मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )

स्थळः- पद्मावती मंदिर, जयप्रभा स्टूडिओजवळ.

परिचयः- पद्मा, पद्मालया नावाने प्रसिद्ध. पूर्वी येथे पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चार्या करुन नृसिंहास प्रसन्न करवून पितृदोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान. जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान. अनेकांचे कुलदैवत.

मूर्तिवर्णन :- अडीच फूट उंचीची शेंदूर लावलेली चित्ताकर्षक मूर्ती.

परिवार देवता:- श्रीविष्णू. नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्तिलोपामुद्रा, प्रल्हादेश्र्वर इ.

यात्रा पद्धती :- देवीचे दर्शन घेऊन स्वतःच्या पापमुक्तीची प्रार्थना करुन परिवार देवतांचे दर्शन घ्यावे.

४. चतुर्थदुगदिवी - श्रीप्रियांगी ( प्रत्यंगिरा )

स्थळ :- फिरंगाई मंदिर, प्रि, पद्माराजे हायस्कुल जवळ.

परिचय :- मुक्तात्मा अंगिरस ऋषींकडे भवसागरास विटून मुक्त्तीची इच्छा धरणारा एक भक्त गेला. ऋषी ध्यानस्थ असलेले पाहून शेवटी त्याने मोठा घंटानाद केला. ऋषी समाधी भंगून जागे झाले व त्या भक्त्तास 'तू शिळा ( दगड ) होशील असा शाप दिला, पण त्याची मोक्षजिज्ञासा पाहून आपल्या तपोबळाने ' कल्पांती तुझ्यात बदल होऊन तू शक्त्तीदेवता होषील असे वरदान दिले, हीच प्रत्यंगिरा होय. भक्त्तांस पापभोगामुळे होणारे रोग-पीडा या देवतेच्या उपासनेने नष्ट होतात.

सपरिवारं मे रक्ष । पूजाजपयात्रासेवदिकं कृतं यन्यूनमधिकं वा परिपूर्ण कुरु । संमुखी वरद भव, क्षमस्वापराधमितिप्रार्थयेत् । माझे व कुटुंबाचे रक्षण कर, पूजा, जप, यात्रा, सेवेमधील कमी-जास्त त्रुटी निरसन करून सेवा परिपूर्ण करून घे, माझ्या अपराधाची क्षमा करुन कृपादायी, वरदायी हो'. अशी प्रार्थना करावी. आरतीस्तोत्र म्हणावे. ही कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला पीठ, मीठ अर्पण करतात.

मूर्तिवर्णन :- १० इंच उंचीचा, उभ्या अवस्थेत, शेंदूर लावलेला निर्गुण तांदळा ( शिला ).

परिवार देवता :- कानकोबा, खोकलोबा.

यात्रा पद्धती :- देवीदर्शन घेऊन परिवाराचे दर्शन घ्यावे.

विशेष माहिती :- येथील खोकलोबा देवास, पीठ-मीठ दहिभात ठेवण्याने खोकला जातो व कानकोबाची पूजा करुन २१/११ कानवल्याची मा़ळ देवास घालून देवाचा तीर्थ-अंगारा घेतल्यामुळे समूळ कानाचे रोग नष्ट होतात असा भक्त्तांचा विश्वास आहे.

क्रमशः--

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: