गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०


वर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.

दिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात " वैकुंठ चतुर्दशी" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी? हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.

मी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.

१९ नव्हेबर,२०१० शुक्रवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.
प्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखवावा नंतर उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.
आवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.
ज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.

 
अधिक माहिती साठी संपर्क करा. 9423086763 / 9423086763 ( Video Call 3G )
http://vastuclass.blogspot.com/ Email:- Astro@sancharnet.in / vastuclass.gmail.com


 
श्री विष्णु पूजा यादी --
चौरंग १ आसन ३, लाल पीस १ तांदुळ २ किलो, नारळ ३ फळे ५
विड्याची पाने ३० सुपारी ३०, कलश २ ताम्हण २, पळी-पंचपात्र १ समई २
निरांजन १ कापूर आरती १, अगरबती १ पुडा कापूर १ डबी, काडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट
अत्तर बाटली १ जान्वे जोड १, हळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट, अभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट
रांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे, ताट २ वाट्या ८, पातेले १ तेल , तूप पंचाम्रुत
पंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा,   फुले ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा
आंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४, सुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि
घरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण, गुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.
तुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे. प्रसाद तयार करुन ठेवणे.

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

" अशुभ नेपच्यूनची पत्रिका " विवाह-पत्रिका मिलनासाठी मंगळा इतका महत्त्वाचा नेपच्यून" ग्रह.

          पत्रिका मिलन करताना द्वितीय, चतुर्थ, पंचम, व्ययात जर अशुभ नेपच्यून असेल तर पत्रिकेचा बारकाईने अभ्यास करावा, नेपच्यूनची पत्रिका ज्याप्रमाणे मंगळाचा आपाण पत्रिका

          मिलन करताना मंगळाची पत्रिका या अर्थाने विचार करतो त्याचप्रमाणे नेपच्यूनचाही वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने विचार करावयास हवा असे सर ( श्री.सुहास डोंगरे ) नेहमी सांगत असतात.

          सर्वसाधारणपणे सुखाचा विचार करताना ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन बाजूंनी विचार करावयाचा असतो. या दोन बाजू तशा भिन्न दिशेच्या आहेत आणि काही अंशी एकमेकात गुरफटलेल्या आहेत  कारण बहुतेकांचं अध्यात्म भरल्यापोटीच असतं.

          नेपच्यूनचा विचार करताना तो कोणत्या स्थानात शुभ आहे. याचा विचार वरील पत्रिकेवरुन कळू शकेल. उदा. पंचम स्थान आणि व्यय स्थान आणि व्यय स्थान हे आध्यात्मिकदृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या अशुभ आहे. जेव्हा चतुर्थ स्थान बिघडलं जात, म्हणजे सर्व दृष्टीनी संकटे येतात सुख शोधनही सापडत नाही अशा वेळी विरक्तिचा विचार मनात येणे साहजिकच आहे. पण विरक्ति विवाहच्या आधि की नतंर आहे. हे महत्त्वाचे आहे. विवाहनंतरची जर विरक्ति असेल तर ही विरक्ति शुभ आहे कि अशुभ आहे हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो.
             
      सर नेहमी सांगतात नेपच्यूनच्या ग्रंहाच्या सहवासात येतो त्या ग्रहांची शक्ति खेचून घेऊन नाश करुन, ती शक्ति दुस-या ग्रहाकडे किंवा त्या स्थानाच्या कारकतत्त्वाकडे वळविणाची एक अमोघ शक्ति नेपच्यूनकडे आहे. थोडक्यात Sucker आहे. त्याचप्रमाणे तो Drainer आहे, यामुळेच गोचरी नेपच्यूनचे चतुर्थ  स्थानातील भ्रमण कमालीचे नाट्यमा ठरते. अधिक माहीतीसाठी ज्योतिषाना "नेपच्यून एक अवलिया" या ग्रंथाचा अभ्यास फार महत्वाचा ठरेल.

          नेपच्यून गुप्त कारस्थाने करणारा – पाताळंत्री – अवलिया-गूढ-अद्दभुतेच्या मागे लागणारा – अनाकलनीय घटना – रहस्यमय, नादिष्ट – प्रवासी – भटक्या –व्यसनी – सिनेनाट्या संगीत नृत्य ह्यांची आवड असणारे, मनकवडे, अतीद्रिंय शक्ति असलेले भावनाप्रधान – भावनांच्या आहारी जाणारे, स्पप्नाळू, मादक – लोभस – मोहक – दुस-यावर छाप टाकणारा, भुलवणारा – मायाझाल पसावणारा – हातचलाखी - फ़सवणारा – नजरबंदी दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा, संत साक्षात्कारी आत्मज्ञानी, कुंडलिनीशक्ति जागृत असणारा, रेकी प्राणीत हिलर, बेधुदं बेफ़िकिरीत जगणारा, समाजाची तमा न बाळगणारा, चित्रविचित्र पोशाख घालणारा, आत्मविश्वास गमवून बसलेला, मादक द्रव्याच्या सेवनाने कर्महानी झालेला, वाया गेलेला, जलतरणपटू, अतीद्रिंय शक्ति – नाँस्ट्रँडेमस किरो – द्रष्टे मंडळी, विश्वबंधुत्त्व, प्रेम, आध्यात्मिक उन्नती वृत्ती, दुस-आचे वाईट न करणारा, सत्संगप्रिय, लबाड-चतुर-ढोंगी-पांखडी-खट्याळ-मानसिक तोल गेलेला.

          नेपच्यून पाँझिटिव्ह असला आणि निगेटिव्ह असला तर काय स्वभाव असू शकतात.चमत्काराच्या पाठीमागे लागलेला, जगावेगळा हौस असलेला मंत्रतंत्रयंत्र तज्ज्ञ, अज्ञाताचा शोध घेणारा, संशोधन विश्वास रमणारा, शारीरिक आणि मानसिक तोल गमावलेला, स्वत:ची उन्नती न जाणण आरा, उत्तुंग यश देणारा, स्वर्गीय स्पर्शाने अलौकिकत्त्व मिळ्वून देणारा. विचित्र रोगी, डाँक्टरांना चुकीचे औषध देण्यास प्रवृत्त करणारा असा हा ग्रह फ़ार मोठ्या प्रमाणात जातकाचा कुंडलीत दोष उपन्न करीत असतो.

          तसेच आज महाराष्ट्र्चा कुंडलीतील नेपच्यून सुध्दा षष्टस्थानात आहे. षष्टस्थानातील  नेपच्यून हा महाराष्ट्राच्या कुंडलीत नक्की काहीतरी गोष्ट घडविणार हे त्रिवार सत्य आहे सध्या गोचरीचा नेपच्यून एकादश म्हणजे ११ व्या स्थानि आहे म्हणजे तो आपल्या व्ययास्थानाच्या व्ययात आहे. व त्यामुळे आता बघा महाराष्ट्राची सत्ता कशी चालते ती?

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली
        वधूवर निश्र्चय पद्धति   भाग ३...          


          आमच्या विद्वान व अत्यंत विचारी आर्य पूर्वजांनी आपल्या विवाह संस्थेचा पाया फार खोल व मजबूज घातला आहे व इतका विचारपूर्वक खोल व मजबूत पाया जगातील इतर कोणत्याही राष्ट्राचे विवाह संस्थेचा आढळणार नाही. अर्थात आमची विवाह संस्था जगातील इतर राष्ट्रांतील सर्व लग्न संस्थापेक्षा अति पवित्र असल्या कारणाने ती तितकीच चिरस्थायी आहे, विशेष उन्नत आहे व विशेष उदात्तही आहे. जगांटील सर्व ऐहीक सुखे प्राप्त व्हावी, धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ सहज साधता येऊन इष्टमित्र, अतिथी अभ्यागत, पशुपक्षी ह्या सारख्या जगांतील लहान मोठ्या प्राण्यांस देववेल तेवढे सुख देता यावे, वेदविहित यज्ञयागादि पुण्यकर्मे करता यावी धर्माची व प्रजेची अभिवृद्धि होऊन आपल्या उभय कुलांतील पूर्वजांचा उद्धार होऊन अंती मोक्ष साधता यावा हेच आमच्या विवाह विधीचे अंतिम साध्य आहे; असे आमचे आर्य पूर्वज सांगत आहेत व ह्याचकरिता आम्हाला विवाह करण्यास सांगितले आहे, किंबहुना आमच्या विवाह संस्थेचे रहस्य ह्यांतच आहे व म्हणून इतर राष्ट्राप्रमाणे आमच्यांतील विवाहसंबंध तोडता येत नाहीत. ( माझे कोठल्याही विवाह संस्थेची / वधूवर मंडळाशी संबध नाहीत )

          आमच्या धर्म शास्त्रात १. ब्राम्ह, २. दैव, ३. आर्य, ४. प्रजापत्य, ५. आसुर, ६. गंधर्व, ७. राक्षस, ८. पैशाच/ पिशाच असे आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. परंतु आज ज्यांच्यात वधुवर पत्रिका संमेलन करुन लग्ने ठरवितात अशा बहुतेक ज्ञातीत ब्राह्मविवाह पद्धत चालू आहे व तीच पद्धत शास्त्रकारांनी उत्तम ठरविली आहे. इतर प्रकारचे विवाह कांही जातीत चालू असतील. ब्राह्मविवाहांत शास्त्राधाराप्रमाणे मुलीचे बापाने वरास आपले घरी बोलावून त्यास आपली उपवर कन्या यथाशक्ति अलंकृत करुन पूर्वी सांगितलेल्या उद्देशाने दान करावयाची असते. परंतु आजकालचे विवाह असे होत नसून त्यांस देवघेवीच्या व्यापाराचे स्वरुप येत चालले आहे! अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय? व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय? व ह्याच मुळे कित्येंकास अशा विचित्र गृहिणी मिळाल्या आहेत की, त्या योगाने त्याच्या भावी सुखाच्या आशेची कायमची राख रांगोळी होऊन कसा तरी संसारशकट ओढावा लागत आहे. उलटपक्षी आपले समाजांत अशीही उदाहरणे आढळून येतात की, गरिबीमुळे किंवा द्रव्य लोभमुळे आपल्या सुंदर मुली त्यांच्या वयाच्या व रुपाच्या मानाने जे कोणी जास्त पैसे देतील अशा गरजु उल्लु, उतारवयाच्या वरपशूस, कुरुप किंवा प्रसंगी गुणहीन नवरदेवास केवळ द्रव्य तृष्णेमुळे किंवा दारिद्रावस्था वगैरे अनेक अपरिहार्य अडचणीमुळे अर्पण करुन त्यांच्या संसारसुखाची राख रांगोळी करितात. या गोष्टीकडॅ आमच्या सुशिक्षित बंधु वर्गाचे लक्ष जाईल काय?

          लग्न जमविण्यापूर्वी वधुवरांच्या पत्रिका पहाण्याची चाल हिंदू, जैन व पारशी ह्या लोकात विशेष आढळते व त्या पत्रिका कशा पहाव्या ह्या बद्दलचे विवेचन करण्याचा ह्या लेखात मुख्य उद्देश आहे. वधुवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन झाल्याखेरीज लग्न करणे हा गौण पक्ष होय असे आमच्यांतील बर्या च लोकांचे मत आहे. पत्रिका जु़ळविणे किंवा वधुवर पत्रिकात प्रीतीयोग होत आहे किंवा नाही हे पहाणे ज्योतिशास्त्राचे काम आहे, हे शास्त्र अनुभवसिद्ध आहे, त्या सहयाने मानवी प्राण्याच्या जीवन चरित्रात काय काय गोष्टी केव्हा आणि कशा घडून येतील ह्यांची बरीच अंशाने कल्पना बांधता येते. मागील अनुभवावरुन भावी गोष्टीवद्दल सावधगिरीने वागणे हा मानवी प्राण्याचा स्वाभाविक धर्मच आहे. परंतु आमच्याकडॅ पत्रिका ज्या साधनावरुन केल्या जातात त्या साधनाची स्थिती कोण शोचनीय आहे ह्याची कल्पनाच करावी लागेते. कित्येक आई बाप फक्त मुलीला अमुक वर्ष असावे अमुक तिथीस इअतके वाज?ण्याचे सुमारास जन्म झाला असावा असे सांगून पत्रिका करवून लग्ने जुळवितात. व कित्येकांची तर ह्यचे पलिकडे धांव असते.

          आपल्या भावी पत्नीचा किंवा पतीचा स्वभाव, आर्युमर्यादा, संतती, संपत्ती वगैरे गोष्टी जाणन्याची प्रत्येकाची इच्छा असते व ती पुष्कळ अंशी याच शास्त्राचे योगाने पूर्ण होते म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घटित पाहण्याच चाल पाडली असती पाहिजे. पण वरील प्रकाराने आम्ही नुसत्या चालीचा फार्स करुन ह्या शास्त्राची थट्टाच करेत आहो असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. पत्रिकांच्या अभावी कन्या गुणी वरांस देणे ह्या उत्तम मार्ग सोडून खोट्या नाट्या पत्रिका पाहण्याचा उपटसूळ आईवाप आपले खांद्यावर का घेतात ते कळात नाही.

          ज्योतिषशास्त्र दृष्ट्या वधुयरांच्या कुंडल्या जुळवणे हे काम किती नाजुक व महत्त्वाचे आहे व ते किती विचारपूर्वक केले पाहिजे ह्याची अंशतः कल्पना हे लेख वाचतील त्यांस सहज होईल.

          पुष्कळ लोक ज्योतिष्याकडे जाऊन कुंडल्या जमवितेवेळी अमुक एक स्थळ फार चांगले आहे, हुंडा थोडा पडत आहे परंतु मंगळ जरा अनिष्ट आहे तर ह्यास कांही हरकत आहे काय वगैरे गोष्टी सांगून ज्योतिषाला आपल्या तर्फेचे मत देण्यास लावितात, व क्वचितवेळी पत्रिकाही फिरवून घेतात वधुवरांच्या कुंडल्या न पाहता लग्ने करणे हा उत्तम पक्ष होय.

         हल्ली प्रचारात चालू असलेली घटित जुळविण्याची पद्धत फारच अपुरी आहे व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही असे अनुभवास येत आहे, म्हणूनच आज जिकडे तिकडे ज्योतिषशास्त्राची कांही मंडळी टार उडवीत आहेत. ज्योतिषाने ३६ गुण जुळविले असता मुलीस थोड्या अवधीत वैधव्य, घटस्फोट, प्राप्त होते किंवा पतीपत्नीत षडाष्टक आढळले आणि म्हणुनच या शास्त्रावरील लोंकांचा भरवसा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. हा शास्त्राचा दोष नव्हे तर हल्ली चालू असलेल्या पद्धतीचा व घटित जुळविणाराचा दोष होय, जी पध्दत दोषयुक्त आहे तिच्यापासून चांगले परिणाम पहावयास क्से मिळावे!.

         याकरिता लग्न जुळविणारा ज्योतिषी अति निर्भीड असून स्पष्टवक्तेपणा हा गुण त्याचे अंगांत पूर्णपणे वास करीत असला पाहिजे म्हणजे त्याच हातून योग्य सल्ला मिळून सहसा ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी घडणार नाही.

        माझ्या लेखात ब-याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल थोडक्यांत विवेचन केलेले आढळेल. अलीकडील समाजाचे स्थिति लक्षात घेतली असतां साधारणपणे मुलाचे लग्न वीस वर्षानंतर व मुलीचे लग्न अठरा वर्षानंतर होते. मुलाचे लग्न अमच्याच वयात झाले पाहिजे असा निर्बध कोठेच आढळत नाही. परंतु गुणी वर मिळाल्याखेरीज कन्येचे लग्न करु नये असे आपले आर्यशास्त्रकार जोराने प्रतिपदन करीत आहेत हल्ली मुलामुलीचे लग्ने योग्य वयाचे बाहेर होत नाहीत.

क्रमंश.........

रविवार, ३१ ऑक्टोबर, २०१०

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली भाग दोन.........
मंगळ आहे म्हणजे काय व तो कसा सदोष अथवा निर्दोष:-


                विवाह जमविताना वधू किंवा वर यांच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानांत मंगळ ग्रह असता मंगळाची पत्रिका म्हणून विवाह जमविण्यास त्याज्य मानली जाते. अगदी अर्वाचीन काळात व चालू युगात तर प्रेमविवाहाला ऊत येऊन त्यास मोठे प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात मुलामुलींच्या इच्छेशिवाय विवाह करावयाचा नाही, असे पालकांचे धोरणही दिसते. पण मुलामुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून त्यांची डोकेदुखी उत्पन्न होते. विचार करण्याची गोष्ट अशी की, आपण इतिहास, पुराणे वाचतो. त्यात विवाह, प्रेमविवाह करावयाचा म्हटल्यास मंगळाला किती महत्त्व द्यावे ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. अलिकडे मंगळाचे खूळ अत्यंत वाढले असून त्यामुळे विवाह जमविण्यास अत्यंत कष्ट पडतात. म्ह्णून अनेक विद्वानांनी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे अवलोकन केल असता शेक १५२५ नंतर मंगळाचा दोष मानण्यात येऊ लागला, असे पीयूषधारा या मुहूर्त चिंतामणीवरील टीकेवरुन दिसून येते.

               जसा मंगळाचा दोष पाहिला जातो, त्याचप्रमाणे रवी, शनि, राहू व केतू यांचाही दोष पाहाणे अगत्याचे आहे. त्यातल्या त्यात शनीसारख्या पापग्रहाच दोष डोळ्याआड करुन चालणार नाही. कारण शनी मृत्यू देतो. इतर पापग्रहसुद्धा मंगळाप्रामाणेच वैद्यव्य, स्त्रीसुखनाश वगैरे फ़ले देतात. परंतु या गोष्टीकडे आजकाल दुर्लक्ष केले जाते, ही दुर्देवाची गोष्ट आहे.

                काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते २,५,१०,११ ही स्थाने मंगळाच्या दोषाची म्हणून मानावीत असे आहे. परंतु या स्थानांवरुन वैधव्य अगर स्त्रीसुखहानीचा विचार केला जात नाही. या स्थानंतील मंगळ फ़ार तर संततिसुख व कौटुंबिक सुख यावर अनिष्ट परिणाम करु शकेल. परंतु द्वितीय स्थान म्हणेजे कुटुंबस्थान शुद्ध असावे असे माझ्या गुरुचे मत आहे. म्हणजे या स्थानांत पापग्रह असू नयेत. कारण त्या पापग्रहाची दृष्टी अष्टम स्थानी पडते. केरळ व मद्रास प्रांतातील ज्योतिषी २,४,७,८,१२ या स्थानांतील मंगळाचा दोष मानतात. आपल्याकडील ज्योतिषी प्रथम स्थानी असलेल्या मंगळाचा दोष मानतात व कुटुंबस्थानात असलेल्या मंगळाचा दोष मानीत नाहीत.

                काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते मंगळाचे दोष पाहण्याचे दोनतीन प्रकार आढळतात. १. चंद्रपासून, २. लग्नापासून, ३. सप्तमेशापासून मंगळ मोजतात. पण यापैकी विश्वसनीय प्रकार कोणता हे कोणीच सांगत नाहीत. पण सर्वेषाम व्यवहारात बहुतेक ज्योतिषी लग्नापासूनच मंगळाचा दोष पाहतात असे दिसून येते.

                कुंडलीमध्ये विवाहसौख्याचा विचार करताना प्रामुख्याने सप्तमस्थानाचा विचार करतात, लग्नस्थान, चंद्राचे सप्तमस्थान, शुक्र, शुक्राचे सप्तमस्थान तसेच अभाग्यस्थानही विचारत घ्यावे लागते, प्रमेविवाह योगासाठी पंचमस्थान आणि लाभस्थानही त्या जोडीने पाहावे लागते, प्रेमविवाहचा विचार करताना, कुंडलीत शुक्र आणि मंगळाचा शुभयोग असेल, मग तो कुठल्याही स्थानात असेल तरी त्याची फ़ळे ही मिळतातच. वैवाहिक जीवनातील स्वास्थ्य, सुख, समृद्धी आणि भरभराट यांसाठी गुरु ग्रह लक्षात घ्यावा लागतो. गुरुची लग्न अथवा चंद्र तसेच सप्तमस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान अथवा शुक्र यांवर जर शुभदृष्टी असेल तर वैवाहिक स्वास्थ्य निश्चित मिळते. लग्नेश अथवा चंद्र, सप्तमेश, शुक्र भाग्येश, चंद्र, सप्तमेश , शुक्र अथवा भाग्येश याची अंतर्दशा अथावा गुरुच्या महादशेत पंचमेशाची अथवा चंद्राची अंतर्दशा तसेच पंचमेश अथवा चंद्राच्या महादशेतील गुरुची अंतर्दशा हा काळ संततिसौख्याच्या दृष्तीने उत्कर्षाचा काळ ठरतो, लग्न, चंद्र, शुक्र, सप्तमस्थान यांवरुन गोचरेच्या शुभग्रहांचे भ्रमण शुभ फ़लदायी ठरणारे असते. चंद्र , शुक्र, गुरुची गोचर भ्रमणे केंद्रातून अथवा कोनातून होत असतात तेव्हा विवाहसौख्याच्या दृष्तीने शुभ फ़ळे मिळतात. मूळ पत्रिकेत चंद्र-शुक्राचे शुभयोग, चंद्र-गुरुचे शुभयोग अथवा गुरु-शुक्राचे शुभयोग असतील, तर प्रदीर्घ विवाहसौख्य लाभते. सप्तमेश, लग्नेश, भाग्येश चंद्र, शुक्र हे ग्रह शुभ नक्षत्रात पडले असतील, तर वैवाहिक जीवनात प्रदीर्घ स्वास्थ लाभते. साडेसाती नसेल तसेच राहु-केतु, हर्षल , नेपच्यून आदी अशुभ ग्रहांचे भ्रमण चंद्र, शुक्र, लग्न, सप्तम स्थानांतून नसेल असा कालावधी विवाहसौख्याच्या दृष्टीने शुभयोग असतील तरच गोचरेच्या शुभ ग्रहयोगांमध्ये उत्कर्षदायी घटना घडतात.

                सप्तमस्थान हे व्यक्तीच्या जीवनावा फार मोठा परिणाम करणारे एक अंत्यंत प्रबल असे स्थान आहे. लग्नस्थान म्हणजे स्वतः व्यक्ति व त्याच्या समोरच असणाए सप्तमस्थान म्हणजे पत्नि. हे स्थान सर्व पकारच्या स्त्री-सौख्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. मुख्यतः लैगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान असल्याने व्यक्तीला वैवाहिक जोडीदारापासून मिळणार्या शारीरिक, मानसिक, सौख्याचा विचार ह्या स्थानावरुन करतात. व्यक्तीची विवाहबद्दलची मते, स्त्रीयांबद्दलचे/पुरुषाबद्दलचे विचार, त्याचे चारित्र्य, व्याभिचारी वृत्ति, अनैतिक संबंध व्यक्तीची लैगिक ताकद, पुरुषत्व, नपंसकत्व, जोडीदाराचे स्वरुप, रंग, स्वभाव, तसेच पतिपत्नीमधील प्रेम्, आपुलकी अथवा मतभिन्नता, मतवैचिव्य, मत्सर आणि जोडीदारासंबधी दैवी त्रास, आजार, मृत्यू, द्विभार्यायोग, वैधव्य, घटस्फोट अशा नाना गोष्टीचे दर्शन कुंडलीत सप्तमस्थानावरुन होत असते.

            ज्योतिषशात्र नव्याने शिकणार्या विद्यार्थ्यानी प्रथम ह्या स्थानांतील ग्रहांचा अभ्यास करावा. त्या ग्रहाच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदु:खाचे स्वरुप व तीव्रता अवलंबून असते.सप्तमातील ग्रह व राशीवरुन जोडीदाराच्या रुपाची व स्वरुपाची कल्पना येऊ शकते. सर्वसाधारण रवि, मंगळ, शनि, राहू, हर्षल, नेपच्यून हे ग्रह सप्तमस्थानांत अशुभफलदायी असतात.प्रत्येक ग्रहाचे सप्तमस्थानातील परिणाम पुढील प्रकारणात दिलेले आहेत. सप्तमस्थानातील ग्रह स्वराशीत, उच्च राशीत, मूलत्रिकोणराशीत सामन्यपणे शुभफलदायी असतो. अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह सप्तमांत असता अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह शुभाशुभ परिणाम जास्त तीव्रतेने करतो.

क्रमश......

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]

                तुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.

                भूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

                  १. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण

                या कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.

               कुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.

                संदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी?, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.

                पत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

                मंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )

                मूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

                निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

                क्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.

शनिवार, ४ सप्टेंबर, २०१०

वृषभ लग्न द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग


१. वॄषभ लग्नामध्ये दशमस्थानाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश भावात असेल तर जन्मस्थानात अर्थिक प्राप्ती नसते व त्याला जीवनामध्ये सदैव धनाची कमतरता असते. अशा व्यक्तीला जीवनात कर्जाचा सहारा घेण भाग पडते.

२. वृषभ लग्नामध्ये लग्नेश शुक्र जर षष्ठात, अष्टमात आणि द्वादश स्थान्त असेल आणि सूर्य (रवी) तुळेचा असेल तर ती व्यक्ती कर्जबाजारी होते.

३. वृषभ लग्नामध्ये द्वितीय स्थानात जर पाप ग्रह असेल किंवा लाभेष गुरु षष्ठात, अष्टमात, द्वादशात असेल तर अशा व्यक्तीला सहजपणे कर्ज मिळू शकत नाही. व ती व्यक्ती कायम दरिद्री रहाते.

४. वृषभ लग्नामध्ये केंद्रस्थानाला सोडून चंद्र, गुरु जर षष्ठमस्थान, अष्टम स्थान, द्वादशस्थानात बसला असेल तर तो संकष्ट योग मानला जातो. त्या कारणाणे जातकाला सदैव धनाची कमतरता भासते. चंद्र गुरुचा गज केसरीयोग सुध्दा बनतो. पण ६,८,व१२ स्थानात हा योग नष्ट होऊन संकष्ट योग निर्माण होतो.

५. वृषभ लग्नामध्ये अष्टमेश गुरु शत्रूस्थानात किंवा नीच राशीचा असेल किंवा बुध द्वादशस्थानात असेल तर अचानक धनहानीने जातक कर्जबाजारी बनतो.

६. वृषभ लग्नामध्ये लाभेश गुरु, षष्ठम, अष्टम व द्वादश स्थानात असेल किंवा लाभेश अस्त, पापपीडीत झाला असेल तर जातक अति गरीब असतो.

७. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अष्टमात किंवा द्वादशात व अष्टमेश गुरु वक्रि झाला असेल तर त्या जातकाच्या घनाचा नाश होतो.

८. वृषभ लग्नामध्ये धनेश बुध अस्त होऊन नीच राशीमध्ये असेल व धनस्थानात किंवा अष्टमस्थानामध्ये कुठलाही पापग्रह असेल तर तो जातक सदैव ऋण ग्रस्त असतो.

संजीव

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग

महेंद्र नी म्हटले...
तुमचे भविषय एकदम चूकिचे आहे. नुसते लग्न पाहून कसे काय तुम्ही भविष्य सांगु शकता?
मेष लग्नाला लग्नेश जर अष्टमात असेल तर कर्जबाजारी होतो असे तुमचे म्हणणे पुर्ण चुक आहे. माझ्या पत्रीकेत तोच योग आहे पण अजूनही म्हणजे पन्नास वर्ष झाली तरीही कर्जबाजारी झालेलो नाही, तुमच्या भविष्या प्रमाणे!
असो..

माझ्या पत्रिकेत शुक्र बुध निच भंग योग करतात तरीही कर्जबाजारी नाही मी..
कृपया असे ठोकताळे लिहून लोकांना घावरवून टाकु नका.
१५ ऑगस्ट २०१० ५-२५ pm

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग नी म्हटले...
महेंद्रजी नमस्कार

धन्यवाद. तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
कृपया जन्मतारीख वेळ व जन्म ठिकाण दिल्या उत्तम
बघतो माझे कुठेचुकले ते?

आपला संजीव
१५ ऑगस्ट २०१० ८-५५ pm


महेंद्र नी म्हटले...
माझी पत्रीका अशी आहे. मेष लग्न, चंद्र वृषभेचा, मिथुन मंगळ पराक्रमात, सुख स्थान रिकामे, पंचमात रवी आणि राहू, शष्ठात शुक्र बुध - निचभंग योगात, सप्तमात काही नाही, अष्टमात काही नाही, भाग्यात गुरु आणि शनी .दशमात काही नाही, एकादशात केतू, आणि व्ययस्थान रिकामे.

नुकतीच साडेसाती आटोपली शनीची. मला अतीशय उत्तम गेला तो काळ. तसेच राहूची महादशा पण फारच छान गेली. गुरु महादशा तर उत्त्तमच गेली कारण भाग्येश गुरु आहे म्हणुन. वेळ आणि तारीख लवकरच कळवतो तुम्हाला अभ्यासासाठी. सध्या आठवत नाही.
पण एक आहे, चर राशी केंद्रात ( १,४,७.१०,) आणि केंद्र स्थान रिकामे अशी पत्रिका आहे माझी.
१६ ऑगस्ट २०१० ११-४६ am

essbeev नी म्हटले...
या फलादेशाच्या निर्णयात दशांचा विचार करावा लागत नाही काय ??
१६ ऑगस्ट २०१० १-३० pm


महेंद्र नी म्हटले...
आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही.
१६ ऑगस्ट २०१० २-१७ pm

आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही......


सर्वतोभद्रचक्राच्या गाभार्यातून रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण........


रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण ( भाग्यांश ) वृषभ राशीच्या १३ अंश २० कलानंतर १६ अंश ४० कलापर्यंतचा विभाग वृषभ राशीचा पाचवा नवमांस अर्थात रोहिणीचा द्वितीय चरण, वृषभ नवमांश म्हणजे वर्गोत्तम नवमांश होय. शुक्राचा स्वनवमांश असल्यामुळे या चरणांत शुक्र उत्तम फले देतो. या चरणातील कोणताही ग्रह केंद्रस्थानात ( १,४,७,१० या स्थानात ) फल देण्याच्या दृष्टीने बलवान असतो. रोहिणी द्वितीय चरणातील कोणताही ग्रह ( गोचरीचा सुध्दा ) हा वर्गोत्तम असल्यामुळे तो शुभ फले देण्यास प्रवृत्त होतो व तो आपल्या विशोत्तरी मानाने महादशेत फले देतो. लग्नी रोहिणी नक्षत्र द्वितीय चरण नक्षत्रचरणाधिपती शुक्र तेथेच असता, किंवा तो कुंडलीत ४,७,१० या स्थानात स्वराशी नवमांशात असता तनुभावाची फले चांगली देईल. इतर स्थानात रोहिणीचा द्वितीय चरण असता व तेथे शुक्र असता स्थानजन्य फले शुभ देईल. परंतु विशेषत दोन, पाच नऊ या स्थानात असला तर अधिक चांगले इतर शुभग्रहही या चरणात वरील स्थानात शुभ फलेच देतील, परंतु ती मध्यम प्रमाणात मिळतील. बिघडलेला कोणताही ग्रह शुभ फल देण्यास असमर्थ होतो वा शुभ फले मिळण्यात अडथळे निर्माण होतात.

एकाच स्थानात राशीचे ३० अंश पूर्ण असणे असंभवीय आहे. त्याचप्रमाणे राशीत असलेला ग्रह कोणात्या अंश कलावर आहे, त्याचप्रमाणे तो ग्रह कोणात्या भावांत स्थित आहे ठरवावे लागते.

स्थूल कुंडलीत एका स्थानात मांडलेले ग्रह त्याच्या राशी-अंश कलांच्या पायावर मागच्या किंवा पुढच्या भावात स्थित असतो. उदा. षष्ठ भावाम्ध्य मेषेच्या ०७ अंशावर आहे व गुरु मेषेच्या २९ अंशावर आहे अशा वेळेला स्थूल कुंडलीत षष्ठ स्थानात मांडलेला गुरु भावचलीत कुंडलीत सप्तमभावात मांडला जाईल. हा गुरु मेषेचाच असतो. वृषभेचा म्हणण्याचे कारण नाही. काही लोक असे म्हणतात की, भावचलीतात तो वृषभेचा झाला. पण हे सर्वस्वी चूक आहे. फल षष्ठ स्थानाचे न मिळता सप्तमस्थानाचे मिळेल हे लक्षात ठेवावे.
क्रांतीवृत्तावर ज्या राशीत नक्षत्रात जो ग्रह असतो तो तेथेच असू द्या, आपल्याला चक्र वदलण्याचे सामर्थ्य नाही. मला विशेष समजते असे सांगण्याचा माझा उद्देश नाही, तर गुरुकुलाने जे आम्हाला, मला सांगितले ते वाचकांच्या समोर ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. वाचकांनी ते गोड मानून घ्यावे व शंका असल्यास कृपया विचारणा करावी ही विनंती.

दिनांक १२/०९/१९६० रोजीचे पंचाग :- वार सोमवार राशी: वृषभ तिथी:- कृष्ण-७ १४:४८ पर्यंत नंतर अष्टमी योग:- सिद्धि,
करणं:- बालव, साधारण २०:३० मुंबईचे सष्ट ग्रह :-

लग्न मेष ०१:१४:३४, रवि सिंह २६:३१:२१, चंद्र वृषभ २३:०९:२४, मंगळ मिथुन ०२:०७:४१, बुध कन्य ०७:१७:५५,
गुरु धनु ०१:१६:५४, शुक्र कन्य १८:४५:५५, शनि धनुअ १८:३१:२०, राहू सिंह २१:५२:५४, केतू कुंभ, हर्षल कर्क २९:५३:०९
नेप तुला १३:५२:०९, लुप्टो सिंह १३:०३:४०

श्री महेंद्रजी आपणास कुंडलीशास्त्राची माहीती आहे असे मला मनापासून वाटते. असो. मी वरील दिलेली मुंबईचे दिनांक १२/०९/१९६० संध्याकाळी २०:३० चे सष्ट ग्रह आहेत. बघा कुंडली माडून काय जमते काय?

धन्यवाद, तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
आपला संजीव

रविवार, १५ ऑगस्ट, २०१०

मेष लग्न कर्जबाजारी पणा

१. मेष लग्न असेल तर दशमभावाचा स्वामी शनि जर षष्ठात, अष्टमात किंवा द्वादशात असेल तर जातक कुठल्याही प्रकारे मेहनत करत असेल तरी तो कर्जबाजारी बनतो.

२. मेष लग्न व लग्नेश मंगळ षष्ठात, अष्ठमात, द्वादश स्थानामध्ये असेल किंवा तुळेचा मंगळ केंद्रस्थानामध्ये असेल तर जातक, व्यपारात फार मोठे नुकसान होऊन कर्जबाजारी होतो.

३. मेष लग्न व लाभेश शनी जर षष्ठत, अष्ठमात, द्वादश स्थानात असेल तर तो जातक काही वर्षासाठी कर्जबाजारी होतो.

