॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम : ॥
श्रीमद्पति शालिवाहन शके १९३२ विकृतिनाम संवत्सर सर्व कार्याची सिध्दी होण्याकरिता श्रीगणेशाची ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करुन संवत्सर फल मी आपणस माझ्या व गुरुच्या आशीर्वादाने कथन करत आहे.
आपण पंचांग हातात घेतले की लगेचच शाली वाहन शक १९३२ विकृति नाम संवत्सर असे आहे. वैदिक वाड्मयात चार वर्षाचे एक युग मानलेले आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे अशा ७१ चतुयुगांचे शेवटी 'मनू' आपल्या कालखंडाची समाप्ती करतो. सध्याचे युग कलियुग आहे. या कलियुगात नामजपाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच दानधर्माला महत्त्व आहे.
हिंदू धर्मातिल नूतन संवत्सर दर गुडीपांडव्या पासुन प्रांरभ होतो. आपणास माहित असेल किंवा नसेल एकदरीत ६० संवत्सरे आहेत. त्या मधिल विकृतिनाम संवत्सर दिनांक १६ मार्च २०१०, ( शिवराज्याभिषेक शके ३३६-३३७, विक्रम संवत् २०६६-२०६७ शुभकृतनाम संवत्सर कलियुगाची ३१७९ वर्ष झाल्यावर हा शक सुरु झाला. चैत्र शुक्ला प्रतिपदेला शकारंभ झाला. शालिवाहन शकात ७८ किंवा ७९ मि़ळविले तर इ.स. येतो. व इ. सनात १३४ किंवा १३५ मि़ळविले की विक्रम संवत मि़ळतो. ) मंगळवार या दिवसा पासून सुरु होत आहे. या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावी मंगल स्नान करुन नविन वस्त्र अंलकांर परिधान करावे. देव पूजन, गुरुपूजन, ब्राम्हणपूजा करावी. ह्या दिवशी कडुलिंबाच्या पुष्पासह कोवळ्या पानांचे चुर्ण करुन पुढे सांगितलेल्या कृतिने भक्षण करावे म्हणजेच व्याधिचा नाश होऊन सुख्य समृध्दि, विद्या, आयुष्य व लक्ष्मीचा लाभ होतो. कृति मिरे, हिंग, मीठ, अजमोद ( ओवा ) व साखर याच्यांसह कडूलिंबाच्या पुष्पासहित कोवळ्या पानांचे चुर्ण चिंचेत भिजवून / कालवुन भक्षण करावे म्हणजे रोग शांती होते.
अथ श्री शालिवाहन शके १६३२ विकृतिनाम संवत्सर हे २४ वे संवत्सर म्हणून ओळखले जाते ह्याचे गुण म्हणजे निर्धन, वाईट बुध्दिचा, नेहमी भांडण करणार असा शास्त्रात उल्लेख आढळतो. या वर्षी विकृति नावाचे संवत्सर असल्याने राज्यकर्ते जनता यांच्या स्वभावात वरिल प्रमाणे बद्ल होण्यात वेळ लागणार नाही यांची प्रचिती आपणास काल झालेल्या महिला आरक्षणात बघण्यास मिळत आहे. जे विद्यायक विधुर / कुमार होते ते आता लग्नच्या मार्गाने ( स्व:स्वार्थाच्या ) स्वताची खुर्चि व हुकुमत चालवण्यासाठी दुसरे लग्न करण्यास तयार झाले आहेत.
शालिवाहन शके १९३२ विकृति संवत्सर चैत्र २०६७,
शुक्लपक्ष म्हणजे प्रतापी, शीलवान, निर्बल, कलहप्रिय, सुंदर व चपळ पुत्र असलेला. यापक्षात चंद्र सतत वृद्धिंगत होत असतो व पंचमी नंतर बलवान होतो. चंद्राच्या कारकत्त्वात ज्या गोष्टी येतात त्यात नक्किच फरक पडतो.
प्रतिपदा :- सरकारकडून धनप्राप्ती, रुपावान, गुणवान, विद्यासंपन्न, चांगल्या व विविध आभूषणांनी युक्त अशी व्यक्ती या तिथीस जन्मते.
मंगळवार :- क्षीण शरीराचा, सत्वगुणी, पराक्रमी, रणशूर, धनवान, जमीनजुमला असलेला असा होतो.
