बुधवार, ११ ऑगस्ट, २०१०

रंगामुळे आपल्या भाववृत्तीवर काही निश्र्चित असा परिणाम होत असतो असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अर्थात तसं का नि कसं घडतं हे मात्र विज्ञानास सांगता आलेल नाही. रंगाचा प्रभाव व्यक्तिगणिक वेगवेगळा होऊ शकतो. त्यामुळेच काही निश्र्चित असे नियम ह्याबाबतीत सांगता येत नाहीत. व्यक्ति तितक्या प्रकृती म्हणतात त्याप्रमाणे रंगाच्या प्रभावाबाबतही म्हणता येईल. विविध मानवसमूहात विशिष्ट प्रकारच्या रंगाची वस्त्रप्रमाणे वापरण्याचा सांस्कृतिक लळा जपलेला असतो, हे आपण बघत असतो. शिवाय व्यक्तिगत अनुभव आणि आवडीनुसार जो तो आपल्याला हव्या त्या रंगाचे कपडे वापरत असताना दिसून येतो. तुम्हाला आवडणारा भडक रंग कदाचित तुमच्या घराशेजारच्या काका-काकूंचा उच्चरक्तदाब आणखी उत्तेजित करणारा ठरु शकतो. तुमचे भडक कपडे पाहून काहीजण नक्कीच नाक मुरडणार! कारण हा ज्याच्या त्याच्या पसंतीचा मामला आहे. नापसंती दर्शविण्यासाठी मग प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया होऊ शकतात वा प्रतिक्रिया प्रकट झाल्या नाहीत तरी त्याचा अर्थ तुमच्या आवडीचे रंग सगळ्यानाच आवडतील अस मात्र नाही!

एका पाहणीत रंगाच्या प्रभावाबाबत अस आढळून आल आहे की लोक रंगाबाबत धनात्मक किंवा ऋणात्मक प्रतिक्रिया जरुर बाळगतात. हे सूक्ष्म अवलोकन असल तरी ते सत्यधिष्ठत आहे एवढ मात्र खर!

आणाखी एक पाहणीत शिक्षित मुलांची प्रतिक्रिया बघण्यत आली :- स्वच्छंदी आणि प्रसन्न मुलांना पिवळा रंग पसंत होता तर तपकिरी रंग मनाची उदासी आणि खिन्नता ह्यात बुडालेल्या मुलांना प्रिय होता असं दिसून आलं. अर्थात रंगाचे हे भावनात्मक विश्लेषण तस वैश्विक सिध्दांत स्वरुप मानता यायचं नाही! कारण तसा सर्वसमावेशक असा अभ्यास आणि तदनंतरचा निष्कर्ष उपलब्ध नाही. एवढं मात्र खंर की अगदी लहान वयाच्या मुलांनासुध्दा विशिष्ट प्रकारचे रंग आवडत असतात आणि त्या रंगांचा त्यांच्या दृष्टीकोनावर प्रभाव पडत असतो. तसंच त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या घडणीतही त्याच सुयोग्य असं योगदान असते हे मान्य करावयास हव.

अगदी लहान बालकांच्या पाहणीत अस आढळून आल आहे की, त्यांना अगदी शुध्द रंगाची खेळणी प्रिय असतात. निळा, लाल रंग त्यांना आवडत असतो. पाढर्या खडूपेक्षा रंगीत खडूचं त्यांना अधिक आकर्षण असतं, कंपासपेटी, रंगपेटीवरील रंग आणि चित्र ह्यांची विविध रंगसंगती आणि आकार त्यांना भावत असतात.

