गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०१०


वर्षातुन एकदाच मध्यरात्री १२:०० वाजता येणारे श्री विष्णूपूजन व पाहाटे ब्रम्हमुहूर्तावर शिवपुजना चे महत्त्व.

दिपावलीच्या शुभेच्छा, आनंद आणि आतिषबाजी यांचा रंगच काही न्यारा असतो. आपल्या आशा पल्लवित करणारा वर्षातून एकदाच शरदऋतुत कार्तिक शुक्लपक्षात " वैकुंठ चतुर्दशी" येते. त्या दिवशी आवळीच्या झाडाखाली विष्णूपुजन केले जाते, ह्या व्रताचा उल्लेख आपणास सहसा शोधुन सापडणार नाही. त्यामुळे हे व्रत लोकप्रिय झालेले नाही. फ़क्त पंचांगात किंवा दैनिक दिनदर्शित ह्या व्रताचा उल्लेख केलेला असतो. पण ही पूजा का करावी? हे व्रत केल्याने आपणास कोणते फायदे होतात. ह्याचा उल्लेख आपणास कुठल्याही लेखात सापडणार नाही.

मी माझ्या कडे येणार्यास जातकांना ह्या व्रता बद्दल सांगून त्यांच्या कडून हे व्रत करुन घेतले आहे. त्याचा फायदा माझ्या जातकांना व त्यांच्या कुटुंबीयांना सुध्दा झालेला आहे. आपण स्वता हे व्रत करुन ह्या व्रताचा अनुभव घ्यावा तसेच दुसर्यां ना ह्या बद्दल माहिती सांगावी ही विनंती.

१९ नव्हेबर,२०१० शुक्रवार रोजी हे व्रत करावयाचे आहे. ह्या दिवशी शनिप्रदोष व वैकुंठ चतुर्दशी एकाच दिवशी आली आहे. ह्या दिवशी सकाळी सुर्योदयाला सूर्याची पूजा करुन संध्याकाळी पुन्हा शिवपूजा करावी. शनिप्रदोषा बद्दल बरीच माहिती प्रसिध्द आहे त्यांमुळे मी प्रदोषा बद्दल लिहीत नाही.
प्रदोष व्रताची सांगता झाल्यानंतर ह्या व्रताची तयारी करावी, (सामानाची यादी खाली दिली आहे) श्री सत्यनारायण पुजेला जो प्रसाद करतो त्याप्रमाणे सव्वाचे माप घेऊन प्रसाद करावा. पुजेला साधारण रात्री ११:०० वाजता सुरुवात करावी, प्रथम गणेश पूजन, नंतर श्री विष्णूपूजन करावे. ( श्री बा़ळकृष्णाची मूर्ती वापरण्यास हरकत नाही ) प्रथम श्री गणेशाला त्यांच्या रिधी सिध्दी सकट घेऊन व नंतर श्रीविष्णु / श्रीबाळकृष्ण ह्यांना अभ्यंग स्नान घालुन पुजेला सुरुवात करावी. जर श्री विष्णुसहस्त्र नाम येत असल्यास ते म्हणावे किंवा श्री विष्णवे नमः हा मंत्र म्हणुन ११ / १०८ / १००८ तुळशीची पाने वहावीत. नंतर नैवैद्य दाखवावा नंतर उपवास सोडावा. हे करत असताना ब्रम्हमुहूर्त ची वेळ होते. त्यावेळी पुन्हा आंघोळ करुन शिवपुजन करावे. ह्या साठी शिवाला बेल व दूधपाण्याचा अभिषेक करावा.
आवळीचे झाड नर्सरीत विकत मिळते ते आणून कुंडीत लावावे साधारण पाच एक वर्ष आपण ह्या झाडाखाली विष्णूपूजनाचा आंनद घेऊ शकतो. त्यांनतर हे झाड आपल्या सोसायटीच्या किंवा आपल्या मालकीच्या जमिनीत लावावेत काही वर्षात आवळे खाण्याचा आंनद आपण व सृष्टीतील प्राणीमात्र ह्याचा उपभोग घेऊ शकतील.
ज्या लोकांना शक्य असेल तर त्यांनी ब्राम्हणा कडून श्री विष्णुपुजन व शिवरुद्र करुन घ्यावा. ज्यांना ही गोष्ट शक्य नसेल त्यांनी आपणास जमेल त्या पध्दतीने श्री विष्णू व शिवाची पुजा करावी पण एक गोष्ट महत्त्वाची हे करताना पुजेआधी संकल्प करणे महत्वाचे आहे.

