मंगळवार, १७ ऑगस्ट, २०१०

द्वादश लग्नानुसार धनहानी आणि कर्जबाजारी योग

महेंद्र नी म्हटले...
तुमचे भविषय एकदम चूकिचे आहे. नुसते लग्न पाहून कसे काय तुम्ही भविष्य सांगु शकता?
मेष लग्नाला लग्नेश जर अष्टमात असेल तर कर्जबाजारी होतो असे तुमचे म्हणणे पुर्ण चुक आहे. माझ्या पत्रीकेत तोच योग आहे पण अजूनही म्हणजे पन्नास वर्ष झाली तरीही कर्जबाजारी झालेलो नाही, तुमच्या भविष्या प्रमाणे!
असो..

माझ्या पत्रिकेत शुक्र बुध निच भंग योग करतात तरीही कर्जबाजारी नाही मी..
कृपया असे ठोकताळे लिहून लोकांना घावरवून टाकु नका.
१५ ऑगस्ट २०१० ५-२५ pm

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग नी म्हटले...
महेंद्रजी नमस्कार

धन्यवाद. तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
कृपया जन्मतारीख वेळ व जन्म ठिकाण दिल्या उत्तम
बघतो माझे कुठेचुकले ते?

आपला संजीव
१५ ऑगस्ट २०१० ८-५५ pm


महेंद्र नी म्हटले...
माझी पत्रीका अशी आहे. मेष लग्न, चंद्र वृषभेचा, मिथुन मंगळ पराक्रमात, सुख स्थान रिकामे, पंचमात रवी आणि राहू, शष्ठात शुक्र बुध - निचभंग योगात, सप्तमात काही नाही, अष्टमात काही नाही, भाग्यात गुरु आणि शनी .दशमात काही नाही, एकादशात केतू, आणि व्ययस्थान रिकामे.

नुकतीच साडेसाती आटोपली शनीची. मला अतीशय उत्तम गेला तो काळ. तसेच राहूची महादशा पण फारच छान गेली. गुरु महादशा तर उत्त्तमच गेली कारण भाग्येश गुरु आहे म्हणुन. वेळ आणि तारीख लवकरच कळवतो तुम्हाला अभ्यासासाठी. सध्या आठवत नाही.
पण एक आहे, चर राशी केंद्रात ( १,४,७.१०,) आणि केंद्र स्थान रिकामे अशी पत्रिका आहे माझी.
१६ ऑगस्ट २०१० ११-४६ am

essbeev नी म्हटले...
या फलादेशाच्या निर्णयात दशांचा विचार करावा लागत नाही काय ??
१६ ऑगस्ट २०१० १-३० pm


महेंद्र नी म्हटले...
आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही.
१६ ऑगस्ट २०१० २-१७ pm

आणि हो.. जन्म आहे रोहिणी नक्षत्र दूसरे चरण. १२ सप्टेंबर १९६० रात्री बहुतेक साडेआठची वेळ असावी.. नक्की आठवत नाही......


सर्वतोभद्रचक्राच्या गाभार्यातून रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण........


रोहीणी नक्षत्राचे द्वितीय चरण ( भाग्यांश ) वृषभ राशीच्या १३ अंश २० कलानंतर १६ अंश ४० कलापर्यंतचा विभाग वृषभ राशीचा पाचवा नवमांस अर्थात रोहिणीचा द्वितीय चरण, वृषभ नवमांश म्हणजे वर्गोत्तम नवमांश होय. शुक्राचा स्वनवमांश असल्यामुळे या चरणांत शुक्र उत्तम फले देतो. या चरणातील कोणताही ग्रह केंद्रस्थानात ( १,४,७,१० या स्थानात ) फल देण्याच्या दृष्टीने बलवान असतो. रोहिणी द्वितीय चरणातील कोणताही ग्रह ( गोचरीचा सुध्दा ) हा वर्गोत्तम असल्यामुळे तो शुभ फले देण्यास प्रवृत्त होतो व तो आपल्या विशोत्तरी मानाने महादशेत फले देतो. लग्नी रोहिणी नक्षत्र द्वितीय चरण नक्षत्रचरणाधिपती शुक्र तेथेच असता, किंवा तो कुंडलीत ४,७,१० या स्थानात स्वराशी नवमांशात असता तनुभावाची फले चांगली देईल. इतर स्थानात रोहिणीचा द्वितीय चरण असता व तेथे शुक्र असता स्थानजन्य फले शुभ देईल. परंतु विशेषत दोन, पाच नऊ या स्थानात असला तर अधिक चांगले इतर शुभग्रहही या चरणात वरील स्थानात शुभ फलेच देतील, परंतु ती मध्यम प्रमाणात मिळतील. बिघडलेला कोणताही ग्रह शुभ फल देण्यास असमर्थ होतो वा शुभ फले मिळण्यात अडथळे निर्माण होतात.

एकाच स्थानात राशीचे ३० अंश पूर्ण असणे असंभवीय आहे. त्याचप्रमाणे राशीत असलेला ग्रह कोणात्या अंश कलावर आहे, त्याचप्रमाणे तो ग्रह कोणात्या भावांत स्थित आहे ठरवावे लागते.

स्थूल कुंडलीत एका स्थानात मांडलेले ग्रह त्याच्या राशी-अंश कलांच्या पायावर मागच्या किंवा पुढच्या भावात स्थित असतो. उदा. षष्ठ भावाम्ध्य मेषेच्या ०७ अंशावर आहे व गुरु मेषेच्या २९ अंशावर आहे अशा वेळेला स्थूल कुंडलीत षष्ठ स्थानात मांडलेला गुरु भावचलीत कुंडलीत सप्तमभावात मांडला जाईल. हा गुरु मेषेचाच असतो. वृषभेचा म्हणण्याचे कारण नाही. काही लोक असे म्हणतात की, भावचलीतात तो वृषभेचा झाला. पण हे सर्वस्वी चूक आहे. फल षष्ठ स्थानाचे न मिळता सप्तमस्थानाचे मिळेल हे लक्षात ठेवावे.
क्रांतीवृत्तावर ज्या राशीत नक्षत्रात जो ग्रह असतो तो तेथेच असू द्या, आपल्याला चक्र वदलण्याचे सामर्थ्य नाही. मला विशेष समजते असे सांगण्याचा माझा उद्देश नाही, तर गुरुकुलाने जे आम्हाला, मला सांगितले ते वाचकांच्या समोर ठेवणे हे माझे कर्तव्य आहे. वाचकांनी ते गोड मानून घ्यावे व शंका असल्यास कृपया विचारणा करावी ही विनंती.

दिनांक १२/०९/१९६० रोजीचे पंचाग :- वार सोमवार राशी: वृषभ तिथी:- कृष्ण-७ १४:४८ पर्यंत नंतर अष्टमी योग:- सिद्धि,
करणं:- बालव, साधारण २०:३० मुंबईचे सष्ट ग्रह :-

लग्न मेष ०१:१४:३४, रवि सिंह २६:३१:२१, चंद्र वृषभ २३:०९:२४, मंगळ मिथुन ०२:०७:४१, बुध कन्य ०७:१७:५५,
गुरु धनु ०१:१६:५४, शुक्र कन्य १८:४५:५५, शनि धनुअ १८:३१:२०, राहू सिंह २१:५२:५४, केतू कुंभ, हर्षल कर्क २९:५३:०९
नेप तुला १३:५२:०९, लुप्टो सिंह १३:०३:४०

श्री महेंद्रजी आपणास कुंडलीशास्त्राची माहीती आहे असे मला मनापासून वाटते. असो. मी वरील दिलेली मुंबईचे दिनांक १२/०९/१९६० संध्याकाळी २०:३० चे सष्ट ग्रह आहेत. बघा कुंडली माडून काय जमते काय?

धन्यवाद, तुम्हाला लिहिलेलं आवडतं, आवर्जुन कॉमेंट दिलयाबद्दल आभार.
आपला संजीव

1 टिप्पणी:

महेंद्र म्हणाले...

संजीवजी
मला काही फारशी माहिती नाही, पण माझ्या वडीलांची ही हॉबी आहे. गेली ५५ वर्ष ते पत्रिका पहातात पैसे वगैरे काही न घेता.सकाळपासून लोकं घरी येत असतात पत्रिकेसाठी. त्यांचं वय सध्या ८३-८४ असेल.
त्यांच्यामुळे लहानपणापासून थोडं फार कानावर पडत गेलं आणि आपोआप समजायला पण लागलं.पण त्या क्षेत्रात काही फारसा इंटरेस्ट घेतला नाही आणि आपलं ज्ञान वाढवायचा प्रयत्नही केला नाही.

भावचलीत कुंडली सोबतच नवमांश मांडल्याशिवाय फलं सांगितल्यास त्यात बरीच चूक होण्याची शक्यता असते,तसेच फक्त लग्न कुंडलीवरून पण फलजोतिष्य सांगितल्यास चुकण्याची शक्यता असते, म्हणून वडील नवमांश मांडल्याशिवाय कधीच फलं सांगत नाहीत . तुम्हाला काल कॉमेंट काल देण्याचे कारण एवढेच होते की लोकं घाबरून जातात असं काही वाचल्यावर. तुमचे पोस्ट्स नेहेमीच वाचत असतो मी.

तसं तुमच्या लक्षात आलं असेलच, पराक्रमात लग्नेश मंगळ, आणि शनीच्या समसप्तकात, म्हणजे ऍक्सिडॆंट प्रोन पत्रीका.*( लग्नेश अष्टमाच्या अष्टम स्थानात - म्हणजे धुर्त स्वभाव, मंगळामुळे सडेतोड (क्वचित उध्दटपणॆ) बोलण्याचा स्वभाव- जे मनात तेच बाहेर !) असो..
आवर्जुन दिलेल्या उत्तराकरता मनःपुर्वक आभार.