चैत्र मास :- या महिन्यात जन्म होणारी व्यक्ती लोकहित साधणारी, रुपवान, नम्र आणि अनेक मित्र असलेली.
योग :- शुभ सकाळी १०:२४ पर्यंत आकर्षक वाणीचा, शुभलक्षणी, चांगले कार्य करणारा, चांगला सल्ला देणारा मनुष्य जन्मतो.
त्यानंतर योग शुक्ल :- जितेंद्रिय, सत्यवचनी, रणांगणात विजय मिळवणारा, शुभ्रवस्त्र व फूलमाला धारण करणारा.
करण १ - किंस्तुध्न :- दुसर्या च्या उपयोगी पडणारा, चंचल बुद्धिचा, हास्यप्रिय मनुष्य जन्मतो.
करण २ - बव :- शिलवान, बलवान, कामी, दयाळू, चतुर, भरभर चालणारा व भग्यवंत असा मनुष्य जन्मतो.
नक्षत्र - उत्तराभाद्रपदि :- मीन रास गुरुच्या अंमलाखाली तर हे नक्षत्र शनीच्या अधिपत्याखाली आहे. या नक्षत्रावर जन्म शुभ - समजला जातो. कुलभूषण, श्रद्धळू, परोपकारी धार्मिक, शत्रूंजय, विपूल संतती, उतावळा, सुखी, भाषाचतुर, बोलका, सत्वगुणी, विद्वान, दाता, धनिक, शुभ कर्मे आचारणारा याच्या चेहर्यारवर कुलीनपणाची छाप दिसते. त्या बिद्धिमान व हुशार असतात. हे जलतत्वाचे सुलोचन व मनुष्य गणी नक्षत्र आहे. देवता- आहिर्बुध्न्य, आराध्य वृक्ष कडुलिंब या नक्षत्राला त्यांचे फल उत्तराधीत मिळते.
उत्तरभाद्रपदा हे ४॥ नक्षत्रा पैकी एक पंचक नक्षत्रातील नक्षत्र आहे.
वत्सराधिपती :- मंग़ळ ग्रह आहे. ह्या संवत्सराचा पती मंगळ राजा असल्याने धन, धान्य, वस्त्र आणि द्रव्य यांचा तुटवडा भासेल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. पर्जन्य तुरळक होईल. मंत्री बुध असल्याने धनधान्याची वाढ होईल. चतुष्पाद प्राणी पुष्ट होतील. सरकारी वर्ग आनंदी राहील. सरकारी खजिन्यात वाढ होईल. मेद्याधिपती मंगळ असल्याने सोसाट्याच्या वारा सुटेल. आगीची भीती निर्माण होईल, धनधान्य कमी होईल. पाण्याचा तुटवडा भासेल. खरीपाचा स्वमी शुक्र असल्याने पर्जन्य जास्त होईल, धान्य उत्तम पिकेल, दुग्धजन्य पदार्थाची रेलचेल होईल. रशेश रवि असल्याने विहिरी, तळी, धरणे यांमध्ये पाणी कमी राहील. ऊसम तेल, सातू कापूस यांचा नाश होण्याची शक्यता आहे. जनतेत थंडीपासून विकार उत्पन्न होतील.
आपण गुंडीपाडवा शुभ समजुन नविन वास्तुत प्रवेश करतो. तसेच नविन वाहन खरेदि करतो पण ह्या वेळे तसे हा पाडवा काही शुभ नाही. कारण गृहप्रवेश रविवारी व मंगळवारी करुनये असे शास्त्र सांगत आले आहे. त्या मुळे गृहप्रवेशाला हा पांडवा शुभ नाही यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच नविन वाहन सुदा ह्य दिवशी खरेदि किंवा विकत घेऊ नये असे माझे प्रामाणिक मत आहे.
वाहन खरेदिसाठी मुहुर्त व वास्तुप्रवेश मुहुर्त :-
वाहन विकत घेणे :-
तिथी:- २,३,५,६,७,८,१०,११,१३ व १५ शु. कृ. (१)
वारः- सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार
नक्षत्रे :- अश्विनी, म्रुग,पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती.
लग्न : २,३,४,६,७,१२ राशीचे असावे.
रवि व चंद्र यांची नक्षत्रे खरेदीचे दिवशीचे नक्षत्रापासून १०,११,१२,१३,१४,२५,२६,२७
उत्तम. बाकीचे घेऊ नयेत.