 
अधिक माहिती साठी संपर्क करा. 9423086763 / 9423086763 ( Video Call 3G )
http://vastuclass.blogspot.com/ Email:- Astro@sancharnet.in / vastuclass.gmail.com


 
श्री विष्णु पूजा यादी --
चौरंग १ आसन ३, लाल पीस १ तांदुळ २ किलो, नारळ ३ फळे ५
विड्याची पाने ३० सुपारी ३०, कलश २ ताम्हण २, पळी-पंचपात्र १ समई २
निरांजन १ कापूर आरती १, अगरबती १ पुडा कापूर १ डबी, काडेपेटी १ वाती , फुलवाती १ पाकीट
अत्तर बाटली १ जान्वे जोड १, हळद - कुंकू १ पाकीट गुलाल १ पाकीट, अभीर १ पाकीट अष्टगंध १ पाकीट
रांगोळी १ पाकीट सुट्टे पैसे १०/- चे, ताट २ वाट्या ८, पातेले १ तेल , तूप पंचाम्रुत
पंचखाद्य गुळ - खोबरे प्रसाद - शिरा,   फुले ( जास्त) , बेल , तुळस, दुर्वा
आंब्याचा डहाळा २ केळीचे खांब ४, सुतळी ४ बंडल आवळीचे झाड किंवा झाडाची फ़ादि
घरातील देव - शंख, घंटा, गणपती, बाळकृष्ण, गुरुजींची महादक्षिणा - ---------- रुपये.
तुळस १००८ किंवा १०८ वेगळी निवडून ठेवणे. प्रसाद तयार करुन ठेवणे.

शनिवार, १३ नोव्हेंबर, २०१०

" अशुभ नेपच्यूनची पत्रिका " विवाह-पत्रिका मिलनासाठी मंगळा इतका महत्त्वाचा नेपच्यून" ग्रह.

          पत्रिका मिलन करताना द्वितीय, चतुर्थ, पंचम, व्ययात जर अशुभ नेपच्यून असेल तर पत्रिकेचा बारकाईने अभ्यास करावा, नेपच्यूनची पत्रिका ज्याप्रमाणे मंगळाचा आपाण पत्रिका

          मिलन करताना मंगळाची पत्रिका या अर्थाने विचार करतो त्याचप्रमाणे नेपच्यूनचाही वैवाहिक आणि कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने विचार करावयास हवा असे सर ( श्री.सुहास डोंगरे ) नेहमी सांगत असतात.

          सर्वसाधारणपणे सुखाचा विचार करताना ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन बाजूंनी विचार करावयाचा असतो. या दोन बाजू तशा भिन्न दिशेच्या आहेत आणि काही अंशी एकमेकात गुरफटलेल्या आहेत  कारण बहुतेकांचं अध्यात्म भरल्यापोटीच असतं.

          नेपच्यूनचा विचार करताना तो कोणत्या स्थानात शुभ आहे. याचा विचार वरील पत्रिकेवरुन कळू शकेल. उदा. पंचम स्थान आणि व्यय स्थान आणि व्यय स्थान हे आध्यात्मिकदृष्ट्या व्यावहारिक दृष्ट्या अशुभ आहे. जेव्हा चतुर्थ स्थान बिघडलं जात, म्हणजे सर्व दृष्टीनी संकटे येतात सुख शोधनही सापडत नाही अशा वेळी विरक्तिचा विचार मनात येणे साहजिकच आहे. पण विरक्ति विवाहच्या आधि की नतंर आहे. हे महत्त्वाचे आहे. विवाहनंतरची जर विरक्ति असेल तर ही विरक्ति शुभ आहे कि अशुभ आहे हा वादग्रस्त मुद्दा होऊ शकतो.
             
      सर नेहमी सांगतात नेपच्यूनच्या ग्रंहाच्या सहवासात येतो त्या ग्रहांची शक्ति खेचून घेऊन नाश करुन, ती शक्ति दुस-या ग्रहाकडे किंवा त्या स्थानाच्या कारकतत्त्वाकडे वळविणाची एक अमोघ शक्ति नेपच्यूनकडे आहे. थोडक्यात Sucker आहे. त्याचप्रमाणे तो Drainer आहे, यामुळेच गोचरी नेपच्यूनचे चतुर्थ  स्थानातील भ्रमण कमालीचे नाट्यमा ठरते. अधिक माहीतीसाठी ज्योतिषाना "नेपच्यून एक अवलिया" या ग्रंथाचा अभ्यास फार महत्वाचा ठरेल.

          नेपच्यून गुप्त कारस्थाने करणारा – पाताळंत्री – अवलिया-गूढ-अद्दभुतेच्या मागे लागणारा – अनाकलनीय घटना – रहस्यमय, नादिष्ट – प्रवासी – भटक्या –व्यसनी – सिनेनाट्या संगीत नृत्य ह्यांची आवड असणारे, मनकवडे, अतीद्रिंय शक्ति असलेले भावनाप्रधान – भावनांच्या आहारी जाणारे, स्पप्नाळू, मादक – लोभस – मोहक – दुस-यावर छाप टाकणारा, भुलवणारा – मायाझाल पसावणारा – हातचलाखी - फ़सवणारा – नजरबंदी दुहेरी व्यक्तिमत्त्वाचा, संत साक्षात्कारी आत्मज्ञानी, कुंडलिनीशक्ति जागृत असणारा, रेकी प्राणीत हिलर, बेधुदं बेफ़िकिरीत जगणारा, समाजाची तमा न बाळगणारा, चित्रविचित्र पोशाख घालणारा, आत्मविश्वास गमवून बसलेला, मादक द्रव्याच्या सेवनाने कर्महानी झालेला, वाया गेलेला, जलतरणपटू, अतीद्रिंय शक्ति – नाँस्ट्रँडेमस किरो – द्रष्टे मंडळी, विश्वबंधुत्त्व, प्रेम, आध्यात्मिक उन्नती वृत्ती, दुस-आचे वाईट न करणारा, सत्संगप्रिय, लबाड-चतुर-ढोंगी-पांखडी-खट्याळ-मानसिक तोल गेलेला.

          नेपच्यून पाँझिटिव्ह असला आणि निगेटिव्ह असला तर काय स्वभाव असू शकतात.चमत्काराच्या पाठीमागे लागलेला, जगावेगळा हौस असलेला मंत्रतंत्रयंत्र तज्ज्ञ, अज्ञाताचा शोध घेणारा, संशोधन विश्वास रमणारा, शारीरिक आणि मानसिक तोल गमावलेला, स्वत:ची उन्नती न जाणण आरा, उत्तुंग यश देणारा, स्वर्गीय स्पर्शाने अलौकिकत्त्व मिळ्वून देणारा. विचित्र रोगी, डाँक्टरांना चुकीचे औषध देण्यास प्रवृत्त करणारा असा हा ग्रह फ़ार मोठ्या प्रमाणात जातकाचा कुंडलीत दोष उपन्न करीत असतो.

          तसेच आज महाराष्ट्र्चा कुंडलीतील नेपच्यून सुध्दा षष्टस्थानात आहे. षष्टस्थानातील  नेपच्यून हा महाराष्ट्राच्या कुंडलीत नक्की काहीतरी गोष्ट घडविणार हे त्रिवार सत्य आहे सध्या गोचरीचा नेपच्यून एकादश म्हणजे ११ व्या स्थानि आहे म्हणजे तो आपल्या व्ययास्थानाच्या व्ययात आहे. व त्यामुळे आता बघा महाराष्ट्राची सत्ता कशी चालते ती?

मंगळवार, २ नोव्हेंबर, २०१०

लग्नातील विक्रमी मंगळ / मंगळाची कुंडली
        वधूवर निश्र्चय पद्धति   भाग ३...          


          आमच्या विद्वान व अत्यंत विचारी आर्य पूर्वजांनी आपल्या विवाह संस्थेचा पाया फार खोल व मजबूज घातला आहे व इतका विचारपूर्वक खोल व मजबूत पाया जगातील इतर कोणत्याही राष्ट्राचे विवाह संस्थेचा आढळणार नाही. अर्थात आमची विवाह संस्था जगातील इतर राष्ट्रांतील सर्व लग्न संस्थापेक्षा अति पवित्र असल्या कारणाने ती तितकीच चिरस्थायी आहे, विशेष उन्नत आहे व विशेष उदात्तही आहे. जगांटील सर्व ऐहीक सुखे प्राप्त व्हावी, धर्म, अर्थ, काम हे तीन पुरुषार्थ सहज साधता येऊन इष्टमित्र, अतिथी अभ्यागत, पशुपक्षी ह्या सारख्या जगांतील लहान मोठ्या प्राण्यांस देववेल तेवढे सुख देता यावे, वेदविहित यज्ञयागादि पुण्यकर्मे करता यावी धर्माची व प्रजेची अभिवृद्धि होऊन आपल्या उभय कुलांतील पूर्वजांचा उद्धार होऊन अंती मोक्ष साधता यावा हेच आमच्या विवाह विधीचे अंतिम साध्य आहे; असे आमचे आर्य पूर्वज सांगत आहेत व ह्याचकरिता आम्हाला विवाह करण्यास सांगितले आहे, किंबहुना आमच्या विवाह संस्थेचे रहस्य ह्यांतच आहे व म्हणून इतर राष्ट्राप्रमाणे आमच्यांतील विवाहसंबंध तोडता येत नाहीत. ( माझे कोठल्याही विवाह संस्थेची / वधूवर मंडळाशी संबध नाहीत )

          आमच्या धर्म शास्त्रात १. ब्राम्ह, २. दैव, ३. आर्य, ४. प्रजापत्य, ५. आसुर, ६. गंधर्व, ७. राक्षस, ८. पैशाच/ पिशाच असे आठ प्रकारचे विवाह सांगितले आहेत. परंतु आज ज्यांच्यात वधुवर पत्रिका संमेलन करुन लग्ने ठरवितात अशा बहुतेक ज्ञातीत ब्राह्मविवाह पद्धत चालू आहे व तीच पद्धत शास्त्रकारांनी उत्तम ठरविली आहे. इतर प्रकारचे विवाह कांही जातीत चालू असतील. ब्राह्मविवाहांत शास्त्राधाराप्रमाणे मुलीचे बापाने वरास आपले घरी बोलावून त्यास आपली उपवर कन्या यथाशक्ति अलंकृत करुन पूर्वी सांगितलेल्या उद्देशाने दान करावयाची असते. परंतु आजकालचे विवाह असे होत नसून त्यांस देवघेवीच्या व्यापाराचे स्वरुप येत चालले आहे! अमुक हुंडा दिला पाहिजे अमुक करणी\मनधरणी केलीच पाहिजे , जाण्यायेण्याचा खर्च दिला पाहिजे वगैरे शैकडो अटी वरपक्षाकडून वधुपक्षास घालण्यत येतात. अजूनही चाल रजिस्टर होण्यापर्यंत गेली नाही हेच आमचे सुदैव होय? व हा प्रकार जुन्या अशिक्षित लोंकापेक्षा नव्या सुशिक्षित व सुधारक म्हणाविर्याे लोकांतच जास्त दिसून येत आहे, व हुंड्याचे मान मुलाची प्रवेश परीक्षा अथवा विश्र्वविद्यालयांटील एक दोन परीक्षा ज्या मानाअने उतरल्या असतील त्या मानाने कमी जास्त होत आहे. ह्याचमुळे कित्येक मुलीचे बाप धुळीस मिळाले आहेत. अशा रीतीने धर्म, कुलाचार वगैरे गुंडाळून स्वार्थपरायण होऊन शास्त्रोक्त विवाहाचे उदात्त तत्त्वास हरताळ फासणे हे आमच्या सुशिक्षित म्हणाविण्यार्याा बंधूस लाजिरवाणॅ नव्हे काय? व ह्याच मुळे कित्येंकास अशा विचित्र गृहिणी मिळाल्या आहेत की, त्या योगाने त्याच्या भावी सुखाच्या आशेची कायमची राख रांगोळी होऊन कसा तरी संसारशकट ओढावा लागत आहे. उलटपक्षी आपले समाजांत अशीही उदाहरणे आढळून येतात की, गरिबीमुळे किंवा द्रव्य लोभमुळे आपल्या सुंदर मुली त्यांच्या वयाच्या व रुपाच्या मानाने जे कोणी जास्त पैसे देतील अशा गरजु उल्लु, उतारवयाच्या वरपशूस, कुरुप किंवा प्रसंगी गुणहीन नवरदेवास केवळ द्रव्य तृष्णेमुळे किंवा दारिद्रावस्था वगैरे अनेक अपरिहार्य अडचणीमुळे अर्पण करुन त्यांच्या संसारसुखाची राख रांगोळी करितात. या गोष्टीकडॅ आमच्या सुशिक्षित बंधु वर्गाचे लक्ष जाईल काय?

          लग्न जमविण्यापूर्वी वधुवरांच्या पत्रिका पहाण्याची चाल हिंदू, जैन व पारशी ह्या लोकात विशेष आढळते व त्या पत्रिका कशा पहाव्या ह्या बद्दलचे विवेचन करण्याचा ह्या लेखात मुख्य उद्देश आहे. वधुवरांच्या पत्रिकांचे गुणमेलन झाल्याखेरीज लग्न करणे हा गौण पक्ष होय असे आमच्यांतील बर्या च लोकांचे मत आहे. पत्रिका जु़ळविणे किंवा वधुवर पत्रिकात प्रीतीयोग होत आहे किंवा नाही हे पहाणे ज्योतिशास्त्राचे काम आहे, हे शास्त्र अनुभवसिद्ध आहे, त्या सहयाने मानवी प्राण्याच्या जीवन चरित्रात काय काय गोष्टी केव्हा आणि कशा घडून येतील ह्यांची बरीच अंशाने कल्पना बांधता येते. मागील अनुभवावरुन भावी गोष्टीवद्दल सावधगिरीने वागणे हा मानवी प्राण्याचा स्वाभाविक धर्मच आहे. परंतु आमच्याकडॅ पत्रिका ज्या साधनावरुन केल्या जातात त्या साधनाची स्थिती कोण शोचनीय आहे ह्याची कल्पनाच करावी लागेते. कित्येक आई बाप फक्त मुलीला अमुक वर्ष असावे अमुक तिथीस इअतके वाज?ण्याचे सुमारास जन्म झाला असावा असे सांगून पत्रिका करवून लग्ने जुळवितात. व कित्येकांची तर ह्यचे पलिकडे धांव असते.

