रविवार, १५ जानेवारी, २०१२

Love marriage with Astrology


 
Love marriage with Astrology 

 
          प्रेम ( LOVE ) या अडीच अक्षरी शब्दाची ताकद प्रंचड आहे.  प्रेम अनुभण्याजोगाच प्रकार आहे. प्रेमी माणसाला प्रेमापुढे सर्व झाघा तुच्छ वाटते. प्रेम आंधळे असते असे उगीच म्हणत नाहीत. प्रेमा खेरीज पंचमस्थाना वरुन संतती, कोणत्या खेळात प्राविण्य मिळवेल का? कला क्षेत्रात नावलौकिक होईल का? लाँटरी लागेल का? उच्च शिक्षण मिळेल का? याचाही बोध होतो.

 
            पंचमस्थानावरुन  प्रेमविवाह बघताना ( SIX HOUSE ) साव्याघराचा ही विचार केला पाहिजे. पंचम स्थान मधिल शुक्रहा ग्रह वृत्तीने कोमल तरुण मनाचा, रसीक, उत्साही, भावना जपणारा व परालिंगी आकर्षण दाखविणारा आहे. एखाद्याचे परालिंगी माणसाशी वागणे कसे असेल, त्याची भावना काय असेल तसेच तो जातक प्रेमाचा पुजारी असेल की शिकारी, हे शुक्र ग्रह कुंडलीत कसा बसला आहे. ह्यावरुन समजते. तसेच प्रेमाच्या व्यापारात तो कोणते डावपेच खेळेल हेही शुक्रावरुन सांगता येते. तसेच ह्या सर्व गोष्टी पंचस्थानावरुन समजून येतात. येथील पापग्रह फ़सवणूक करतात, धोका देतात.

  
          पंचम स्थानावरुन प्रत्यक्ष प्रेमाची स्वभाव, रंगरुप, व्यक्तिमत्व, राहाणी याबद्द्ल काही सांगता येत. पण एखादी व्यक्ती चार पाच जणांशी प्रेमाचे लपंडाच खेळेल, पण विवाह त्यातील एखाद्याशी अगर व्यक्तीलासोडून इतराशी होऊ शकेल किंवा विवाह होणारही नाही प्र्त्येक प्रेमाची परिणीती विवाहात होते असे थोडेच आहे? असे जत असते तर कुणाला “विसर सर्व घडलेले, विसर तू मलाही, मी तुझी कुणी नव्हते आणि कुणी नाही” असे म्हणण्याची वेळ आली नसती.

  
          ज्यांच्या पत्रिकेत पंचमस्थानाचा संबंध व्दितीय व सप्तम व लाभ स्थानाशी होतो, त्याच्यां बाबतीत प्रेमविवाह होण्याची जास्त शक्यता असते. प्रेमविवाह होण्याची काही ठळक योग खाली दिलेले आहेत तसेच अधिक माहिती साठी ( श्री सुहास डोंगरे लिखीत “आपले नशीब – आपले ग्रहयोग” हे पुस्तक वाचावे ).

 
 •         पंचम स्थानाचा स्वामी सप्तमात व सप्तम स्थानाचा स्वामी पंचमात
 •         पंचमेश व सप्तमेश व्दितीय किंवा पंचम किंवा सप्तम किंवा लाभ स्थानात एकत्र.
 •         पंचमेशाची सप्तम स्थानावर दृष्टी व सप्तमेशाची पंचमस्थानावर दृष्टी.
 •         पंचमेश व सप्तमेश एकाच ग्रहाच्या दृष्टीत.
 •         गुरु-शुक्र-नेपचून नवपंचम व शुक्रे-शनी युती अथवा समसप्तक.
 •         शुक्र-मंगळ शनि-नेपचून समोरा समोर.

  

 •             कृष्ण्मूर्ति पद्धतीत पंचमस्थानाचा उपनक्षत्र स्वामीच्या व्दितीय पंचम, सप्तम व एकादश स्थानाशी संबध असणे असे उद्दगार नेहमी धोंडपत आपटे त्यांच्या लिहण्यात करत असतात अधिक माहिती साठी त्यांचा BOLG पाहण्याची विनंती http://dhondopant.blogspot.com/
 
  

प्रेमविवाहास उशीर ( Time consuming Love Marriage )

  

      ज्यांच्या पत्रिकेत चंद्र-शनि युती किंवा समोरा समोर असतात, चंद्र शनिच्या नक्षत्रात व शनि चंद्राच्या नक्षत्रात त्याच प्रमाणे सप्तम स्थानात शनि-मंगळ-हर्षल सारखे ग्रह असल्यास विवाहाची तारीख अकल्पित कारणा मुळे लांबणीवर पडते. विवाहात नाना प्रकारचे विघ्ने अचानक उभी राहातात.

 
  

प्रेमविवाह नंतर अपयश (  Un-successful Love Marriage )

 
  

      सप्तमस्थाना पेक्षा सष्ठस्थान पापग्रहाच्या प्रभावामुळे बलवाण असल्यास तसेच शुक्रग्रहावर पापग्रहाचा अमंल असल्यास प्रेमविवाहाची चकाकी अल्पावधित निघुन जाते. व कटूसत्याला सामोरी जावे लागते. जर का सष्ठस्थानात शनि असेल तर विवाह होऊन सुधा फ़ारकाळ टिकून राहात नाही.

 
      त्याचप्रमाणॆ ज्यांच्या चर्थुतस्थानात शनि-मंगळ, शनि-रवि, चंद्र-शनि अशा प्रकारच्या युत्या असतात त्यांना वैवाहिक सौख्य अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. जोडीदाराचा मृत्यु, जोडीदाराचा वियोग, जोडीदाराची शारिरिक अथवा मानसिक दुरबलता ही त्यातील काही प्रमुख कारणे.