वास्तुशांती-गृहारंभ आणि गृहप्रवेश
उक्त महिने - श्रेष्ठ - वैशाख, श्रावण, मार्गशीर्ष, पौष आणि फाल्गुन मध्यम - ( नारद मते ) जेष्ठ, कार्तिक अशुभ फल चाकराचा नाश माघ अशुभ फल अग्निभय मुख्यघर पौष महिन्यात वर्ज्य.
उक्त वार - रविवार, मंगळवार वर्ज्य.
रवि मंगळाच्या राशीची ( १,५,८, ) लग्ने व नवांश वर्ज्य.
शुभ तिथी :- श्रेष्ठ शुद्ध पक्ष २,३,५,७,१०,११,१३,१५
मध्यम कृष्ण पक्ष २,३,५,७,१०,११
रिक्ता तिथी त्याज्य आहेत ( ४,९,१४ )
उक्त नक्षत्रे - श्रेष्ठ - रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा
आणि रेवती एकूण ८ नक्षत्रे.
मध्यम नक्षत्रे - अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजित, श्रवण, धनिष्ठा,
शततारका एकूण ९ नक्षत्रे.
अशुभ नक्षत्रे - १. धनिष्ठा पंचकातील नक्षत्रे - धनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा,
रेवती यावर खांब उभा करु नये.
२. बाकीची निंद्य नक्षत्रे - भरणीम कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पुर्वा (३), विशाखा,
ज्येष्ठा, मूळ एकूण ११ नक्षत्रे.
३. वृषचक्र, कलशचक्र यातील अशुभ नक्षत्रे वर्ज्य, कुर्मचक्रही पाहावे.
४. तिक्ष्ण, उग्र व मिश्र नक्षत्रे सर्वथैव वर्ज्य.
तीक्ष्ण नक्षत्रे - मूळ, जेष्ठा, आर्द्रा, आश्लेषा एकूण चार.
उग्र नक्षत्रे - पूर्वा ३, भरणी, मघा, एकूण पाच.
मिश्र नक्षत्रे - कृत्तिका, विशाखा.
कूर्म चक्र - (१) ज्या तिथीस गृहारंभ करावयाचा त्या तिथीस ५ ने गुणावे (२) कृत्तिका नक्षत्रापासून त्या दिवशीचे नक्षत्र मोजावे व ते वरील गुणाकारात मिळवावे (३) त्या बेरजेत आणखी १२ मिळवावे (४) आलेल्या संख्येस ९ ने भागावे बाकी जर १,४,७, राहिली तर कूर्म जलस्थानी आहे - फल लाभ; २,५,८, राहिली तर कूर्म पृथ्वीवर आहे - फल हानी; ३,६,९, (०) राहिली तर कूर्म आकाशी आहे - फल मरण.
योग व करण - अशुभ योग व करण टाळावे. त्याचा सर्वथैव त्याज्य भाग टाळावा. दु:पंचाग - हे सर्व २१ महादोष वर्ज्य, मृत्युपंचक नसावे.
लग्न शुद्धी -
(१) प्रवेश काळी स्थिर लग्न असावे ( २,५,८,११)
(२) चर लग्न सर्वथैव वर्ज्य ( १,४,७,१० ) आहे.
(३) ३,६,११ स्थानी पाप ग्रह नसावे.
(४) १,४,७,१० स्थानी पाप ग्रह नसावे.
(५) ६,८,१२, ह्या स्थानाखेरीज अन्य स्थानी शुभ ग्रह असावेत ( १,२,५,७,९,१० )
(६) ४,८, स्थानी कोणताही ग्रह नसावा.
(७) लग्नी व ७,८,१२ स्थानी चंद्र नसावा.
(८) गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, बल असावे.
(९) गृहकर्त्याचे जन्म लग्न किंवा जन्म राशीपासून ८ वे लग्न नसावे.
(१०) द्विस्वभाव लग्न मध्यम आहे.
गृहकर्ता - रवि हा गृहकर्ता असतो. चंद्र ही त्याची पत्नी असते. गुरु हे त्याचे सुख असते. शुक्र हे त्याचे घन असते. तेव्हा गृहारंभी, गृहप्रवेशी गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, शुक्र हे १) अनिष्ट असतील, २) निर्बली असतील, ३) अस्तंगत असतील, ४) नीच असतील तर शुभ फलाचा नाश होतो. गृहसंबधी सर्व कामे कार्ये दिवसा करावीत रात्री करु नयेत.
अधिक मास, क्षय मास, गुरु शुक्र अस्त, सिंहस्थ आणि सर्व अशुभ दिवस वर्ज्य आहेत. गृहप्रवेशाच्या दिवशी काहीजन होम हवण करतात त्यावेळी अग्नि पाहाणे फार महत्त्वाचे आहे तो कसा पाहावा.
अग्नि पाहाणे - शुध्द प्रतिपदादी वर्तमान तिथीपर्यंत मोजून त्यात वाराचा अंक ( रविवार १, सोम २, मंगळ ३... ) आणि १ मिळवावा. त्या संखेस ४ ने भागावे४. बाकी जर ० अगर ३ उरल्यास अग्निवास पृथ्वीवर आहे. शुभफल मिळेल २ उरल्यास अग्निवास पाता़ळात आहे. फल अर्थ नाश होतो. १ उरल्यास अग्निवास आकाशात फल्-प्राण नाश होतो.
वृषचक्र - हे गृह प्रवेश व गृहारंभास अवश्य आहे. ते शुभ असावे. वृषचक्र हे रवि नक्षत्रापासून खालीलप्रमाणे वृषाचे कोणते भागावर ती नक्षत्रे पडतात व त्याचे फल काय हे पाहावे. येथे अभिजित सह २८ नक्षत्रे विचारात घ्यावी.
वृषभाच्या शिर १ ते ३ अशुभ अग्निभय, ४,५,६,७, पुढील पाय अशुभ, उजाड शून्य, ८,९,१०,११ मागील पाय स्थिरता शुभ, १२,१३,१४ पाठ शुभ लक्ष्मी प्राप्ती, १५,१६,१७,१८ उजवी कुस शुभ लाभ, १९,२०,२१, शेपूट अशुभ नाश, २२,२३,२४,२५ डावी कुस अशुभ दारिद्र्य, २६,२७,२८ मुख अशुभ पिडा, म्हणजे रविपासून ८ ते १८ पर्यंत नक्षत्रे शुभ असतात तीच घ्यावीत.
कलश चक्र :- गृहप्रवेशा च्या वेळी आपण जो कलश पुजन करतो तो कलश व त्याचे चक्र ज्या नक्षत्री रवि असेल त्या नक्षत्री कलश ठेवावा, रवि पुढे पहिले नक्षत्र आग लागेल, अशुभ २,३,४,५, पुर्व घर रिकामे पडेल, अशुभ, ६ ते ९ दक्षिण लाभ, १० ते १३ पश्चिम धनप्राप्ती शुभ, १४ ते १७ उत्तर गृहकलह अशुभ १८ ते २१ गर्भ विनाश अशुभ, २२ ते २४ गुद कायम वास होतो. शुभ २५ ते २७ कंठ स्थिरता प्राप्त होते. शुभ गर्भ नक्षत्रावर प्रवेश गर्भातील बालकांचा नाश, म्हणजे ६ ते १३ व २२ ते २७ अशा एकूण १४ नक्षत्रांवर गृहप्रवेश करावा. गृहप्रवेशा वे़ळी शुभ कालश चक्र असावे. सांराश :- रविपासून ८,९,१०,११,१२,१४ ही नक्षत्रे असता त्यावेळी वृष व कलश चक्र असते.
घराचे मुख कोठे करावे - चंद्र ज्या दिशेकडे असेल ती व त्याचे समोरची दिशा वर्ज्य करुन चंद्राचे मुख पहाणेसाठी घराचे द्वाराने प्रवेश करावा.
घराचे मुख १. गृहारंभ समयी असलेल्या नक्षत्रावरुन चंद्र ज्या दिशेला येईल ती दिशा व त्या समोरीची दिशा यांकडे मुखद्वार केले असता किंवा त्यातून प्रवेश केला असता चंद्र त्या द्वाराचे पुढे व मागे येतो. तो अशुभ असतो. त्या दोन्ही दिशा वर्ज्य करुन प्रवेश करावा.
२. जसे कृत्तिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे व अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्व व पश्चिम असतो म्हणून प्रवेश दक्षिण किंवा उत्तर द्वाराने करावा.
३. मघा ते विशाखा ही सात नक्षत्रे व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण व उत्तरेस असतो म्हणून पूर्व किंवा पश्चिम द्वाराने प्रवेश करावा. असे केले असता चंद्र मागे किंवा पुढे येत नाही.
वामार्क - नूतन गृह प्रवेशाचे वेळी सुर्य वामार्क ( डावे हाताकडे ) असावा.
१) गुह प्रवेश मुर्हूर्ताची लग्न कुंडली मांडावी, २) त्यात रवि कोणत्या स्थानी आहे हे पाहावे, ३) तो जर ८,९,१०,११,१२ या स्थानी असेल तर पूर्व द्वाराने गृह प्रवेश करावा. म्हणजे रवि आपले डावे हाताकडे येईल म्हणजेच 'वामार्क' झाला. ४) रवि जर ११,१२,१,२,३, या स्थानी असेल तर उत्तर द्वाराने प्रवेश करावा. ५) रवि जर २,३,४,५,६, या स्थानी असेल तर पश्चिम द्वाराने प्रवेश करावा, ६) रवि जर ५,६,७,८,९, या स्थानी असेल तर दक्षिण द्वाराने प्रवेश करावा.
वरिल नियमावरुन ८,९ स्थानी पूर्व व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात. ११,१२ स्थानी पूर्व व उत्तर असे दोन्ही प्रवेश येतात, २,३, स्थानी उत्तर व पश्चिम असे दोन्ही प्रवेश येतात. ५,६ स्थानी पश्चिम व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात.
द्वार - शुभ द्वार करण्यासाठी ही शुभ नक्षत्रे बघतात. त्यासाठी द्वार चक्रामधील शुभ नक्षत्र घ्यावे त्याची पध्दत अशी - सूर्य नक्षत्रापासून पहिली ४ नक्षत्रे शुभ त्यापुढील ८ नक्षत्रे शुभ त्यापुढील ३ नक्षत्रे अशुभ व शेवटीची ४ नक्षत्रे शुभ होत. स्य्र्य नक्षत्रापासून पहिली नक्षत्रे शिरावर शुभ फल लक्ष्मी प्राप्ती, त्यापुढील ८ नक्षत्रे ४ कोनावर ( प्रत्येक कोनावर ) अशुभ, फलघर ओसाड पडते. त्यापुढील ८ नक्षत्रे द्वाराशयावर म्हणजे द्वाराच्या बाजूस प्रत्येकी ४ शुभ फल घरात सुख पावते, त्यापुढील ३ दहेलीवर ( उंबरठ्यावर ) अशुभ, फल मृत्यू येणे व शेवटची ४ नक्षत्रे मध्यभागी शुभ फल- सुख पावणे.
म्हणून प्रत्येक पंचागात दिलेला शुभ दिवस शुभ असतो असे समजणे फार चुकीचे आहे. तसे पाहीले तर अमावस्येचा दुसरा दिवस हा कर दिन म्हणून सुध्दा समजला जातो. आपण आपल्या सर्व आयुष्याची कमाई आपल्या स्व:ताच्या घरासाठी खर्च करतो आणि सर्वाना सोईचे जाईल म्हणून साडेतीन मुहूर्ता पैकी एक दिवस निवडून किंवा सर्वांना सुट्टी असते म्हणून रविवार निवडतो तेच फार चुकीचे आहे. गृहप्रवेश किंवा वास्तुशांती साठी आपण गाव गोळाकरण्याचा सल्ला मी देत नाही. पहिल्यादा योग्य दिवस व मुहूर्त पाहून वरिल दिलेल्या सुचनाचे पालन करा. सर्व पुजा व्यवस्थित योग्य दिवशी करुन घ्या नंतर आपल्याला हवातो दिवस निवडून सर्वाना खूश करा आणि पाहा आपल्या वास्तुतील आपल्या कुंटुबीयावर झालेला चांगला परिणाम.
हे संवत्सरफल जो श्रवण करील तो वर्षभर सुखी होईल.
॥ इति संवत्सरफलम् ॥ श्रीगणेशार्पणमस्तु ॥ शुभं-भवतु ॥
संजीव नाईक वास्तु आणि ज्योतिष समोपदेशक
बी/३०१ वंदना संदन, मनवेल पाडारोड, विरार पुर्व ४०१३०५
दुरध्वनी क्रंमाक ०२५०-२५२१७९७ / ९४२३०८६७६३ / ९८६९००८२६३