४. मेष लग्न केंद्र स्थानाला सोडून चंद्र गुरुपासून षष्ठात, अष्टमात किंवा द्वादश स्थानामध्ये असेल तर संकष्ट योग बनतो त्या कारणाने त्या व्यक्तिला सदैव धनाचा अभाव असतो.

५. मेष लग्नामध्ये धनेश शुक्र अस्त असेल व नीच राशीत किंवा धनस्थान व अष्टम स्थानात कुठलाही पापग्रह असेल तर जातक सदैव कर्जबाजारी राहते, कर्ज शेवटपर्यंत असते.

६. मेष लग्न लाभेश शनि षष्ठात, अष्टमात, द्वादश स्थानात बसला असेल किंवा धनेश अस्त झाला असेल किंवा पापपीडित असेल तर अशी व्यक्ति कर्जाच्या कारणाने महा दरिद्री होते.

७. मेष लग्नामधे अष्टमेश मंगळ शत्रुक्षेत्री नीच राशीत किंवा अस्त असेल तर अचानक धनहानी झाल्याने जातक कर्जबाजारी बनतो.

८. मेष लग्नामध्ये अष्टमेश मंगळ वक्रि होऊन बसला असेल तर किंवा अष्टम स्थानात कुठलाही ग्रह वक्रि होऊन वसला तर कोणत्याही कारणाने अकस्मात धनहानी होते.

अधिक माहिती साठी संपर्क साधा
संजीव

बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

एक विलक्षण अनुभव मंगळ आणि वास्तुशास्त्र, मंगळाचा दोष, मंगळाची पत्रिका, मंगळ आणि कलर थेरपी, मंगळाच्या अष्टमात शनी,


नाव:- वैभव जन्म तारीख १० फ़्रेब्रुवरी १९९५, वेळ संध्याकाळी ०५.५५ मुंबई ( परेल ).
जन्म: चंद्र राशी वृषभ, तिथी शुक्ल -११, नक्षत्र मृग, योग वैधुति, करण वणिज.

वृषभ रास :- मॄगशीर्ष नक्षत्राचा पहिला चर या राशीत येत आहे. आकाशात प्रत्यक्ष दिसणा-या बैलाच्या आकृतीस वृषभ राशी म्हणतात, ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण वृषभ राशीत असतात.

वृषभ राशी नेहमी दोन आकड्याने दाखवितात. जन्मकुंडलीतील ज्या भावात २ आकडा मांडलेला असतो त्या भावात वृषभ राशी आहे असे समजावे ही सम राशी आहे. जन्म कुंदलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते. ही स्थिर राशी आहे.

सम राशी या सौम्य राशी आहेत. त्यामुळे निरुपद्रवता, दुस-याचे ऐकून घेणयाची वृत्ती, समजुतदरपणा, व शांतपणा हे गुण सामान्यत: दिसतात. तसेच स्त्री राशी म्हणून लज्जा, विनय, ममता, वात्सल्य, संगोपन, संसारासक्ती, घर करुन राहण्याची प्रवृती, परावलंबित्व, दुस-याच्या मदतीने पुढे येणे, कोमलता हळवेपणा, वगैरे स्त्रीचे ठिकाणी असणारे नैसर्गिक गुण स्त्री राशीत असतात. चंद्र व शुक्र हे ग्रह कोणत्याही स्त्री राशीत सामान्यत: बलवान असत्तत स्त्री राशी समभाव व समग्रह यांछे साहचर्य परस्परास पोषक असते. म्हणून समभावात समराशीत स्त्री ग्रह असता ते विशेष बलवान.

ही स्थिर राशी असल्याने स्थैर्य, प्रवासाची नावड, हिंडण्या-फ़िरण्याचा कंटाळा वस्तु व वास्तु ( राहण्याची जागा ) आणि व्यवसाय स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती हे गुण या राशीत प्रमुखपणे दिसतात.ही चतुष्पाद राशी आहे. माणसाचे चालण्यावरुन या राशीचा असलेला तिरपे चालणेचा गुण दिसून येतो. चतुष्पाद राशी दशमात बलवान असतात.

वृषभ राशी ही पुथ्वीतत्वाची राशी असल्याने सुबकपणा, प्रमाणशीर अवयव रचना, निटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सह्नशिलता, सौंदर्य योग्य जुळणी करणे व योग्य मांडणी करणे वगैरे पृथ्वीतत्व प्रधान ग्रह आहे. तो या राशीत बलवान होतो. त्यामुळे पृथ्वीतत्वाचे गुण उत्कट स्वरुप धारण करतत. राशी व भाव यामध्ये पौष्यपोषकपणा असतो. त्यामुळे भाव व राशी गुण वाढतात. म्हणून समभावात सम राशीचे गुण प्रकर्षाने दिसतात.

वृषभ ही राशी पृष्ठोदय राशी आहे. ही रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव राशी असल्याने ज्या भावात ती बलवान असते त्या भावने दाखविलेल्या व्यक्तिअची संख्या मध्यम असते.

जन्म नक्षत्र :-

मृगशीर्ष नक्षत्र पावचे नक्षत्र मृग नक्षत्र होय, हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा आरंभ सिंह नवमांशाने होतो. सिंहेचा रवि व कन्येचा बुध, तुळेचा शुक्र, वृश्चिकेचा मंगळ यांचा अमंल असतो. हे नक्षत्र तीर्यमुखी,मंदलोचनी व देवगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचा राशीस्वामी शुक्र आहे, त्यामुळे कलाकौशल्य असते. नक्षत्र स्वामी मंगळ म्हणून चपळता असते व देवता चंद्र म्हणून अवखळपणा असतो. या सर्व गोष्टींचा एकत्रिपणा या नक्षत्राच्या लग्नावर दिसून येतो. ७ जूनला रवि या नक्षत्रात आला की पावसाला सुरवात होते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक कुरळे केस, रेखीव भुवयांचे, बुध्दिमत्ता चांगली असलेले व पायाचा भाग निमुळता, हरणासारखा असलेले असते. शारीरिकदृष्या हे नक्षत्र बलवान नाही. या व्यक्ती उंच, मध्यम बांध्याच्या व नाजूक प्रकृतीच्या असतात.

या नक्षत्रात ११ तारे असून मार्गशीर्ष महिन्यात ते रात्रभर दिसते. अतिशय मोठे नक्षत्र आहे. या नक्षत्राची व्याप्ती वृषभेत २३° २०’ ते ३०° व मिथुनेत ६° ४०’ आहे. या नक्षत्राचा शर दक्षिण १३°२२’ आहे. यांना शरीरिक श्रम झेपत नाहीत. इंग्रजीत या नक्षत्राला ’ओरायन” म्हणतात. शारीरिक शक्ती व जीवनशक्ति कमी असते. हे नक्षत्र देवगणी असल्याने या नक्षत्रावर जन्मलेली जातक सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, संतुष्ट, रसिक, बुध्दिमान, व्यवहारी व न्यायी असते. कलाकौशल्यात नैपुण्य असते. नीटनेटकेपणा व स्वच्छतेची आवड असते. नक्शत्र जरी बिघडले तरी या व्यक्ती व्यसनाकडे वळत नाही. या नक्षत्रात अतिशय चांगले गुणधर्म आहेत परंतु ग्रह तसे लाभल्यास त्याचे परिणाम दिसून येतात. किंवा गोचरीचा ग्रहाचा परिणाम दिसून येतो.

मृग नक्षत्राचा भाव हा सिंह नवमांशवरुन आरंभ होतो. सर्वतोभद्र चक्राप्रमाणॆ मृग नक्षत्राचा चौथ्या चरणाला नीचांश प्राप्त झाला आहे.

या नक्षत्रात जातकाणी खालील गोष्टीत शिक्षण घेतले पाहिजे. आर्किटॆक्ट, इंजिनिअर, ड्राफ़्‍ट्स्‌मन, पत्रकारिता, प्रिटिंगप्रेस व्यवसाय, चार्टर्ड अकौंटट, मशीन विकणारे कमिशन एजंट, सेल्समन, बँकींग क्षेत्रातील आँडीटर, पेंटर, चित्रकार, डाँक्टर्स या प्रकारचा व्यवसायात हे नक्षत्र फ़ार मोठ्या पदावर नेणारे किंवा नावलौक मिळवून देणार नाही. त्यामुळॆ राजवैभव किंवा अधिकार योग मिळणार नाही.

या नक्षत्र नाजूक असल्याने हवामानातील बदलाप्रमाणे साथीजन्य रोग होऊ शकतात. तसेच शीत विकारामुळे सर्दी, कफ़, खोकला, थंडीताप या प्रकारे त्रास होतो,

मृगशीर्ष नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- मगृशीर्ष नक्शावर जन्मलेल्या व्यक्ति गंभीर, वाक्पटू, चंचल आणि स्वाभिमानी असतात. त्यांना अपमान खपत नाही. दुस-यांच्याविशयी मनात अढी व ईर्ष्या असत. आपल्या जीवनात नाव मिळवून उच्च स्थान मिळवतात.

मृगशीर्ष नक्षत्राच्या व्यक्ति शस्त्रकलेत पारंगत असत्तत. नम्रस्वभाव व आदरणीय व्यक्तिंच्या बाबतीत आदराची भावना यांच्यात असते. राज्या-पक्षाकडून अनुकूलता प्राप्त होते. मंत्र्याशी मैत्री असते. धार्मिक वृत्तीचे व सन्मार्गावर चालणारा असणार. भोगविलासात विशेष रस त्यांना असतो. नवनवीन अनुभवांचा संग्रह यांच्याकडे असतो. स्वभावाने भावूक असल्याने चटकन प्रभावित होतात. पैशाची बचत करण्याची कला यांना अनुयायी असणार. व आपले विचार प्रकट करताना हाव-भाव करण्यांछी सवय असते. आपल्य अप्रगतीसाठी निरंतर झटण्याची वृत्ती असते. आंतरिक प्रेरणेमुळे सामान्यपणे भाग्यशाली असतात. मनोवैज्ञानिकाच्या रुपात प्रसिध्दी याला मिळेल.

प्रथम स्थान ( लग्न स्थान / प्रथम भाव / ग्रह / नक्षत्र ) याचा विचार सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे :-

१. लग्न कर्कराशीत आश्लेषा नक्षत्राच्या प्रथम चरणात धनु नवमांशात आहे. हा सर्वतोभद्र चक्र १८:५८:३९ अंशावर (अवकहडा चक्र) प्रमाणे ३३ व्या उत्पनांशावर आहे. आश्लेषा नक्षत्राचे जे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे जातकास उत्पनांश हा सूक्ष्मांश प्राप्त झाला किंवा जातकाच्या कुंडलीमध्ये गुरु, चंद्र, रवि यासारखा ग्रह त्या स्थानी असेल किंवा गोचरीच्या भ्रमणा तुन येईक तर जातकास अतिशय उत्कृष्ट फ़ले मिळू शकतात आणि जातक प्रगतिपथावर विराजमान होतो. ह्या नक्षत्राचे गुणधर्म पाहून कोणात्या प्रकारचा व्य्वसाय करावा व या उन्नतीस तो पात्र असेल हे या नवमांशात असलेल्या ग्रहांवरुन ठरवावे लागेल, जातकाचा धनु नवमांश आहे. धनुचा गुरु हा जातकाच्या पत्रिकेत पंचमात वृश्चिक राशीत जेष्ठा नक्षत्राच्या प्रथम चरणात आहे. हा सुध्दा सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे ६९ उत्पन्नांश.

२. आश्लेषा नक्षत्रातील प्रथम चरणातील लग्न :- शेष आपल्या डोक्यावर पृथ्वीचा भार घेतो. यालाच आश्लेषा म्हणतात. कर्तृत्ववान व्यक्तिच्या अंगावर जबाबदार्‍या पडणे व ते यशस्वीपणे पार पाडण्याचे सामर्थ्य असणे हा गुण आश्लेषा नक्षत्रात आहे. मराठी ९ या अंका सारखे दिसणारे हे नक्षत्र अधोमुखी मंदलोचनी, जीवाग्नी तत्त्वाचे आहे. ते तीक्ष्ण, दारुण फलदायक आहे. राक्षकगणी, मार्जार योनीचे आहे. नक्षत्राची अमृतनाडी असून, नक्षत्रस्वामी बुध व नक्षत्रदेवता सर्प आहे. गंडातर योगातले हे नक्षत्र अमृतनाडीत आहे. कुंडलीत या नक्षत्रात शुभ ग्रह असल्यास व ते शुभ ग्रहयुक्त नक्षत्र १, ५, ९, १० या स्थानात असल्यास मनुष्य कर्तव्यदक्ष असून आपले कर्तृत्व सिध्द करतो व अमृतमय फले प्राप्त करतो. हे नक्षत्र वरील स्थानत असता जातक महत्त्वाकाक्षी, निग्रही सुविचारी असून समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त करतो.

३. लग्नी मंगळ :- लग्नी प्रथमस्थानी मंगळ असता जातक अत्यंत चपळ, उत्साही असतो. या व्यक्ति कुठलाही निर्णय झटपट घेतात. झटकण राग येतो. दुसव्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती असते. वयाच्या २८ नंतर भाग्योदय होतो. २८ नंतर त्यांची तामसी वृत्ती कमी होते. नोकरीत भाग्योदय होतो. भाऊ-बहिणी याच्या बरोबर पटणार नाही. मातृसौख्यात कमतरता असणार. मातेला दिर्घ मुदतीचा आजाराची शक्यता आहे. मैदानी खेळाची आवड, कौटुंबीक सौख्य कमी. दुसर्‍याने दिलेला सल्ला जातकाला कमी पणाचा वाटतो. दुसर्‍याने कुणी दोष दाखवून दिल्यास ते कधीच पटत नाही.

४. कुंडलीत प्रथमस्थानी मंगळ व सप्तमात रवि:- रविमंगळ युति, प्रतियुती अथवा क्रेंद्रयोग तीव्र स्वरुपाची फळे या जातकाला देताना दिसतात. रविमंगळ युती अधिकार योग देताना दिसत आहे.

प्रथमस्थानी असणारा मंगळ दुसर्‍यावर वर्चस्व निर्माण करतो. तामसी स्वभावामुळे वैवाहिक जीवनात वैवाहिक साथीदाराशी पटणॅ मुश्किल होते. हा मंगळ चवथ्या दृष्टीने चतुर्थ स्थानाकडे पहातो त्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होते वैवाहिक स्वास्थ हरवून जाते. प्रथमस्थानी असणारा मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमस्थानाकडे पहतो. त्यामुळे सत्तमस्थान दुषित होते. वैवाहिक साथीदाराशी कुठलीही तडजोड स्विकारण्याची मनोवृती नसल्याने वैवहिक जीवनातील गोडी निघून जाते. अष्टमस्थानाकडे आठव्या दृष्टीने पहाणारा मंगळ प्रकृतीविषयी अनिष्ट फळ देतो त्यामुळे वैवाहिक जीवनातील शरीरसुखात बाधा निर्माण होते.

वृश्चिकेचा सहाव धनु नवमांष व जेष्ठा नक्षत्राचे पहिके चरण म्हण्जे उत्पान्नांश या नक्षत्रावर असलेले गुरु, रवि, मंगळ हे ग्रह जातकास धन वृध्दि करुन देतात. परंतु या नक्षात्राचे वैशिष्ठ्य असे आहे की जेव्हा एखादा क्रुर ग्रह कालांतराने वेध घेईल तेव्हा धनाच्या बाबतीत अनेक त-हेच्या समस्या उत्पन्न करून जातकाची धनहानी होईल. तसेच उत्पन्नाच्या मार्गामध्ये खंड पडेल म्हणून या सूक्ष्मांशाबद्दल जातकास काळजीपूर्वक मार्गदर्शन करावे.

जातकाच्या कुंडलीत मंगळ कर्क राशीत २९:४४:३४ अंशावर असल्याने कर्क राशीत तो २८ अंशावर नीचेचा असतो. कर्क राशीत त्याचे बल हे निकृष्ट असते. मंगळ ०६ अंशाच्या पुढे असल्याने मंगळास बाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे तो थोडे फ़ळ निश्चित जातकाला देईल या शंका घेंण्यास जर सुध्दा जागा नाही.

मंगळ हा ग्रह ४, ७, ८ दृष्टीने चतुर्थ स्थानातील तुळ राशीत राहू वर पाहात आहे. चतुर्थ स्थानाल मंगळ पूर्ण दृष्टीने पाहत असल्यने मातापित्याचे सुख मिळत नाही, शारीरकष्ट भोगणारा, पणा वयाच्या २८ व्या वर्षाच्या अवस्थेपर्यंत अत्यंत दु:खी, पाश्चात सुखी, परिश्रम न करता अंगचुकारपणाने काम करणारा. तसेच त्याची स्व:रास वृश्चिक पंचमात गुरु ग्रहा बरोबर आसल्याने त्याच्या निर्णयाला उत्तम चालणा गुरु ग्रह देऊन मंगळ त्याला प्रोहसान देईल. सातवी दृष्टी सप्तमावर बुध, नेप, रवी वर असल्याने रवी त्याचा मित्र गृह असल्याने कोणत्याही कामात त्याल आळस व शारीरिक थकवा येणार नाही. तसेच सप्तम स्थानावर मंगळ पुर्ण दृष्टीने बधत असल्याने परस्त्रीरत, कामी, प्रथम भार्येचा वियोग होऊन त्यायोगे दु:ख पावणारा पण रवी बुध ( रवी+बुधा आदित्ययोग ) मुळे यांची शक्यता कमी आहे. त्याची आठवी दृष्टी अष्टमात शनिवर असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. ज्या ज्यावेळी गोचरीचा ग्रह ह्या स्थानावरुन जाईल त्यात्यावेळी जातकाला शारीरिक पिडा संभवतात. आठव्यास्थानावर मंगळ पूर्ण दृष्टीने पाहील तर धन व कुटूंब यांचा नाश परंतु जातकाच्या कुटूंबा मधिल मात्यापित्याची पत्रिका पाहिल्या शिवाय हे निवेदन करणे चुकीचे आहे कारण जर मात्या पित्याच्या कुंडलीत चंद्र राशी मकर व कुंभ असल्यास शनि त्याचा राशी स्वामी आहे व जातकाच्या कुंडलीत अष्टमात मकरेचा शनि आहे त्या मुळे हा योग होणार नाही ह्या योगाची नोंद आवशक घेण्यासारखी आहे.

कर्केतील मंगळ हट्टी स्वभाव व मानसिक अस्थिरता हा कर्क राशीत मंगळाचा गुणधर्म आहे. चंद्राच्या ह्या जलराशीत मंगळ फ़लीताच्या दृष्टीने मोठे कोडे आहे. कर्केतील मंगळची फ़ले फ़ार विचार करुन वर्तवावी लागतात. कित्येक वेळा कर्क राशीतील मंगळ आत्यंतिक शुभ फ़ले देताना सापडतो. काही वेळा तितकीच अशुभ फ़ले मिळतात. आश्लेषा नक्षत्रातील मंगळा मुळे जातक व्यापारात फ़सल्या जातात. ह्या जातकानी व्यापार करूनये.

मंगळाच्या पंचमात गुरु या योगात बायको वांझ मिळण्याचा संभव असतो. अगर तिला संततीप्रतिबंधक रोग होतात. योग्य उपचार केल्यास रोग जातो व संतती होण्याचा संभव असतो. रविच्या उपासनेने संतती टिकत. सर्व प्रकारच्या एंजिनियरींग शिक्षण पुर्ण होते. साहित्य फ़ार होते. चांगले लिखाण लिहिले जाते. हा प्रसिध्दि योग आहे. फ़क्त कर्क, वृश्चिक, मीन राशीत हा योग झाल्यास संतती भरपुर होते व संततीनियमन करण्याची पाळी येते.

एक विलक्षण अनुभव :- आकाशातल्या ग्रहात नवराबायकोची दोन जोडपी आहेत. १ले रवि-चंद्र, २रे मंगळ-शुक्र, रविचंद्र ही नवराबायको अत्यंत जुन्या पद्धतीतली आहेत. आणि शुक्र-मंगळच्या युतीतसुध्दा रविच्या पुढे ( सायंकाळी पश्चिमेकडे दिसणारी युती ) ६० अंशावर ज्या वेळी पुर्वाश्चिम, दक्षिणोत्तर अंतर शून्य असेल तर शुक्राचे मनोहर तेज मंगळावर पडते. त्या वेळी मंगळाचा तांबूस वर्ण कमी होऊन एक प्रकारचा मनोहर पांढुरका वर्ण दिसू लागतो. म्हणजे ही युती फ़ार मनोहर दिसते आणि –

ज्या वेळी रविच्या मागे शुक्र असेल ( सकाळी पुर्वेकडे दिसणारी युती ) त्या वेळी चारी दिशांचे अंतर शून्य असेल तर मंगळ तेज शुक्रावर पडते व शुक्र त्या वेळी थोडास गुलाबी वर्णाचा दिसू लागतो, या वेळी शुक्र अगदी मनोहर दिसतो.

मंगळाच्या अष्टमात शनी :- या योगात संतती, संपती, मानमरातब, ऐश्वर्य यांनी युक्त होतो. धंदा नोकरी उत्तम चालते, नावलौकिक उत्तम मिळवितो. परंतु शांततेने समाधानाने आयुष्य घालविणारे असतात. त्यांचे प्रकृती इतकी नाजूक असते व हे मनाने इतके नेभळट असतात की यांना ज्वलत्जहाल क्रांतिकारकांचे तेज सहन होत नाही.हे चमडी दमडी बचावून राजकरण करण्याचा तृतीय प्रकृतीचा मार्ग पत्करतात. उदा. हिंदूमहासभा, लिकशाही स्वराज्य पक्ष, असले नादान पंथ दुस-या ख-या कार्यकर्त्यांना अपशकून कर्ण्याकरताच काढलेले आहेत. यातल्या शूर वीरांना तुरूंगात जायाला नको, दंड भरावयाला नको, व्यासपीठावर मोठ्यामोठ्याने गाढवासारखे बडबडून टाळुआ मिळवून गळ्यात मोठाले हार घालून घरी मिरवत जाणे व घरी जाऊन गरम शिरा खाऊन वर चहाचे डिकाँक्शन पिऊन निष्काळजीपणॆ झोपी जाणे हाच योग पुण्याचे श्री न, चिं. केळकर, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांच्या कुंडल्यात होता.

मंगळाच्या महादशेत फ़ळे :- ही दशा मृग, चित्रा, धनिष्ठा नक्षत्रात येते. या महादशेतील धनयोग होतो. जर मंगळ वक्रि असल्याने बंधू-वैमनस्य, हा केंद्रात असल्याने जमीनजुमला, घरदार देतो व शेतीपासून फ़ायदा, मानसिक शांती. जातकाल जन्मता: ७ वर्षाची मंगळाची महादशा होती. त्यांनतंर राहूची महादशा सुरु झालेली आहे.

कर्क राशीचा मंगळ जमीनजुमला, धरदार, नोकरचाकर, वाहने, भूमी यांची अतिकष्टाने प्राप्ती नतलग व स्त्रीपुत्रांचा वियोग, मानसिक दुर्बलता, क्लेश व चिंता देतो.

प्रथम स्थानी कर्केचा मंगळ

१.प्रथम स्थानी कर्केचा मंगळ क्रोधी मनाची कमतरता, मोठे आशावादी, भांडण –तंट्याच्या मोठमोठ्या योजना आखतात.

२.आरोग्याच्या तक्रारी.

३.प्रथम स्थानी मंगळ असता व्यवसायात नुकसानी, व्यापारास लागणारे गुण यांचे अंगी नसतात. ह्या जातकानी नोकरी करणे फ़ार चांगले आहे.

४.पण ह्यानी व्यापारा संबधी मोठमोठ्या योजना आखाव्यात पण दुस-यासाठी स्व:तासाठी नाहीत.

५.कर्केचा मंगळ प्रथम स्थानी वाडवडिलांचे सुख प्राप्त होत नाही व संततीसुखात कमतरता असते असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे तरी अष्टमातील शनी व वडिल-आईची कुंभ-मकर रास ही या योगाला संपुष्टात आणते.

भाव बल :-
जातकाच्या कुंडलीत कर्क लग्नात मंगळ (व) आश्लेशा नक्षात्राच्या चतुर्थ चरणी ( २९:४४:३४ ) अंशावर आहे. मीन नवमांशात आहे. ह्या तील मंगळ जलभय सूचक व शस्त्रकियासूचक समजावा. कुंडलीत वक्री मंगळ या नवमांशी पायात दोष वा पायाचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. या नवमांशांतील मंगळ द्रवपदार्थांच्या व्यापारास अनुकुल आहे.

मंगळ आणि वास्तुशास्त्र :-

ज्याच्या पत्रिकेतील चंद्र, लग्न अथवा चतुर्थस्थान मंगळाने दुषित आहे त्याने स्ततःच्या नावावर घर घेऊ नये अशा व्यक्तिने घरात उत्तरेकडील भिंतीवर मारुतीच्या फोटो लावावा. तसेच गृहसौख्य लाभण्याच्या दृष्टीने श्री गणपती उपासना करावी. मंगळवारचा उपवास कराव. घरात चाकू, विळी सारख्या धारदार वस्तू तसेच अग्नि यापासून सावधगिरी बाळगावी. मंगळाच्या पत्रिका असंआर्‍यांनी श्री गणपती उपसना करावी. मंगळवारचा उपास करावा. संकष्टी अंगारकीचा उपास धरावा. " उपेम हुं श्री मंगलाय नमः ह्या मंगळाच्या बीजधार मंत्राचा ( लक्ष्याचा जप ७ दिवसात पुर्ण करावा, रोज १०८ वेळा " ॐ अंगाकराय नमः किंवा ऋग्वेदातील श्री सुव्या रोज म्हणावे. किंवा अंगाकराय विघ्नहे शक्ती: हस्ताय | धीमही, तन्मो भौम प्रचोदयात || हा गायत्री मंत्र १०८ वेळा रोज म्हणावा.

मंगळाचा दोष, दाहकता, तीव्रता कमी करण्यासाठी मंगळाची पत्रिका असणार्‍यांनी अंगारक कवच, अंगारक स्त्रोत्र, मंगळ चंडिका स्तोत्र, ऋणमोचल स्तोत्र यपैकी जे जमेल ते कवच रोज म्हणावे.

मंगळाची पत्रिका असणार्‍या स्त्रियांना पाळीचा त्रास खूप होतो. तसेच बाळंतपणात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. गर्भधारणॅच्या प्रक्रियेत ही अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून मंगळाची पत्रिका असणार्‍या तरुण मुलींनी, महिलांनी पुढील मंत्र रोज म्हणावा.

" या रक्त वसना देवी या रक्तः रजसूया | रजोस्वला महातेजा उमा कँगु वासिनी || " मंगळ दुषित पत्रिका असणार्‍यांनी विवाह लवकर ठरण्यासाठी पुढील मंत्र रोज म्हणावा " ॐ पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी | तारिणी दुर्गसंसार सागरस्य कुलोद् भवाम् || हा मंत्र॑ दररोज ७ वेळा म्हणावा.

मंगळ आणि कलर थेरपी :-

ज्याच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे.मंगळ स्वराशीचा, मित्रराशीचा अथवा उच्च राशीचा आहे. अथवा मंगळाला नवमांश बळ आहे त्याने आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगी निर्विवाद यश मिळण्याकरिता कलर थेरपीचा वापर करावा. अतिशय महत्त्वाचे काम असेल आणि त्या कामात हमखास यश मिळवायचे असेल तर अशा प्रसंगी पुरुषांनी अंगात लाल शर्ट अथवा लाल टोपी/ रुमाल चा वापर करावा. महिलांनी लाल ड्रेस अथवा लाल साडी धारण करावी. श्री गणपतीला लाल फूल वाहून दर्शन घ्यावे, डोळे मिटून या मंडळीनी लाल रंगात आपल्या कुलदेवतेची मानसपूजा करावी. स्वसंमोहनाचे तंत्र ज्यांना माहिती आहे त्यांनी भिंतीवर एखादा पुठ्ठा टांगून त्यावर एक लाल ठिंपका काढावा व त्या ठिंपक्यावर आपली एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना रेकीचे तंत्र माहिती आहे. त्यांनी स्वतःसाठी रेकीचा वापर करताना डोळे मिटून मनातल्या मनात लाल छटा संकल्पीत करुन रेकी घ्यावी. संकट प्रसंग आल्यास डोळे मिटून लाल छटा संकल्पीत करुन श्री गणपतीची ही मानसपूजा करावी.

संजीव
रंगामुळे आपल्या भाववृत्तीवर काही निश्र्चित असा परिणाम होत असतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात तसं का नि कसं घडतं हे मात्र विज्ञानास सांगता आलेल नाही. रंगाचा प्रभाव व्यक्तिगणिक वेगवेगळा होऊ शकतो. त्यामुळेच काही निश्र्चित असे नियम ह्याबाबतीत सांगता येत नाहीत. व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणतात त्याप्रमाणे रंगाच्या प्रभावाबाबतही म्हणता येईल. विविध मानवसमूहात विशिष्ट प्रकारच्या रंगाची वस्त्रप्रमाणे वापरण्याचा सांस्कृतिक लळा जपलेला असतो, हे आपण बघत असतो. शिवाय व्यक्तिगत अनुभव आणि आवडीनुसार जो तो आपल्याला हव्या त्या रंगाचे कपडे वापरत असताना दिसून येतो. तुम्हाला आवडणारा भडक रंग कदाचित तुमच्या घराशेजारच्या काका-काकूंचा उच्चरक्तदाब आणखी उत्तेजित करणारा ठरु शकतो. तुमचे भडक कपडे पाहून काहीजण नक्कीच नाक मुरडणार! कारण हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा मामला आहे. नापसंती दर्शविण्यासाठी मग प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया प्रकट झाल्या नाहीत तरी त्याचा अर्थ तुमच्या आवडीचे रंग सगळ्यानाच आवडतील अस मात्र नाही!

एका पाहणीत रंगाच्या प्रभावाबाबत अस आढळून आल आहे की लोक रंगाबाबत धनात्मक किंवा ऋणात्मक प्रतिक्रिया जरुर बाळगतात. हे सूक्ष्म अवलोकन असल तरी ते सत्यधिष्ठत आहे एवढ मात्र खर!

आणाखी एक पाहणीत शिक्षित मुलांची प्रतिक्रिया बघण्यत आली :- स्वच्छंदी आणि प्रसन्न मुलांना पिवळा रंग पसंत होता तर तपकिरी रंग मनाची उदासी आणि खिन्नता ह्यात बुडालेल्या मुलांना प्रिय होता असं दिसून आलं. अर्थात रंगाचे हे भावनात्मक विश्लेषण तस वैश्विक सिध्दांत स्वरुप मानता यायचं नाही! कारण तसा सर्वसमावेशक असा अभ्यास आणि तदनंतरचा निष्कर्ष उपलब्ध नाही. एवढं मात्र खंर की अगदी लहान वयाच्या मुलांनासुध्दा विशिष्ट प्रकारचे रंग आवडत असतात आणि त्या रंगांचा त्यांच्या दृष्टीकोनावर प्रभाव पडत असतो. तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीतही त्याच सुयोग्य असं योगदान असते हे मान्य करावयास हव.

अगदी लहान बालकांच्या पाहणीत अस आढळून आल आहे की, त्यांना अगदी शुध्द रंगाची खेळणी प्रिय असतात. निळा, लाल रंग त्यांना आवडत असतो. पाढर्या खडूपेक्षा रंगीत खडूचं त्यांना अधिक आकर्षण असतं, कंपासपेटी, रंगपेटीवरील रंग आणि चित्र ह्यांची विविध रंगसंगती आणि आकार त्यांना भावत असतात.

कारखान्यातून सुध्दा भिंतीना कोणता रंग असावा म्हणजे कामगारांचा उत्साह आणि कार्यकुशलता प्रभावीपणे कार्यतर राहून उत्पादन वाढेल, ह्यासाठी पाहणी करुन जरुर ते प्रयोग अमंलात आणले जातात. कारण कारखान्यातले वातावरण कामगारांच्या चित्तवृत्तींना प्रफुल्लित ठेवू शकले तर त्याचा परिणाम कारखान्यातील माल उत्पादनावर निश्चितच होत असतो. कामगार मन लावून काम करु लागले तर गुणसंख्यात्मकदृष्ट्या उत्पादनावर चांगला परिणाम घडून येत असतो. ह्याबाबतीत व्यवस्थापन अलिकडे जागरुक झाल्याचे दिसून येत आहे.

रंगाबाबतचे हे भावनात्मक विश्लेषण केवळ कपड्यांपुरतेच किंवा घराच्या कारखान्याच्या भिंतीच्या विशिष्ट प्रकारच्या रंगांचे अस्तित्व आणि त्यांचा प्रभाग ह्यापुरतंच मर्यादित राहिलेल नसून खाद्यपदार्थ आणि त्याचे पॅकिंग, वेस्टन वगैरे मोटर, स्कुटर, हातबॅगा, खांद्याला अडकवायच्या बॅगा, धुलाईयंत्र, पंखे, शीतपेट्या, घरातील फर्निचर, गाद्या, उशा,अभ्रे, पडदे, अगदी पेन-पेन्सिलीसुध्दा ह्यांच्या रंगाच्या निवडीबाबत उत्पादकांप्रमाणॅच ग्राहकांचे सुध्दा मानसशास्त्र निगडीत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होत असतो, हे बाजारातील विविध प्रकारचे रंग परिधान केलेले पदार्थ-वस्तू पाहून कळून येते.

निसर्गामध्ये इतके विविध रंग आहेत की ते पाहून त्यांच सृजन करणार्या शक्तीच कौतुक वाटू लागते. विविध रंगाची फुले, फळे, लतावेली, वृक्ष, पान, आकाश, पर्वतराजी, नद्या, तळी, सागरकिनारे, चमकणारी किनार्यावरची वाळू,चांदणे किती अमर्याद आणि शास्वत स्वरुपाचे हे रंगीबेरंगी वैविध्य! एकीकडे निसर्गात अशी रंगाची विविधतापूर्ण रुप तर माणसाने आपल्या सौदर्यतृष्णेकरिता रंगाचे आपले असे विविधतेचे आगळेवेगळे अस विश्व निर्माण केले आहे ती केवळ एक निर्मितीच आहे अस नसू़न सुंदरतेने नटलेले गोड-आनंददायी सृजनचं आहे.

आज रंगाचा जणू एक अविभाज्य असा प्रभाव एकूणच समाजावर पडलेला दिसून येतो आहे. आश्चर्य वाटाव इतक्या प्रमाणात समाजातील विविध क्षेत्रात अगदी घरापासून, सरकारी विश्रामगृह ते पंचतारांकीत हॉटेल्स आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत तद्वतच अतिपूर्वेकडील देशांपासून ते अतिपश्चिमेकडील देशातील समाजात सुध्दा रंगाचा वापर विपुलतेने आणि आपापल्या मगदुराप्रमाणे आणि अभिरुचीप्रमाणे रंगाची निवड आणि वापर करण्यात येतो. रंगाद्वारे आपल्या संस्कृतीचच जणू दर्शन घडून येत असत तर व्यक्तिगत पातळीवर रंगसंगतीचा माणसाच्या चरित्र-चित्रणाच्या आणि त्याच्या स्वभावाचा अन्योय असा संबंध असतो. संतशिरोमणी जगद्दगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात

" पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा | नाही दूजा ||"

तर आपल्या जणू हे अंगवळणी पडून गेलेलं असत की विशिष्ट प्रकारचे रंग आपणास प्रिय असतात. त्याच्या दर्शनाने मनास आल्हाद वाटतो तर काही रंग स्वाभाविकपणेच अप्रिय असतात. आता ते तसे का अप्रिय असतात? ह्यामागे मानसशास्त्रीय काही उपत्ती जरुर असते. पण एवढ मात्र खर की ते फक्त व्यक्तिसापेक्षा असत. एकाला एक रंग प्रिय असेल त्र तोच रंग दुसर्यास अप्रिय असू शकतो.

गोर्या गोमट्या देहाच्या व्यक्ति जेव्हा भडक रंगाची वस्त्रे परिधान करतात तेव्हा ती त्यांना शोभूनही दिसतात पण कुणी जेव्हा कोळशासारख्या रंगाची वस्त्र वापरतो तेव्हा ते काय सुख देत असेल बघणार्यांनी ठरवायच! कारण मानसशास्त्रीयदृष्ट्या काळा रंग हा शोक, वितरागित किंवा मानसिक विद्रोह दर्शक असतो. त्यामुळे धार्मिक कार्यात, अनुष्ठानत काळ्या रंगाला अजिबात स्थान नाही. अर्थात त्यातही ज्या व्यक्तिंना काळ्या रंगाची मनातूनच आवड असेल त्यांचा स्वभाव विद्रोही, दृढनिश्चयी असतो असे मानसशास्त्रीय संशोधन सांगत. रुढी आणि परंपरा तोडून फोडून टाकायला हव्यात असा त्यांचा स्वभावधर्म असतो. अर्थात ह्या रंगाच आणखीही एक वैशिष्ट्य आहे की, ह्या रंगाद्वारे गुप्तता आणिअ व्यक्तिगत पातळीवरची रहस्य गोडी दिसून येते.

रंग आणि वृत्ती

पिवळा रंग हा सपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असण हे गुण दर्शवितो. आपलयाकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाच महत्त्व अनन्यसाधारण अस आहे. हा रंग ज्यांना आवडातो त्यांची बुध्दी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा तीक्ष्ण असते ते वैयक्तिरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झाल नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्य रंगाने लाभते. महा-तणाव आणि ह्र्दयरोग ह्याबाबतीत ज्यांना चिंता असेल त्यांना अगदी प्रेमपूर्वक ह्या रंगाशी आपली गट्टी जमवायला हवी. काही कालावधीत आपला आपणच अनुभव घ्यावा. ज्याची हाडे आणि सांधे दुखत असतील त्यांनासुध्दा त्यामुळे लाभ होतो, असे अनुभवांती सांगण्यात आल आहे.

निळा रंग हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे ह्यारंगाच वैशिष्ट्य आहे. ह्या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली ह्यांची अनुभूती मिळते ( हा रंग स्वयपाक घर / किचन मध्ये वापरणे टाळावे ) हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणस स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्घाळू, सौदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. अशा व्यक्तीना कुठल्या नको त्या झंझाटात पडायची इच्छा नसते. आपण बरं की आपल घरदार बर असा ह्यांचा स्वभाव असतो. वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो.

लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह ह्या भावांच दर्शन ह्या रंगाद्वारे होते. विशेष करुन लग्न सभारंभामध्ये वधू-वराचे जोडेसुध्दा लाल रंगाचे वापरायची परंपरा काही समाजसमूहात आढळून येते, हेही कामोत्तेजकतेचेच निर्देशक असते. ह्या रंगातच मुळी एक प्राकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दि, खोकला ह्या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ती व्यक्ति जीवनातल्या दरेक क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असते. अतिउत्साह आणि उत्तेजितता हे ह्या रंगाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आदिम हिंसक प्रवृत्तीचेही निदर्शक आहे.

हिरवा रंग एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर चित्ताचीए आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. त्याचप्रमांणे प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. म्हणून सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. ज्यांना फुफ्फुसाचे आजार असतील, श्वासाचा त्रास असेल, गळ्याची कंठाची-घशाची समस्या असेल त्यांना हिरवा रंग मानसशास्त्रीयदृष्ट्या लाभप्रद असतो.

पांढर्या रंगाच वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असताना बघून श्री. बा. भ. बोरकर यांच्या "आनंदभैरवी" या काव्यसंग्रहातील एका कवितेतील काव्यपंक्तीची आठवण अवश्य होते.

थेटर आमुचे झाले देऊळ
मकानामध्ये दुकान आले
आणि मिरविते शील आमुचे
पांढर्यात गुंडाळूनी काळे

अर्थात बबोरकरांच्या ह्या काव्यपंक्तीचा संदर्भ थोडा वेगळा असला तरी त्याद्वारे सुद्धा मानवी स्वभावाचेच दर्शन घडते. अशा प्रकारे विविध रंग आणि मानवी स्वभावाची विविधता एकमेकांस पूरकषटविकारांच दर्शन घडविणारी असतात. म्हणून ज्योतिषशास्त्रात व वास्तूशास्त्रात रंगाला व रंग संगतीला फ़ार महत्व आहे. जर का आपण वास्तूमध्ये चूकीचे रंग वापरले तर ते आपल्या रोजच्या जीवणावर परिणाम करतात. त्यामुळे वाचकानी आपल्या घराला /वास्तूला रंग देताना ह्या गोष्टीचा फ़ार विचार करावा.

संजीव

बुधवार, २ जून, २०१०

एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे.

२६ जून २०१० साली होणारे सूर्यग्रहण :-


जगातील काही नामवंत ज्योतिषानि सूर्यग्रहणा विषयी भाष्य केले आहे. काही जण नुसते शनी-मंगळाच्या युतीने योगात देशाचे व ज्यांच्या पत्रिकेत कन्या रास षष्ठ अष्टम स्थानी आहे म्हणजे मेष आणि कुंभ लग्नाच्या कुंडल्यांना विकार होतील. ह्या बद्दल भविष्य वर्तविण्यास सुरुवात केली आहे. पण ही शनि मंगळाची युती मेदनीय ज्योतिष्यशास्त्रा दृष्टीनी आज आपण बघणार आहोत. तसेच ह्या बाबत श्री राजीव उपधाय आपल्याला वेळोवेळी मेदनीय जोतिषाच्या दृष्टी कोणातून मार्गदर्शन त्याच्या साईटवरुन ( http://rajeev-upadhye.blogspot.com ) करत आहेत. त्याचा लाभा वाचकानी द्यावा. तसेच श्री. सुहास डोंगरे यांनी सुध्दा मेदिनीय ( राष्ट्रिय ) ज्योतिष शास्त्रा बद्दल अनेक पुस्तके जातकाच्या वाचनात भर घालण्या साठी प्रसिध्द केली आहेत.

कोणत्याही ग्रहाच्या युतीचा परिणाम हा जातकाला तो ज्या स्थानात राहात असतो त्या स्थांनाच्या अनुसंधाने होत असतो. हा पहिला नियम येथे घेणे महत्वाचे आहे. पुथ्वी वरिल लग्न बिंदूहा प्रत्येक राज्यात देशात नेहमी वेगवेगळा असू शकतो. तसेच घातचक्रा मधिल माहितीची सागड घातली तर प्रत्येकाचे कारण आपणास समजणे अवघड जाणार नाही. प्रत्येक ग्रहाचे पृथ्वीच्या भवति फ़िरण्याची एक सीमा ठरलेली आहे. त्या सीमेरेषेच्या बाहेर कोणताही ग्रह जाणार नाही. आपल्या जोतिष्यशास्त्रात २७ ( अधिक एक ) २८ नक्षत्रे व १० ग्रह व अधिक राहू व केतू मिळवून १२ ग्रह आहेत हे सर्व ग्रह व नक्षत्रे पृथ्वी सभोताली सतत एक ठराविक मार्गक्रमाने फ़िरत असतात. ते पृथ्वी भवती फ़िरताना प्रतेक लग्नाशि विशिष्ठ योग करतात. तसेच गोचरीचे ही योग करत असतात. ह्या योगाचा अभ्यास जर का केला तर आपल्याला योग ते भाष्य करण्यास कधिही अडचण येणार नाही.

प्रत्येक देशातील / शहराला ग्रहाची तसेच नक्षत्राची बघण्याची दृष्टी / वेध हे वेगवेगळ्या कोणातून होत असते. यालाच आपण ग्रहाचे व नक्षत्राचे योग असे संबोधतो. या मध्ये जातक हा ज्यावेळी जन्मलेला असेल त्या प्रमाणे त्याचे आपण भविष्य सागण्यास सुरुवात करतो. पण हे जरी खरे असले तरी जातकाचा झालेला जन्म लग्ना प्रमाणे आपण त्याचे भविष्य सागत असतो. पण हे माझ्या दृष्टी कोणातून चूकीचे आहे. कारण पहिल्यादा जातक हा एका ठराविक विभागात राहात होता, तो जरी बाहेर गेला तरी काही ठराविक अतंर जाणार हे ज्योतिष्याला माहीत होते, त्यामुळे साधारण अदांज घेउन ज्योतिष्या जातकाला त्याच्या आयुष्यातील घटणा क्रमांचा अंदाज देत असत. आता आपण आधुनिय युगात आलो आहोत. जेव्हा आपण एखाद्या जातकाचे भविष्य वर्तवितो त्या वेळी जातकाचा ठावठिकाणा आपल्यास माहिती असलेला पाहिजे तसेच जातकाचे प्रवास व देशपर्यंटन सुध्दा माहित असले पाहिजे म्हणजे आपल्याला मेदनीय ज्योतिष्याच्या सुंसगतीने योग्यते भाष्य करता येते.

जातकाच्या लग्नकुंडली प्रमाणे तसेच त्याच्या दशा व गोचरीच्या ग्रह व नक्षत्र आणि मेदनिय म्हणजे जातक ज्या ठिकाणी वास्तव्यास आहे त्या ठिकाणाचा सर्वसार विचार करुन जातकाला त्याचे भविष्य सागितले पाहिजे. हा एक महत्वाचा मुदा लक्षात घेऊन स्व. श्री. कृष्णमूर्ती यांनी के.पी पध्दत अवलबंली आहे, ते त्रिवार सत्य आहे. कारण के.पी पध्दतीत जातक ज्या स्थानात राहून प्रश्न विचारतो त्या स्थांनाची कुंडलीचा आपण विचार करुन जातकाच त्याचे भविष्य सागतो. हा मुद्दा आता के. पी. पध्दतीने भाष्य करणा-या ज्योतिष्याच्या लक्षात आलेला नाही. हे कटु सत्य के.पी पध्दत अवलंब करणा-या ज्योतिष्यानी मान्य करावयास हवे.

आता आपण मेदिनीय ज्योतिष्यशास्त्र म्हणजे काय ते पाहू :-

मेदिनीय ज्योतिष वर्तविताना प्रामुख्याने दोन भाग पडतात. अ) नैसर्गिक घटना ब) मानवी घटना
सुख व दु:ख या जीवनरुपी नाण्याच्या दोन बाजू आहेत. पण अनुभव असा की सुखाची बाजू सहजपणे विसरली जाते, दु:खाची बाजू मात्र सतत जीवनभर सलत राहाते.

मेदिनी याचा अर्थ पृथ्वी. या पृथ्वीतलावर सर्व चराचर सृष्टीवर होणार्यात अनेक विविधरंगी घटनांचा मागोवा घेणारे शास्त्र म्हणजेच “मेदिनीय॑ ज्योतिषशास्त्र” होय. सर्व पृथ्वीचा विचार केल्यास सर्वसामान्य माणसे म्हणजे जणुकाही नियतीच्या हातातील कळसूत्री बाहुल्याच आहेत. नियतीच्या एकाच तडाख्यात कित्येक माणसे क्षणार्धात भूकंप, ज्वालामुखी, वादळे, पूर यांत बेचिराख होतात. नागासाकी व हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बने लक्षावधी माणसे क्षणार्धात खलास झाली होती. यावरुन पृथ्वी व सर्वसामान्य माणसे यांचा विचार करता पृथ्वी, तिच्या विशिष्ट भागाला व विशिष्ट परिस्थितीला साहजिकच जास्त महत्त्व आहे.
समस्त पृथ्वी अक्षांश-रेखांश या पद्धतीने विभागली गेली आहे. त्यामुळे कोणते गाव, कोणते शहर नेमके कोठे आहे, कोणत्या दिशेला आहे याचा उलगडा होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रामध्ये हे अक्षांश-रेखांश महत्त्वाचे आहेत. तसेच ते मेदिनीय ज्योतिषात अतिशय महत्त्वाचे आहेत, किंबहुना त्याखेरीज मेदिनीय ज्योतिषामध्ये कोणतेही भाकीत करता येत नाही. जगामधील निरनिराळ्या देशामध्ये निरनिराळ्या प्रमाण वे़ळा सूर्याच्या भ्रमाणाप्रमाणे आधारभूत धरल्या जातात. भारताचा विचार केल्यास ८२ संश ३० मिनिटे ( पूर्व ) हे रेखांश आधारभूत पकडून भारतीय प्रमाण वेळ काढण्यात आली आहे. समस्त॑ जगाचा विचार करताना लंडान शहराचे शून्य संश रेखांश पकडून सर्व जगातल्या प्रदेशाची विभागणे केलेली आहे. साहजिकच मोठमोठ्या प्रदेशात उदा. अमेरिका, रशिया, ऑस्ट्रेलिया येथील एकाच प्रदेशात निरनिराळ्या प्रमाण वेळा राज्याप्रमाणे आहेत.
अंदाजे दुसरे शतकात पश्चिमात्य ज्योतिषी टॉलेमी यांनी लिहिलेल्या "टिट्राबोक्तास" या नावाजलेल्या ग्रंथात निरनिराळी राष्ट्रे व शहरे यांचे त्याने वर्गीकरण केलेले आहे. हे वर्गीकरण करताना त्याने त्या त्या विशिष्ठ देश, राष्ट्र याची नैसर्गिक वैशिष्ट्ये व इतिहास लक्षात घेतला आहे. पृथ्वी ही विविधरंगी विविढंगी असल्यामुळे "मूर्ती तितक्या प्रकृती" या न्यायाने निरनिराळे नैसर्गिक भेद पृथ्वीवर आढ्ळून येतात. त्यातील उत्तर गोलार्ध हे तर महत्त्वाचे आहेच.

टॉलेमीने देश व शहरांची विभागणी निरनिराळ्या राशींमध्ये नेमकी कोणत्या निकषांवर घेतली त्याचप्रमाणे कोणत्या आयनांश पकडून काढली, ( सायन व निरयन भविष्य कथनाच्या पद्धतीमधील अंशात्मक भे म्हणजे अयबांश होय ) त्याचाही नीट्सा उलगडा जुन्या ग्रंथामध्ये सुस्पष्टपणे सापडत नाही. त्याने वसंतसंपात बिंदूपासून ३६० अंश रेखांशाची विभागणी १२ राशीत करुन प्रत्येक रास ३० अंशाची या मापाने शहरांचे व देशांच्या राशी त्यांच्या वर्गीकरणापरत्वे केले आहे. त्याप्रमाणे मेष राशीचा अंमल इंग्लड, जर्मनी, डेन्मार्क, पॅलेस्टाईन , सिरीया या देशांवर तर नेपल्स, बर्मिगहॅम या शहरांवर आहे असे मानलेले आहे तर समस्त भारत, पंजाव, अफगाणिस्तान, ग्रीस या देशांचे वर्गीकरण त्याने मकर राशीमध्ये दिलेले आहे.
तथापि त्या टॉलेमीच्या वेळच्या देश व शहरे यांच्या सीमारेखांमध्ये (प्रामुख्याने देश ) खूपच फरक पडलेला आहे. त्या वेळचा महाभारत आता फक्त भारत उरलेला आहे कारण टॉलेमीच्या वेळेला पाकिस्तानचा जन्म झालेला नव्हता थोडक्यात सर्वच प्रदेशांच्या सीमारेखा ज्या टॉलेमीच्या वेळच्या होत्या त्या आता राहिल्या नाहीत. तसेच टॉलेमीनंतर अंदाजे १८०० वर्षे झाली असल्यामुळे (त्य वेळी सायनच पद्धत असावी असा तर्क आहे. ) टॉलेमीने देश व शहरे यांच्या राशीचे जे वर्गीकरण केलेले आहे त्या राशीचे अंश त्याने दिलेले नसल्यामुळे काही माहिती अपूर्ण व लंगडी आहे. ( सायन व निरयनमध्ये आजकाल अंदाजे २३ अंशाचा फरक असतो. टॉलेमीच्या वेळी हा फरक नगण्य असेल) याबद्दल नेमके व निश्चितपणे सांगणे केवळ कठीण आहे. कारण मेदिनीय ज्योतिषाशास्त्र हे अजून तसे अपूर्णावस्थेत आहे.

