बुधवार, ४ नोव्हेंबर, २००९

कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.वर्ग क्रंमाक दोन :-
अश्विनी नक्षत्राची वैशिष्ट्ये:- केतू शुभ ग्रहाबरोबर नसेल व दूषित असेल तर हे नक्षत्र संतती प्रदान करत नाही. स्त्रियांना गर्भधारण झाल्यास गर्भपाताची शक्यता असते. कोणत्याही उपचाराचा फायदा होत नाही. त्यामुळे बर्‍याच स्त्रियांना संतती प्रापतीचा उपभोग घेता येत नाही. काम शक्ति क्षीण असते. पण याच्यावर जर शुभ ग्रहाची दृष्टी असेल तर किंवा ह्या नक्षत्राच्या खोल्या मध्ये शुभ ग्रह किंवा गोचरीचे शुभ ग्रह असल्यास कुप्रभाव कमी होतो.
या नक्षत्रावर जन्मझालेल्या व्यक्ति विचारशिल, अध्ययनशील, अध्यपानाचे कार्य करणारे. ज्योतिषी, वैद्यकीय शास्त्रा रुची असणारे, ( हैयो हैयोयो ) लेखक, इमादार, चंचल प्रकृतीचे, निसर्ग भ्रमण प्रिय, आंगावर चामखीळ व त्वचेचे विकार असणारे, गृहकलह माजवणारे, महत्त्वाकांक्षी विचारांचे असतात.

विशोत्तरी मतानुसार ही व्यक्तीच्या जन्मताच केतूच्या महादशेच्या चरणात येते. केतूची दशाचा काळ सात वर्षचा मानला जातो. केतूच्या दशेत मंगळ प्रभावी असेल याच्या उलट मंगळाची दशा चालु असून केतू प्रभावी असेल तर लग्न कुंडलीच्या ग्रह स्थांना नुसार फलप्राप्ती होईल. त्या व्यतिरिक्त नाडी ( चड्डीची नाही ) पध्दतीनुसार फलप्राप्ती होईल. (आकृती पाहा ) प्रत्येक नक्षत्राची नाडीचा उल्लेख केलेला आहे. ह्या नक्षत्रावरुन कोणताही ग्रह गेला तर त्या ग्रहानुसार व स्थाना नुसार जातकास फल प्राती होईल
आपणास दरोज दिसणार रविग्रह दरवर्षी वैशाख महिन्याच्या सुरवातीला ह्या नक्षत्रा कडे तेरा दिवसाच्या पहुणचारासाठी येतो. चे,चु,चो,ला याच्या कडे एका पाठोपाठ तीन ते साडे तीन दिवस प्रत्येक खोलित आपला मुक्काम करत असतो. त्याच वेळी तो कुणाला चांगली फळे देतो किंवा त्यांच वेळी दुसरा कोणताही ग्रह तेथे मुक्काम करत असेल तर तो त्याच मित्र शत्रु सम प्रमाणात जो जसे असेल त्या प्रमाणे आपल्या जवळील अस्त्राचा उपयोग करुन जातकास त्याप्रमाणे फळे देतो.
रवीचे मित्र चंद्र, मंगळ, गुरु ह्याच्या बरोबर असताना त्याची जंगी पार्टी होत असते. शनि आणि शुक्राला तो आपला शत्रु मानत असतो. बुधाला तो आव जाव घर तुम्हारा सम मानतो.
हा वर्गत्तम नवंमाश असल्यामुळे या ठिकाणी शुभ किंवा अशुभ ग्रह फ़लिताच्या दृष्टीने अतिशय बलवान असतात. शनि हा शत्रु असल्याने तो नीच असतो. रवि व मंगळ या नवमांशात बलवान व राजयोगकारक ठरतात. हे ग्रह शौर्य, धैर्य, सत्ता, अधिकार, कीर्ति अथवा लौकिक अशि फ़ळे देताना अनुभवास येतात. जन्मकुंडली मध्ये केन्द्र कोणांत १,४,७,१०,५,९, स्थनचे रवि व मंगळ या नवमांशी राजयोगकारक ठरतात. नवमांश कुंडलीत क्रेद्रांत हा नवमांश वर्गोत्तम असतां व्यक्ति भेद क्ररुन पुढे येतात.
मेषराशीतील मेष नवमांशी कुंडलीत कोणतेही ग्रह असता ( शनि सोडुन ) तमोगुण शीघ्रकोपी, दीघोंद्योंग व महत्वाकांक्ष हे गुण सामान्यत: आयुश्यात अविष्कृत होत्तांना दिसतात. प्रयत्न व पाराकाष्ठा हा गुण या नवमांशात आढळतो.
ह्या स्थांना मंगळ व शनि एकत्र असल्यास गंभीर परिणाम जातकाच्या जिवन शैलित त्यास अनुभवास येतात. तसेच कुंडलीत कोठेही मंगळ व शनिची एकत्र पणाने संचार म्हणजे जातकाच्य आयुष्यात स्थांनाच्या फ़ळा प्रमाणे विरुध्द घटना.
सर्वतोभद्र चक्र प्रमाणॆ पहिला सूक्ष्मांश म्हणजे तस्करांश जर जातकाला हा अंश प्राप्त झाला असेल तर जातकाची वर्तणुक तस्कराप्रमाणे म्हणजेच चोरी, कुमामार्गची असते.
( जर अभ्यासा साठी सर्वतोभद्र चक्र हे दुर्मिळ पुस्तक पाहिजे असल्यास आपण माझ्ये पारंपरिक ज्योतिषशास्त्र गुरु सौ. मिनल कुलकर्णी ( ज्योतिष शास्त्री ) यांनी मराठीतून लिहिलेले हे पहिले व एकमेव पुस्तक आपण त्यांच्याशी संप्रर्क करुअन प्राप्त करु शकतात.  टेलिफ़ोन नं 022-28695120 / Mob. 9322030404 )

५ टिप्पण्या:

Nilima म्हणाले...

agdi chhan mahti deili tumhi.
maze pan jara problems sodwal ka plz mazya lagnala 7year zhali aajun santati nahi aahe, aani mala job milto pan tiket nahi mhanje maze feeld marketing aahe mi tarvel agent aahe custmr yetat aani cahle jatat aase ka hote?? mi tar mazya pari ne tyana aamchi packages nitwayvastith samjwun sangte nehmi flowup thevte tari custmr hatatun nistun jato mhanje to dusrya ekhadya travel agncy madhe jawun jaste rate la ticket viket gheto pan mazhya kadun nahi :(
ase sagle ka hote mazya barobar plz tumhi jara madat karal ka aaho mi vaitagli aahe nahi mul baal nahi career. maze nakshtr anuradha aahe aani mazya mr. che nakshatre uttarashad aahe
i am waiting for u r reply.

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

निलीमा यांस
आपल्या अभिप्राया बद्दल धन्यवाद

आपण सांगितल्या प्रमाणे आपले नक्षत्र अनुराधा आहे.
या नक्षत्राचा स्वामी शनी राशी स्वामी मंगळ आहे. आपला बांधा आडवा व चेहरा गोल असून मोहक व हसरा आहे का? शरीरात जीवनशक्ती, रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे. आपला स्वभाव तामसी व रागीट आहे काय? आपण बुध्दीजीवीपेक्षा श्रमजीवी जास्त आहात. आपला जन्म गरीब कुंटूबात आहे. आपल्याला वागण्यामुळे आपणास लघवीचे विकार तसेच गर्भाशयाची विकाराची तक्रार आहे काय?
आपण “ ओम नमो मित्रस्थ वरुणस्य चक्षुसे महादेवायतदृतगूं समर्थत दूरदृशे देव जाताय केतवे दिवस पुत्राय सूर्यायश गूं सत्त ओम मित्राय नम: हा जप दाहा हजार वेळा करवा. श्री गजानन भक्ति विजय ग्रंथाचे पारायण करावे. शक्य झाल्यास आपल्या दोघांचे जन्म तारिख वेळ ठिकाण कळवावे. आपली पत्रीका व्यवस्तित पाहुन मग उपाय योजना सांगितली जाईल.

Nilima म्हणाले...

tumhi sangitlya parmane bandha aadwa aani face hasra aahe pan maza janm tasa garib kutumbaat ase mhanta yenar nahi aamhi jahagirdar khandanache aahot aamchya kade 25 gavon chi jahagirdari hoti pan nater rahili nahi jahagiri geli nav faqt shilk rahile pan tase garib nahi mahnta yenar pan aamhi sadun kaka chya kutumbacha satyanash zhala mahnje kaka rahile nahit, tyancha motha mulga pan nahi rahila, dhakta jo aahe tyache aajar panat donhi legs gele :( aashi sagli paristithi aahe. aani maze baba chi tabyat dekhil aata bari nai raahat, aase sagle mazhya maherche problems.
aata maza problem mi warti namud kelay
mazi DOB 13/7/1981 jnam vel 6.30pm
mazya mr. chi DOB 23/7/1975 Jnam Vel 12.15pm

aani mala ajun kasla hi vikar nahi.
Aata tumhich sanga kay te.

Nilima म्हणाले...

aani ho tumhi jo mantre jap sangitla aahe to kasa karyacha??? mhanje ekach bethkit 10000?? ekach bethakit 10000 ter shkya nahi :( aani kevha chalu karycha? mhanje kontya divshi??

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

निलीमा
आपले जन्म ठिकाण आपण सांगितले नाही.
काही गोष्टी येथे लिहता येत नाहीत. तरी कृपया ईमेल करा किंवा फ़ोन वर संपर्क साधा.
संजीव