५. पंचमदुर्गादेवता श्रीकमलजादेवी - कमलांबा
स्थळ - नृसिंहमंदिर, बलभीम बँकेसमोर, शोवाजी पेठ
परिचय :- भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुराशी युद्ध आरंभले. तेव्हा आपल्या योगिनीगणासह महागौरी सिंहावर बसून युद्धास आली आणि तिने दुर्गासुराचा नाश केला
म्हणून ब्रह्मदेवाने देवीची कमलपुष्पाने महापूजा केली. तेव्हापासून ही गौरी कमलजा नावाने प्रसिध्द झाली.
मूर्तिवर्णन :- कमळावर बसलेली, चतुर्भुज २ फूट उंचीची प्रासादिक मूर्ती.
परिवार देवता:- श्रीनृसिंह , विठ्ठल-रुक्मिणी, महादेव इ.
यात्रा पद्धती :- श्रीदेवीचे विधिवत् दर्शन घेऊन आरती व स्तोत्र म्हणून, नृसिंहदेवाचे दर्शन घेऊन इतर परिवाराचे दर्शन घ्यावे. आपल्या गेलेल्या पितरांच्या मुक्त्तीसाठी देवीची प्रार्थना करावी.
विशेष माहिती :- तत्तीर्थप्रवरं किंतु वर्ण्यते विरजं मया । यत्रेयं विद्यते देवी पद्मजा नाम विश्रुता ॥ विरजतीर्थ तदेव लवणालयं ( लोणारतळे ) तदेव विष्णूगया तत्र पद्मजा । ( कमलजादेवी ) पूर्वी येथे असलेल्या तळ्यास विरजरर्तीर्थ ( लोणारतळे ) म्हणत. हे स्थान लवणालय तसेच पवित्र विष्णूगया म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवकर्मे व पितरांची कर्मे विशेष फलदायी आहेत.
क्रमंश :............
विद्वत्वं च नृपत्वं च नैव तुल्यं कदाचन् | स्वदेशे पूज्यते राजा विद्वान सर्वत्र पूज्यते || Don't judge yourself at all; accept yourself and move on from there. तुम्ही स्वयंदिप व्हा !
गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०
मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०
३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )
स्थळः- पद्मावती मंदिर, जयप्रभा स्टूडिओजवळ.
परिचयः- पद्मा, पद्मालया नावाने प्रसिद्ध. पूर्वी येथे पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चार्या करुन नृसिंहास प्रसन्न करवून पितृदोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान. जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान. अनेकांचे कुलदैवत.
मूर्तिवर्णन :- अडीच फूट उंचीची शेंदूर लावलेली चित्ताकर्षक मूर्ती.
परिवार देवता:- श्रीविष्णू. नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्तिलोपामुद्रा, प्रल्हादेश्र्वर इ.
यात्रा पद्धती :- देवीचे दर्शन घेऊन स्वतःच्या पापमुक्तीची प्रार्थना करुन परिवार देवतांचे दर्शन घ्यावे.
४. चतुर्थदुगदिवी - श्रीप्रियांगी ( प्रत्यंगिरा )
स्थळ :- फिरंगाई मंदिर, प्रि, पद्माराजे हायस्कुल जवळ.
परिचय :- मुक्तात्मा अंगिरस ऋषींकडे भवसागरास विटून मुक्त्तीची इच्छा धरणारा एक भक्त गेला. ऋषी ध्यानस्थ असलेले पाहून शेवटी त्याने मोठा घंटानाद केला. ऋषी समाधी भंगून जागे झाले व त्या भक्त्तास 'तू शिळा ( दगड ) होशील असा शाप दिला, पण त्याची मोक्षजिज्ञासा पाहून आपल्या तपोबळाने ' कल्पांती तुझ्यात बदल होऊन तू शक्त्तीदेवता होषील असे वरदान दिले, हीच प्रत्यंगिरा होय. भक्त्तांस पापभोगामुळे होणारे रोग-पीडा या देवतेच्या उपासनेने नष्ट होतात.
सपरिवारं मे रक्ष । पूजाजपयात्रासेवदिकं कृतं यन्यूनमधिकं वा परिपूर्ण कुरु । संमुखी वरद भव, क्षमस्वापराधमितिप्रार्थयेत् । माझे व कुटुंबाचे रक्षण कर, पूजा, जप, यात्रा, सेवेमधील कमी-जास्त त्रुटी निरसन करून सेवा परिपूर्ण करून घे, माझ्या अपराधाची क्षमा करुन कृपादायी, वरदायी हो'. अशी प्रार्थना करावी. आरतीस्तोत्र म्हणावे. ही कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला पीठ, मीठ अर्पण करतात.
मूर्तिवर्णन :- १० इंच उंचीचा, उभ्या अवस्थेत, शेंदूर लावलेला निर्गुण तांदळा ( शिला ).
परिवार देवता :- कानकोबा, खोकलोबा.
यात्रा पद्धती :- देवीदर्शन घेऊन परिवाराचे दर्शन घ्यावे.
विशेष माहिती :- येथील खोकलोबा देवास, पीठ-मीठ दहिभात ठेवण्याने खोकला जातो व कानकोबाची पूजा करुन २१/११ कानवल्याची मा़ळ देवास घालून देवाचा तीर्थ-अंगारा घेतल्यामुळे समूळ कानाचे रोग नष्ट होतात असा भक्त्तांचा विश्वास आहे.
क्रमशः--

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०
कोल्हापुरातील नवदुर्गांचे महत्त्व
कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. भोग व मोक्ष देणारे आदिमातेचे प्राणप्रिय सिद्धस्थान आहे. या परमपवित्र प्रासादिक क्षेत्रामध्ये अनेक देवता, सत्पुरुष व दानवांनी देखील तपश्चर्या करुन, आपले साध्य व या क्षेत्रात सिद्धता, महत्त्व वाढविले आहे. आपण सर्वजन कोल्हापूरला गेलो तर कोल्हापुरची महालक्ष्मी चे दर्शन घेतल्या शिवाय येत नाही. परंतु कोल्हापुरात महालक्ष्मी शीवाय आणखीन नवदुर्गा आहेत त्याचे सुध्दा दर्शन महत्त्वाचे आहे. त्याची माहीती खाली देत आहे.
श्रीकरवीर महाक्षेत्रातील नवदुर्गांची माहीती.
१. श्रीएकवीरा ( शीदकांबिका ) शक्तिप्रधान, श्री दुर्गेचे पालकस्वरुप सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्वशक्तिगणातील प्रधानदेवता.
स्थळः- दत्तभिक्षालिंगस्थानाजवळ, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, कोल्हापूर.
परिचयः- रेणुका, यल्लमा, रामजननी अशा विविध नावांने प्रसिद्ध. जमदग्नीऋषींची पत्नी व परशुरामाची माता, साडेतीन महाशक्तिपीठातील माहुरगडची देवता, देवीशक्तीतील प्रधान देवता, फक्त मुखवट्याची ( चेहर्याची ) पूजा होते. मात्र या स्थानी ती निर्गुणरुपात आहे. अनेकांची कुळदेवता.
मूर्तिवर्णन :- सुमारे फुटाचा भूमिलगत निर्गुण्-स्वयंभू तांदळ ( शिळा ) परिवार देवता:- भैरव, जोतिबा. यात्रा पद्धती:- एकवीरा, भैरव, जोतिबा दर्शन करुन मंदिराबाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेऊन निघावे.
२. श्रीमूकांबा ( मुक्तांबिका ) :- ज्ञानशक्ती श्री दुर्गेचे ज्ञानमय, मुक्तस्वरुप ज्ञानलाभ करुन संसारचक्रातून मुक्त करणारी
स्थळः- साठमारीमागे, रामकृष्ण्परमहंस मार्ग, विवेकानंदवाचनालय वास्तु, मंगळवार पेठ, कोल्हापूर, शिवाजी स्टेडियम मुख प्रवेश द्वाराजवळ.
परिचयः- मोकांबा नावाने प्रसिद्ध, संसारचक्रातुन मुक्त करते. आद्यशंकराचार्यांची उपास्यदेवता, परशुरामाने स्थापन केलेल्या ७ मुक्तिस्थानातील देवता.
मूर्तिवर्णन :-दिड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भज बैठी मूर्ती, बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवर्या धरल्या आहेत.
परिवारदेवता:- मुक्तेश्वरमहादेव, वराह-नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरावनाथ, काळभैरव.
यात्रा पध्दती:- देवीचे दर्शन घेऊन परिवारदेवतांचे दर्शन घ्यावे व भैरवनाथ, काळभैरवांचे दर्शन घ्यावे.
३. श्रीपद्मवती ( पद्मांबिका ) :- नसिंहशक्ती, श्री दुर्गेचे मुक्तिकार स्वरुप भक्तास सर्वभोग देणारी व पापनाश करणारी.
क्रमश:-

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०
कलियुगातील कल्पतरु
कलियुगात भक्ताला सत्संग व गुरुसेवा या दोन्हीची प्राप्ती कशी होऊ शकते, या बाबतचा कोणता उपाय श्रीपाद वल्लभांनी सुचविला आहे. हा उपाय श्रद्धा व भक्ती या दोन्हीवर आधारीत असल्यामुळे अर्जुनाला भक्ती व भक्तीमार्ग किती श्रेष्ठ आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी ती १० वा अध्याय प्रथम आपण पाहावा. भक्तीचे महत्वाने दैत्याने देवांनाही मागे टाकले. या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. ज्या भक्त प्रल्हादाला जो मोठेपणा मिळाला तो इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. जात वर्ण, कुळ कुठले ही असो मला प्राप्त करुन घेण्यास एक भक्ती पुरेशी आहे.
या नरसिंह अवताराच्या प्रसंगी जेव्हा नरसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडतात त्यावेळेस त्यांच्या नखांना हिरण्यकश्यपूच्या पोटातील विष लागते. त्यामुळे नरसिंहाना तीव्र दाह होऊ लागतो. तो शांत करण्यासाठी त्याण्च्या मागोमाग आलेली लक्ष्मी त्यांना औदुंबराची फळे आणून देते. नरसिंह आपली दाह शांत वाटू लागते. त्यांचा दाह शांत होतो. दाह शांत झाल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात ते लक्ष्मीला आलिंगन देतात, दोन्ही देव औदुंबरवर प्रसन्न होतात व उभयता औदुंबराला आर्शीवाद देतात.
तया समयी औदुंबरासी ! देती वर हषीकेशी । "सदा फळित तू होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ।
जे जन भजती भक्तीसी । काम्य होय त्वरितेसी । तुज देखतांचि परियेसी । ऐ
उग्र विष शांत होय । जे सेवितील मनुष्य लोक । आखिल काम्य ( सर्व इच्छा ) पावोनी ऐक ।
फळ प्राप्त होय निके ( निश्चित ) । पापवेगळा होय नर । वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता ।
जे नर असतिल दैन्यपिडीता । सेवितां होतील श्रेयायुक्त ( श्रीमंत ) । तुझे छायी बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
अनंत फळ होय ज्ञान । कल्पिले फळ होय त्यासी । तुझे छायी जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथी स्नान करित ।
तितके पुण्य परियेसा । तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसी । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होई परियेसा ।
जे जे कल्पूनि मानसी । तुझ सेविती भावेसी । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तुंचि । सदा वसो तुझपाशी । लक्ष्मीसहीत शांतीसी ।
म्हणोनी वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी । ऐसा वृक्ष औदुंबरु । कलियुगी तोची कल्पतरु ।
त्यानंतर म्हणजे सद् गुरु दत्तात्रय अवताराच्या वेळी सुध्दा जेव्हा जेव्हा त्यांना संताप होत असे त्यावेळेला ते औदुंबराच्या खाली वसल्यामुळे त्यांना शांत वाटत असे. दत्तात्रय अवतारात ब्रह्मा, विष्णु, मेहश भक्तजनांच्या मार्गदशेनासाठी तीर्थाटन करताना त्याचा वास नेहमी औदुंबरखाली असे त्यांच्यामुळे ह्या वृक्षाचे फारच महत्व आहे.
गुरु दत्तात्रयाप्रमाणेच गुरु श्रीपाद वल्लभाचे वास्तव्यही नेहमी औदुंबर वृक्षखालीच असे. अवतार काळी कृष्णा नदीच्याकाठच्या नरसोबाचीवाडी या ठिकाणी अशाच एका औदुंबर वृक्षाखाली त्यांचे वास्तव्य असताना, दररोज दुपारच्यावेळी ६४ योगीनी ( जलदेवता ) नदीचे पात्र दुभंगून अवतीर्ण होत असत. त्या श्रीपाद वल्लभांची प्रथम आरती करुन नंतर ह्या नदीच्या पात्राखाली असलेल्या एका नगरात नेत असत. तेथील लोकही त्यांची पुजाअर्चा करुन नंतर त्या योगिनी गुरुंना वेगवेगळ्या पदार्थाचे भोजन देत व नंतर त्यांची पूजा अर्चा करुन परत त्यांना औदुंबर वृक्षाखाली आणून सोडत. असा क्रम बरेच दिवस चालला होता. काही दिवसानंरत गुरु श्रीपाद वल्लभांना आपल्या पुढील कार्यासाठी गाणगापूरला जाण्याची वेळ जवळ आली. त्यावेळेस या जलदेवातांना फार दु:ख झाले. आपल्या हातून घडणारी गुरुसेवा आता खंडीत होणार, ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्या सर्व गुरुचरणी रडू लागल्या. त्यावेळेस त्यांचे सांत्वन करताना श्रीपादवल्लभांनी त्यांना सांगितले, "मी जरी लौकिक दृष्ट्या गाणगापूरला जात असलो तरी माझा इथे सदैव वास असेल. माझ्याप्रमाणेच तुम्हीही इथे वास करावा व जे भक्त येथे काही इच्छा घेऊन येतील त्यांना तुम्ही सहाय्यभूत व्हावे. त्याच्या दर्शनासाठी मी माझ्या पादुका इथे ठेवत आहे. भक्तांनी त्याचे व औदुंबराचे पूजन करुन औदुंवराला अभिशेक करावा."
त्याचप्रमाणे चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी किंवा संक्रातीच्या महिन्यात भक्तीभावपूर्वक स्नान केल्यावर अनंत अश्र्वमेघ केल्याचे पुण्य मिळेल त्याच प्रमाणे सोमवती अमावस्येला या क्षेत्रात स्नान केल्यामुळे खुर व शिंगे सोन्याने मढवीन सहस्त्र कपिल गायी ब्राम्हणाला गंगातीरी दान केल्याचे फळ मिळेल. त्याचप्रमाणे एका ब्राम्हणाला आपण जेवू घातल्यास एक कोटी ब्राम्हणाना भोजन दिल्याचे फळ मिळेल्.औदुंबर वृक्षतळी जप अथवा होम केल्यास ( या ठिकाणी अग्निहोत्रासारखा सोपा होम करावा. ) रुद्र जपोनी - एकादशी ( एकादशिनीचा विधी बहुतेक वे़ळा ब्राम्हण बोलवून करतात ) रुद्र जपसाठी रुद्र गायत्री मंत्र ॐ श्री तत्पुरुक्षाय विदमहे महादेवाय धिमही तन्नो रुद्रा प्रचोदयात.' रुद्र हा प्राणवाचक शब्द आहे. या जपाला सुरवात करावयाच्या आधी जम्त असल्यास कपालभाती व प्राणायाम करावा. जप झाल्यावर फक्त प्राणायाम करावा. त्याच प्रमाणे मंदगतीने प्रदक्षिणा घातल्यास पदोपदी वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते. असे गुरु श्रीपाद वल्लभांनी चौसष्ट योगिनींना औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले व नंतर ते औदुंबर वृक्षाखालीच गाणगापूरात प्रकट होण्यासाठी अंतर्धान पावले.
आधिच्या प्रकरणार शेवटी सांगितल्याप्रमाणे कलियुगातील भक्ताला सत्संग व गुरु सेवा प्राप्त करुन घेण्याचा उपाय गुरुचरित्रातील १९ व्या अध्यायात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत निर्देश केलेला आहे. तो म्हणजे गुरु श्रीपाद वल्लभांच्या नरसोबाच्या वाडीतील औदुंबराअचे प्रतिक म्हणून औदुंबर वृक्षाचे छोटेसे रोप रोपवटिकेमधून विकत आणणे हा होय.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत दिलेल्या सुचनेचा अवलंब लगेचच करण्यात आला होता. त्या काळी बहुतेकांच्या अंगणात, शेतामध्ये, अथवा जागा असेक तेथे हा वृक्ष औदुंबर क्षेत्राचे प्रतिक म्हणून, गुरु दत्तात्रयाचा वास असतो या भावनेने त्याची पूर्जाअर्चा होऊ लागली होती.
कालांतराने नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे सारख्या शहरांची वस्ती वाढू लागली. विभक्त कुटुंब पध्दती प्रचलित होऊ लागली. शहरात जागेची टंचाई असल्यामुळे औदुंबर वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कलीच्या प्रभावाने तर हळूह्ळू हा वृक्ष फारच दुर्मिळ होऊ लागला. परंतु आता सत्संग व गुरुसेवेची प्राप्ती करुन घेण्यासाठी, आपण जसे प्रत्यक्ष गणपतीलाच घरी आणत आहोत या भावनेने गणेशेउत्सवाच्या वेळी जसा आपण गणपती आणतो. त्याचप्रमाणे आपण प्रत्यक्ष सद् गुरु दत्तात्रयांना श्रीपादवल्लभांना विभूती रुअपाने म्हणजेच औदुंबरच्या रुपाने घरी घेऊन येत आहोत या भावनेने छोटे रोप नर्सरीमधून आणावयाचे आहे.
नर्सरी मधून या रोपाबरोबरच बिना खत मिश्रीत माती व शेणखत घेऊन यावे. औदूंबराचे रोप घरात आणल्यावर त्याची माती बदलून टाकावी व मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये नवीन आणलेल्या मातीमध्ये थोडे शेणखत मिसळून हे औदुंबराचे छोटे रोप लावावे. आपल्या इतर इन डोअर फ्लॅट प्रमाणे त्यास सकाळ संध्याकाळ अर्धा तास ऊन द्यावे. ( दोन्ही वेळा ऊन जमत नसल्यास एक वेळ तरी ऊन द्यावे किंवा ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावे ) हे छोटे रोप बोनसाय वगैरे करण्याचा कुठलाही प्रयोग न करता मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये ज्याप्रमाणे आपण हल्ली नारळाचे इन डोअर फ्लॅट ठेवतो, त्याप्रमाणे तीन चार वर्षे पर्यंत हा छोटा कल्पतरु वास्तूमध्ये सहज ठेवू शकतो. तीन वर्षानंतर फारच मोठे होत आहे असे जाणवू लागल्यास; आपल्या गावाकडील घरात, अथवा एखाद्या मंदिरात वगैरे व्यवस्थित लावून टाकावे आपल्या घरासाठी नवीन रोप घेऊन यावे. रोप घरी आणल्यानंतर चार आठ दिवसांनी शुद्ध प्रतिपदा, सोमवार, गुरुवार, संकष्टी अशा एखाद्या चांगल्या दिवशी या वृक्षाची आपल्या घरातील देवाबरोबर प्रथम पूजा करावी. त्या दिवशी ही औदुंबराची कुंडी एखाद्या थाळी अथवा ट्रे मधे ठेवून त्यास पळीने अभिषेक करावा, तुपाचे निरांजन ओवाळून कापूर, उत्तबत्ती वगैरे लावून गणपतीची, पांडुरंगाची व दत्ताची अशा आरत्या म्हणाव्यात.