साहाजिकच त्यानंतर निरनिराळ्या तज्ञ ज्योतिषांनी उदा. सेफेराईल, राफेल ते आजपर्यंतचे डॉ. बी. व्ही, रामन, कै श्री. केळकर, श्री सुहास डोंगरे यांनी काही तुरळक देशांचे, राशींचे निरनिराळे वर्गीकरण त्यांची वुध्दिमत्ता व अनुभव यांच्या जोरावर केलेले आहे. तथापि विद्वानात एकमत फारच क्वचित होत असल्यामुळे नेमकी कोणती पत्रिका ज्योतिष अभ्यासकांनी घ्यावी याबद्द्ल साहजिकच संभ्रम निर्माण होतो.
देश व शहरांच्या पत्रिका व त्यावर अंमल करणार्या राशी यांचा विचार करताना आजची पत्रिका आधारभूत पकडली आहे. त्याप्रमाणे त्या देशातील इतिहासातील ठळक घटना जमणे अतिशय महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे त्या प्रत्रिकेप्रमाणे देशातील आगामी घटनांचे भविष्य तंतोतंत बरोबर येणे किंबहुना जास्त महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रचंड चिकाटी अविरत परिश्रम, ऐतिहसिक घटनांचा मागोवा, सूक्ष्म निरीक्षण शक्ती, बुध्दिकौशल्य व ज्योतिष शास्त्रातील वरवर क्षुल्लक वाटणार्यान पण महत्त्वाच्या गोष्टीवर त्यांचे प्रभुत्व व मोदिनीय ज्योतिषाची जाण हे खुपच महत्त्वाचे आहे. इतिहासातील घटना लक्षात घेतल्या तर या घटनासुद्धा इतक्या विविध स्वरुपाच्या व विविध रंगी परंतु ठळक व नजरेत भरणार्याे असतात की त्यामधून नेमकी कोणती घटना प्रमाणभूत म्हणून पकडावयाची हे अखेर ज्या त्या ज्योतिषांच्या कल्पनेचा, बुध्दिकौशल्याचा, अनुभवाचा परिपाक असतो. भारताच्या बबतीत विचार केल्यास टॉलेमीने भारताची रास सायन मकर पकडली आहे. कै श्री के केळ्कर हे भारताची रास निरयन मकर पकडूनही त्यांची कित्येक भविष्ये अचूक आलेली आहेत, तर ज्योतिषांमधील आधुनिक वराहमिहीर असा ज्यांचा उल्लेख आदराने करता येईल असे डॉ. बी. व्ही. रामन हे भारताची रास निरयन कन्या पकडतात व त्याप्रमाणे त्यांचीही अनेक भविष्ये पहिल्या महायुध्दापासून ते आजपर्यंत आश्चर्यकारकरीत्या खरी ठरली आहेत.
ज्योतिष शास्त्रात प्रामुख्याने भारतीय ज्योतिषा जर कोणी अननोल भर घातली असेल तर तो ज्योतिषी म्हणजे वराहमिहीर होय. याने "बृहत्तहसंहिता" या ज्योतिष ग्रंथामध्ये निरनिराळ्या देशांची विभागणी राशीवार केलेली होती, तसेच वराहमिहिर यांनी राहू व केतू हे दोन कल्पितबिंदू ग्रह म्हणून मानलेले आहेत. वराहमिहिरच्या पूर्वी राहू व केतू हे ग्रह मानले जात नव्हते. त्याचप्रमाणे वराहमिहीर यांनी कूर्मचक्राच्या आधारे देशांची विभागणी करुन अनेक आश्चर्यकारक विधाने केलेली आहेत. ( वराहमिहिरांचे योगदान इतके प्रचंड आहे की, वराहमिहीर एकच आहे की दोन याबद्द्ल संभ्रम निर्माण व्हावा. ) कोणत्या नक्षत्रात ग्रहण असल्यास त्याचे परिणाम काय होतात याचे सुध्दा त्याने सूक्ष्मपणे भविष्यकथन केले आहे. ते सगळेच प्रकरण आश्चर्यकारक आहे कारण त्यावेळेला आजच्यासारखा सुसज्ज यंत्रणाही नव्हत्या. असे वाचनात आले आहे की पाश्चात ज्योतिषी सेफेरेल यांनी असे भविष्य कथन केले होते. ते म्हणतात की, एका पाठोपाठ एक प्रदेश बळकावीत जगज्जेता सिकंदर जेव्हा विशिष्ट रेखांश ओलांडून पुढे जाईल त्या क्षणापासून त्याचे पतन होण्यास सुरुवात होईल. अर्थातच ते भविष्य त्यांनी कोणत्या आधारे केले याबद्दल नीटसा पुरावा उपलब्ध दिसत नाही.

ज्योतिष अभ्यासकांना सोयीसाठी टोलेमीने दिलेले प्रदेश व शहरे यांचे वर्णन जसेच्या तसे दिलेले आहे. त्या राशी सायन आहेत की निरयन आहेत हे ज्योतिष अभ्यासकांनाच ठरवून देत.

राशी प्रदेश

मेष रास प्रदेश :- इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी, लेसर, पोलंड, पॅलेस्टाईअन व सिरिया.

वृषभ रास प्रदेश :- आयर्लंड, इराण, पोलंड, आशिया मायनर, जॉर्जिया, कासेशस, ग्रेशिअन, आर्किपेलगो, आयप्रस व श्वेत रशिया.

मिथुन रास प्रदेश :- अमेरिकेतील संयुक्त संस्थाने ( यू.एस.ए ) वेल्जमब्रॅक्ट, लांबार्डी, इजिप्त, सार्डानिया, इंग्लंडचा पश्चिम भाग, आर्मोनिया, त्रिपोली, फ़्लन्डर्स आणि वेल्स.

कर्क रास प्रदेश :- स्कॉटलंड, हॉलंड, न्यूझिलंड, आफ़िकेचा उत्तर व पश्चिम भाग, मॉरिशस बेटे आणि पाराग्वे.

सिंह रास प्रदेश :- फ़्रान्स, इटली, बोहेमिया, सिसिली, काल्डियापासून बसरा प्रांतापर्यंतचा भाग, रुमानियाचा उत्तर भग, पाल्प्स पर्वतातील प्रदेश.

कन्या रास प्रदेश :- युरोपीय तुर्कस्थान, स्वित्झरलंड, वेस्ट इंडीज, बाबीलोनिया, मोरिया, थेसली, कुर्डीस्थान, ग्रीस देशातील काही भाग, व्हर्जीनिया आणि ब्राझिल.

तूळ रास प्रदेश :- ऑस्ट्रिया, इंडोवायना, चीन मुख्यत्वाने उत्तरेकडचे प्रांत व भारताचा चीनजवळचा प्रदेश, तिबेट, कास्पियन समुद्राच्या बाजूचा प्रात, उत्तर इजिप्त जपान, ब्रह्मदेश आणि अर्जेटिना.

वृश्चिक रास प्रदेश :- अल्जेरिया, बव्हेरिया, मोरोक्को,नॉर्वे, उत्तर सीरिया क्कीन्सलंड.

धनु रास प्रदेश :- अरबस्तान, ऑस्ट्रेलिया, केप फ़िनिस्टर, डालमॅशिया, हंगेरी, इस्त्रिया, मोरॅव्हिया, स्क्लव्होनिया, स्पेन, टस्कनी, फ़्रान्स देशातील सिअएन व ग्यॅरोन ते केप फ़िनिस्टर पर्यंतचा प्रदेश आणि मादगास्कर.

मकर रास प्रदेश :- भारतवर्ष, पंजाब, पर्शियामधिल सिराकत व मारकनजवळील प्रदेश, अफ़गाणिस्तान, थ्रेस, अल्बेनिया, बोस्निया, बल्गेरिया, ग्रीस, मेक्झिको, लुथिआनिया.

कुंभ रास प्रदेश :- खडकाळ अरबस्तान, प्रशिया, रशिया, पोलंड, स्वीडन.

मीन रास प्रदेश :- पोर्तुगाल, सहाराचे वाळवंट.


शहर किंवा प्रदेशांच्या पत्रिका तयार करण्यासाठी ज्या निरनिराळ्या पध्दती तज्ञ ज्योतिषी अवलंबितात त्यामध्ये एक पध्दत ही आर. व्ही. वैद्य यांची आहे. त्यांच्या मते प्लुटो हा ग्रह राष्ट्रामधील ठळक घटना म्हणजेच क्रांतिकारक घटनाण्चा मुख्य कारक ग्रह आहे.
श्री. सुहास डोंगरे सिव्हिल इंजिनिअर,ज्योतिषी, वास्तु ज्योतिष्य अभ्यासक ह्यांचे खापरपजोबा श्री व्यंकटेश बापूजी केतकर यांनी प्रथम प्लुटो ग्रहाचा शोध लावला आणि तेही कोणत्याही प्रकारची सुसज्ज यंत्रणा नसताना, ते लोकमान्य टिळकांच्या समकालीन होते. त्यांनी केतकर शुध्द पंचाग याचा प्रथम अवलंब केला. या प्लुटो ग्रहाचे सामर्थ प्रचंड असून संहारक शक्ती व नवनिर्मितीचा कारक आहे. हे लोंकाना पटवून दिले.

त्यामुळे एखाधा देश / शहरातील ठ्ळक घटना ज्या कालावधीत झाल्या तो कालावधी व प्ल्टो कोणत्या राशीत आहे हे लक्षात घेऊन ती रास दशबिंदूपाशी घेऊन त्याप्रमाणे लग्नबिंदू ठरवावा असे त्याचे मत आहे. या प्लुटो ग्रहाच्या जोडीला हर्षल व नेपच्यून याची मदत घ्यावी.

मेदिनीय निभागात फलादेश करताना सर्वात कोणत्या गोष्टीला महत्त्व असेल तर ते म्हणजे ग्रहणे होय, ग्रहणे हे प्रामुख्याने आधारभूत आहेत तर ग्रहणांची पत्रिका ही मेदिनीय फलीत करण्यासाठी आधारपत्रिका, भारतीय ज्योतिर्विदांनी राहू व केतू यांची वराहमिहिरांच्या काळापासून पूर्णपणे ओळख आहे. त्याकाळी दळणवळण पध्दती फार मागासलेली होती त्यामुळे सर्व जण जेव्हा एकमेकाना भेटत असत त्यावेळी त्याचे संवाद व लिखाण एकमेकाशी देवाण घेवाण होत असे. त्यातील चुका व वेळेचे बंधन असल्यामुळे फारसे मेदनिय शास्त्र प्रचलित नव्हते.

जेव्हा एखादे ग्रहण किंवा ग्रहाचा युती योग होत असतो त्या प्रमाणे ते ग्रहा वसुधरेच्या प्रत्येक भागाला काय फ़ळे देतात हे महत्वाचे आहे. त्या प्रमाणे ज्योतिष्याने भाष्य करताना ह्या सर्व सामान्य गोष्टीचा विचार करणे आवश्यक आहे. नुसते ग्रहाच्या किंवा ग्रहणाच्या योगाने आपणास हे रोग होतील किंवा अपघात होतील हे म्हणजे फ़ार चुकीचे आहे, कारण देशात अनेकाचे लग्न एकच असते, पण च्याच्या वर ग्रहाच्या व नक्षत्राच्या दृष्टीचे परिणाम हा वेगवेगळा असू शकतो. तो परिणाम नवनविन नियम करुन मोजने आवश्यक आहे.

लिहण्यस फ़ार आहे. परंतु येथे वेळेचे व नित्य कामाचे बंधन असल्याने लिहता येत नाही. तसेच वेळेचे बंधन असल्याने शुध्द लेखन तपासणे सुध्दा जमत नाहे. तरी चुका सुधारुन घ्याव्या ही विनंती.
कुंभ राशीत शतरारका नक्षात्र जन्मलेला
संजीव

गुरुवार, २७ मे, २०१०

॥ श्री ॥
मुळ नक्षत्र आणि उपनयन संस्कार मुहूर्त

काल एक उपनयन संस्काराची पत्रिका आली. म्हणजेच मुलाच्या मुंजेसाठी आमंत्रण आले होते. पत्रिका पाठवणारे वेदसंपन्न पुरोहित आहेत. उपनयन सस्कांराचा मुर्हूत दिनांक ३० मे २०१० सकाळी १०.११ मिनिटाचा नाशिक येथे आहे. मी काही पत्रिका पाहीली नाही. रात्री घरी आलो व आमच्या सौभाग्यवतींना म्हटले तुला नाशिकला श्री शंकराच्या दर्शनाला जायचे आहे ना? चल आपली दोन दिवसाची सोय झाली ( म्हणजे फ़ुकटात नव्हे ) अजयच्या भाच्याची मुंज आहे. अजयने आपल्यासाठी राहाण्याची व्यवस्था केली आहे. आमच्या सौभाग्यवतींना व मुलगा ( वैभव ) यास आनंद झाला. चला मे २०१० चा शेवट गोड होत आहे. पत्नी व मुलानी एका स्वरात मला सांगितले ३० मे २०१० रोजी सकाळी आपल्या विभागात मतदान आहे. मतदान सकाळी उरकून आपण लगेच प्रवासाला निघूया. सवयी प्रमाणे मुलाने पंचाग आमच्या सौभाग्यवतींच्या हाती दिले आणि म्हटले मातोश्री लागा कामाला. आणि आमच्या सौभाग्यवतींने पंचग उघडले आणि मोठा चमत्कारीक आवाजात म्हटले अहो त्यादिवशी “मूळ” नक्षत्र आहे. ह्या लोंकानी हा कसा मैजिबंधनाचा ( उपनयन संस्काराचा ) मुहुर्त काढलेला आहे तो मुहूर्त चूक की बरोबर आहे. ह्या विषयी मला पहिल्यादा माहिती द्या? आम्ही लागलो कामाला.

ज्योतिषशास्त्रानुसार जेष्ठा व मुळ नक्षत्रावर जन्म झाल्यास ज्योतिषाला ह्या नक्षत्राबद्दल अधिक माहिती लोंक विचारीत असतात. त्यासंबंधी अनुभवाच्याद्वारे व ग्रंथ साह्याने माहिती देत आहे. ह्या पध्दतीला भारतीय परंपरा आहे.

मुळ नक्षत्र हा प्रामुख्याने जननदोषा करता आहे असे सर्व लोंकाचे गृहीत आहे.

मूलाद्यपादे पिंतर निहन्याद्‌ द्वितीयेक मातरमाशु हन्ति । तृतियके वित्त विनाशक: स्वाच्चुतुर्थके समुपैति सौख्यम्‌ ॥

अर्थ :- मूळ नक्षत्राच्या प्रथम चरणी जन्म असता बापाचा व द्वितीय चरणी मातेचा नाश होतो. तृतीय चरणी संपत्तीचा नाश होतो व चतुर्थ चरणी सुखी होतो. त्याप्रमाणे वाचनात अलेल्या माहीती प्रमाणे मूळ नक्षत्राच्या सर्व घटी १५ नी विभागाव्यात व खालीलप्रमाणे प्रत्येक विभागाचे फ़ल पहावीत.

१. बापाचा मृत्यू, २. चुलत्याचा मृत्यू, ३. बहिणीच्या नव-याचा मृत्यू ४. वडिलांच्या बापावा मृत्यू, ५. मातेचा मृत्यू, ६. मावशीचा मृत्यू, ७. मामाचा मृत्यू. ८. चुलतीचा मृत्यू, ९. सर्वनाश, १०. पशुनाश, ११. नोकराचा मृत्यू, १२ जन्मलेले बालक स्वत:मरते, १३. जेष्ठ भांवडाचा मृत्यू १४. बहिणीचा मृत्यू, १५ आईचा वडील मृत्यू पावतात.

काही ग्रंथकरांच्या मते मूळ हा वृक्ष मानून त्याचे चार भाग करतात. पहिला भाग वृक्षाचे मूळ घरास नाशकारक, दुसरा भाग स्तंभ, धननाश व मातेला वाईट, तिसरा भाग वृक्षाच्या फ़ांद्या – पित्याला वाईट, चौथा भाग वृक्षपत्रे – परिवारास वाईट.

मूळ नक्षत्र वास व फ़ल :- फ़ाल्गुन, जेष्ठ, वैशाख, मार्गशिर्ष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र पाताळी असते. आषाढ, आश्विन, माघ व भाद्रपद ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मूळ नक्षत्र स्वर्गी असते. श्रावण, कार्तिक, चैत्र, पौष ह्या महिन्यात मूळ नक्षत्र मृत्यू लोकांत असते. स्वर्ग आणि पाताळ ह्या ठिकाणी मूळ नक्षत्र असता जन्मलेले मूल शुभकारक व मृत्यूलोकी असता अशुभकरक जाणवे. तृतिया षष्ठी, दशमी शुध्द चतुर्दशी ह्या तिथीस आणि शनिवार व मंगळवार ह्या दिवशी मूळ नक्षत्रावर जन्मलेले मूल कुलाचा उच्छेद करते असे शास्त्रात म्हटले आहे.

मूळ नक्षत्र जनन दोषापवाद :- नाशिकचे प्रसिध्द जुन्या काळातील ज्योतिषी कै. यज्ञेश्वर गोविंद घोलप यांनी व्यवहार ज्योतिष ह्या पुस्तकात अस अपवाद दाखविला आहे. अश्विनी, भरणी, कृत्तिका मृग, आर्द्रा, पुनर्वसू, हस्त, चित्रा, स्वाती, रेवती जेष्ठा ह्या नक्षत्रांवर सूर्य संचार करीत असता मूळ नक्षत्रावर जन्मलेल्या अर्भकापासून अरिष्टाची भीती नसते.

परिहार :- मूळ नक्षत्रावर जन्म झाल्यास १२ व्या दिवशी पित्याने मूळ नक्षत्र शांती करावी.

सर्वारंभ मुहूर्त :- कोणत्याही कार्याचा प्रारंभ करताना आपल्य जन्मकुंडलीतील बारावे आणि आठवे स्थान शुद्ध असणे आवश्यक आहे. या दोन स्थानी कोणताही ग्रह असू नये. जन्मराशीतून तिसरे, सहावे, दहावे व अकरावे लग्न असेल आणि त्यावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल व शुभ ग्रह युक्त असेल, चंद्र जन्मराशीपासून तिसरा, सहावा, दहाव, किंवा अकरावा असेल तर कोणतेही कार्य प्रारंभ करावे त्यात यश निश्चित मिळते, असे ज्योतिषशास्त्र म्हणते.

