राहू आणि केतू
भागवताच्या मते कश्यप व धनी यांचा पुत्र ( ६,६,३०) आकाराने वाटोळा (म.भा.भीष्म १९ ) राहू व केतु मिळून मुळात एकच पुरुष होता, त्या एकाचेच दोन जाहाले. देव दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून अमृत बाहेर निघाले मोहिनीरुपी विष्णु ते अमृत देवांना वाटत असता हा देवाच्या पंगतीत चोरुन येऊन बसला. सुर्य-चंद्रानी त्याचे कपट उघडे केले असता विष्णूने त्याचे शीर तोडले. धडाचा झाला राहू व शिराचा झाला केतु त्यादोघांनी सुर्य-चंद्राविषायी राग धरला. त्या रागाने अद्यापि पर्वकाळी राहु-केतू हे सूर्य चंद्रांना गिळू पाहतात. त्यालाच आपण ग्रहण म्हणतो.
राहू-केतु हे सूर्यमालिकेतील ग्रह नाहीत. किंबहुना ’ग्रह’ संज्ञेत ते मोडत नाहीत. पृथ्वीची कक्षा व चंद्राची कक्षा ह्या दोन कक्षा एकमेकांना ज्या दोन ठिकाणी छेदतात ते छेदन बिंदू म्हणजे राहू व केतू आहेत. ज्योतिषशास्त्रा ह्या गणिताच्या बिंदूना प्राचीन काळापासून ग्रहाइतकेच महत्व देण्यात आले त्यांच्या फ़लाचा अभ्यास प्राचीन ज्योतिषी उत्कृष्ट स्वरुपात केला आहे हे दोन छेदन बिंदू ज्या स्थानात पडातात जे ग्रह ह्या दोन बिंदूजवळ असतात, त्या स्थानाच्या दृष्टीने त्या ग्रहाच्या परिणामाच्या दृष्टीने त्यात फ़ेरबदल करावे लागतात.
वास्तुत: राहू आणि केतू हे दोन इतर ग्रहांप्रमाणॆ दिसणारे ग्रह नाहीत. किंबहुना त्यांना व्यक्तित्वच नाही. हे दोघे आहेत दोन संपात बिंदू, ज्या वर्तुळ मार्गाने चंद्र फ़िरतो तो मार्ग आणि ज्या मार्गाने पृथ्वी सूर्याभोवती फ़िरते, तो मार्ग हे दोन मार्ग अवकाशात परस्पराना ज्या दोन भिन्न स्थळी छेदतात त्यापैकी एका छेदन बिंदूला राहू आणि दुस-या छेदन बिंदूला केतू म्हणतात. या दोन्ही छेदन बिंदूना गती आहे. म्हणून त्याला फ़लज्योतिषशास्त्राने स्वतंत्र ग्रह मानून त्यांची स्थाने एकमेकांसमोर १८० अंशावर काल्पिली आहेत. मेषादी राशीत पुढे-पुढे जात नसून मागे-मागे येत आतात म्हणजे वक्र गती असते. सूर्याभोवती प्रदक्षिणा करावयास राहूला १८ वर्षे लागतात. त्याचा तपशील असा:-
राहूची दैनदिन गती ३ कला २१ विकला आहे. या गतीने राहूला १२ राशी आक्रमण करण्याला ६७८५ दिवस २० घटी २५ फ़ळे ७ विपळे इतका काल लागतो. ३६० दिवसांच्या प्रमाणे १८ वर्षे १० महिने २ दिवस व ३६५ दिवसाच्या प्रमाणे १८ वर्षे ७ महिने २ दिवस इतका काळ लागतो.
राहूबद्दल पाश्चात्य ज्योतिषी काय म्हणतात ते पाहू: आग्न ज्योतिषी बिलाप लिळी म्हणतो – राहू हा पुरुष प्रकृतीचा असून तो गुरु-शुक्राच्या स्वभावधर्माचा व भाग्यवृध्दी करणारा आहे, तो गुरु-शुक्राच्याप्रमाणे फ़लदायी आहे. हा जेव्हा शुभ ग्रहाच्या बरोबर असतो, तेव्हा तो आपले अशुभ धर्म कमी करतो. जेव्हा तो शुभ ग्रहाने युक्त असतो , तेचा त्याच्य शुभ धर्माची वृध्दी करतो.
पाश्चात्य ज्योतिषशास्त्रात राहू-केतू सर्पाकार मानले आहेत. राहूच्या उच्च व स्वक्षेत्रासंबंधी एकवाक्यता नाही, प्रवासाची वेळ, सर्प, शत्रु, द्यूत, यश, प्रतिष्ठा, छत्रचामरादी राजयोग यांचा राहू कारक मानले आहे.
राहूचे मित्र – बुध, शुक्र, शनि, सम- गुरु, शत्रु- रवि, चंद्र, मंगळ, लिंग–स्त्री ग्रह, तमोगुणी, जात चांडाळ, अशुभग्रह,
दृष्टी:- आपल्या स्थानापासून ५,७,९,१२ स्थानावर पुर्ण २,१० या स्थानावर अर्धी, ३,६, स्थानावर पापदृष्टी आणि स्वग्रही असला, तर संध असतो असे पराशर सांगतात. त्याच्या दृष्टीबद्दल कोणत्याच शास्त्राकाराने कोठे सांगितल्याचे आढळत नाही, पण आपले ज्योतिषी ७ व्या दृष्टीशिवाय कोणतीच दृष्टी मानावयास तयार नाहीत.
याची उच्च-नीच राशी संबधाचे एकवाक्यात नाही. पंरतु आपले ज्योतिषी मानतात ते–राहू मिथुन व कन्या राशीत बलवान असतो. त्याची स्वराशी कन्या आहे मिथुन राशीत १५ संशावर उच्च असतो. काहीच्या मते वृषभ राशीत १५ अंशावर उच्च असतो व काहींच्या मते वृश्चिक राशीवर नीच असतो. ( ब्रहतपराशर्यमध्ये वृषभ ही व्याची उच्च राशी मानली आहे. कन्या ही स्वग्रह मानली आहे. )
हा वर्णाने निळा-काळा, उंच, सडपातळ, आदी खालच्या जातीचा, खरजेने व्याप्त जाहलेला पाखंडी, उचक्या लागणारा, खोटे बोलणारा, कपटी, कुष्टरोगी, नेहमी दुस-याची निंदा करणारा, बुध्दीहीन असतो. तांबूस, उग्र चेह-याचा, दृष्टी उग्रम विषवाणी, शरीरबांधा उंच, सशक्त, कर्तव्यभ्रष्ट, धुरकट रंग व नेहमी तंबाखू ओढणारा. शरीरावर व्रण, स्वभावाने दुष्ट असे याचे वर्णन पराशर करतत.
स्वभाव- तमोगुणी, दिशा- नैऋत्य, बर्बर देशावर याची सत्ता असते, वाहन – काळा सिंह, काहींच्या मते घोडा, धातू – शिसे, गोमेद हे तत्न ( स्त्रीयांनी हे रत्न वापरु नये ), तीळ हे त्याचे धान्य आहे, नीलवस्त्र व कृष्णपुष्प या त्याच्या दानवस्तु आहेत.
राहू अशुभ असता:- म्हणजे अशुभ स्थानी असता माणसाने काळ्या रंगाचे कपडे वापरु नयेत त्याच प्रमाणे नैऋत्य दिशेकडील माणसांशी संबंध ठेवू नये.
राहूच्या आवस्था:-
मिथुन, कन्या, कर्क, धनू राशीत असता – बाल
मेष, वृश्चिक, वृषभ – तरुण
मकर, कुंभ, मीन, सिंह – वृध्द
राहूशी इतर ग्रहांशी होणारे योग:-
ग्रहण विचारात रवि, चंद्र व राहू यांची फ़ळे आहेत असे समजावे, फ़रक इतकाच आहे की, ग्रहणाची फ़ळे प्रसंगवशात मिळतात व तीही कडक मिळतात आणि दर महिन्याला ग्रहण नसता हिणारी राहू-चंद्राची युती व वर्षातून एकाच वेळी राहू बरोबर होणारी रविची युती साध्य आहेत. तसेच कोणताही ग्रह चंद्र कक्षेच्या पातात येईल तर त्या ग्रहांची शुभ फ़ळे फ़ार जोराने मिळतात.
राहूकेतू-धक्का
राहु केतु मुळे सप्तमस्थान अथवा चंद्र बिघाडला असल्यास वैवाहिक जीवनात गूढता निर्माण होते. मनावर सतत दडपण राहते. मानसिक कोंडमारा होतो. प्रकृतिस्वास्थ्य नसल्याने कामसुखात बाधा येते. विवाह ठरतानाही विलंब होतो. वैवाहिक जीवनात तडजोड करावी लागते. पत्रिकेत सप्तमस्थान अथवा चंद्र केतुने बिघडला असल्यास्स वैवाहिक जीवनात उदासीनता निर्माण होते. जीवनसाथीदाराचा वियोग सहन करावा लागतो. कामसुखातील चैतन्यही हरवून जाण्याची प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते.
राहूधक्का जन्मलग्न तुला किंवा वृश्चिक असीन शनि हा ग्रह, कर्क, वृश्चिक, अथवा मीन राशीत असून त्यापासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी असला म्हणजे त्या जातकाला राहू धक्का पोचेल असे निदान करता येईल.
केतुधक्काही जन्मलग्न तुला किंवा वृश्विक असून शनि हा ग्रह मात्र वृषभ, कन्या, मकर या राशीत असून त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी जर का केतु हा ग्रह पडलेला दिसेल तर त्या जातकाला केतुधक्का त्रास देईल असे म्हणता येईल.
राहू हे धड आहे आणि केतु हे शिरकमल आहे असे भारतीय शास्त्राज्ञांचे मत आहे. अर्थात राहू धक्क्याचा परिणाम आडदांपणाच्या कृत्यात भाग घेणारा, त्यातून नुकसानीचे योग जातकाला दर्शवील तर केतु धक्का कुटिल बुध्दीने डाव रंगात आणणारा. पण यशाच्या ऐन प्रसंगी डावातील रंग निघून जाऊन सहजगत्या साध्या चुकीने एकाएकी बाजी करण्याचा प्रसंग केतु धक्का मानवाला आणील.
राहू हा ग्रह भावंडांचा कारक मानला जातो तर केतु हा ग्रह नातलग मंडळीचा वृध्द मंडळीचा कारक समजला जातो. हे दोन्हीही ग्रह प्रवासाचेही कारक आहेत. त्यातल्यात्यात केतु हा ग्रह महान प्रवासी आहे-पण या ग्रहांच्या गुणधार्माची गंमत ही दिसते की, राहू वा केतु मानवाला प्रवासी करतील खरे पण हा प्रवास अत्यंत विरक्त वृत्तीने किंवा बेफ़िकीरपणे ते करतील हे दोन्हीही ग्रह स्वजनाकरता प्राणपणाला लावणारे महान मुत्सद्दी असे आहेत. शनीइतकाच यांचा मुत्सद्दी आणि कारस्थानीपणामध्ये क्रम लागेल. पण पराजय पदरी पडला तर शनितत्वाचा माणूस धैर्य धरुन पुन्हा प्रयत्न करील, तर राहू केतु तत्वाचा माणूस नेस्तनाबूद होऊन जाईल एवढाच फ़रक आहे. अर्थातच हे ग्रह ज्यांना धक्का देतील त्यांचा अगदी संपूर्णपणे विनाश करुनच मोकळे होतील यात संशय नाही. हे जातीने दैत्यवंशीय आपल्या कृतीने व अमृतप्राशनाने यांनी देवत्व पचनी पाडलेले आहे. यामुळे यांचे ठिकाणी दुविचारधारेचा प्रवाहही संतत प्रसवत असतो. पण यांचे सुविचाराचे बोल कुणीही ऐकत नाही. जेव्हा का स्वजनच त्यांचा तिरस्कार करु लागतात, तेव्हा यांना संयम पाळणे कठीण जाते आणि मग महाप्रलयकाल ओढवतो. स्वजनांचाच संहार, स्वकृतीचाच सर्वनाश, स्वधर्माचाच स्वाहाकार या राहूकेतूच्या धक्क्यातून बाहेर पडतो.
ज्या व्यक्तिच्या कुंडलीत असा धक्कादायक योग असेल त्यांनी स्वजनांपासून अत्यंत सावध राहावे हे बरे. तुला लग्नी कर्केचा शनि राहू धक्क्याला जास्त जोराने चालना देऊन भावंडाचा प्रलयकाल त्याचेवर ओढवील. प्रवासात अपघातांचे संभव अशाच व्यक्तींचे जीवनात उद्दभवतील. घरातील वडीलधारी माणसे पटापट थोड्याच काळात दगावण्याचे योगही याच धाक्यातून येतात. हीच स्थिति केतुधक्यात तुला लग्नी मकरेचा चतुर्थातील शनि दाखवील. राहू धक्का पुर्वभाग्य नष्ट करील तर केतु धक्का भावंडांचा नाश करील, तुला लग्न असून वृश्चिकेचा शनि असताना दीर्घ मुदतीची दुखणी, आज्याच्य वेळची स्थिति जातकाची न राहणे, नेत्रपीडा, करभी, देवस्की यांपासून त्रास, जाणूनबुजून मार बसण्याची शक्यता राहूधक्का दाखवील. मीनेचा शनि राहू धक्क्याला थोडा कमी चालना देईल. फ़क्त प्रवासात वा अनोळखी लोंकाकडून धोके, त्याचप्रमाणे खाण्यापिण्यात विषप्रयोगाची शक्यतादर्शक योग, हीच स्थिति केतु धक्क्याची तुला लग्नी अष्टमातील वृषभेचा शनि असताना जातकाला दाखवील.
राहू अथचा केतु धक्का पोचेल की नाही हे पाहात असताना हे ध्यानात ठेवा की, जन्मकाली तुला वा वृश्चिक लग्न आहे किंवा नाही. असलेच तर शनि तुला, कर्क, वृश्चिक अथचा मीनेत आहे का? वृश्वित लग्नीही वरील राशीत आहे का आणि असला तर या शनीपासून राहू हा ग्रह ४/८/१२ वे स्थानी जन्मकाली आहे का? असेल तरच राहू पोचेल, नाहीतर नाही आणि केतुधक्क्याकरिता लग्नं तीच लागतात पण शनि मात्र कन्या, मकर किंवा वृषभेत लागतो व त्याचेपासून ४/८/१२ वे स्थानी केतु लागतो, तरच केतु धक्का पोचू शकतो.
अर्थात या दोन महान प्रभावी ग्रहांचे धक्के एकाच व्यक्तिला जीवनात मिळणार नाहीत हे सिध्द होते आणि हे त्यांचे मानवजातीचर उपकारच असेच मानले पाहिजे
वृश्चिक लग्नी किंवा मीनेतील वा कर्केतील शनि मानवाला भावंडांकडून मरणासम यातना देववील, स्वशरीरावर शस्त्रक्रीयेची पाळी आणील, हा योग राहू धक्का दाखवील, तीच गत वृश्चिक लग्नी केतु धक्का असताना जेव्हा का शनि ग्रह वृषभ, मकर वा कन्येत असेल तेव्हा मानवाची करील. सट्टॆबाज व्यक्तींना राहू व केतु धक्काच जास्त जाणवतो. राहू धक्क्यात वृश्चिक लग्नी शनि स्थलांतराचे सतत प्रसंग, विभक्तीकरण, मेदूला दुखणी, उपासमार व वेडाचे झटके येणे वगैरे परिस्थिति जोरदारपणे दर्शवील, तर मीनेचा शनि संततीला त्रास दाखवील.
सर्वसाधारणपणे केतु धक्का मानवाला लोकपवादाने, भावंडांच्या अघोरी कारस्थानाने नेस्तबूद करण्यास कारणीभूत ठरतो. कुटिल कारस्थान हे केतूचे कार्य असल्याने केतुधक्कावाल्या व्यक्तींनी कोर्टकचे-यांच्या लफ़ड्यात जास्त पडू नये हेच बरे. राहू हा मातेकडील स्थितिनिदर्शक ठरेल तर केतु हा ग्रह पितृकुळाचा दर्शक ठरेल. अर्थात यावरुन मातृपितृकुळाची पंरपरा आपले धानी येईल. अस्तु.
१. मंगळ राहु योग संततिसुखासाठी चांगला नसतो.
२. बुध-शुक्र-राहु (त्रिग्रह) योग कलेच्या क्षेत्रात कर्तबगारी दाखवू शकतो.
३. कुंडलीतील कोणताही भावेश केतु युक्त झाल्यास फ़लात कमतरता निर्माण करतो.
४. गुरु-केतु योगात आध्यात्मिक धारणा उच्च दर्जाची असू शकते.
५. चंद्राच्या चतुर्थात राहु असता घराच्या प्रवेशद्वारासाठी नैऋत्य दिशा योग्य अशी असते.
६. केतुची दशा सामान्य पणाने कोणत्याही लग्नांना वाईट जात असते.
७. लग्नातील राहु व्यक्तीतील निर्दयीपणा वाढवीत नेतो.
८. लग्नातील राहु व्यक्ति उपासक असू शकतात.
९. लग्नीतील केतु व्यक्तिचे आतोग्य चांगले ठेवत नाही.
१०. धनस्थानातील केतुमुळे माणसाला दंतरोग असू शकतात.
११. धनस्थानातील राहुमुळे व्यक्ति आक्रमकपणे पैसे मिळविताना दिसते..
१२. तृत्तीय स्थानात राहु असता व्यक्तिची वागणूक उर्मट असू शकते.
१३. तृतीय स्थानात केतु असता व्यक्तिला नातेवाईकां कडून त्रास होऊ शकतो.
१४. चतुर्थातील राहु असता शिवाउपासना केल्याने शांती मिळू शकते.
१५. पंचमातील राहु संततिच्या प्रगतीस अडथळा आणू शकतो.
१६. पंचमातील राहु कठोर उपासना घडवू शकतो.
१७. पंचमातील राहु निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.
१८. पंचमेश राहुकुक्त निर्णायक लाभ करुन देऊ शकतो.
१९. पंचमेश राहुयुक्त शिक्षणात अडथळा आणू शकतात.
२०. पंचमात मंगळ –राहु संततीस तापदायक.
२१. कुंडलीतील राहु सदासर्वकाळ वाईट फ़ले देईल असे नसते.
२२. गुरु-केतु नवपंचम योग व्यक्ति निखळ अध्यात्मिक असू शकते.
२३. कुंडलीतील चंद्राच्या चतुर्थात केतु असता घराजवळ गणपतीचे देऊळ असते.
२४. सुखस्थानात केतु असता सुखात कुठेतरी मिठाची चिमुट असू शकते.
२५. मुखरोगासाठी रवि-केतु महत्वाचे ग्रह असू शकतात.
२६. विषबाधा, स्फ़ोट यासाठी रवि-राहु महत्वाचे ग्रह असू शकतात.
२७. सप्तमात राहु असता जोडिदाराच्या स्वभावात क्रुरता असू शकते.
२८. सप्तमात केतु असता जोडिदाराची प्रकृती चांगली असत नाही.
२९. भाग्यशानातील चंद्र-राहु युती शिक्षणासाठी अडथळे निर्माण करु शकते.
३०. सर्व प्रकारच्या जातकांच्या कुंडल्यांतुन बदलीचा प्रश्न सोडविताना राहुला महत्व द्यावे लागते.
३१. वृश्चिकेतील राहु डूख धरणारा असू शकतो.
३२. रवि-राहु पण मार्गी बुध असताना बाजार तेजी आणतात.
३३. अश्विनी नक्षत्रातील केतु कठोर उअपासना करुन घेत असतो.
३४. रोहीणी नक्षत्रातील केतु मानसिक त्रासानंतर फ़ायदा देतो.
३५. रोहीणी नक्षत्रातील केतु सदा-सर्वदा स्त्रीकडुन लाभ दाखवत नाही.
३६. मृग नक्षत्रातील राहु जातकाला संघर्ष करावयास लावतो.
३७. गुरु-राहु युतियोग जातकाच्या स्वभावात दुष्टता असू शकते.
३८. गुरु-राहु युतियोग स्वत:च्या संततीचे फ़ारसे लाड करतान आढळणार नाहीत.
३९. गुरु-राहु युतियोग शिक्षणात मोठी प्रगती होत नाही.
४०. आर्द्रा हे राहुचे नक्षत्र आहे हेच जन्म नक्षत्र असता जातकाल राहुमहादशा सुरु असते.
४१. राहु हा कुंडलीत दोन्ही पध्दतीत काम करत असलेला दिसतो.
४२. घराण्याचे शाप घराण्याचे पाप या दोन्हीचेही सुचन राहु करत असतो.
४३. राहु हा आजोबांचा कारक आहे.
४४. राहु हा छत्रकारकही होऊ शकतो.
४५. आर्द्रा नक्षत्रातील राहु चांगली अथवा वाईअट फ़ले तिव्रतेने देतो.
४६. आर्द्रा नक्षत्रातील केतु सर्व प्रकारच्या साधनेसाठी चांघला असतो..
४७. पुनर्वसु नक्षत्रात राहु अत्यंत शुभ असू शकतो.
४८. पुनर्वसु नक्षत्रात केतु साधनेसाठी चांगला असतो.
४९. आश्र्लेषा नक्षत्रातील राहु पित्यास त्रास असू शकतो.
५०. आश्र्लेषा नक्षत्रातील केतु विषबाधा- पिशाच्चबाधा असे त्रास होऊ शकतात.
५१. मद्या नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.
५२. मद्या नक्षत्रात चंद्र असता नन्मत: केतुची महादशा असते.
५३. मद्या नक्षत्रातील राहु वडिलांकडून त्रास दाखवितो.
५४. मद्या नक्षत्रातील केतु गणपती उपासेनस चांगला असतो.
५५. पुर्वा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ कुंडलीतील राहुला महत्व द्यावे.
५६. पुर्वा नक्षत्रातील राहु दुस-या तिस-या चरणांवर शुभफ़ले देऊ शकतो.
५७. पुर्वा नक्षत्रातील केतु उपासनेस सर्वत्र चांगला.
५८. उत्तरा नक्षत्रातील राहु पहिल्या तिस-या चवथ्या चरणांवर बराच मिश्र होऊ शकतो.
५९. उत्तरा नक्षत्रातील केतु उपासनेस चांगला
६०. ह्स्त नक्षत्रतील राहु जन्मस्थ बुधा प्रमाणे फ़ले देऊ शकतो.
६१. हस्त नक्षत्रातील केतु आरोग्यच्या दृष्टीने हानीकारक ठरु शकतो.
६२. चित्रा नक्षत्रातील राहु कुंडलेत मंगळा ज्या राशीत आसेल त्याप्रमाणे फ़ले देतो.
६३. वित्रा नक्षत्रातील केतू आरोग्याला हानिकारक असतो.
६४. स्वाती नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.
६५. स्वाती नक्षत्रात जन्म्स्थ चंद्र असता जातकाला राहुची म्हादशा असते.
६६. स्वाती नक्षत्रात राहु कठोर उअपासना करवून घेतो.
६७. विशाखा नक्षत्रातील राहु जन्मस्थ शुक्र कोणत्या राशीत आहे यावर ठरत असते.
६८. विशाखा नक्षत्रातील केतु दंतरोग यादृष्टीने पहावा लागतो.
६९. अनुराधा नक्षत्रातील केतु मुखरोगासाठी हानीकारक ठरतो.
७०. जेष्ठा नक्षत्रातील राहु जन्मस्थ मंगळाप्रमाणे फ़लदायी होतो.
७१. जेष्ठा नक्षत्रातील केतु आरोग्यासाठी चांगला नाही.
७२. मूळ नक्षत्र केतुच्या अधिपत्याखाली येते.
७३. मूळ नक्षत्रात जन्मस्थ चंड्र असता जन्मत: केतुची महादशा सुरु असते.
७४. उत्तरषाढा नक्षत्रात राहु असता जन्मस्थ रवि ज्या राशीत असेल त्याप्रमाणे फ़लेदायी होतो.
७५. उत्तरषाढा नक्षत्रात केतु असता आरोग्यला हानिकारक होतो.
७६. श्रवण नक्षत्रात राहु जन्मस्थ चंद्राला मह्त्व द्यावे लागते.
७७. धनिष्ठा नक्षत्रातील राहु फ़क्त दुस-या तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.
७८. शतातारका नक्षत्र राहुच्या अधिपत्याखाली येते.
७९. शततारका नक्षत्रात जन्मस्थ चंद्र असता जातकाला राहु महादशा असते.
८०. शततारका नक्षत्रातील राहु उपासनेला चांगला असतो.
८१. शततारका नक्षत्र विपत म्हणून असेल तर जन्मस्थ राहुला महत्व द्यावे लागते.
८२. पुर्वा भाद्रपदा नक्षत्रातील राहु तिस-या चरणावर शुभफ़ले देऊ शकतो.
८३. रेवती बक्षत्रातील राहु शेवटच्या चरणात अशुभ फ़ले देऊ शकतो.
८४. गोचर राहु केतु यांचे राशीतून अथवा सप्तमातुन भ्रमण होत असता वैवाहिक जीवनात अडथळे निर्माण होतात.
८५. मंगळ राहु युती विवाहित स्त्रीच्या पत्रिकेत अत्यंत अशुभ “तोंड दाबून बुक्क्यांचा मार” अशी परिस्थिती निर्माण होते.
८६. राहुचे बुध, शुक्र व शनि मित्र गुरु सम आणि रवि,चंद्र व मंगळ शत्रु आहेत.
८७. केतुचे मित्र सम व शत्रु राहुप्रमाणे समजावे वस्तुत: राहु व केतु याचे मित्र सम शत्रुत्व कांही ज्योतिषी मानीत नाहीत त्याचे कारण ते गोल नसून बिंदूरुपी आहेत हे होय. ग्रहांचे हे नैसर्गिक मित्र-सम-शत्रौत्व आहे.
८८. प्रथम स्थानी राहू असता जप-जाप्याची आवड
८९. राहू-चंद्र एकत्र असता एकदा तरी आयुष्यात मोठ्या संकटास तोंड द्यावे लागते.
९०. राहु शनी लग्नात असता पिशाच्चबाधा. / क्षीण चंद्र शनीसह अष्टमात असता पिशाच्चबाधा.
९१. राहू प्रथम किंवा पंचम स्थानी असता मनुष्याचे दात वेडेवाकडे, मोठे व दंतपीडा.
९२. तृतीय स्थानी राहू असता ( कोणत्याही राशीचा ) लाहानपणी कान फ़ुटण्याची व्यथा.
९३. षष्ठस्थानी राहू-चंद्र असता पोटाचे विकार.
९४. राहू-मंगळ एकाच स्थानी प्रतियोगात असतील, तर ऒपरेशन संभव अगर अपघात किंवा मंगळाचे राहु वरुन भ्रमण असता अपघात होण्याची संभवना.
९५. राहू रवि लग्नात असता दृष्टीनाश संभवतो ( नक्षत्र व इतर योग महत्वाचे असतात )
९६. राहू चतुर्थात पापग्रहाने दृष्ट असेल व लग्नेश निर्बली असेल, तर रुधिर रोग.
९७. मूळ राहुवरुन गोचरीचे राहूचे भ्रमण होत असता आजार अ दंतरोग दात काढण्याची पाळी येते.
९८. राहूवरुन मंगळाचे, मंगळावरुन राहूचे भ्रमण चालू असता प्रकृती बिघाडते.
९९. राहू षष्ठात असता किंवा केतू षष्ठात असता दंतरोग ओठ मोठे असतात.
१००. राहूचे किंवा शनीचे द्वितीयात किंवा सप्तमात गोचरीने भ्रमण चालु असता दंतपीडा
१०१. राहू द्वितीय स्थानी असता वाणी दोष असतो.
१०२. राहू तृतीयात असता जन्म देवस्थानाजवळ होतो.
१०३. धनात पापग्र्ह व तृतीयात राहू असता बंधुसौख्य नाश होते.
१०४. चतुर्थात राहू असता प्रथम संतती मृत होते.
१०५. राहू लाभात असता म्हातारपणी पुत्राकडून सुख मिळते.
१०६. राहू-मंगळ सप्तमात असतावैवाहिक सुखाचा बोजबारा उडतो.
१०७. अष्टमात राहू अगर हर्षल असता अनेक वेळा विवाह फ़िसकटतात.
१०८. अष्टमात राहू-हर्षल असता स्त्री धन मिळणार नाही.
१०९. ज्या लोकांन लिहिताना तोंड वेडे-वाकडे करण्याचे सवय अस्ते त्यांचा राहू सम्राशीत असतो, पण १/९ स्थानात असता हा नेम चुकत नाही.
११०. षष्ठात राहू मामाचे सुख लागू देत नाही, भांडखोर वृत्ती असते.
१११. राहू आपल्या राशीत किंवा ९ अगर १० व्या स्थानी असेल, तर मनुष्याला उच्चदशा प्राप्त होते.
हे एक संशोधन आहे. अर्थात चिकित्सक अभ्यासू व या शास्त्राचे रसिकजन यांनी यातील ठोकताळ्यांचा अनुभव घेऊन जरुर पडताळा पहावा व जे जे अनुभव पटले असतील वा नसतीलही ते माला कळवावे. म्हणजे माझ्या संशोधनाचे कामाला उत्तेजन मिळेल ही विनंती.
संजीव
संदर्भ ग्रंथ:- नवग्रहांची फ़ळे (श्री. वि,श्री. देशिंगकर), ग्रहांचे धक्के (श्री पदमाकर जोशी (शांडिल्य)), सहस्त्रावली ( श्री ज्योतिषभूषण उदयराज साने )