गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

गृहारंभ / वास्तु मुहूर्त

भारतीय विद्यां पैकी एक विद्या आहे ती म्हणजे वास्तुशास्त्र विद्या. नविन वास्तुच्या बांधकामास किंवा नविन वास्तुत प्रवेश करण्यापुर्वी मुहूर्त पाहणे आवश्यक असते. योग्य सुमुहूर्तावर वास्तुप्रवेश आणि वास्तुचे बांधकाम करणे ही महत्त्वाची घटना असते. भारतीय कालगणेनुसार मुहूर्त काढण्यासाठी उपयुक्त साधन “ पंचाग” आपल्या साठी भारतीयांनी (गणिती) परिश्रम घेउन बाजारात उपलब्द करुन दिले आहे. अशा पंचांगानुसार मुहूर्त काढले असता अशुभ फ़ळांची तीव्रता कमी होऊन शुभ फ़ले लाभतात. तसेच अनेक दोषांचा परिहार होतो. धार्मिक व्यवहार म्हणजे वास्तुचे भुमीपूजन, भूमीशांती, शीलान्यास, वास्तुशांती करताना योग्य व अयोग्य दिवस व वेळ ठरवली गेली आहे यालाच मुहूर्त असे म्हणतात.


वास्तुचा कार्यारंभ करण्यासाठी शुक्लपक्ष आणि सुर्य उत्तरायणात असला पाहिजे. त्यांचप्रमाणे गृहस्वामीचे चंद्रबल – ताराबल – शुभलग्न - शुभदिन सुध्दा असला पाहिजे. कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षाच्या पंधरा तिथि नामा नुसार पाच प्रकारच्या तिथि असतात. त्या अशाप्रकारे नन्दा ( १,६ व ११ ), भद्रा ( २,७ व १२ ), जया ( ३,८ व १३ ), रिक्ता ( ४,९ व १४ ), पुर्णा तिथि ( ५,१० व १५ अथवा ५,१० व ३०) ह्या तिथी आपल्या नावानुसार फ़ल देतात.

शुक्रवारी नन्दा तिथि ( १,६ व ११ ), बुधवारी भद्रा तिथि ( २,७ व १२ ), मंगळवारी जया ( ३,८ व १३ ) शनिवारी रिक्ता ( ४,९ व १४ ), आणि गुरुवारी पुर्णा तिथि ( ५,१० व १५ ) तर त्या तिथि आणि वार सर्वसिध्दिप्रद्ययक असतात.

शुक्ल पक्षात २,३,५,७,१०,१३,१५(पौर्णिमा) या तिथि श्रेष्ठ होय. चतुर्थि, नवमी, चतुर्दशी या तिथि त्याज्य आहेत, अष्टमी, अमावस्या या तिथि अशुभ आहेत. तसेच वारालाही महत्व आहे. गृहरंभासाठी सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे वार शुभ आहेत. शनिवार मध्यम आहे. रविवार आणि मंगळवारी त्याज्य आहेत. त्याज्य व अशुभ तिथिंना गृहारंभ केल्याने दारिद्र, धनहानी, उच्चाटन, धान्यनाश, राजभय, असते म्हणून या तिथिना गृहारंभ टाळावा

रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तराभाद्रपद आणि रेवती ही नक्षत्रे श्रेष्ठ आहेत. अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजीत ( उत्तरषाढाच्या शेवटच्या १५ घटिका आणि श्रवणाच्या आधिच्या १५ घटिका ), श्रवण, धनिष्ठा, शततारका ही नक्षत्रे शुभ आहेत. मूळ, ज्येष्ठा, आर्द्रा, आश्लेषा ही उग्र नक्षत्रे आहेत. पूर्वाफ़ाल्गुनी, पूर्वाभाद्रपद, कृत्तिका व विशाखा ही वर्ज्य नक्षत्रे आहेत.

२७ योगा पैकी व्यातिपात, वैधृति, विष्कंभ ( पहिल्या तिन घटिका ) वज्र ( पहिल्या नऊ घटिका ), व्याघत ( पहिल्या पाच घटिका ), गंड व अतिगंड ( पहिल्या साहा घटिका ), शुल ( पहिल्या १५ घटिका ) अशुभ मानल्या गेल्या आहेत.

तिथिच्या अर्ध्या भागाला करण असे म्हणतात, ११ करणा पैकी विष्टि व नाग ही करणे अशुभ आहेत. गृहारंभ करताना रवी, चंद्र, बुध, गुरु व शुक्र बलवान असावेत, रवी हा मेष, वृषभ, कर्क, सिंह, तुला, वृश्चिक आणि कुंभ राशीत असताना शुभ फ़ले देतो, व इतर राशीत असताना अशुभ फ़लेदायी असतो.

नविन चुल / शेगडी प्रज्वलीत करताना (वास्तुशांती) त्यासाठी बुधवार, गुरुवार, शुक्रवार हे दिवस उत्तम आहेत, नव्या घरात शनिवारी, मंगळवारी, सोमवारी व रविवारी अग्नि प्रज्वलित केल्यास दारिद्र लाभते, धननाश होतो, रोग जडतात, स्त्रिया शारिरीक दृष्ट्या क्षीण किंवा अकार्यक्षम होतात.

सर्वात चांगला योग सकारां म्हणजे :- शनिवार, स्वाती नक्षत्र, सिंह लग्न, शुल्क पक्ष, सप्तमी तिथि, शुभ योग आणि श्रावण महिना असेल तर हे सातही सकाराने युक्त आहेत आणि या सातही सकारांच्या योगात गृहारंभ केला तर वाहन सौख्य, धन-धान्य वृध्दी, पुत्र व गृहस्वामीला विविध प्रकारचे लाभ आणि सौभाग्य प्राप्त होते.

वृषभ, सिंह, वृश्चिक, कुंभ या स्थिर लग्नावर केलेला वास्तुप्रवेश अथवा गृहारंभ शुभफ़लदायी ठरतो, कार्य सिध्दिस जाते. मिथुन, कन्या, धनु, मीन या द्विस्वभावी राशीचा पूर्वार्ध स्थिर लग्नाचा व उत्तरार्ध चर लग्नाचा असतो. त्यामुळे चर लग्नावर गृहारंभ केल्यास तो हानिकारक होतो. मेष, कर्क, तूळ, मकर ही चर लग्ने वास्तुच्या शुभकार्याला वर्ज्य आहेत.

गृहप्रवेश करताना चंद्राची दिशा व त्यांचे समोरील दिशा वर्ज्य करुन घराच्या द्वाराने प्रवेश करावा, कृतिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे, अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्वदिशेला किंवा पश्चिम दिशेला असतो म्हणुन या दिशेच्या उलट उत्तर व दक्षिण दिशेने गृहप्रवेश करावा. मघा ते विशाखा व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण दिशेकडे किंवा उत्तरेस असतो या कारणा ने पूर्व किंवा पश्चिम दिशेकडुन गृहप्रवेश करावा.

शुभद्वार करण्यासाठी शुभ नक्षत्रे नेहमी बघण्याची पध्द्त आहे. रवि नक्षत्रा पासुन चार नक्षत्रे शुभ, फ़ल लक्ष्मी प्राती, त्यापुढील आठ नक्षत्रे अशुभ घराच्या चार कोनावर प्रत्येकी दोन-दोन नक्षत्रे अशुभ घरात कोणी राहत नाही, त्यापुढील आठ नक्षत्रे घरावर शुभ व द्वाराचे बाजुस घरात सुख देतात. त्यापुढील तीन नक्षत्रे अशुभ घराच्या उंबरठ्यावर अशुभ मृत्यू, शेवटची चार नक्षत्रे शुभ व मध्यगतीने शुभ फ़ले देतात.

गृहारंभ करताना कुशल विद्वानाला विचारावे व गृहारंभ शुभ मुहूर्तावर करावा अन्यथा अशुभ मुहूर्तावर अथवा आपल्या मनाने शुभ मुहूर्त न पाहता ग्रुहारंभ केला तर ते कार्यत अडचणी, आर्थिक समस्या निर्माण होऊन मानसिक अशांती राहते. म्हणुन वास्तुप्रवेश करताना विचारपुर्वकच करावा व त्यासाठी विद्वानाचे मार्गदर्शन घ्यावे.

संजीव

बुधवार, २३ सप्टेंबर, २००९

मुख्य घरातील देव्हारा व मुख्य दरवाज्या मुळे होणारे दोष:-

वास्तुचे वर्ग शिकवताना आमच्या सौ.च्या परिचयातील एक लीना नावाची बाई आली, आमच्या सौ. ना वास्तुबद्दल माहिती असल्या कारणा ने त्यांनी अगोदरच त्यांच्या घराचा आराखडा काढला होता. आम्ही तो फ़ळ्यावर मांडला, विघ्यार्थि येवढे खोडकर त्यांनी आराखडा काढतानाच त्यांची दु:खे सांगण्यास सुरवात केली.

१. देव्हारा चुकीच्या ठिकाणी असल्या कारणाणे घरात ऎश्र्वर्यहानी, धननाश, पश्चिम वायव्य असल्याने रोगबाधा. वास्तुची रक्तवाहीनी सुभद्रा २५ वे घर रोगस्थान व वास्तु पुरुषाची भुजा असल्याने घरात येणारा पैसा कमी पडणार. यादिशेची लक्ष्मी गजलक्ष्मी असली तरी पुजा करताना ईशान्य दिशेला पाठ म्हणजे संतानलक्ष्मी, परमेश्र्वर दिशास्वामी गुरु, वास्तु पुरुषाचे शिख ( डॊके ), याच्याकडे पाठ. यादिशेची देवता पापाराक्षसी, दिशास्वामी शनी, राशीस्वामी वृश्विक (मंगळ) याची पुजा म्हणजे बघा.

२. घराचे मुख्य द्वार नैऋते पश्चिम असल्याने वास्तुपद १७वे स्थान म्हणजे “पितर” आणि वास्तु पुरुषाचे पाय मुख्य द्वारा कडे येतात.  कन्यारास, राहु व केतु पुतनाराक्षसी, नैऋतीराक्षस ह्याचा अमल घरच्या करत्या पुरुषावर होतो.

३. या दिशेला उतार असल्यास व्यसन, अपकीर्ती, ग्रहपीडा, स्फ़ोटक, पिशाच्चबाधा, भूतप्रेतपीडा; दुष्ट स्त्रियांचा संग, चर्मरोग, मृत्य यांसारखी फ़ले भोगावी लागतात.

४. या भागात मुख्य दरवाजा असेल तर नातेसंबधात तणाव, मुलांच्या क्षिशणात अडथळे, अपघात, मुलांना मानसिक दडपण इत्यादी फ़ळे मिळतात. वास्तुच्या पुर्व दिशाच्या पदातील रक्तवाहीण्या पुर्वदिशेकडे सती, वसुमती, नंदा, सुभद्रा, मनोरमा व आग्नेयदिशेकडे इद, विशोका, ज्वाला, जया, प्रिया ह्याची ह्या वास्तुबाहेर बाहेर गेल्याने वास्तुत हानी. तसेच वास्तुपुरुषाचा हात, भुजा, मणिबंध, बगल, पोट, ऊर ह्या भागातुन वेगळे झालेल्याने त्याचा परिणाम मुख्य करत्या परुषावर झाला. तसेच काळपुरुषाच्या कुंडली प्रमाने अर्ध कर्मस्थान, लाभस्थान, व्ययस्थान, गेल्याने शत्रुपीडा, आपत्ती, कुकर्म, कष्ट, द्रव्यलाभात अडथळे, दीर्घायुष्यात बाधा, सर्वप्रकारच्या लाभात अडथळे, पितृसुख, उघ्योग, राजाकडून मान, नोकरी वरिष्टांची मर्जी, अब्रु, प्रवास, चरितार्थच्या साधनात अडथळे सासु, जानुस्थान इत्यादि लाभा पासुन वचिंत.

५. नैऋत्येचे द्वार पश्चिमभिमुख्य करुन असेल तर मिश्र फ़ले मिळेल. जिना असल्याने शुभ, द्वारासमोर व्हंराडा असल्याने अशुभ,

श्रीमती लीना यांचे यजमानाचा वयाच्या ३५ व्या वर्षी मृत्यू झाला. वरील मजल्या वर सुध्दा मुख्यघर मालकाचा वयाच्या ३८ व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांमुळे श्रीमती लीना ह्यांना आपल्या उपजीवीका चालवण्यास स्त्रियांसाठि सौदर्यं पार्लर सुरु करण्याची वेळ आली. मुलांचे शिक्षणातील लक्ष उडाले. नातेसंबधात तनाव निर्माण झाला.. त्यात कमी म्हणजे ह्या घराला उंबरठा नव्हता. सौ. ह्यांनी तीला सांगुन पहिल्यादा मुख्य द्वाराला लाकडी उंबरठा योग्य मुहुर्तावर बसविला. त्यांमुळे ४०% घरात शांतता आली.
संजीव




सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.

लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे. ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का? या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं. दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्‍यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो. कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू. कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात. प्रत्येक दिशेचा आता विचार करु....

आजचा अभ्यास :- वास्तुचे आयुष काढणे

वास्तुचे आयुष्य = वास्तुची लांबी ३५’-००" X ३५’-००" वास्तुची रुंदी भागीले १२० X ९ = ९१ वर्षे १० महिने १५ दिवस आपल्या घराच्या बांधकामाचे sq feet ( buldup ) काढा व खालील सुत्रा नुसार त्याचे आयुष निश्चित करा? उदा. लांबी X रुंदी भागीले १२० (वर्ष) X ०९ (ग्रह) =