मंगळ आहे म्हणजे काय व तो कसा सदोष अथवा निर्दोष:-
विवाह जमविताना वधू किंवा वर यांच्या जन्मकुंडलीत १,४,७,८,१२ या स्थानांत मंगळ ग्रह असता मंगळाची पत्रिका म्हणून विवाह जमविण्यास त्याज्य मानली जाते. अगदी अर्वाचीन काळात व चालू युगात तर प्रेमविवाहाला ऊत येऊन त्यास मोठे प्राधान्य प्राप्त झाले आहे. त्यातल्या त्यात मुलामुलींच्या इच्छेशिवाय विवाह करावयाचा नाही, असे पालकांचे धोरणही दिसते. पण मुलामुलीच्या पत्रिकेत मंगळ आहे म्हणून त्यांची डोकेदुखी उत्पन्न होते. विचार करण्याची गोष्ट अशी की, आपण इतिहास, पुराणे वाचतो. त्यात विवाह, प्रेमविवाह करावयाचा म्हटल्यास मंगळाला किती महत्त्व द्यावे ही एक विचार करण्यासारखी बाब आहे. अलिकडे मंगळाचे खूळ अत्यंत वाढले असून त्यामुळे विवाह जमविण्यास अत्यंत कष्ट पडतात. म्ह्णून अनेक विद्वानांनी ग्रंथ लिहिले आहेत. त्यांचे अवलोकन केल असता शेक १५२५ नंतर मंगळाचा दोष मानण्यात येऊ लागला, असे पीयूषधारा या मुहूर्त चिंतामणीवरील टीकेवरुन दिसून येते.
जसा मंगळाचा दोष पाहिला जातो, त्याचप्रमाणे रवी, शनि, राहू व केतू यांचाही दोष पाहाणे अगत्याचे आहे. त्यातल्या त्यात शनीसारख्या पापग्रहाच दोष डोळ्याआड करुन चालणार नाही. कारण शनी मृत्यू देतो. इतर पापग्रहसुद्धा मंगळाप्रामाणेच वैद्यव्य, स्त्रीसुखनाश वगैरे फ़ले देतात. परंतु या गोष्टीकडे आजकाल दुर्लक्ष केले जाते, ही दुर्देवाची गोष्ट आहे.
काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते २,५,१०,११ ही स्थाने मंगळाच्या दोषाची म्हणून मानावीत असे आहे. परंतु या स्थानांवरुन वैधव्य अगर स्त्रीसुखहानीचा विचार केला जात नाही. या स्थानंतील मंगळ फ़ार तर संततिसुख व कौटुंबिक सुख यावर अनिष्ट परिणाम करु शकेल. परंतु द्वितीय स्थान म्हणेजे कुटुंबस्थान शुद्ध असावे असे माझ्या गुरुचे मत आहे. म्हणजे या स्थानांत पापग्रह असू नयेत. कारण त्या पापग्रहाची दृष्टी अष्टम स्थानी पडते. केरळ व मद्रास प्रांतातील ज्योतिषी २,४,७,८,१२ या स्थानांतील मंगळाचा दोष मानतात. आपल्याकडील ज्योतिषी प्रथम स्थानी असलेल्या मंगळाचा दोष मानतात व कुटुंबस्थानात असलेल्या मंगळाचा दोष मानीत नाहीत.
काही विद्वान ज्योतिष्यांच्या मते मंगळाचे दोष पाहण्याचे दोनतीन प्रकार आढळतात. १. चंद्रपासून, २. लग्नापासून, ३. सप्तमेशापासून मंगळ मोजतात. पण यापैकी विश्वसनीय प्रकार कोणता हे कोणीच सांगत नाहीत. पण सर्वेषाम व्यवहारात बहुतेक ज्योतिषी लग्नापासूनच मंगळाचा दोष पाहतात असे दिसून येते.
कुंडलीमध्ये विवाहसौख्याचा विचार करताना प्रामुख्याने सप्तमस्थानाचा विचार करतात, लग्नस्थान, चंद्राचे सप्तमस्थान, शुक्र, शुक्राचे सप्तमस्थान तसेच अभाग्यस्थानही विचारत घ्यावे लागते, प्रमेविवाह योगासाठी पंचमस्थान आणि लाभस्थानही त्या जोडीने पाहावे लागते, प्रेमविवाहचा विचार करताना, कुंडलीत शुक्र आणि मंगळाचा शुभयोग असेल, मग तो कुठल्याही स्थानात असेल तरी त्याची फ़ळे ही मिळतातच. वैवाहिक जीवनातील स्वास्थ्य, सुख, समृद्धी आणि भरभराट यांसाठी गुरु ग्रह लक्षात घ्यावा लागतो. गुरुची लग्न अथवा चंद्र तसेच सप्तमस्थान, पंचमस्थान, भाग्यस्थान अथवा शुक्र यांवर जर शुभदृष्टी असेल तर वैवाहिक स्वास्थ्य निश्चित मिळते. लग्नेश अथवा चंद्र, सप्तमेश, शुक्र भाग्येश, चंद्र, सप्तमेश , शुक्र अथवा भाग्येश याची अंतर्दशा अथावा गुरुच्या महादशेत पंचमेशाची अथवा चंद्राची अंतर्दशा तसेच पंचमेश अथवा चंद्राच्या महादशेतील गुरुची अंतर्दशा हा काळ संततिसौख्याच्या दृष्तीने उत्कर्षाचा काळ ठरतो, लग्न, चंद्र, शुक्र, सप्तमस्थान यांवरुन गोचरेच्या शुभग्रहांचे भ्रमण शुभ फ़लदायी ठरणारे असते. चंद्र , शुक्र, गुरुची गोचर भ्रमणे केंद्रातून अथवा कोनातून होत असतात तेव्हा विवाहसौख्याच्या दृष्तीने शुभ फ़ळे मिळतात. मूळ पत्रिकेत चंद्र-शुक्राचे शुभयोग, चंद्र-गुरुचे शुभयोग अथवा गुरु-शुक्राचे शुभयोग असतील, तर प्रदीर्घ विवाहसौख्य लाभते. सप्तमेश, लग्नेश, भाग्येश चंद्र, शुक्र हे ग्रह शुभ नक्षत्रात पडले असतील, तर वैवाहिक जीवनात प्रदीर्घ स्वास्थ लाभते. साडेसाती नसेल तसेच राहु-केतु, हर्षल , नेपच्यून आदी अशुभ ग्रहांचे भ्रमण चंद्र, शुक्र, लग्न, सप्तम स्थानांतून नसेल असा कालावधी विवाहसौख्याच्या दृष्टीने शुभयोग असतील तरच गोचरेच्या शुभ ग्रहयोगांमध्ये उत्कर्षदायी घटना घडतात.
सप्तमस्थान हे व्यक्तीच्या जीवनावा फार मोठा परिणाम करणारे एक अंत्यंत प्रबल असे स्थान आहे. लग्नस्थान म्हणजे स्वतः व्यक्ति व त्याच्या समोरच असणाए सप्तमस्थान म्हणजे पत्नि. हे स्थान सर्व पकारच्या स्त्री-सौख्याच्या दृष्टीने महत्त्वाचे समजले जाते. मुख्यतः लैगिक भावनांवर परिणाम करणारे हे स्थान असल्याने व्यक्तीला वैवाहिक जोडीदारापासून मिळणार्या शारीरिक, मानसिक, सौख्याचा विचार ह्या स्थानावरुन करतात. व्यक्तीची विवाहबद्दलची मते, स्त्रीयांबद्दलचे/पुरुषाबद्दलचे विचार, त्याचे चारित्र्य, व्याभिचारी वृत्ति, अनैतिक संबंध व्यक्तीची लैगिक ताकद, पुरुषत्व, नपंसकत्व, जोडीदाराचे स्वरुप, रंग, स्वभाव, तसेच पतिपत्नीमधील प्रेम्, आपुलकी अथवा मतभिन्नता, मतवैचिव्य, मत्सर आणि जोडीदारासंबधी दैवी त्रास, आजार, मृत्यू, द्विभार्यायोग, वैधव्य, घटस्फोट अशा नाना गोष्टीचे दर्शन कुंडलीत सप्तमस्थानावरुन होत असते.
ज्योतिषशात्र नव्याने शिकणार्या विद्यार्थ्यानी प्रथम ह्या स्थानांतील ग्रहांचा अभ्यास करावा. त्या ग्रहाच्या नैसर्गिक गुणधर्मानुसार सुखदु:खाचे स्वरुप व तीव्रता अवलंबून असते.सप्तमातील ग्रह व राशीवरुन जोडीदाराच्या रुपाची व स्वरुपाची कल्पना येऊ शकते. सर्वसाधारण रवि, मंगळ, शनि, राहू, हर्षल, नेपच्यून हे ग्रह सप्तमस्थानांत अशुभफलदायी असतात.प्रत्येक ग्रहाचे सप्तमस्थानातील परिणाम पुढील प्रकारणात दिलेले आहेत. सप्तमस्थानातील ग्रह स्वराशीत, उच्च राशीत, मूलत्रिकोणराशीत सामन्यपणे शुभफलदायी असतो. अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह सप्तमांत असता अशुभफलदायी ठरतो. सप्तमभावारंभाजवळ असणारा ग्रह शुभाशुभ परिणाम जास्त तीव्रतेने करतो.
क्रमश......