कामाच्या गडबडीत, बाहेर गाची जाताना, जेव्हा जेव्हा आपल्या घरातील देवच्या पूजेला दांडी असेल, त्या दिवशी व इतर दिवशीही ज्या प्रमाणे आपण आपल्या इतर इन डोअर फ्लँटची काळजी घेतो त्याप्रमाणे काळ्जी घ्यायची आहे. या वृक्षासाठी काही कडक सोव्ळे ओवळ वगैरे न पाळता मनात श्रध्दा भाव व सहजता ठेवावी. शक्यतो गुरुवारी संध्याकाळी किंवा जेवणाच्या आधी गणपतीची व दत्ताची आरती म्हणावी, जमल्यास सणावाराला अभिषेक करावा. पाने स्वच्छ करावीत दोन मिनिटे शांत बसून नंतर चार पाच मनाचे श्लोक म्हणावे एवढ्या उपायांनीही सत्संगाचा लाभ मिळेल. अभिषेक आरते या साधनानी सद् गुरु सेवा घडेल.
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लागे दोषु । धैर्य धरोनी अंतकरण । शुध्द बुध्दी वर्तती जन । दोष न लागती कधी जाण । गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुला न लागे दोषु ( गुरु २ रा )
वर ब्रह्मदेवांनी कलीला सांगितल्याप्रमाणे एकादा घरात गुरुसेवा सुरु झाली की, त्याघरात कलीचा प्रभाव पडू शकत नाही. आपल्या व आपल्या कुटुंबियाच्या अंतकरणात धैर्य आपोआप निर्माण होऊ लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. वास्तूशास्त्र ज्याकडे आपण वास्तूची प्रसन्नता व शांती या हेतूने वळतो तो हेतू कुठलीही भींत न फोडता, स्वयंपाकाचा ओटा कुठेही न हालवता साध्य करता येईल.
ज्याच्या घरात पाळणा हलत नसेल त्यांनी आपल्या घरात जरुर औदुंबर लावावा व त्यास रोज १०८ प्रदक्षिणा घालाव्यात, तसेच श्री गुरुचरीत्राच्या २२ व्या अध्यायाचे रोज पारायण रावे. सुख आणि समृद्धी साठी ह्या वृक्षा समोर गुरुचरित्राचे पारायण करावे.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०
श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले
॥ श्रीअनघादत्तव्रत ॥
सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत.
अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे.
॥ श्री अनघादत्तव्रताची माहिती ॥
व्रत कोणी व केव्हा करावे :- मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस ( किंवा शुद्धाष्टमीस ) " अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रत करावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुअन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे.
हे व्रत का करावे :- ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्याने पापनिरसन व दारिध्रनाश होऊन त्याला दैगीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्ती होते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो.
व्रताची मांडणी :- घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी. यानंतर स्नान करुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठदिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी, ( श्रीअनघादत्त पूजायंत्र व मुर्ती मिळवण्यासाठी संपर्क क्रंमाक श्री सुहास जोशी 9850966297 0231-2624792, पत्ता:- २९१४ ए, वॉर्ड, वांगीबोळ, महाव्दार मार्ग, कोल्हापूर ४१६०१२. श्रीअनघादत्तव्रत मूल्य रु. ३०/-, श्रीदत्तानघालक्ष्मीव्रत मूल्य रु. १५/-, शास्त्रशुध्द श्रीअनघादत्तप्रतिमा मूल्य रु. ५०/-, पंचधातूची मुर्ती रु. ५००/- अधिक टपाल खर्च ) या दत्तपीठाच्या डावीकडे ( आपल्या उजव्या हातास ) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे ( २ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा ) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे.
व्रतसूत्र :- श्रीअनघदत्तात्रेयांच्या मीर्तीजवळ लालदोरा ( व्रतसीत्र ) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमीपूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे. )
व्रतपूजा :- यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीसनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठदिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥ या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे.
पूजाविधीची अधिक माहीती हवी असल्यास वरील दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क करावा
दत्तभक्त संजीव
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)