकांसाठी व वास्तुमध्ये शुभ परिणाम घडवण्यास वास्तु प्राणायमाची आवशकता असते. प्राणायम करण्यासाठी वेळेचे बंधन पाळण्याची आवश्यकता नाही. पंरतु जर आपण सकाळी पाच ते सहा ही वेळ निवडावी तर फ़ार उत्तम आहे. देवपुजा झाल्यानंतर जर वास्तु प्राणायम केले तर वास्तुबरोबर आपल्या मनाचीही प्रसन्नता वाढते.


वास्तु प्राणायम करतान वास्तुमधिल पश्चिमेची मोकळी भिंत प्रामुख्याने निवडावी, शक्यझाल्यास "देवघर व देव्हारा" या लेखा मधिल दिलेल्या माहिती प्रमाणे स्व:स्वार्थ साधनेसाठी जागेची निवड करावी. निवड झाल्या नंतर बसण्यासाठी लोकर किंवा दर्भासन आसनासाठी वापरावे. आपली चेतना संस्था ज्या अस्थिबधंनात बंदिस्त आहे. त्याच्या सातव्या मणिबंधापासुन ते २६ व्या मणिबंधापर्यंत समांतर रेषेत भिंतीला टेकुन बसावे बसताना मणिबंध भिंतिला जर समांतर रेषेत बसत नसतिल तर काही हरकत नाही काळजी करुनये, सुखासनात टेकुन किंवा टेबलावर बसण्यास सुध्दा परवागी आहे. पाठ जरुर भिंतीला लावावी. शक्यझाल्यास पदमासनात बसावे या पदमासनाला खुप महत्व आहे. त्याचा परिणाम मूलाधार चक्रावर होतो. पदमासनाने प्राणायम क्रिया सुलभ होऊन इच्छित सिध्दी लवकर साध्य होतात.

वास्तुप्राणाय करताना आपला सुध्दा प्राणायाम होतो हे विषेश आहे. माझ्या जवळ शिकलेल्या विध्यार्थि तसेच मार्गदर्शन घेतलेल्या लोंकाना याचा चांगला अनुभव आहे. वास्तुप्राणायमाची सुरुवात वास्तुच्या नक्षत्रा पासुन केल्यास जास्त लाभ होतो. विषेश म्हणजे वास्तुचे नक्षत्र घरातील मुख्य व्यक्ति ज्याच्या नावावर घर आहे त्याचे व वास्तुचे नक्षत्र एक असल्यास त्यास दुहेरी फ़ायदा मिळतो. वास्तुचा नक्षत्राधिपती व लग्नाधिपती आणि जातकाचा नक्षत्र-लग्नाधिपती जर समान असल्यास "सोनेपे सुहागा" .

वास्तुप्राणायाम करताना पद्दमासन किंवा सुखासन घालुन, नंतर मांड्यांवर हात ठेऊन, डोळे मिटून घावेत. मनातील विचार काढून टाकावेत. मन निर्विकार, निर्विचार करावे. रेचक करुन फ़ुफ़्फ़ुसातील सर्व हवा काढून टाकावी. श्वास हळूहळू आत घ्यावा. ह्या वेळी आपली कोणती नाडी चालत आहे हे बघणे अंत्यत महत्वाचे आहे .नाडीचे दोन प्रकार आहेत. एक चंद्रनाडी व दुसरी सुर्यनाडी ज्यांलोकांना अंगमेहनतीची कामे आहेत त्यांनी सुर्यनाडी वापरावी व ज्या लोकांना निर्णय घेण्याची कामे आहेत त्यांनी चंद्रनाडीचा वापर करावा. श्वास घेताना पहिल्यादा आठवेळा अष्टदिशाचा विचार करुन अष्टदिशाच्या नावे श्वास घ्यावा. नंतर  ओम विष्णवे नम: , ओम महालक्ष्म्यै: नम: , ओम कुलदेवतायै: नम: , ओम आकाशाय नम: , ओम वायुय नम: ,ओम पृथिव्यै नम: , ओम जलाय नम: , हे करताना मनात विचार आणावेत की वरील अष्टदिशाच्या देवता व पंचमहाभुते यांची शक्ति माझ्या शरीरात व माझ्या वास्तुत दाखल होत आहे. ,माझे विचार आणि शरिर आणि वास्तु चैत्यन्य व सर्वसार्मथ्यांनी प्रफ़ुल्लीत झाले आहे. असा आत्मविश्वास ज्यावेळी मनात निर्माण होईल त्यावेळी आपणास वास्तुसुख व सर्व सुख प्राप्त होण्यास वेळ लागणार नाही.