 
  

विजोड जोडी ( Un-match couple’s )

 
  

       सप्तमस्थानाशी शनिचा संबध असल्यास पती-पत्नी मध्ये रंग, रुप, आकार, वय, शिक्षण, राहाणी व स्वभाव हा मुख्यता फ़रक आढळतो. प्रवासात, पत्राव्दारे, दुराध्वनीव्दारे सहवासामुळे ज्यांप्रेम जमते त्यांच्या पत्रिकेत तृतीयस्थानाचा पंचम स्थानाशी संबध असतो. केवळ शारीरीक आकर्षणामुळे जे एकत्र येतात व प्रेमात पडतात त्यांच्या पत्रिकेत पुरुषाच्या बाबतीत शुक्र वक्री व स्त्रीयांच्या बाबतीत मंगळ बिघडलेला असतो.  ( LOVE AT FIRST SIGHT )किंवा प्रथम दर्शनी जे प्रेमात पडतात त्यांच्या पत्रिकेत शुक्राचा हर्षल किंवा नेपचूशी संबध असतो.

  

      ज्याच्या पत्रिकेत पंचमस्थानाचा दशमस्थानाशी संबध येतो त्याचा जोडीदार व्यवसायिक वर्तृळातील असतो. पंचमस्थानाशी संबध असणा-या शुक्रामुळे प्रेमविवाहस विरोध होत नाही.

 
      विरोध होण्यासाठी असणारी प्रमुख कारणे, म्हणजे जातीमधील, राहाणीमधील भिन्नता, तसेच दोघांची भिन्नपातळी वय, बीजवर वगैरे. सप्तम व तृतीयस्थानात राहू केतू हर्षल नेपचून सारखे पापग्रह असल्यास विरोधाला तोडद्यावे लागते. आणि गुरु बिघडला असल्यास नैतिक अध:पतन होऊन विवाह होतो. तसेच गुरु व शिष्य किंवा आदरणीय व्यक्ती व दुर्लक्षित व्यक्ती ह्यांच्यात खळबळजणक प्रेम विवाह होतो.

 
अनेक प्रेमविवाह ( another marriage’s )

 
     सप्तमस्थानात मिथुन, कन्या, धनु, मीन रास असून सप्तमेशही व्दिस्वभाव राशीत बुधाबरोबर असल्यास एका पेक्षा जास्त प्रेम विवाह होतात. शुक्र-मंगळ वक्रि असने हे महत्वाचे असते.

 
परस्पर आकर्षण ( Physical Attraction )

 
     पुरुषाच्या पत्रिकेतील शुक्र व स्त्रीपत्रिकेतील मंगळ ह्याच्या मध्ये साम्य आढळल्यास ते दोघेही आपोआप एकमेकाकडे ओढले जातात. ह्याग्रहाच्या जोडीला चंद्र असल्यास मानसिक, हर्षल असल्यास वैचित्र्यामुळे रवि असल्यास आकस्मिक, तर नेपच्युन असल्यास अनाकलनीय कारण असते. वरवर पाहाता हे समजणे केवळ कठिण असते. काही वेळेला पूर्वजन्माच्या दुव्यामुळे ते दोघे एकत्र चाललेले असतात.
 
 •   प्रेमविवाह होण्यासाठी पत्रिकेत खालील योग असावे लागतात. 
 
 ( As per Astrology following Plant’s conditions are required for Love marriage )

  
 •   पंचमेश सप्तमात व सप्तमेष पंचमात
 •   पंचमेश व सप्तमेश यांची युती किंवा प्रतियोग.
 •   पंचमेश व सप्तमेश व भाग्येष याची एकमेकाशी संबध.
 •   शनि-शुक्र क्रेंद्रयोग व शनिच्या दशमात शुक्र.
 •   चंद्र-गुरु नवपंचम किंवा गज केसरी योग.
 •   शुक्र-हर्षल युती किंवा प्रतीयोग किंवा शुक्र नेपच्यून संबध.
 •   शुक्र-रवि युती
 •   शुक्र-मंगळ युती किंवा प्रतीयोग.
 •   मकरेचा शुक्र शनिच्या नजरेत.
 •   भाग्यस्थानाचा नैसर्गिक पापग्रहाशी संबध.
 •   मकरेचा शुक्र रविने व शनिने संबधित असता अनैतिक संबध दाखवितो.
   

     विवाहकाळा ठरविण्यासाठी गुरु व शुक्र या मातबर ग्रहाची मद्दतघ्यावी लागते. गुरुवरुन वर्ष, मंगळावरुण साधारण महिना, व रवि शुक्रावरुन निश्चित काळ ठरविता येतो. तथापी विवाह निश्चित पणे कधीहोणार व कोणाशी होणार हे ठामपणे वर्तविने सोपे नाही. त्यासाठी अभ्यासू व अनुभवि ज्योतिषि हवा.
विवाह काळाचे काही नियम
 • गोचर गुरुची मुळचा चंद्र शुक्रावर नजर ( गुरु सर्वसाधारण सर्व ( १२ राशी ) राशी फ़िरण्यास १३ महिने घेत असतो.)
 • गोचर गुरुचे एक दोन पाच सात नऊ व अकरा स्थानात भ्रमण.
 • गोचर राहूचे मुळच्या चंद्र,शुक्र वरुण भ्रमण.
 • सप्ततेसशाशी गोचर गुरुचे योग.
 • शुक्रावंर गोचर शनिची नजर.
 
( महत्वाचा मुद्द म्हणजे शनि-मंगळ युती किंवा सष्टमस्थानात शनी असल्यास प्रेम विवाह किंवा लग्न करताना सावधान राहीले पाहिजे )