कारखान्यातून सुध्दा भिंतीना कोणता रंग असावा म्हणजे कामगारांचा उत्साह आणि कार्यकुशलता प्रभावीपणे कार्यतर राहून उत्पादन वाढेल, ह्यासाठी पाहणी करुन जरुर ते प्रयोग अमंलात आणले जातात. कारण कारखान्यातले वातावरण कामगारांच्या चित्तवृत्तींना प्रफुल्लित ठेवू शकले तर त्याचा परिणाम कारखान्यातील माल उत्पादनावर निश्चितच होत असतो. कामगार मन लावून काम करु लागले तर गुणसंख्यात्मकदृष्ट्या उत्पादनावर चांगला परिणाम घडून येत असतो. ह्याबाबतीत व्यवस्थापन अलिकडे जागरुक झाल्याचे दिसून येत आहे.

रंगाबाबतचे हे भावनात्मक विश्लेषण केवळ कपड्यांपुरतेच किंवा घराच्या कारखान्याच्या भिंतीच्या विशिष्ट प्रकारच्या रंगांचे अस्तित्व आणि त्यांचा प्रभाग ह्यापुरतंच मर्यादित राहिलेल नसून खाद्यपदार्थ आणि त्याचे पॅकिंग, वेस्टन वगैरे मोटर, स्कुटर, हातबॅगा, खांद्याला अडकवायच्या बॅगा, धुलाईयंत्र, पंखे, शीतपेट्या, घरातील फर्निचर, गाद्या, उशा,अभ्रे, पडदे, अगदी पेन-पेन्सिलीसुध्दा ह्यांच्या रंगाच्या निवडीबाबत उत्पादकांप्रमाणॅच ग्राहकांचे सुध्दा मानसशास्त्र निगडीत असल्याने मागणीप्रमाणे पुरवठा होत असतो, हे बाजारातील विविध प्रकारचे रंग परिधान केलेले पदार्थ-वस्तू पाहून कळून येते.

निसर्गामध्ये इतके विविध रंग आहेत की ते पाहून त्यांच सृजन करणार्या शक्तीच कौतुक वाटू लागते. विविध रंगाची फुले, फळे, लतावेली, वृक्ष, पान, आकाश, पर्वतराजी, नद्या, तळी, सागरकिनारे, चमकणारी किनार्यावरची वाळू,चांदणे किती अमर्याद आणि शास्वत स्वरुपाचे हे रंगीबेरंगी वैविध्य! एकीकडे निसर्गात अशी रंगाची विविधतापूर्ण रुप तर माणसाने आपल्या सौदर्यतृष्णेकरिता रंगाचे आपले असे विविधतेचे आगळेवेगळे अस विश्व निर्माण केले आहे ती केवळ एक निर्मितीच आहे अस नसू़न सुंदरतेने नटलेले गोड-आनंददायी सृजनचं आहे.

आज रंगाचा जणू एक अविभाज्य असा प्रभाव एकूणच समाजावर पडलेला दिसून येतो आहे. आश्चर्य वाटाव इतक्या प्रमाणात समाजातील विविध क्षेत्रात अगदी घरापासून, सरकारी विश्रामगृह ते पंचतारांकीत हॉटेल्स आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत तद्वतच अतिपूर्वेकडील देशांपासून ते अतिपश्चिमेकडील देशातील समाजात सुध्दा रंगाचा वापर विपुलतेने आणि आपापल्या मगदुराप्रमाणे आणि अभिरुचीप्रमाणे रंगाची निवड आणि वापर करण्यात येतो. रंगाद्वारे आपल्या संस्कृतीचच जणू दर्शन घडून येत असत तर व्यक्तिगत पातळीवर रंगसंगतीचा माणसाच्या चरित्र-चित्रणाच्या आणि त्याच्या स्वभावाचा अन्योय असा संबंध असतो. संतशिरोमणी जगद्दगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात

" पडिले वळण इंद्रिया सकळा भाव तो निराळा | नाही दूजा ||"

तर आपल्या जणू हे अंगवळणी पडून गेलेलं असत की विशिष्ट प्रकारचे रंग आपणास प्रिय असतात. त्याच्या दर्शनाने मनास आल्हाद वाटतो तर काही रंग स्वाभाविकपणेच अप्रिय असतात. आता ते तसे का अप्रिय असतात? ह्यामागे मानसशास्त्रीय काही उपत्ती जरुर असते. पण एवढ मात्र खर की ते फक्त व्यक्तिसापेक्षा असत. एकाला एक रंग प्रिय असेल त्र तोच रंग दुसर्यास अप्रिय असू शकतो.