          आपल्या भावी पत्नीचा किंवा पतीचा स्वभाव, आर्युमर्यादा, संतती, संपत्ती वगैरे गोष्टी जाणन्याची प्रत्येकाची इच्छा असते व ती पुष्कळ अंशी याच शास्त्राचे योगाने पूर्ण होते म्हणूनच आमच्या पूर्वजांनी घटित पाहण्याच चाल पाडली असती पाहिजे. पण वरील प्रकाराने आम्ही नुसत्या चालीचा फार्स करुन ह्या शास्त्राची थट्टाच करेत आहो असे मोठ्या कष्टाने म्हणावे लागते. पत्रिकांच्या अभावी कन्या गुणी वरांस देणे ह्या उत्तम मार्ग सोडून खोट्या नाट्या पत्रिका पाहण्याचा उपटसूळ आईवाप आपले खांद्यावर का घेतात ते कळात नाही.

          ज्योतिषशास्त्र दृष्ट्या वधुयरांच्या कुंडल्या जुळवणे हे काम किती नाजुक व महत्त्वाचे आहे व ते किती विचारपूर्वक केले पाहिजे ह्याची अंशतः कल्पना हे लेख वाचतील त्यांस सहज होईल.

          पुष्कळ लोक ज्योतिष्याकडे जाऊन कुंडल्या जमवितेवेळी अमुक एक स्थळ फार चांगले आहे, हुंडा थोडा पडत आहे परंतु मंगळ जरा अनिष्ट आहे तर ह्यास कांही हरकत आहे काय वगैरे गोष्टी सांगून ज्योतिषाला आपल्या तर्फेचे मत देण्यास लावितात, व क्वचितवेळी पत्रिकाही फिरवून घेतात वधुवरांच्या कुंडल्या न पाहता लग्ने करणे हा उत्तम पक्ष होय.

         हल्ली प्रचारात चालू असलेली घटित जुळविण्याची पद्धत फारच अपुरी आहे व तिच्यावर सर्वस्वी अवलंबून राहता येत नाही असे अनुभवास येत आहे, म्हणूनच आज जिकडे तिकडे ज्योतिषशास्त्राची कांही मंडळी टार उडवीत आहेत. ज्योतिषाने ३६ गुण जुळविले असता मुलीस थोड्या अवधीत वैधव्य, घटस्फोट, प्राप्त होते किंवा पतीपत्नीत षडाष्टक आढळले आणि म्हणुनच या शास्त्रावरील लोंकांचा भरवसा दिवसेदिवस कमी होत चालला आहे. हा शास्त्राचा दोष नव्हे तर हल्ली चालू असलेल्या पद्धतीचा व घटित जुळविणाराचा दोष होय, जी पध्दत दोषयुक्त आहे तिच्यापासून चांगले परिणाम पहावयास क्से मिळावे!.

         याकरिता लग्न जुळविणारा ज्योतिषी अति निर्भीड असून स्पष्टवक्तेपणा हा गुण त्याचे अंगांत पूर्णपणे वास करीत असला पाहिजे म्हणजे त्याच हातून योग्य सल्ला मिळून सहसा ज्योतिषशास्त्राच्या विरुद्ध गोष्टी घडणार नाही.

        माझ्या लेखात ब-याच महत्त्वाच्या गोष्टीबद्दल थोडक्यांत विवेचन केलेले आढळेल. अलीकडील समाजाचे स्थिति लक्षात घेतली असतां साधारणपणे मुलाचे लग्न वीस वर्षानंतर व मुलीचे लग्न अठरा वर्षानंतर होते. मुलाचे लग्न अमच्याच वयात झाले पाहिजे असा निर्बध कोठेच आढळत नाही. परंतु गुणी वर मिळाल्याखेरीज कन्येचे लग्न करु नये असे आपले आर्यशास्त्रकार जोराने प्रतिपदन करीत आहेत हल्ली मुलामुलीचे लग्ने योग्य वयाचे बाहेर होत नाहीत.

क्रमंश.........