वास्तुप्राणाय हा तुमचे वय + पाच वेळा नियमीत एकाच जागी व ठरलेल्या वेळी करावा. जर आपण काही कामा निमित्त्त परगावात असाल तर ठरलेल्या वेळी आपल्या वास्तुपुरुषाची आठवण काढून वास्तुप्राणायम करावा. या कारणाने परगावात ज्या स्थांनात आपण राहात असाल तेथील ऋण ऊर्जा आपल्या सोबत येणार नाही. ज्याला आपण शास्त्राच्या भाषेत निगेटिव्ह ऐनर्जि म्हणतात ती.

वास्तुप्राणायामामुळे आरोग्यदेवता-धन्वंतरी व वास्तुदेवता यांचा नित्य तुमच्यावर वरदहस्त राहील. पैसा मिळाल्यामुळे वास्तुशास्त्रानुसार शास्त्रोक्त पध्दतिने आपण आपली नविन वास्तु निर्माण करु शकाल व जुन्या वास्तुमधिल दुषित स्थानातील दोष कमी करुन आनंदाने वास्तव्य कराल.

टिप:- वास्तुप्राणायम करताना आपणास शारीरीक त्रास असल्यास वैद्यकिय सल्याशिवाय वास्तु प्राणायम करुनये. त्या ऐवजी आपणास जमेल त्या पध्दतीने प्राणायाम करावा. जास्त शारिरीक कष्ट घेऊनये.

बुधवार, ७ ऑक्टोबर, २००९

वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक गोष्टी

" घर असावे घारासारखे |  नकोत नुसत्या भिंती ||

तिथे असावा प्रेम, जिव्हाळा |  नकोत नुसती नाती ||

त्या शब्दांना अर्थ असावा |  नकोच नुसती फुका वाणी ||

सुर जुळवे परस्परांचे  | नकोत नुसती रडगाणी ||

त्या अर्थाला अर्थ असावा  | नकोत नुसती नाणी ||

अश्रुतूनही प्रीत झरावी  | नकोत नुसते पाणी ||

या घरट्यातून पिलू उडावे |  दिव्य घेऊनी शक्ति ||

आकांक्षाचे पंख असावे  | उंबरठ्यावर निष्काम भक्ति ||

या काळात या जगामध्ये अनेक गृहनिर्माण होत आहेत. अशा प्रकारे गृहनिर्माण करताना लाखो रुपये खर्च करतात त्यांना घन, दौलत, घरदार इस्टेटी असताना पति-पत्नी, पुत्र यांच्यामध्ये नेहमी असमाधान, भांडण, मानसिक चंचलता अशांतता असते. जीवन सुखी नसते. हे कशाला ? म्हणजेच आपण राहत असणारे घर छोट्या झोपडीपासून ते राजमहालापर्यंत का असेना त्याच्या निर्माणासाठी आपल्या पूर्वज ॠषीमुनींनी हजारो वर्षाचा प्रदिर्घ अनुभव घेऊन मानवाचे जीवन कल्याणमय होण्यासाठी ते सुत्र, नियम रुपाने ग्रंथरचना केली आहे. घर कसे बांधावे, कोणत्या दिशेला उंच बांधावे, कोणत्या दिशेला उतार, मोकळे, स्वच्छ असावे, कोणत्या दिशेला काय असावे, आयगणित, आयु, धन, ऋण, आय इत्यादीचा विचार करुन जे घर, प्रसाद, बंगला, दुकान बांधण्यात येते अशा प्रकारचे नियम सर्व एकत्र करुन त्याचे एक शास्त्र केले त्याचेच नाव " वास्तुशास्त्र " होय.

आजच्या काळात घराचा शो, रिकाम्या जागेचा जास्तित जास्त उपयोग करण्यात येतो, मुळ घर बांधताना या आर्किटेक्ट लोकांनी वरील विषयांचा विचार न करता शास्त्राचा विचार जास्त केला पाहिजे. वास्तुशास्त्राचा उपयोग करुन आपके घ्रर, कारखाना, दुकान इतर वास्तुचे निर्माण केल्याने सुख, ऐश्वर्य, आरोग्य, मानसिक सुख इत्यादीचा लाभ होतो. कुटुंबकल्याण झाल्यामुळे ते जगत्-कल्याण होते.

मनुष्य जीवनात दु:खाची सावट संपून सुखाची पाहाट येईल या आशेवरच जगत असतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडतात. नोकरी मिळणे, विवाह होणे, मूल होणे, घर बांधणे इत्यादींमुळे जीवनात आनंद होतो, त्यातल्यात्यात विवाह आणि घर बांधणे या शुभ घटनामुळे व्यक्तिच्या जीवनात आनंदाला पार उरत नाही, आपण काहीतरी मिळविल्याचे सार्थक वाटत असते.

जीवनात मिळणार्याम सुख दु:खाला त्या व्यक्तिचे चांगले वाईट कर्माचा जेवढा सहभाग तितकाच त्या वास्तुचाही सहभाग असतो. मिळणारे शुभाशुभ फळे देखिल वास्तूमुळे मिळतात. कारण मनुष्य जीवनाचे कुठलेही आराखडे तो त्या घरातच आखित असतो.

आजच्या महागाईच्या का़ळात मिळालेल्या कमीतकमी जागेत जास्तीत जास्त जाग कशी वापरता येईल याचा विचार माणूस करीत असतो. कधीकधी नकळत काही चुका घडतात. मग पुढे सुरु होतो दु:खाच पर्व.

मुले मोठी झालीत म्हणून म्हणा किंवा राहायला जागा पुरेना म्हणून म्हणा घरमालकाच्या तगाद्यामुळे म्हाणा, विभक्त कुंटुबा मुळे म्हणा आपले एखाद घर असावं म्हणून तो स्वतःची एक जागा मिळवितो त्या जागेत आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतो.

वसई-विरार कल्याण, नविन मुंबई हा परिसर मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक परिवार आपले सुंदर घर असावे अशा कल्पनेने या विभागात येतात. पण त्यांना कुटुंब प्रमुखाचे योग्य मार्गदर्शन नसल्या मुळे अनेक अडचणीना तोंड घ्यावे लागते. त्यातिल प्रमुख कारणे :-

१. ज्या परीसरात जागा निवडायची आहे त्या परीसराचा भौगोलिक व भूमिचा विचार.

२. इमारतीच्या वास्तुची दिशा व इमारतीचा मुख्य दरवाजा व मुख्य रस्ता.

३. सदनिकेचा मुख्य दरवाजा व त्या समोरील जिना किंवा व्दार.

४. घराच्या दाराला उबंरठा कशाचा असावा व का असावा?

५. स्वयपाक घर, संडास, बाथरुम, शयन कक्ष (बेडरुम) याची योग्य दिशा

६. मुहुर्तासहित भूमिपूजन ते वास्तुशांती पर्यंतचे अशास्त्रिय / अयोग्य विधी किंवा वास्तु प्रवेश

७. व्दार सजावट व घर सजावट. इत्यादि.....

संजीव

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

प्रवेश व्दाराचा उंबरठा व घरातील मुख्य पुरुष व मुलांना होणारा त्रास.

घराला घरपण देणारा उंबरठा हा नेहमी बाहेरील निगेटिव्ह ऊर्जेला घरात येण्यास मज्जाव करत असतो. पंरतु आज काल लोंक लाकडाचा उंबरठा बसवता मार्बलचा किंवा दगडाचा उंबरठा बसवतात. ह्याच गोष्टीचा त्रास आपल्या दररोजच्या जीवनात होत असतो.
आपल्याला एक महत्वाची सुचना करावी वाटते. ती म्हणजे आपल्या घराच्या उंबरठ्याला चिर पडली आहे का? पहिल्यादा उंबरठा तपासा आपल्या घरातील मुख्य व्यक्तिला अपघात होण्या पासुन वाचवा. आपला जर ह्या गोष्टीवर विश्र्वास नसेल तर आपण आपल्या संकुलातील किंवा नातेवाईकाचे उंबरठे तपासुन खात्री करा
जर मार्बलच्या उंबरठा असेल तर अपघाताचे प्रमाण १००% आढळते. ह्या गोष्टीची खात्री करुन घ्या, आम्हांला आपला अभिप्राय कळवा. नुसते वाचत बसु नका आपले विचार लिहा.
आम्ही एकदा डि.एन. नगर अंधेरी येथे कँपला गेलेलो असतानाची एक गोष्ट, एक जातक दु:खी अंत:कर्णाने आमच्या स्टाँलवर आला. त्यांनी माझ्या सहकारी श्रीमती चव्हाण  चौघुले यांना टेरोच्या माध्यमातुन जातकाने प्रश्न विचारला कि माझ्या घरात काही बाधा आहे का? माझ्या मुलावर करणी किंवा जादुटोणा तर केला नाही ना? त्या जातकाची सर्व कार्ड पाँझिटिव्ह आली. माझे सहकारी चमकले त्यांनी हा प्रश्न माझ्या कडे सुपुर्द केला. मी सुध्दा चमकलो! पुन्हा श्री स्वामी चरणाकडे आशिर्वाद मागितला, त्याचक्षणी स्वामीची ती ओळ आठवली भिऊनकोस मी तुझ्या पाठी आहे त्यांप्रमाणे टेरोकार्ड स्वामीच्या चरणा वरती काहीवेळ ठेऊन नंतर जातकाच्या हाती दिली. त्यातील एक कार्ड काढण्यास सांगितले आणि प्रश्नाचे उत्तर मिळाले. जातकाला घरी जाण्यास सांगुन एक सुतार एक कडीया दुस-या दिवशी सकाळी तयार ठेवण्यास सांगितला,  ठरवल्या वेळेनुसार सकाळी १०.३० च्या सुमारास मी त्यांच्याकडे गेलो. सगळे जण वाटबघत होते मी गेल्या गेल्या सुतारास सांगितले, घराचा मुख्य दरवाजाचा बसविलेला उंबरठा तोड. घरातील सर्वजण चमकले; ते म्हणाले आम्ही तर गेल्या वर्षी हा दरवाजा घराचे नुतनीकरण केले आहे. मुख्य दरवाजासाठी जवळपास दहा ते पंधरा हजार रुपये खर्च केले आहेत. तुम्ही तो का तोडता? मी म्हटले; मुळ कारण त्यांच ठिकाणी लपले आहे. सर्वाची नजर त्या उंबरठ्यावर पडली. उंबरठा सुंदर स्वच्छ होता. मी सांगितले जर का आपले ह्या गोष्टीसाठी नुकसान झाले तर, मी आपले सर्व नुकसान भरपाई देईन. त्यां प्रमाणे ते कबुल झाले. जसा मुख्य द्वाराचा उंबरठा तोडण्यास घेलला तसे सर्वजणाचे डोळे त्या उंबरठ्यावर केंद्रित झाले. बघतात तर काय! काम करताना घरातील शिल्लक राहिलेल्या लाकडाच्या पट्ट्यानी तो खिळे मारुन सुंदर उंबरठा बसवला होता. ह्या कारणाने त्यांचा मोठा ११ वर्षाच्या मुलगा अपघातात मरण पावला होता. दुस-या मुलाच्या अभ्यासातील लक्ष उडाले होते. तो घरात चिरचिर करत राहात होता.
            आपण घर सुंदर दिसण्यास हजारो रुपये खर्च करतो. मुख्य द्वाराची सजावट करताना आपल्या पुर्वजांनी सांगितलेल्या गोष्टी कडे दुर्लक्ष करतो. पहिल्यादा संगणकासमोरुन उठा. आपला उंबरठा कसाआहे तो तपासा. तसेच वरिल दिलेल्या उदाहरण तपासण्या साठी आजुबाजुच्या घरात जाता त्यांचे उंबरठे तपासा खात्री करुन घ्या. मला कळवण्यास विसरु नका; तसदि घ्या, आपला अभिप्राय सर्व वाचका साठी उपयुक्त ठरेल.
ह्या वर्गातील आपले हे पहिले पाऊल असेल या नंतर प्रत्येक विद्यार्थी वर्गासाठी ON LINE CODE असेल. ह्याची सर्व वाचकांनी दक्षता घ्यावी. विरार येथे वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र वर्ग सुरु झाले आहेत. काही दिवसात दादर येथे वास्तुशास्त्र वर्ग घेण्यात येईल. प्रवेश मर्यादित असेल आपली नांवे लवकरात लवकर नोंदवा. ईमेल करा vastuclass@gmail.com    astro@sancharnet.in धन्यवाद........