सोमवार, २१ सप्टेंबर, २००९

आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो.

लक्ष्मी दारातून आत येते किंवा दारातून माघारी जाते. म्हणून वास्तुशास्त्रात दरवाजा अतिशय महत्त्वाचा मानला गेलाय. फक्त दरवाजा जरी वास्तुशास्त्राप्रमाणं असेल तरी अनेक सुपरिणाम मिळतात. संपूर्ण घर रेक्टिफाय करत बसण्यापेक्षा फक्त दरवाजा रेक्टिफाय करणं सोपं, कमी श्रमाचं आणि कमी खर्चाचं आहे. शिवाय इतंकच केलं तरी भाग्योदय होतो. म्हणून दरवाजाचं वास्तुशास्त्र जाणून घेणे गरजेचं आहे. ऊर्जा दोन प्रकारची असते. चांगली आणि वाईट. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. कधी " काय अवदसा घरात आलीय !" असं आपण सहजच म्हणून जातो. मायबोलीतील ही 'अवदसा' म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी. आणि पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे अर्थात लक्ष्मी होय. लक्ष्मी म्हणजे चांगल्या वैश्र्विक ऊर्जेचं घरात आगमन व्हांव म्हणून ज्या मुख्य दरवाजातून लक्ष्मी येते, त्या मुख्य दरावाजाकडे विशेष लक्ष पुरवावं लागतं. घराचा मुख्य दरवाजा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार असेल तर लक्ष्मी घरात येते. म्हणजेच योग, क्षेम, आयु, कल्याण, मांगल्य या पंचपरमेष्ठीची प्राप्ती होते, भाग्यकल्प होतो, असं वास्तुशास्त्रा मानतं. पण मुख्य दरवाजा वस्तुशास्त्राच्या नियमांच्या विपरित असेल तर तो वाईट ऊर्जेला निमंत्रण देतो. घरात 'अवदसा' आल्याची प्रचीती येते. विपरित फळं मिळू लागतात. मुख्य दरवाजा हे आपल्या घराचं मुख आहे. जर मुखच अस्वच्छ, दुर्गंधीयुक्त, जंतुसंसर्ग झालेलं असेल तर तेथून पोटात जाणार्‍या अन्नाची अवस्था काय होईल? जंतू घेऊन आलेलं अन्न आपल्या शरीराचं भरणपोषण करु शकेल का? दूषित ऊर्जा आपल्या घराचं स्वास्थ टिकवू शकेल का? या साठी दरवाजाला उंबरठा असणं अतिशय आवश्यक आहे. हिंदू परंपरेत त्याला मर्यादेचं प्रतीक मानलंय. आयुष्य म्हणजे स्वैराचार नव्हे हेच जणू तो सांगत असतो. फ्लॅट सिस्टिममध्ये उंबरठा गायब झाला. कारण आजकालचं बांधकाम बिल्डरचं हित सांभाळत त्याची पै न पै वाचवत केलं जातं. उंबरठा नसेल तर दरवाजाची चौकट ही चौकट न राहता त्रिकाट होते हे लक्षात घ्या. शिवाय हळूहळू या फ्रेमचा काटकोन कमी होत जातो. उंबरठा नसेल तर घराची सीमारेषाही पूर्ण होते नाही. अर्थात वास्तुपुरुष डिफाइन होत नाही. त्यामुळे घराबाहेरील दोषांचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. दरवाजा चौकोनीच असावा. अर्धवर्तुळाकार नको. अशा घरात कन्याजन्माचं प्रमाण जास्त असतं, दरवाजा त्रिकोणी असेल तर स्त्रीपीडा उद्दभवते. दरवाजाची चौकट पूर्ण असावी. म्हणजेचं लाकडी उंबरठा असावा. हल्ली फ्लॅटमध्ये उंबरठा गायब झालेला असतो. त्यामुळे दरवाजाची आधुनिक शास्त्र सांगतं की घरात प्रवेश करणार्‍या पृथ्वी, सौर व चांद्र ऊर्जेचं संतुलन उंबरठा राखतो. चौकटीसह पूर्ण दरवाजा एकाच प्रकारच्या लाकडाचा असावा. लाकूड पुल्लिंगी झाडाचं वापरावं, दारासाठी दोन कवाड असतील तर डांव कवाड मोठं ठेवावं. त्याला मातृ कवाड तर उजव्या कवाडाला पुत्रिका कवाड अशी संज्ञा आहे. मातृ कवाड पुत्रिका कवाडा॑पेक्षा मोठं असावं. दरवाजा प्रमाणबध्दच असावा. आवाज करणारे, उघडताना अडकणारे, बुटके किंवा अतिउंच, फुगलेले, पातळ, कललेले, तिरके, डाग पडलेले, भेग पडलेले, रंग उडालेले दरवाजे असू नयेत. बृहत्संहिता ग्रंथात म्हटलंय की दरवाजा प्रमाणापेक्षा उंच असेल तर शासनभय आणि प्रमाणापेक्षा कमी असेल तर चोरभय व दु:ख देतो. मध्यभागी विस्तुत असेल ( ओव्हल आकाराचा ) तर हाव वाढवतो. कुब्ज ( उघडण्यास कठीण ) असेल तर कुलनाशक होतो. अतिपीडित ( उंबर्‍यास टेकणारा ) असेल तर गृह्स्वामीस पीडा करतो. घराच्या दिशेनं त्याचा तोल गेलेला असेल तर मृत्यूसारख्या घटना घडतात. बाहेरच्या दिशेनं कललेला असेल तर गृहस्वामीला अकारण प्रवास करावा लावतो. कोणत्याही प्लॉट किंवा भवनाला ३२ प्रकारे दरवाजा काढता येतो. यातील ८ दरवाजे शुभ असतात तर उर्वरित २४ दरवाजे कमी-अधिक अशुभ असतात. या २४ दरवाजांचं अशुभत्व कस कमी करायचं ते आता पाहणार आहोत. प्रथम मुख्य दरवाजे पाहू. कोणत्याही मुख्य दिशेत चुकीच्या पदात दरवाजा असेल तर वाईट फळं देणारच. मग भलेही ती दिशा उत्तर किंवा पूर्व असो. पण असे चुकीच्या पदातील दरवाजे रंग, पिरॅमिड, स्वस्तिक, धातू, दगड आदींचा खुबीनं वापर करीत रेक्टिफाय करता येतात. प्रत्येक दिशेचा आता विचार करु....

आजचा अभ्यास :- वास्तुचे आयुष काढणे

वास्तुचे आयुष्य = वास्तुची लांबी ३५’-००" X ३५’-००" वास्तुची रुंदी भागीले १२० X ९ = ९१ वर्षे १० महिने १५ दिवस आपल्या घराच्या बांधकामाचे sq feet ( buldup ) काढा व खालील सुत्रा नुसार त्याचे आयुष निश्चित करा? उदा. लांबी X रुंदी भागीले १२० (वर्ष) X ०९ (ग्रह) =

२ टिप्पण्या:

अनामित म्हणाले...

nice site bt frst fill in ur profile details
n if possible try 2 create topics in comments as to readers can refer 2 d needed topic ther

वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र मार्गदर्शन शिकवणी वर्ग म्हणाले...

धन्यवाद.... सुचनाची दखल घेतली आहे.
संजीव