गोर्या गोमट्या देहाच्या व्यक्ति जेव्हा भडक रंगाची वस्त्रे परिधान करतात तेव्हा ती त्यांना शोभूनही दिसतात पण कुणी जेव्हा कोळशासारख्या रंगाची वस्त्र वापरतो तेव्हा ते काय सुख देत असेल बघणार्यांनी ठरवायच! कारण मानसशास्त्रीयदृष्ट्या काळा रंग हा शोक, वितरागित किंवा मानसिक विद्रोह दर्शक असतो. त्यामुळे धार्मिक कार्यात, अनुष्ठानत काळ्या रंगाला अजिबात स्थान नाही. अर्थात त्यातही ज्या व्यक्तिंना काळ्या रंगाची मनातूनच आवड असेल त्यांचा स्वभाव विद्रोही, दृढनिश्चयी असतो असे मानसशास्त्रीय संशोधन सांगत. रुढी आणि परंपरा तोडून फोडून टाकायला हव्यात असा त्यांचा स्वभावधर्म असतो. अर्थात ह्या रंगाच आणखीही एक वैशिष्ट्य आहे की, ह्या रंगाद्वारे गुप्तता आणिअ व्यक्तिगत पातळीवरची रहस्य गोडी दिसून येते.

रंग आणि वृत्ती

पिवळा रंग हा सपन्न व्यक्तिमत्व, अध्यात्मात आवड, प्रगतीचा ओढा असण हे गुण दर्शवितो. आपलयाकडे धार्मिक समारंभामध्ये पिवळ्या रंगाच महत्त्व अनन्यसाधारण अस आहे. हा रंग ज्यांना आवडातो त्यांची बुध्दी कुशाग्र असून त्यांची स्मरणशक्ती सुध्दा तीक्ष्ण असते ते वैयक्तिरित्या कष्टाळू आणि प्रामाणिक असतात. जे अजून प्राप्त झाल नाही, त्याची प्रतीक्षा करण्याची संयमीवृत्ती ह्य रंगाने लाभते. महा-तणाव आणि ह्र्दयरोग ह्याबाबतीत ज्यांना चिंता असेल त्यांना अगदी प्रेमपूर्वक ह्या रंगाशी आपली गट्टी जमवायला हवी. काही कालावधीत आपला आपणच अनुभव घ्यावा. ज्याची हाडे आणि सांधे दुखत असतील त्यांनासुध्दा त्यामुळे लाभ होतो, असे अनुभवांती सांगण्यात आल आहे.

निळा रंग हा शांतीचा निदर्शक आहे. शीतलता आणि स्निग्धता हे ह्यारंगाच वैशिष्ट्य आहे. ह्या रंगात सागर आणि आकाशाची अमर्यादा खोली ह्यांची अनुभूती मिळते ( हा रंग स्वयपाक घर / किचन मध्ये वापरणे टाळावे ) हा रंग ज्यांना प्रिय असतो ती माणस स्वभावाने उदार, विश्वासू, श्रद्घाळू, सौदर्यप्रेमी आणि सुखी जीवन व्यतीत करणारी असतात. अशा व्यक्तीना कुठल्या नको त्या झंझाटात पडायची इच्छा नसते. आपण बरं की आपल घरदार बर असा ह्यांचा स्वभाव असतो. वातविकारांच्या लोकांसाठी हा रंग लाभदायक ठरु शकतो.

