शनिवार, ३० ऑक्टोबर, २०१०

[ लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली ]

                तुलशी विवाह नंतर अनेक घरातून वधू-वराच्या शोध मोहीमेस सुरुवात होते. पण आजच्या जगात कुंडलीशास्त्राला महत्व न देता, विज्ञानशास्त्राला महत्व देतात. विवाह ही एक नैसर्गिक अशी सामाजिक व धार्मिक बाब आहे असे मानले जाते. हिंदुधर्मशास्त्रात शास्रकारांचे मते धर्माचरणासाठी स्त्री व पुरुष यांनी एकमेकांचा पती-पत्नी या नात्याने केलेला अंगिकार म्हणजे विवाह. सामाजिकदृष्ट्या पाहिले तर रजिस्टर विवाह म्हणजे कायद्याने सुसंगत असलेला स्त्री-पुरुषांचा पती-पत्नी या नात्याचा संबध होय.

                भूतकाळाची विस्मृती आणि भविष्यकाळाचे अज्ञान या दोन शापवत वरदानामुळेच प्रत्येक व्यक्ति वर्तमानकाळात वावरत असते. अशा वेळी तिचे पूर्वसंचित, तिने केलेल्या पापपुण्याचा संचय त्या व्यक्तिवर अंमल करीत असतो आणि वर्तमानकाळ घडवीत असतो. त्याचे श्रेय त्याला उपभोगावयाला मिळत असते. हे झाले सामाइक जीवितासंबधी. पण वंशवृध्दीकरिता पुरुषाला स्त्रीची आवश्यकता आहे. तसेच स्त्रीजन्माचे सार्थक व्हावे म्हणून स्त्री पुरुषाचा अंगिकार करते. हिंदू संस्कृतीनुसार विवाहाचे उद्देश पुढीलप्रमाणे आहेत.

                  १. कुटुंबस्थापना २. शरीरसुख ३. संतानप्राप्ती ४. पारस्पारिक सहयोगी जीवन ५. धर्माचरण

                या कारणास्तव अशा तर्हे ने दोन मनं एकत्र येऊन “शुभ मंगल सावधान” या बोधवाक्याने विवाहबध्द होऊन ते जगापुढे पती-पत्नी या स्वरुपात येतात. कारण त्याचे भूतकाळी घडलेले कर्मफ़ळ हे गुप्त असून या जन्मी उन्मीलित होऊन ते भोगावयास येते. त्यावरच मिळणार्याा सुखात किंवा दु:खात वैवाहिक जीवन समाविष्ट आहे. विवाहसंबंध केवळ विषयभोगाकरिता वा लौकिक व्यवहारकरिता घडत नाहीत तर धर्माचरणाकरिता दोन ह्रदयांचे जे दृढ संमिलन तोच विवाह होय. याकरिता अज्ञानाने केलेले कोणतेच कार्य चांगले नसते हा प्रत्यक्ष नियम आहे. ज्ञान हे सर्व सुखाचे व उन्नतीचे मूळ आहे. म्ह्णून ज्योतिषशास्त्राधारे वधु-वरांच्या पत्रिकेची छाननि करुन विवाह केल्याने वृध्दि होईल.

               कुंडलीतील मंगळदोषामुळे अनेक मुलामुलीची लग्ने अडून राहातात. याचा विचार करुन माझ्या साईटवर मंगळदोषाचे विवेचन व मार्गदर्शन करुन मंगळामुळे येणार्याा अडचणींचे प्रश्न सुटतील व ज्योतिष्य सांगणार्याळ ज्योतिष्याना वधुवराची कुंडली नीट अभ्यासून आपल्या जातकाला योग्य मार्गदर्शन करावे एवढीच स्वामी चरणी प्रार्थना.

                संदर्भ ग्रंथ :- विवाह योग, मंगळ कोश, मंगळाला घाबरु नका, आरोग्य जातक, जातकशिरोमणि, ज्योतिर्मयूरव, आपला योग कधी?, वैवाहिक जीवनात अडथळे आणणारे ग्रहमान, भारतीय फ़ल ज्योतिष, आरोग्य जातक, जन्म कुंडलीवरुन आपले भविष्य आपणच पहा, नवग्रह व त्याची फ़ळे इत्यादि पुस्तकाचा संदर्भासाठी वापर करणार आहे यांची प्रकाशकानी व वाचकानी नोद घ्यावी ही विनंती.

                पत्रिका जमते की न जमते हे कसे पहावे, या गोष्टीकडे आपण आता वळू, बर्याळच काळापासून वधूची पत्रिका घेऊन, ती वराच्या पत्रिकेशी जमते, की नाही, हे पहाण्याचा प्रघात व रुढी पडलेली आहे. पडलेली रुढी मोडण्यास फ़ार त्रास व विरोध होतो. पूर्वी काहीतरी प्रामाणिकपणे पत्रिका पाहिली जात होती. पण, आता तसे घडत नाही. मुलगी चांगली असली की, पत्रिकेत काही दोष असला तरी, पत्रिका जमतेय असे सांगून लग्न ठरविणॆच्या गडबडी सुरु होतात. मुलीचा विवाह कोठे जमत नसेल, तर पालक पत्रिकेत बदल करतात व पत्रिका देतात. अशा स्थितीत विवाह होऊन, पुढे काही अरिष्ट निर्माण झाल्यानंतर आयुष्याचा जो गोधळ उडतो, त्याला पारावार असत नाही. तरी सूज्ञ जनांनी तसे करु नये, थोडी रुढी मोडावी, ती दोघांच्या हितासाठी; ती अशी: वर व वधू पक्षांनी एकमेकांस वर-वधूच्या पत्रिका देऊन त्या एकमेकांशी जुळतात किंवा नाहीत, हे ठरवून मग पुढील वाटाघाटीस लागावे. काहीच न पाहाता योगायोग असेल तसे घडेल, असे म्हणावे हे सर्वात चांगले. ज्या लोकाचा पत्रिकेवर विश्वास नसेल त्यांनी वधूवराची रक्त गटाची नुसती चाचणी न करता त्याची डी.एन.ऐ. चाचणी करावी कारण ह्या चाचणीत सर्वगोष्टीचा उलघडा होऊन पुढील अनर्थ टाळता येतो.

                मंगळाची परिभाषिक माहिती स्वगृहे : मेष व वृश्चिक ( वृश्चिक राशीचे अधिपत्य पाश्चात्य ज्योतिषांनी प्लुटोकडे दिले आहे. )

                मूल त्रिकोण रास :- मेष, मूल त्रिकोण राश्यंश ० ते १२ अंश, स्वराशीचे अंश १३ ते ३० अंश; उंच्च राशी :- मकर उच्चांश २८ अंश ; नीच राशी - कर्क, नीचांश २८ अंश; मध्यम गती २३ कला व ३० विकला दररोज, संख्या - ९, देवता- कर्तिकेय; अधिकार- सेनापती; दर्शकत्व - शारीरिक बल; शरीर वर्ण- तांबूस;गौर वर्ण; शरीरांगर्गत धातू - मज्जा; तत्त्व अग्नी; विषय- नेत्रांनी ग्रहण होणारा व ज्ञान होणारा असा रुपविषय; कर्मेन्द्रिय - हात; ज्ञानेन्द्रिय - नेत्र, त्रिदोषांपैकी दोष - पित्त, त्रिगुणापैकी गुण- तमोगुण, लिंग पुरुष; रंग- लालभडक, द्र्व्य- सुवर्ण; धातू लोखंड.

                निवासस्थान - अग्निस्थान - स्वयंपाकघर; दिशा - दक्षिण; जाती क्षत्रिय; रत्न - पोवळे; रस - कडू, ऋतू - ग्रीष्म, वय - बाल ४ वर्षेपर्यंत; दृष्टी - ऊर्ध्व; उदय - पृष्ठोदय; स्थलकारकत्व- पर्वत, अरण्ये, किल्ले, भाग्योदय वर्ष २८ वे. अनुकूल भाव : तृतीय, षष्ठ, दशम, एकादश. प्रतिकूल भाव : द्वितीय, अष्टम, द्वादश; बाधस्थान : सप्तम स्थान; अनुकूल राशी : मेष, वृषभ, कर्क, वृश्चिक, धनु, मकर व मीन; प्रतिकुल राशी: मिथुन, कन्या, तुला व कुंभ; मित्र ग्रह : रवि, चंद्र, गुरु; शत्रु ग्रह: बुध; सम ग्रह ; शुक्र व शनि. नविन ग्रहाशी शत्रू-मैत्री : हर्शल ( प्रजापती ) मंगळाचा शत्रू, नेपच्यून ( वरुण ) मंगळाशी सम, प्लुटो ( रुद्र ) मंगळाचा मित्र.

                क्रंमश ………….. टिप आपले प्रश्न पाठविताना सोबत जन्मतारीख, वेळ व ठिकाण , दूरध्वनी क्रंमाक लिहण्यास विसरु नये. योग्य मानधन घेऊन कुंडली सोडवलि जाईल किंवा मानधनाच्या रुपात आपल्याला जवळच्या वैद्यकिय रुग्णालयात जाऊन तेथील गरजू व्यक्तिना औषधाच्या स्वरुपातील मद्दत करावी रुग्णालयाची किंवा गरिब रुग्णाची माहीती विचारल्यास आपल्या परिसरातील रुग्णालयाची किंवा सेवाभावि संस्थेची माहिती दिली जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: