सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

कोल्हापुरातील नवदुर्गांचे महत्त्व

कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. भोग व मोक्ष देणारे आदिमातेचे प्राणप्रिय सिद्धस्थान आहे. या परमपवित्र प्रासादिक क्षेत्रामध्ये अनेक देवता, सत्पुरुष व दानवांनी देखील तपश्चर्या करुन, आपले साध्य व या क्षेत्रात सिद्धता, महत्त्व वाढविले आहे. आपण सर्वजन कोल्हापूरला गेलो तर कोल्हापुरची महालक्ष्मी चे दर्शन घेतल्या शिवाय येत नाही. परंतु कोल्हापुरात महालक्ष्मी शीवाय आणखीन नवदुर्गा आहेत त्याचे सुध्दा दर्शन महत्त्वाचे आहे. त्याची माहीती खाली देत आहे.

श्रीकरवीर महाक्षेत्रातील नवदुर्गांची माहीती.

१. श्रीएकवीरा ( शीदकांबिका ) शक्तिप्रधान, श्री दुर्गेचे पालकस्वरुप सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्वशक्तिगणातील प्रधानदेवता.

स्थळः- दत्तभिक्षालिंगस्थानाजवळ, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, कोल्हापूर.

परिचयः- रेणुका, यल्लमा, रामजननी अशा विविध नावांने प्रसिद्ध. जमदग्नीऋषींची पत्नी व परशुरामाची माता, साडेतीन महाशक्तिपीठातील माहुरगडची देवता, देवीशक्तीतील प्रधान देवता, फक्त मुखवट्याची ( चेहर्‍याची ) पूजा होते. मात्र या स्थानी ती निर्गुणरुपात आहे. अनेकांची कुळदेवता.

मूर्तिवर्णन :- सुमारे फुटाचा भूमिलगत निर्गुण्-स्वयंभू तांदळ ( शिळा ) परिवार देवता:- भैरव, जोतिबा. यात्रा पद्धती:- एकवीरा, भैरव, जोतिबा दर्शन करुन मंदिराबाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेऊन निघावे.

२. श्रीमूकांबा ( मुक्तांबिका ) :- ज्ञानशक्ती श्री दुर्गेचे ज्ञानमय, मुक्तस्वरुप ज्ञानलाभ करुन संसारचक्रातून मुक्त करणारी

स्थळः- साठमारीमागे, रामकृष्ण्परमहंस मार्ग, विवेकानंदवाचनालय वास्तु, मंगळवार पेठ, कोल्हापूर, शिवाजी स्टेडियम मुख प्रवेश द्वाराजवळ.

परिचयः- मोकांबा नावाने प्रसिद्ध, संसारचक्रातुन मुक्त करते. आद्यशंकराचार्यांची उपास्यदेवता, परशुरामाने स्थापन केलेल्या ७ मुक्तिस्थानातील देवता.

मूर्तिवर्णन :-दिड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भज बैठी मूर्ती, बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवर्‍या धरल्या आहेत.

परिवारदेवता:- मुक्तेश्वरमहादेव, वराह-नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरावनाथ, काळभैरव.

यात्रा पध्दती:- देवीचे दर्शन घेऊन परिवारदेवतांचे दर्शन घ्यावे व भैरवनाथ, काळभैरवांचे दर्शन घ्यावे.

३. श्रीपद्मवती ( पद्मांबिका ) :- नसिंहशक्ती, श्री दुर्गेचे मुक्तिकार स्वरुप भक्तास सर्वभोग देणारी व पापनाश करणारी.

क्रमश:-

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: