विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा !
बुधवार, २० जानेवारी, २०१०
श्री पंत ( http://dhondopant.blogspot.com/ ) याच्या विनंतीला मान देऊन शोध 'मंत्र पुष्पांजलीच्या' मराठी भाषांतराच्या शोधात असताना सापडलेला दुवा मी आपल्या माहीती साठी देत आहे.
’मंत्रपुष्पांजलि’चा अर्थ (ले० प्रा० माधव ना० आचार्य)
गणपत्युत्सव, श्रीसत्यनारायणाची पूजा व इतर विविध धार्मिक कार्यक्रमांमधील आरत्या-प्रार्थनांच्या भागात आरंभाची गणपतीची “सुखकर्ता दुःखहर्ता” ही आरती आणि शेवटची मंत्रपुष्पांजली यांचा हटकून समावेश असतोच; मग मधल्या इतर आरत्या व प्रार्थना प्रसंगौचित्याप्रमाणे कितीही बदलोत. त्यामुळे प्रारंभीची ती आरती व शेवटची मंत्रपुष्पांजली या दोन्ही आपल्याला बर्यापैकी पाठ असतात. अर्थात मंत्रपुष्पांजलीचे शब्दोच्चार व तिची चाल हे दोन्ही आपण आपापल्या प्रामाणिक (गैर?)समजुतीप्रमाणे ठरवीत असतो, व आपल्यापैकी प्रत्येकालाच आपल्या घरातील उच्चारपद्धती व चालच सर्वात योग्य आहेत अशी खात्री वाटत असते. मात्र अशा प्रकारे तोंडपाठ असणार्या त्यातील मंत्रपुष्पांजलीचा अर्थ मात्र आपल्याला दूरान्वयानेसुद्धा माहित नसतो आणि गंमत म्हणजे बालपणापासून उत्साहाने म्हटल्या जाणार्या या प्रार्थनेचा अर्थ न समजून घेताच आपण तिची बिनडोक घोकंपट्टी करून डोळे मिटून (शब्दशः आणि लाक्षणिक अर्थानेसुद्धा) ती प्रार्थना म्हणतो आहोत हे आपल्या गावीही नसते.
मध्यंतरी आमचा एका तरूण मित्र राममोहन याला अचानक साक्षात्कार झाला आणि हा प्रश्न मनात आला की आपण आयुष्यभर वारंवार ईश्वराला उद्देशून म्हणत आलेल्या या प्रार्थनेचा अर्थ काय? त्याने आमच्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे हा प्रश्न रिंगणात टाकला. आम्ही सर्व मित्रांनी खूप प्रयत्न केले, महाजालावर तपासले, पण समाधानकारक अर्थ काही सापडला नाही. शेवटी आमच्यापैकी सर्वाधिक वयोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध मित्र म्हणजे प्रा० राईलकर यांनी त्यांच्या गावचे (चौलचे) बालपणीपासूनचे मित्र प्रा० मा० ना० आचार्य यांच्याकडून तो अर्थ मिळवला. प्रा० आचार्य संस्कृत आणि मराठीचे प्राध्यापक होते आणि दोन्ही भाषांवर त्यांचे मोठे प्रभुत्व आहे. संस्कृतमधील अनेक पुरातन ग्रंथांचा त्यांनी अभ्यास केलेला असून त्यातील काहींवर त्यांनी लिहिलेल्या टीकात्मक लेखांचे संस्कृत तज्ज्ञांनीही कौतुक केलेले आहे. मंत्रपुष्पांजलीच्या त्यांनी विशद केलेल्या अर्थाच्या छोट्याशा टिपणावरूनसुद्धा त्यांची कुशाग्र बुद्धी, त्यांचा सखोल अभ्यास आणि प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जाऊन तिचा उलगडा करण्याचा स्वभाव यांची चुणूक दिसून येते.
संस्कृत भाषेची आवड आणि आपल्या संस्कृतीबद्दल जिज्ञासा-प्रेम-अभिमान असणार्या मंडळींना हे टिपण नक्कीच आवडेल.
प्रा० मा० ना० आचार्य यांनी प्रस्तुत केलेला मंत्रपुष्पांजलीचा अर्थ खालील दुव्यावर पहावा. किंवा चित्रावर टिचकी मारावी
http://amrutmanthan.files.wordpress.com/2009/11/e0a485e0a4aee0a583e0a4a4e0a4aee0a482e0a4a5e0a4a8-e0a4aee0a482e0a4a4e0a58de0a4b0e0a4aae0a581e0a4b7e0a58de0a4aae0a4bee0a482e0a49ce0a4b2.pdf
मंगळवार, १९ जानेवारी, २०१०
श्री पत्री गणेशाची - पुजा निसर्गाची या २१ प्रकारच्या वनस्पतीची पाने मिळविण्यासाठी तरी निदान गणपती उत्सवाच्या काळात लोक, घराच्या आसपास शेतांमध्ये व जंगलांमध्ये माळरानांवर फिरतात त्यामुळे विशिष्ट झाड कोणत्या ठिकाणी आहे ह्याची त्यांना माहिती होते व अशाप्रकारे प्रत्येक झाडाशी आपले भावनिक नाते जडते.
श्री गणेशाला पुजा करताना लागणारी पत्री
१. मधुमालती २. माका, ३. बेल, ४. पांढर्या दुर्वा, ५. बोर, ६. धोतरा, ७. तुळस. ८. शमी ९. आघाडा, १०. डोरली, ११. कण्हेर, १२. रुई १३. अर्जुन, १४. विष्णुक्रांत, १५. डांळीब, १६. देवदार, १७. पांढरा मरवा, १८. पिंपळ, १९. जाई, २०. केवडा, २१. अगस्ता.
ह्या बद्दल अधिक माहीती साठी श्री प्रकाश काळे मु. मालकरी पाडा- सफाळे, पो. उंबरपाडा, ता. पालघर, जि. ठाणे पिन ४०११०२ ( महाराष्ट्र ) ह्याच्याशी संपर्क साधावा.
संजीव
रविवार, १० जानेवारी, २०१०
राहू व केतू या दोन छेदन बिदूंना फलज्योतिषात तसेच कुष्णमूर्ती शास्त्रात ग्रहांना फार महत्व असते. पृथ्वी व चंद्र यांच्या कक्षा ज्या ठिकाणी छेदतात त्या बिंदूना राहू व केतू अशी संज्ञा दिलेली आहे. राहू व केतू कडे फलज्योतिषांत काही विशिष्ट गोष्टींची जबाबदारी सोपवली आहे. ह्याचा फायदा किंवा तोटा यांचा विचार करून जर का आपण ह्या संधीचा योग्य फायदा करुन घेतला तर जिवनात आपल्याला फार मोठे मानाचे स्थान प्राप्त होईल. सर्वसाधारण आपल्याला कालसर्प योगा बध्दल माहीती असेल किंवा नसेल पण कालसर्पयोग आपल्या जिवनातील अनेक शुभगोष्टी साठी फार महत्त्व पुर्ण मानला जातो.
राहू केतू या ग्रहांचा विचार करता अमृत प्रांशनासाठी देवांच्या रांगेत बसलेल्या विधुवंत राक्षसाचा श्री विष्णूने शिरच्छेद केला. त्यानंतर त्याचे धड राहिले देवतांच्या रांगेत तोच नवग्रहातील केतू ग्रह, राहूचे मित्र बुध, शनि, शुक्र, तर केतूचे मित्र रवी, चंद्र, मंगळ गुरु. कालपुरुषाच्या कुंडलीत ह्या दोन छेदन बिंदू पासून जर रेषा ओढली तर त्या रेषेला राहू केतू अक्ष असे म्हणावे लागेल. या अक्षाच्या एकाच बाजूला म्हणजेच राहू ते केतू किंवा केतू ते राहू पर्यंत ग्रह असतील तर त्यास ज्योतिषशास्त्रात कालसर्प योग म्हणतात. शुन्य अंश ते १८० अंश ह्या मध्ये जर का रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि असे एका रांगेणे ग्रह आले तर त्याला ज्योतिषाच्या भाषेत ग्रहमाला योग असे म्हणतात. जसे गायन वादनात सात स्वर असतात तसेच ग्रहाच्या ग्रहमालेत सात ग्रह एका पाठेपाठ आले तर त्याला ग्रहमाला योग असे म्हणतात. ह्याच योगाला जोतिषाच्या भाषेत "कालर्सप योग" असे म्हणता. जसे संगीतात शेवटी "सा" येतो तसाच कालसर्प योगात "सा" म्हणजे राहू किंवा केतू तो कसा जरी आला तरी तो शेवटीचा किंवा पहीला "सा" तरीपण कालसर्प या योगाची भीती जनमानसात रुढ झाली आहे. संगीतात रागाचा चढ-उतार हा आहे त्या प्रमाणे प्रकृतीचा सुद्घा चढ-उतार हा धर्म आहे. तसाच धर्म या कालर्सप योगाचा भूतलावरील प्रत्येक जातकास त्याचा अनुभव घावा लागतो.
या कालसर्प योगाचा विचार केला तर भावानुसार बारा आणि लग्नबिंदूनुसार बारा १२ X १२ = १४४ उदित भागातील सर्प योगानुसार १४४ आणि अनुदित भागातील सर्प योगानुसारही १४४ असे २८८ प्रकारचे सर्प योग आकारास येतात. जेव्हा सर्प योग राहूपासून केतूपर्यत या अवस्थेत असतो तेव्हा त्याला उदित गोलार्धातील सर्पयोग म्हणतात व केतूपासून राहूपर्यत असा सर्पयोग असतो त्याला अनुदित गोलार्धातील सर्पयोग म्हणतात. जर राहू-केतू मधून एखादाच ग्रह बाहेर असेल तर त्याला अर्धसर्प योग म्हणतात २८८ X ७ = २०१६ प्रकारचे अंशतः कालसर्प योग बनतात.
कालसर्प योग हा नवग्रहातील राहू-केतूमुळे आकारास येतो. राहू, केतू हे आकाशात दिसणारे ग्रह नाहीत. ते गणित सिद्ध बिंदू आहेत. चंद्राची रवी भोवती क्रांतिवृत्तामधून फिरण्याची कक्षा सर्पकार असल्याने त्या कक्षेमधील चलन पावणारे हे पात बिंदू असल्यामुळे या राहू व केतूंना सर्पाकार मानले आहे राहूला सर्पाचे तोंड व केतूला सर्पाची शेपटी असे समजले जाते. सर्पाचे तोंड हे ग्रहणकाली भयानक दिसते व त्याच्या शेपटीत तडाखा मारण्याची प्रचंड शक्ति असते. म्हणून ग्रहण काळात जन्म झालेला असल्यास राहू-केतू बरोबर असणार्या ग्रहांचे अशुभ फल भोगावे लागते. अन्यथा इतर वेळी हाच राहू ऐश्वर्यकारक व केतू मुक्तिकारक म्हणून काम करतो.
कालसर्प योगाचा उल्लेख पाराशरी, सारावली, सर्वार्थ चिंतामणी अशा काही ग्रंथामध्ये ह्या योगा संबधी अधिक माहीती मिळते तसेच श्री व सौ बेलसरे या दोघा उभयतांनी ह्य संबधी बरेच संशोधन केले आहे. तसेच त्याचे लेख ग्रहांकित दिवाळी अंक २००९ मध्ये प्रसिध्द झाले आहेत. कुंडलीच्या १२ स्थानातून १२ प्रकारचे कालसर्प योग तयार होतात ते खालील प्रमाणे आहेत.
१२ प्रकारच्या कालसर्प योगाचे प्रकार आणि त्याचे परिणाम
कालसर्पाचे प्रकार राहू- केतूचे स्थान परिणाम
१.अनंत कालसर्प योग लग्न - सप्तम ( १ आणि ७ ) अतिशय संघर्ष, मानसिक अशांतता.
२.कुलिक कालसर्प योग धन - अष्टम स्थान ( २ आणि ८ ) पैशाचा अपव्यय अधिक, बोलण्यात कटुता,
कौटुंबिक भांडणे, अंतदु:खात
३.वासुकी कालसर्प योग तृतीया - नवम ( ३ आणि ९ ) भावंडाना कष्टदायक, मित्रांमुळे नुकसान,
भाग्योदयात अडथळे.
४.शंखपाल कालसर्प योग चतुर्थ - दशम ( ४ आणि १० ) संतती नसणे, गुंतवणुकीमुळे नुकसान,
नोकरी-उद्योगात नुकसान.
६. महापद्म कालसर्प योग पष्ठ - व्यय ( ६ आणि १२ ) बिंधास्तपणा, नेहमीच जिंकण्याची वृत्ती,
शत्रूंना भय, पैशाची उधळण.
७. तक्षक कालसर्प योग सप्तम - लग्न ( ७ आणि १ ) वैवाहिक जीवनात अशांतता स्वतःचे म्हणे खरे
करण्याची वृत्ती.
८. कार्केटक कालसर्प योग अष्टम - धन ( ८ आणि २ ) वंश परंपरागत धन मिळण्यासाठी भांडणे,
आयुष्यात दुर्घटना अधिक, धननाश
९. शंखचुड कालसर्प योग नवम - तृतीय ( ९ आणि ३ ) भाग्यवृध्दीत अडचणी, वंशवेल वाढवण्यात बाधा,
प्रगती नाही.
१०. घातक कालसर्प योग दशम - चतुर्थ ( १० आणि ४ ) आई-वडिकांपासून दूरत्व, व्यवसायापेक्षा नोकरीत यश.
११. विशधर कालसर्प योग लाभ - पंचम ( ११ आणि ५ ) संघर्षमय सामाजिक जीवन, राजकारणाची विशेष आवड,
अभ्यासात उत्तम प्रगती.
१२. शेषनाग कालसर्प योग व्यय - षष्ठ ( १२ आणि ६ ) गुप्त शत्रूंपासून त्रासझ, आजारांचे निश्चित कारण न
कळणे, बदनामी होणे.
कालसर्प योगात राहू या ग्रहाला महत्त्व दिले आहे. राहू गुरुप्रमाणे द्वितीय, पंचम, सप्तम, नवम या स्थानावर दृष्टी टाकतो. त्यामुळे कालसर्प योगात राहूच्या दृष्टीचा स्थानंच्या फलितावर परिणाम होऊन त्या स्थानाने दर्शविलेल्या गोष्टीत प्रंचड वाढ होते किंवा गडबड घोटाळा निर्माण होतो. उलट केतूने दर्शविलेल्या स्थानाचे अशुभ फलित मिळते.
काही व्यक्तिच्या कुंडलीत हा कालसर्पयोग किती महत्त्वाचा आहे ते आपण अभ्यासून पाहावे. काही व्यक्तिची नावे देत आहे.
कुलिक कालसर्प योग
एडवर्ड हे ६० व्या वर्षी इंग्लंडच्या राज्य सिंहासनावर बसले. राजेश पायलट जन्म गरीब घरण्यात झाला. अतिशय संघर्षमय परिस्थितीत त्यांनी वायुसेनेत प्रवेश मि़ळवला. नंतर राजकरणात प्रवेश करुन केंद्रिय मंत्रीपद मिळवले. धनस्थानातील राहू ऐश्वर्य प्रदान करु शकतो तर धन स्थानातील केतू माणसाला गरिबीत ढकलतो. या नियमामुळे राजेश पायलट गरिबीतून वर आले इतकेच नाही तर ते उच्च अशा आर्थिक स्थितीत पोचले सुध्दा परंतु केतूने आपल्या अष्टम स्थानातील प्रताप त्यांना दाखविला त्याचा दुर्घटनामय मृत्यू झाला.
शंखपाल कालसर्प योग
हर्षद मेहता राहू चतुर्थात आणि केतू दशमात दशमातील केतू मुळे स्वतःनेच रचलेल्या मायाजालात तो फसला. दशम स्थानातील केतुचे अशुभ फलित त्यास कारणीभूत ठरली त्याच्या विरुध्द सचिन तेंडुलकर याच्या पत्रिकेत शंखपाल कालसर्प योग आहे. राहूमुळे स्वकर्तृत्वाने क्रिकेट विश्वात यश आणि प्रसिद्धी मिळून शकला. परंतु दशमातील केतूमुळे त्याला अनेकदा अपयशही आले आहे.
पद्म कालसर्प योग
सर दोराबाजी टाटा पंचम स्थानातील राहूच्या शुभ फलितामुळे हे साते घडत आहे हे निर्विवाद सत्य असले तरी कधी कधी भासणारी पैशाची चणचण, समाजात वावरताना येणारी बंधने यासारखी लाभस्थानाच्या फलितातील कमतरता, या पत्रिकेत केतू लाभस्थानात असल्याने दिसते. नेल्सन मंडेला यांच्या कुंडलीतही हा पद्म कालसर्प योग आहे. केतू सामाजिक पतमध्ये चढ-उतार दर्शवतो.
महापद्म कालसर्प योग
थोर ज्योतिषी बी. रमण यांचे आजोबा पंडित सूर्यनारायण व्यास यांच्या कुंडलीत हा कालसर्प योग आहे
वासुकी कालसर्प योग
उद्योगपती धिरुभाई अंबानी यांच्या कुंडलीत राहू तृतीया स्थानी. अत्यंत गरिबीतून वाटचाल करीत धिरुभाई आणि कोकिलबेन उद्योगविश्वात अत्यंत उच्चपदी आरुढ झाले. केतूमूळे नशिबाची पुण्यसंचयाची पुंजी कमी असल्याने लहानपण गरिबीत गेले. कारण कालसर्पयोगात केतू ज्या स्थानात असेल त्या स्थानात फलितामध्ये कमतरता येते.
शंखपाल कालसर्प योग
हर्षद मेहता राहू चतुर्थात आणि केतू दशमात दशमातील केतू मुळे स्वतःनेच रचलेल्या मायाजालात तो फसला. दशम स्थानातील केतुचे अशुभ फलित त्यास कारणीभूत ठरली त्याच्या विरुध्द सचिन तेंडुलकर याच्या पत्रिकेत शंखपाल कालसर्प योग आहे. राहूमुळे स्वकर्तृत्वाने क्रिकेट विश्वात यश आणि प्रसिद्धी मिळून शकला. परंतु दशमातील केतूमुळे त्याला अनेकदा अपयशही आले आहे.
पद्म कालसर्प योग
सर दोराबाजी टाटा पंचम स्थानातील राहूच्या शुभ फलितामुळे हे साते घडत आहे हे निर्विवाद सत्य असले तरी कधी कधी भासणारी पैशाची चणचण, समाजात वावरताना येणारी बंधने यासारखी लाभस्थानाच्या फलितातील कमतरता, या पत्रिकेत केतू लाभस्थानात असल्याने दिसते. नेल्सन मंडेला यांच्या कुंडलीतही हा पद्म कालसर्प योग आहे. केतू सामाजिक पतमध्ये चढ-उतार दर्शवतो.
महापद्म कालसर्प योग
थोर ज्योतिषी बी. रमण यांचे आजोबा पंडित सूर्यनारायण व्यास यांच्या कुंडलीत हा कालसर्प योग आहे. त्याच्या कुंडलीत राहू षष्ठतून म्हणजे प्रतिस्पर्धा भावातून दशमकर्म द्वादश व्यय उलाढाल आणि द्वितीय म्हणजे उच्चशिक्षणाच्या स्थानावर दृष्टी टाकतो. याचे फलित म्हणजे पंडित सूर्यनारायण व्यास यांनी उज्जैनसारख्या छोट्या गावात राहून विक्रम विश्व विद्यालय, विक्रम कीर्ती मंदिर, सिंधीया प्राच्याविद्या शोध प्रतिष्ठान आणि कालिदार अॅकॅडमी यासारखा महान संस्थाची स्थापना केली इत्यादी... परंतु व्यय स्थानातील केतूमुळे स्वतःसाठी काहीच गुंतवणूक करता आली नाही.
तक्षक कालसर्प योग
सम्राट अकबर याच्या कुंडलीत असायोग होता त्याच्या कुंडलीतील राहू हा नव्या कल्पना आकारास आणणारा ग्रह असल्याने जनता व राज्याच्या उन्नतीसाठी अकबर बादशाहा स्वतः अनेक प्रगतीपर गोष्टीची आखणी करत. पण केतूमुळे यशस्वी सम्राट असलेल्या अकबराचे लहानपण मात्र अत्यंत हलाखीत व वैभहीन गेले. त्याच बरोबर कौटूंबिक कटकटीनाही त्यांना तोंड द्यावे लागले. धर्म आणि तत्त्वनिष्ठेमुळे सलीम आणि जोधाबाई यांच्याबरोबर त्यांचे मतभेद सर्वाना माहीत आहेत.
कार्कोटक कालसर्प योग
प्रसिध्द अभिनेत्री स्मिता पाटील तीच्या कुंडलीत राहू अष्टमात मृत्यू स्थानत होता. केतू धनस्थानात त्याची दुष्टी बघितली तर परधर्मीय व्यक्तिबरोबर विवाह. राहूने आपले कार्य केले व तिला उत्तम अभिनेत्री बनविले परंतु केतुमाहाराजाने तीला सारी सुखे जवळ असताना काही खाऊ दिले नाही तीचा मृत्यू लवकर आला. ( कुंडली पाहून नंतरच राहू व केतूची फळे बघावित नाहीतर नसता गैरसमज होईल )
शंखचूड कालसर्प योग
नवम स्थानात राहू व तृतीय स्थानात केतू श्रीराम कथाकार श्री मुरारी बापू च्या कुंडलीत हा योग आहे. अब्राहम लिंकन संसारी असूनही त्यांचे जिवन समाजासाठी खर्च होते. पण केतू मुळे मुत्यू कसा होईल ते सांगता येणार नाही आश्चर्यकारक घटना घडुशकतात.
घातक / पातक लाकसर्प योग
दशम स्थानात राहू व चतुर्थ स्थानात केतू ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान मार्गारेट थॅचर दुसर्यास उत्तम मार्गदर्शन करुन प्रगतीपथावर चालावयास लावणे. त्याच्या कुंडलीत शश योगाचे फलित म्हणजे कार्यात वाढ झाल्यावर वैयक्तिक जीवनात अधिक लक्ष न देता येणे, परंतु दशमतील राहू हा छत्रधारी असल्याने तो राजकारणी लोकांना शुभ फलित प्रदान करतो. चतुर्थातील केतू मु़ए सुखाचा उपभोग कमी दर्शवितो.
विषधर कालसर्प योग
एकादश स्थानात राहू व पंचम स्थानात केतू असेल तर हा योग होतो कॉग्रेसचे जेष्ठ नेते श्री नारायण दत्त तिवारी सुरुवातीला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री बनलेले पुढे केंद्रिय मंत्रिमंडळात मंत्री झाले. सतत राजनैतिक संकटांचा सामना करावा लागत आहे. दुसरे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जॉर्ज ड्ब्ल्यू बुश ह्या दोघांनी अस्तित्व अबाधित राहण्यासाठी त्यांनी त्यांच्या या कारकितर्तीत घेतलेले निर्ण्य स्तुत्य म्हणावे लागतील.
शेषनाग कालसर्प योग
व्यय स्थानी राहू व षष्ठात केतू हा योग स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या कुंडलीत हा योग प्रामुखाने अभ्यास करण्या सारखा आहे. पुत्र संतती झाली नाही. पत्नीही लवकर सोडून गेली जावयाकडुन दु:ख देशासाठी अनेक वेळा तुरुंगावास झाला.
आजकाल सर्वजन कालसर्प योगाची शांती करण्याचा सल्ला देतात. परंतु हाच कालसर्प योग आपल्याला उच्च स्थानाला घेऊन जात असतो. शांती करण्या पेक्षा ह्या योगाची चागली फळे कशी मिळविता येतील याची अधिक माहीती आपल्या ज्योतिष सल्लागारा कडुन घ्या ही विनंती. तसेच आपली दशा आणि वास्तू सुध्दा आपल्याला सर्व गोष्टीचा लाभ मिळविण्यास कारणीभुत होत असते ह्याची जाणिव सुध्दा लक्षात राहु द्या.
प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात तसेच कालसर्प योगाचेही आहे. ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे जसा अशुभ कालसर्प योग तयार होतो तसा शुभ योग सुध्दा तयार होतो. कुंडलीत सर्पयोग आकारस आल्यावर ग्रह जर राहूच्या मुखात ( राहूकडे ) जात असतील आणि मुखात जाणारा पहिला ग्रह हा त्याच्या मित्र गटातील म्हणजे बुध, शुक्र, शनि यापैकी एक असेल तर तो शुभ मालायोग होतो हे लक्षात घेतले पाहीजे.
संजीव
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)