जन्मकुंडलीप्रमाणे व उपनयन संस्कार व लग्नाच्या गोचरी ग्रहाप्रमाणे :- व्यय स्थानात शुक्र व केतु आहेत. तसेच त्यावर षष्ठ स्थानात कुंभ रास आहे, कुंभेचा राशीस्वामी शनिच्या राशीत मंगळ धनिष्ठा स्वत:च्या नक्षत्रात (३) चरणात असून त्याची दृष्टी व्ययात आहे. त्याच प्रमाणे जन्म राशी पासून चंद्र गोचरीचा त्यादिवशी सातवा आहे. चंद्र उपनयन संस्काराच्या लग्नाच्या वेळी धनुराशीत मुळे नक्षत्रच्या (४) चरणात केतूच्या नक्षत्र आहे. त्यामुळे येथे ही एक चूक झाली आहे.

सर्वार्थसिध्दि योग:- खालील वारांच्या पुढे लिहलेले नक्षत्र असल्यावर “सर्वर्थसिध्दियोग” बनतो. कोणतेही महत्त्वपूर्ण कार्य करण्यासाठी हा योग अत्यंत शुभ व यशदायक असतो. असे ज्योतिषशास्त्रातील विव्दान लोंक म्हणतात.

रविवार :- हस्त, मूळ, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपदा, उत्तराफ़ाल्गुनी, पुष्य, अश्विनी.
सोमवार :- श्रवण, रोहिणी, मृगशीर्ष, पुष्य, अनुराधा.
मंगळवार :- अश्विनी, उत्तरभाद्रपदा, कृत्तिका, आश्लेषा.
बुधवार :- रोहिणी, अनुराधा, हस्त, कृत्तिका, आश्लेषा.
गुरुवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसू, पुष्य.
शुक्रवार :- रेवती, अनुराधा, अश्विनी, पुनर्वसु, श्रवण.
शनिवार :- श्रवण, रोहिणी, स्वाती.

( रविवारी सर्वार्थसिध्दि योग मूळ नक्षत्र असल्याने त्यांनी हा मुहूर्त धरला तर नसेल ना? )

ज्योतिषशास्त्रात नक्षत्रांना फ़ार महत्व आहे. गोचर भ्रमणामुळे एखादा ग्रह जन्मकुंडलीच्या शुभ स्थानातून भ्रमण करीत असेल तरीसुध्दा तो शुभ किंवा अनुकूल फ़ळ देईलच असे नाही. कोणत्या नक्षत्रातून किंवा मूळचा ग्रह भ्रमण करीत आहे हे पाहणे अनिवार्य आहे. असे केल्यानेच फ़लितात सूक्ष्मता व अचूकता येईल.

दैनंदिन मुहूर्त किंवा दिवस चांगला आहे की वाईट हे पाहण्यासाठी सुध्दा या पध्दतीचा उपयोग यशस्वी ठरतो. एखाद्या दिवसाचा चंद्र तुम्हाला अनुकूल आहे परंतु त्या दिवसाचे नक्षत्र तुमच्या जन्मनक्षत्रानुसार अनुकूल फ़लदायक नसेल तर एकटा चंद्र संपूर्ण दिवसभार शुभदायक फ़ले देणार नाही म्हणून नक्षत्र गोचर फ़ार महत्वाचे आहे.
जन्मसंपद्वित्क्षेम: प्रत्वद: साधकस्थ । नैश्वतो मित्रवर्ग इच परमो मैत्र एवच ॥

जन्मनक्षत्रापासून १, २, ४, ६, ८, ९, १०, ११, १३, १५, १७, १८, १९, २०, २१, २४, २७ हि अठरा नक्षत्रे फ़लदायक आहेत. आपल्या जन्मनक्षत्रापासून विपदकर, प्रत्वर, नैश्वन या सदरात येणारी नक्षत्रे अनिष्ट किंवा अभुभ फ़ले देतात. तसेच जन्म उत्पत्तिकर, संपतकर क्षेत्रकर, साधक, मैत्री, परमैत्री ही इष्ट नक्षत्रे अनुकूल व शुभफ़ले देतात.

जन्मनक्षत्रापासून तिसरे, पाचवे, सातवे, बारावे, चौदावे, सोळावे, एकविसावे तेवीसावे व पंचवीसावे ही ९ नक्षत्रे अनिष्ट फ़लदायी असतात.

आता विचार करा की या प्राख्यत कर्मकांड करण्या-या स्वत:ला शास्त्र माहित असलेल्या जाणकारानी हा मुहूर्त का निवडला बरे. ह्याचा परिणाम काय घडेल ह्या बालकाचा ह्यात काय दोष आहे.

जातकाचा जन्म दिनांक ०३/१२/२००१ जन्मवेळ रात्री ०१:३० डोंबिवली (महा.) बालकाचे नाव अर्थव

जातकाच्या जन्म आर्द्रा नक्षत्रात झालेला आहे. आर्द्रा नक्षत्राला मूळ नक्षत्र हे प्रत्त्वर १४ वे नक्षत्र येत आहे. त्या मुळे हे नक्षत्र १४वे आहे. मला वाटते कि हा आर्द्रा नक्षत्राचा घोटाळा मोजण्यात किंवा प्रिंटिंगची चुक असलेल्या संदर्भात होऊन चुकुन हा १४ च्या ऐवजी १५ फ़लदायी म्हणून त्यांनी धरला असावा.

जन्म लग्न कुंडली प्रमाणे मौजिबंधन लग्न कुंडली प्रमाणे
लग्न कन्या ०१.१२.४५ उत्तरा-फ़ा.(२) लग्न कर्क १२.१९.४३ पुष्य (३)

कन्या लग्नाचा स्वामी बुध तृतिय स्थानात वृश्चिक राशीत १५.४०.५५ अनुराधा नक्षत्राच्या ३ चरणात राशी स्वामी मंगळ आणि अनुराधाचा नक्षत्र स्वामी मंगळ.

मौजिबंधन लग्नाप्रमाणे वृश्चिक रास पंचमात व बुधाची मिथुन रास व्ययात शुक्र व केतुयुक्त जातकाच्या पत्रिकेत चतुर्थस्थानातील केतु धनुच्या (गुरु) मुळ नक्षत्रात द्वितीय चरणात, आणि मौजिबंधन लग्नाच्या कुंडलीत व्ययात मिथुन राशीत आर्द्रा (राहू) चतुर्थ चरणात येत आहे. जातकाला मोक्ष प्राप्तिसाठी हा मौजिबंधंनाचा योग महत्वपूर्ण आहे.

उपनयन कुंडली लग्न कर्क राशीत १२.१९.४३ पुष्य नक्षत्राच्या (३) चरणात येत आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र हा षष्ठात प्लुटो व राहू युक्त आहे. धनुराशीचा चंद्र ११.१२.३४ मूळ नक्षत्राच्या चतुर्थ चरणात राहूयुक्त असून व्ययातील शुक्राची व केतुची सप्तम दृष्टी त्यावर आहे. तसेच गोचरीप्रमाणॆ चंद्र हा उपनयन लग्नाच्या वेळी सप्तमात म्हणजेच जातकाच्या चतुर्थस्थानात धनु राशीत येत आहे. शास्त्राप्रमाणे ३, ६, १०, ११ वा गोचरीचा चंद्र लाभ कारक ठरतो. पण येथे गोचरीचा चंद्र सप्तमात आहे.

उपनयन संस्काराच्यावेळी केंद्रात फ़क्त एक बुध ग्रह आहे. तो पण दशमात मेष राशीत भरणी नक्षत्राच्या (३) चरणात भरणी नक्षत्राचा स्वामी शुक्र व्ययात. लग्नकालीन केतूची विशोत्तरी महादशेच्या अतंरदशेत शनिची दशा सुरु आहे. तसेच लग्न कुंडलीत राहूच्या अंतरदशेत रवि दशा सुरु आहे. लग्न कुंडलीत राहु दशमात चंद्र व गुरुयुक्त आहे. कुंडलीच्या दशमात बुधाची मिथुन रास असून बुध तृतियस्थानात शुक्र, रवि, प्लुटो युक्त आहे.


हा सर्व सामान्य नियम आहे,

अर्थव यास ०३/१२/२००१ ते २०/०४/२०१३ पर्यंत राहूची विशोत्तरी दशा आहे. सध्या राहूच्या अतंरदशेत ०७/११/२००९ पासून शुक्राची अतंरदशा सुरु आहे दशेचे वर्णन खालील प्रकारचे दिले आहे. त्या प्रमाणे त्यांच्या पिताश्रीनी त्याचा उपनयन चा कार्यक्रंम दिनांक ३० मे, २०१० रोजी का बरे ठरवीला आहे?

राहूमध्ये रवि १० महिने २४ दिवस ही आंतरदशा येताच धनवृध्दि, परदेशगमन, शासनाकडून लाभ होणार आहे. ( विमाची रक्कम किंवा त्तसम फ़ायदा मिळेल ). ०७/११/२००९ ते ०२/१०/२०१० पर्यंत रवि.

राहूमध्ये चंद्र १ वर्ष ६ महिने या आंतरदशेमध्ये कलह, बंधुवियोग, धनप्राप्ति, अनंत लाभ, सुख व सुविधा यांची प्राप्ति होते. ह्या काळात कोर्टाकचेरीमध्ये जाऊ नये गेल्यास नुकसान होईल ०२/१०/२०१० ते ०२/०४/२०१२ चंद्र.

राहूमध्ये मंगळ १ वर्ष १८ दिवस ही आंतरदशा येताच नाना प्रकारे उपद्रव,कमतरता, मानसिंक चिंता, अडीअडचणी, स्मरणशक्तिचा –हास, परिक्षेमध्ये अपयश, पदावनती होणार आहे, सुगीच्या काळात पैसै जमा करावेत. ०२/०४/२०१२ ते २०/०४/२०१३ मंगळ.

कन्या :- लग्नाच्या पंचमात मकर राशी येत. तिचा अधिपती म्हणून हर्षल ग्रह आहे; पण प्लुटो- नेपच्यूनप्रमाणेच हर्षलला स्वतंत्र दशा नसल्याने जवळचे कारकत्व शनिमध्ये असल्याने शनि व भाग्येश शुक्र यांचे संबंध कुंडलीत चांगली असावयास हवे.

कन्या लग्नाचा भाग्येश ग्रह शुक्र आहे. तसेच तो धनेशही आहे. यामुळे शुक्राची दशा कन्या लग्नाला सर्वात चागंली जाणारी असते. शुक्राच्या खालोखाल कन्या लग्नाचा दशमेश बुध असल्याने व तो लग्नेश असल्याने बुधाची दशासुध्दा कन्या लग्नाला चांगली जाते. मात्र हे दोन्ही ग्रह मूळ कुंडलीत सुस्थितीत असावे लागतात. या ग्रहांना शक्यतो राशीगत बल व नवमांश बल यांपेकी काहीतरी असावे लागते. तसेच हे दोन्ही ग्रह अर्थवची मनस्थिती ठरविण्यात महत्वाचा वाटा उचलत असल्याने ज्या प्रमाणात ते मूळ कुंडलीत शुभ आहेत. त्याप्रमाणात त्यांचे फ़ल जातकाला त्यांच्या दशाकालात अथवा इतर ग्रहांच्या बुध-शुक्राची युतीच्या अंतर्दशा चांगली जाते. कन्या लग्नाचा अष्टमेश मंगळ आहे म्हणून या ग्रहाची दशा कन्या लग्नाला सर्वसाधारण्पणे चांगली जात नाही. पण हा मंगळ कुंडलीत भावबली व चांगल्या नवमांशात असता या ग्रहाची दशा सुध्दा चांगली जाते अर्थव च्या कुंडलीत नवमांश मंगळ दशमात आहे. आरोग्याच्या दृष्टीने जरी या मंगळाचा त्रास जातकाला होईल, पण उत्कर्षाच्या दृष्टीने मात्र हा मंगळ जातकाला सातत्याने पुढे नेण्याचाच प्रयत्न करेल. कन्या लग्नाला मारकेश गुरु असल्याने मीन राशीच्या अधिपती नेपच्यून असून दशेमध्ये सुखस्थानाचाही अधिपती आहे. यामुळे गुरुची महादशा कन्या लग्नाला चांगली जात जाईल, पण हे अर्धसत्य आहे. हा गुरु मूळ कुंडलीत दशमात आहे.. गुरु हा आध्यात्मिक ग्रह असल्याने स्वत:च्या संसारात त्या जातकाची तेवढी समरसता दिसून येणार नाही. पण आर्थिक आणि भौतिक प्रगती चांगली असल्याचे दिसून येईल. कन्या लग्नाला चंद्र हा लाभेश आहे. चंद्राच्या अंमल माणसाच्या मनावर असतो. शरीरातील रक्तभिसरण, शरीरातील पाणी, चयापचय संस्था यावरही चंद्राचा अंमल असतो. हा चंद्र कन्या लग्नाचा षष्ठाचा-षष्ठ स्थानाचा अधिपती झाल्याने आरोग्यजातकाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा ठरतो.

टिप:- माझ्या मते दशमातील राहूची दशा सध्या सुरु आहे. त्यानतंर गुरुची दशमातील दशा सुरु होणार आहे. गुरु + राहू ( गुरु (वक्रि) मिथुन राशीत २०.१९.३६ अंशावर पुनर्वसू नक्षत्राच्या प्रथम चरणात तर राहू (व) ०४.०१.३४ मृग नक्षत्राचा (४) चरणात आहे ) गुरु + राहू जर का एका राशीत असले तर तो चांडाळ योग होतो.) दशमातील चांडाळ योग हा जातकाला चांगला नाही असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे. पण दोघाचा राशी स्वामी एक आहे; गुरु व राहू मिथुन राशीत आहे, त्यामुळे त्याचे स्वामी एक आहेत. पण नक्षत्र स्वामी वेगवेगळे आहेत. गुरु चे नक्षत्र पुनर्वसू व त्याचा स्वामी गुरु व राहूचे नक्षत्र मृग त्याचा स्वामी मंगळ आहे. आता गुरु व मंगळ युध्दास प्रारंभ झाला आहे. ह्याचे गोष्टीचे विश्लेषण मी या ठिकाणी करणार नाही.

अशुभ दृष्टी :- जो ग्रह अशुभ दृष्टीने युक्त असतो त्याचे दशेत संततिबाधा, अग्निभय, ताबेदारी, मातापित्यापैकी कोणाचा तरी मृत्यू, पैशाची नुकसानी वगैरे गोष्टी संभवतात.

फ़लदेश पाहताना दशांचा फ़लादेश विचारात घेणे जरुर आहे. त्याच वेळी ग्रहावरील सूक्ष्म स्थिती लक्षात घेतली पाहिजे. त्याचबरोबर प्रत्येक ग्रहाचे उच्च नवांश, नीच नंवाश, पाप षष्ठांश, चेष्टाबळ, वगैरे स्थिती पाहिली पाहिजे. त्यानुसार निर्णायकफ़ल घेतले पाहिजे, म्हणजे भविष्य तंतोतंत खरे येते.

• दशमेशाच्या दशेत धनप्राप्ति होऊन राजमान्यता वाढते. त्या प्रमाणे दशमात राहू असल्याने जातकासा राजमान्यता प्राप्त झाली आहे. दशमेची दशा सध्या सुरु आहे.
• गोचर रविच्या नक्षत्रापासून जातकाचे नक्षत्र २६ वे रोहिणी आहे. त्यामुळे जातकास हे चांगले नाही.
• आचार्य गर्ग यांच्या मतानुसार चंद्रस्थित नक्षत्रापासून जातकाचे जन्मनक्षत्रची स्थिती १४ वी असल्याने हा मुहूर्त शुभ व ह्रदयात असल्याने दांपत्यसुखासाठी चांगला म्हणून धरला आहे का?.
• तसेच चंद्र नक्षत्रापासून जन्मनक्षत्रापर्यंत १३ ते १८ मधील नक्षत्रामध्ये येत असल्याने ते जातकाच्या हातावर पडत आहे. हातावर नक्षत्र पडल्यामुळे जातकाला धनलाभ मिळण्याची शक्यता धरुन हा मुहूर्त काढला तर नसेल ना?
• मंगळ-नक्षत्र गोचर फ़ल:- राशी गोचर प्रमाणॆच आचार्य गर्ग आणि लल्ल यांनी मंगळाच्या नक्षत्रा विषयी काही विश्लेषण केलेले आहे. तसेच महर्षि गर्ग यांच्या मते मंगळ स्थित नक्षत्रापासून जन्म नक्षत्रापर्यंत गणती सुरु करावे. तसेच आचार्य गर्ग यांच्या मते गोचर मंगळाच्या नक्षत्रापासून आपले जन्म नक्षत्र जेथे पडेल त्याप्रमाणे फ़लित समजावे.
१. १ ते ३ मुखात रुचकर भोजन, सुख्य
२. ४ ते ७ राजसन्मान, प्रतिष्ठा प्राप्ती ( जातकाचे मंगळ गोचर ह्या नक्षत्रात आहे )
३. ८ ते ११ बाहुत या पैकी ८,९ उजव्या हातात- यशदायक.
अशी अशुभ फ़ले १० ते ११ ( डाव्या हातात-
रोगकारक,त्रासदायक, अनिष्ठफ़ल).
४. १२ ते १३ गळ्यात उचकी लागणॆ, चिंताकारक.
५. १४ ते १८ ह्रदयात धनलाभ, आर्थिक स्थितीत सुधारणा
६. १९ ते २१ पायात भ्रमण प्रवास.

याप्रमाणे गोचरीचा मंगळ हा जन्मनक्षत्रापासून पाचवा प्रत्यरी मद्या नक्षत्राच्या (१) चरणात आहे. तसा मंगळ षष्ठस्थानाचा वाईट फ़ले देत नाही तो शत्रुला नामोहरण करत असतो. गोचरीचा मंगळ द्वितीय धनस्थानाचा अधिपती केतूच्या मद्या नक्षत्रात नेपच्यूच्या दृष्टीत आहे. दशमातील राहुच्या दशाफलाप्रमाणे राहु दशमात रविबरोबर असल्याने अर्थवच्या पित्याला हानिकारक आहे (दशेपुरते मर्यादीत).

अर्थवच्या कुंडलीत नवमस्थानातील वृषभ राशीतील रोहिणी (३) चरणातील वक्री शनी गोचरी भ्रमणात तृतीयस्थानात वक्री असून तो कन्या राशीत उत्तर-फ़ा. नक्षत्राच्या (३) चरणात आहे. त्याच्या सप्तमात गुरु व हर्षल हे ग्रह आहेत. त्यामुळे जातकाला गुरुचा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे.

अर्थवचा जन्मलग्न च्यावेळी पुर्व क्षितीज्यावर कन्या लग्न उदित होते. कन्या ही द्विस्वभाव व पृथ्वीराशी लग्नी उदित आहे. असा जातक शांत सकोच वृत्तीचा विनयी व आतल्यागाटीचा असतो. कन्या लग्नाचे लोंक कोणातेही काम दूरवर विचार केल्या खेरीज हाती घेत नाही. अर्थवचे अत:करण दयाळु व प्रेमळ आहे. परंतु दुस-याच्या भाडगडीत पडण्याची त्याची इच्छा होणार नाही. व्यवहारात कसे वागावे हे ह्या जातकाला चांगले कळते. व त्याचा खरा स्वभाव कोणालाही समजणार नाही. अर्थवची बुद्धी तीव्र असुन कोणतेही गोष्ट याला लवकर समजते.

अर्थवाचे मन अभ्यासू वृत्तीचे आहे. शास्त्रीय विषय व वाड्‌.मय यात बुध्दी चालते. कल्पना व तर्क चांगला आहे. योजकपणा व बारकाई, मतलबीपणा व अतिषय लोभ हे ह्या जातकाचे मोठे दुर्गुण आहेत.

स्वत:ची खात्री झाल्याशिवाय अर्थव कोणात्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. निरिक्षण व चिकित्साबुध्दी चांगली आहे. व्यवहार दक्षता व पध्दतशीरपणा हे मोठे सदगुण अर्थवमध्ये दिसून येतील. किरकोळ कामे सुध्दा अर्थव पध्दशिरपणे करणार. कधी कधी कारण नसताना मानसिक त्रास करुन घेईल. व कारण नसताना तो आपले मत बदलेल. आत्मविश्वास कमी व स्वत:च्या सामर्थ्याबद्दल साशंकपणा आहे.

संकटाच्या वेळी ह्याचे धर्य डळमळुन तो घाबरुन जाईल. हा निराशावादी आहे. योग्य पुढाराच्या नेतृत्वाखाली अर्थव उत्तम प्रकारे काम करू शकतो. सेवावृत्ती हा त्याचा मुख्य धर्म आहे.

लिहण्यासारखे बरेच काही आहे. परंतु सौभाग्यवतीने येथेच पुर्णविराम करण्याची आज्ञा दिल्याने आम्ही येथेच पुर्णविराम करत आहोत. अर्थवला सर्व ग्रह-नक्षत्राची शुभ फ़ले लाभोत ही श्री व स्वामी चरणी प्रार्थना.
शुभं-भवतु.
स्वामी भक्त.

तळटिप:- हा विधि करण्याअगोदर महामृत्युंजय जप तसेच नवग्रह शांती करावी.

बुधवार, १९ मे, २०१०

BREAST CANCER स्थनाचा कर्क रोग K.P. HOROSCOPE


॥श्री॥

सर्वसामान्य माणूस “कर्करोग” CANCER या आजाराच्या नावालाच खूप घाबरतो. त्यात पुन्हा एखादी व्यक्ति जर भावानशील, संवेदनाक्षम असेल तर विचारूच नका !. ब्रेस्ट कर्करोग हा विषय तसा खास स्त्रियांचाच.
आपल्या सर्वांना माहीत आहेच की मानवी शरीर हे असंख पेशींनी तयार झालेले आहे. ह्या पेशींची वाढ व झीज होणे सतत ( आयुष्यभर ) चालूच असते. जेव्हा पेशींच्या वाढीचा ( Growth rate ) निर्मितीचा वेग प्रामाणापेक्षा जास्त होतो, तेव्हा शरीरात “गाठ“ निर्माण होते. ह्या गाठीचे पुन्हा दोन प्रकार आहेत. Malignant Grouth असलेल्या गाठी. ह्या शरीरभर कोठेही पसरून जीवाला घातक ठरु शकतात. तर Non malignant growth असलेल्या गाठी ठराविक अवयवापुरत्याच मर्यादित असतात व ह्या गाठी फ़ारशा घातक नसल्याने त्या शस्त्रक्रियेने यशस्वीपणे काढल्या जातात.

स्त्री यांमध्ये असा एक समज आहे की Breast banber is the best bonder परंतु हाही एक गैरसमजच आहे. कारण कोणत्याही कर्करोगाचे जर त्याच्या प्राथमिक अवस्थ्येत निदान झाले तरच! कारण कर्करोग एक असे वैशिष्ट्य दिसून आले आहे की, अगदी सुक्षलवातीच्या प्राथमिक अवस्थेत कोणतीही लक्षणे दृष्टोत्पत्तीस येत नाहीत किंवा कोणतीही वेदना जाणवत नाही, त्यामुळे साहजिकच त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते व जेव्हा लक्षात येते तेव्हा बर्यानच वेळेस परिस्थिती आटोक्याबाहेर गेलेली असते.

फ़लज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने आरोग्यचा विचार केला तर आत्माकारक रवि व मनाचा कारक चंद्र, लग्न बिंदू व लग्नातील ग्रह हे खूपच महत्वाचे आहेत. लग्नावरुन आपण जातकाचा शरीराबांध, नैसर्गिक जीवनशक्ति, रोग प्रतिकारक शक्ति, प्रकृतीर्धम, स्वभावगुण इत्यादींचा विचार करु शकतो. जन्म कुंडलीतील लग्नातील षष्ठातील ग्रह, लग्नातील व षष्ठातील राशि व त्यांचे इतर ग्रहांशी होणाया योगानुसार जातकाचे आरोग्य कसे राहणार आहे ते कळते. कुंडलीतील ’षष्ठ” स्थान हे रोगारिपुदर्शक स्थान आहे. ह्या स्थानात क्रुर ग्रह किंवा कोणताही ग्रह शत्रूराशीत असेल किंवा अशुभ ग्रहांच्या दृष्टीत असेल तर त्या राशीने दर्शविलेल्या शरीरातील भागावर परिणाम करतात व त्या त्या ग्रहाने निर्माण होणारे आजार होऊ शकतात. “अष्टम” स्थान मृत्यूस्थान आहे. जातकाचा मृत्यू कोणत्या आजाराने, तो आजार अल्पमुदतीचा आहे की दीर्घ ( रेंगाळणारा ) मुदतीचा असेल ते सांगता येते. कुंडलीतील २२ वा द्रेष्काण मृत्यूने निदान दर्शवितो. १२ वे स्थान “व्यय” स्थान असून त्यावरुन सर्व प्रकारचा व्यय ( तन – मन – धन ) हानी – नुकसान दर्शविले जाते.

लग्नातील पुरुष राशी ( विषम राशी ) ही धनविद्युतकारक असते तर समराशे ऋणविद्युतकारक असते. विषम राशी बलवान तर समराशी दुर्बल असतात.

दिनांक १८ मे २०१० रोजी माझ्या कडे एक व्यक्ति आपल्या पत्नीच्या आजारा संबधी विचारणा करण्यास आली. माझ्या गुरुवर्य श्री. मा. पंतानी ( धोडोपंत आपटे ) प्रश्नाच्या वेळी शुभ व अशुभ शकुन सांगितल्या प्रामाणे मी प्रथम प्रश्नाच्या वेळीचा शुभ व अशुभ संकेत पाळला. तसेच काल मी पुण्याला श्री सुहास डोंगरे ह्याच्या कडे भेटण्यास गेलो होतो तेव्हा त्यांनी प्रथमच संपादित “ग्रहबोली” चा अंक भेट म्हणून वाचण्यास दिला होता.

संध्याकाळ असल्याने सहजच तो वाचण्यस घेतला व सौ. कुंदा वसंत महाजन यांचा लेख वाचत असताना जातक माझ्या कडे प्रश्न विचारण्यास आले. प्रश्न त्याच्या सौभाग्य व्यक्तिच्या आजारपणाचा होता. जातकानी त्याच्या गृहलक्ष्मीची कुंडली आणली नव्हती किंवा त्यांना तीची जन्म तारीख व वेळ आठवत नव्हती. त्यामुळे कृष्णमूर्ति पध्दतीने ही पत्रिका सोडवण्यास घेतली.

प्रश्न ता. १८/०५/२०१० कृष्णमूर्ति प्रश्न क्रंमाक ३८ वेळ १९:०३:३७ स्थळ विरार.


लग्न स्वामी शुक्र, लग्न नक्षत्र स्वामी मंगळ, राशी स्वामी चंद्र, दिन स्वामी मंगळ, राशी नक्षत्र स्वामी गुरु,प्रश्न कुंडलीत जातकाचे प्रश्न लग्न वृषभ आहे व वृषभेचा शुक्र लग्न स्वामी म्हणुन के.पी लग्नात द्वितीय स्थानात आहे. तसेच तो प्रथन भावात वृषभ व मिथुन आहे. त्यावेळीच्या लग्न वृश्चिक असून त्या लग्नात शुक्र अष्टमात आहे. अष्टमस्थानातील शुक्र हा आयुष्यभर असणा-या रोगा बद्दल सूचना करतो. ज्याच्या अष्टमात शुक्र आहे त्यांनी आपल्या आरोग्या बद्दल फ़ार काळजी घावी अशी माझी वैयक्तिक सूचना आहे.
(उदा.मधुमेह, कर्करोग, किंवा एखाद्या असाध्य आजार जो शेवट पर्यंत आपली साथ करतो तो. )

माझ्या मनात पाल चुकचुकली आणि मी जातकाला त्याच्या पत्निला एखाद्या मोठा आजार झाला का? किंवा एखाद्या महत्वाच्या आजारा विषयी शस्त्रक्रिया आहे का म्हणून आपण माझ्या कडे आला आहात का म्हणून प्रति प्रश्न केला. आणि विषयाला सुरुवात झाली, वाचनात आलेली माहिती तसेच मी जातकाच्या भविष्य वर्तवताना केलेल्या चुका शोधन्यासाठी हा लेख मी येथे देत आहे. मार्गदर्शन करतना जर का चुक झाली असेल तर कृपया कळवावे. मी जातकाला चार पाच दिवसानी बोलविले आहे.

“ स्थनाचा कर्क रोग BREAST CANCER “

कुंडलीतील चतुर्थ स्थानावरुन आपण स्तनांचा अभ्यास करणा आहोत हे वाक्य वाचत असताना जातकाचा प्रवेश झाला.

चतुर्थस्थानातील राशीस्वामी म्हणजेच चतुर्थेश व दूध येण्याच्या क्रियेवर अंमल असणार ग्रह चंद्र हे महत्वाचे ठरतात. चंद्र हा वृषभ राशीत ०३ अंशावर परमोच्च असतो व वृश्चिक ०३ अंशावर परमनीच होतो. कुंडलीत रोगाचे विश्लेषण करताना ६, ८, १२ ह्या तीन स्थानाबरोबर ११ वे स्थान ( षष्ठाचे षष्ठ ) व तुतीय स्थान ( अष्टमाचे अष्टम ) ह्या नाशक स्थानांचा विचार करणे जरुरेचे आहे. तसेच रवि कुंडलीचाही अभ्यास फ़ायदेशीर ठरतो.

शनि मंगळ राहूबरोबर त्रिक स्थानांचे अधिपती (Malgnant) कर्करोगाच्या वाढीला जबाबदार आहेत. तसेच वृध्दिचा कारक गुरु पण ह्यांना मदत करतोच. कर्केचा गुरु हा जर अशुभ स्थानी, अशुभ ग्रह योगात असला तर गाठीची वाढ होते.

शनि हा नैसर्गिक पापग्रह असून तो विलंबी रेंगाळणारे आजार देतो. जितका शनि अनिष्ठ असतो, तितके दु:ख जास्त असते. अडथळे आणणारा व गुप्तता पाळणारा ग्रह असल्याने रोगाचे प्राथमिक अवस्थेत निदान होऊ शकत नाही. तो हा शनि षष्ठाचा गौण कारक व अष्टम व्ययाचा कारक ग्रह आहे.

मंगळ हा रक्ताचा, मांसाचा कारक असून पत्रिकेत ज्या राशीवर, स्थानावर शनि, मंगळाच्या दृष्टीचा एकत्रिक परिणाम होतो. त्या ग्रह भाव निर्देशित अवयवावर अशा प्रकारचा विकार होण्याची शक्यता असते. चंद्र हा स्तनांचा कारक ग्रह व वृध्दिचा कारक गुरु हा जर अशुभ स्थितीत अशुभ ग्रंहाच्या स्वामीबरोबर असेल तर गाठीची वाढ होते. ( स्त्रीयाच्या पत्रिकेत केंद्रस्थानात चंद्र असल्यास त्याचे स्थन सुंदर असतात. )

राहू हा तर सर्व प्रकारच्या घातक आजारांचा कारक आहे. जेव्हा तो पापग्रहांच्या युतीत किंवा त्रिक स्थानेशांच्या युतीत असतो तेव्हा तो खुप खतरनाक ठरतो.

चंद्र, बुध, शुक्र ह्यापैकी कोणताही एक ग्रह दूषित असता किंवा गुरु दूषित असता व चारही शुभ ग्रहांशी राहू संबधित असल्यास किंवा चारही अशुभ योग होत असल्यास कफ़, खोकला होऊन स्तनांचा कर्करोग होतो.

प्रश्न कुंडलीत प्रश्न समयी राशी स्वामी चंद्र हा रुलिंग मध्ये आहे. कर्क राशीमध्ये चंद्र असेल तर आरोग्य उत्तम असते. कर्क चंद्राच्या स्त्रीया निरोगी, आकर्षक असतात. चंद्र स्वगृही असतो. कर्क राशीत चंद्र क्षीण बळी नसेल तर अशी स्त्री सुदृढ असते. तिचे वक्ष:स्थळ उन्नत असते. ह्या स्त्रीया नेहमी वयापेक्षा लहान दिसतात. परंतु कर्केच्या चंद्रावर मंगळ शनि रवि यांची अशुभ दृष्टी किंवा युती असेल तर पचनक्रिया व अपचनासंबधी तक्रारी असतात. पण प्रश्न कुंडलीत चंद्र कर्कराशीत मंगळा बरोबर बसला आहे. वरील दिल्या प्रमाणे मंगळ हा ग्रह रक्ताचा मासाचा कारक आहे.

आरोग्य सुधारणा साठी मी प्रथम षष्ठ स्थान बघितले त्यात्य तुळारास होती तुळा राशीचा शुक्र LSRD मध्ये कार्यरत होता तुळेचा शुक्र हा पंचमात किंवा लाभात, महादशेत, अंतर्दशेत आणि विदेशा कार्यरत नव्हता म्हणजे आरोग्य सुधारण्याचे संकेत नाहीत.

चंद्र बुध शुक्र यापैकी कोणताही एक ग्रह दूषित असला किंवा गुरु दूषित असला व या चारही शुभ ग्रंहाशी संबंधित राहू असला किंवा चारही अशुभ योग होत असता कफ़, खोकला होऊन स्तनाचा कर्करोग होतो हा अंदाज सहसा चुकणार नाही.

त्याच प्रमाणे जातकाच्या प्रश्न कुंडलीत LSRD मधिल चंद्र हा ग्रह मंगळाच्या सानिध्यात आहे. म्हणजे निश्चित जातकास वरिल पैकी एका रोगाचा त्रास होणार हे निश्चित आहे.

कर्क राशीतील मंगळ हा आश्लेषा नक्षत्रात (३) चरणात आहे. त्यामुळे स्तनाच्या विषयी रोगाकडे लक्षवेधत आहे. जल राशीत अग्नि ग्रह म्हणजे काहीतरी निश्चित निर्देशित करणार त्या प्रमाणे जातकाच्या पत्नी ला स्तन: कर्करोग झाला व तो प्राथमिक अवस्थेत आहे. व त्याचे वैद्यकीय उपचार सध्या सुरु आहेत. जातक चत्मकारीक रित्या चमकले कारण त्याला ही अपेक्षा माझ्या जवळून नव्हती.

LSRD मध्ये जातकाला गुरुची विशोत्तती दशा सुरु होती, अंतर्दशा राहुची सुरु आहे. गुरु राहू हा एक विचित्र योग आहे. प्रश्न कुंडलीत गुरु हा मीन राशीत पू.भाद्रपदा (४) चरणा मध्ये हर्षल बरोबर आहे. तो पंचमात पाहात आहे, पंचमात शनि विराज मान आहे, पंचमातील शनिच्या राशी नवमात व दशमात आहे. जाकाची गुरुची दशा २२ मे रोजी संपत आहे. नतंर शनिची दशा सुरु होत आहे. शनिच्या दशेत जातकास योग्य उपचार मिळतील त्याच वेळी एखादी शस्त्र क्रिया होऊन जातक काय स्वरुपी बरा होणार या आशेवर पुन्हा आपल्या संसारात रममान होईल पण शनि विलबंकारक तो थोडाच स्वत बसणार आहे तो आपला इंगा दाखवणारच.