लाल रंग हा सर्वात आकर्षक मानला जातो. शौर्य, संघर्ष, उत्तेजना, कामवासना, आवेग आणि उत्साह ह्या भावांच दर्शन ह्या रंगाद्वारे होते. विशेष करुन लग्न सभारंभामध्ये वधू-वराचे जोडेसुध्दा लाल रंगाचे वापरायची परंपरा काही समाजसमूहात आढळून येते, हेही कामोत्तेजकतेचेच निर्देशक असते. ह्या रंगातच मुळी एक प्राकारची ऊब असते, रक्तदाब, सर्दि, खोकला ह्या विकारांसाठी हा रंग उपयोगी सिद्ध झाला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ती व्यक्ति जीवनातल्या दरेक क्षेत्रात महत्त्वाकांक्षी असते. अतिउत्साह आणि उत्तेजितता हे ह्या रंगाचे वैशिष्ट्य आहे. त्याचप्रमाणे आदिम हिंसक प्रवृत्तीचेही निदर्शक आहे.

हिरवा रंग एकांताचा निदर्शक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू, अस्थिर चित्ताचीए आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रित राहणारी आणि तरीही बुद्धिप्रामण्यवादी असतात. त्याचप्रमांणे प्रदर्शनप्रियताही त्यांच्यापाशी असते हिरव्या रंगाच्या दर्शनाने डोळ्यांना शीतलता प्राप्त होत असते. म्हणून सकाळी हिरवेगार वृक्ष, लतावेली किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळ मनसोक्त पाहण्याने डोळ्यातील सूक्ष्म वाहिन्यांना शीतलता प्राप्त होते. ज्यांना फुफ्फुसाचे आजार असतील, श्वासाचा त्रास असेल, गळ्याची कंठाची-घशाची समस्या असेल त्यांना हिरवा रंग मानसशास्त्रीयदृष्ट्या लाभप्रद असतो.

पांढर्या रंगाच वैशिष्ट्य हे की, हा रंग पवित्रता आणि सरळपणाचे प्रतिक मानला जातो. खर तर पांढरा रंग हा तसा कुठला पृथक रंग नाहीच मुळी! निळा पिवळा, नारगी, लाल, जांभळा ह्या रंगाच मिश्रण म्हणजे पांढरा रंग! सात विभिन्न रंगाचे मिश्रण मिळूनच सूर्याचा सफेद प्रकाश बनला आहे. हा रंग ज्यांना प्रिय असतो ते लोक शांत सरळ आणि स्पष्टमतवादी असतात आणि हे अस असल तरी धूर्त,चालाख, लांड्यालबाड्यात पटाईत असलेली माणस मात्र अगदी बगळ्यासारखी सफेद वस्त्र घालून मिरवत असताना बघून श्री. बा. भ. बोरकर यांच्या "आनंदभैरवी" या काव्यसंग्रहातील एका कवितेतील काव्यपंक्तीची आठवण अवश्य होते.

थेटर आमुचे झाले देऊळ
मकानामध्ये दुकान आले
आणि मिरविते शील आमुचे
पांढर्यात गुंडाळूनी काळे

अर्थात बबोरकरांच्या ह्या काव्यपंक्तीचा संदर्भ थोडा वेगळा असला तरी त्याद्वारे सुद्धा मानवी स्वभावाचेच दर्शन घडते. अशा प्रकारे विविध रंग आणि मानवी स्वभावाची विविधता एकमेकांस पूरकषटविकारांच दर्शन घडविणारी असतात. म्हणून ज्योतिषशास्त्रात व वास्तूशास्त्रात रंगाला व रंग संगतीला फ़ार महत्व आहे. जर का आपण वास्तूमध्ये चूकीचे रंग वापरले तर ते आपल्या रोजच्या जीवणावर परिणाम करतात. त्यामुळे वाचकानी आपल्या घराला /वास्तूला रंग देताना ह्या गोष्टीचा फ़ार विचार करावा.

संजीव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: