बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१२

प्रश्नकुंडली म्हणजे ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारला जातो

प्रश्नकुंडली


प्रश्नकुंडली म्हणजे ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारला जातो. त्याच दिवसाची, त्यावेळेची व प्रश्न ज्या ठिकाणी विचारला गेला असेल त्याठिकाणची कुंडली मांडून प्रश्नाची उत्तरे दिली जातात. त्या कुंडलीस प्रश्नकुंडली असे म्हणतात. प्रश्नकुंडली मांडण्याची किंवा तयार करण्याची पद्धत जन्मलग्न कुंडलीप्रमाणेच आहे. मात्र प्रश्नकुंडली वरुन फलादेश व कालनिर्णय केला जातो ते सर्व नियम जन्मलग्न कुंडलीपेक्षा फार वेगळे असतात जन्मलग्नकुंडलीतील ग्रहाचे व राशींचे कारकत्व प्रश्नकुंडलीतही सारखेच असते. थोडक्यात प्रश्नकुंडली ही जन्मकुंडलीचे छोटे भांवड होय. ह्यालाच कृष्णमूर्ती पद्धती या नावाने संबोधले जाते.

प्रश्नकुंडलीची आवश्यकता :-

१. काही वेळा प्रश्नाची उत्सुकता किंवा महत्त्व तसेच जातकाच्या प्रश्नाची तीव्रता जास्त असल्याने तत्काळ फलादेशाची अपेक्षा असते. अशावेळी जातकाकडे जन्मकुंडली नसल्यास प्रश्नकुंडलीची मदत घ्यावी लागते.

२. जेव्हा जातकास स्वतःची प्रश्नकुंडलीची मदत घेऊन त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले जाते.

प्रश्नकुंडलीचे फायदे :-

१. प्रश्नकुंडली ही एक सोपी पद्धत आहे. जन्मकुंडलीप्रमाणे प्रश्नकुंडली मांडण्यास सूक्ष्म गणिताची जरुरी नसते.

२. स्पष्ट ग्रह तसेच सर्वभाव स्पष्ट करुन भावचलीत कुंडली करावयास लागत नाही. त्यामुळे प्रश्नकुंडली मांडण्यास फारच थोडा वेळ लागतो.

प्रश्नकुंडलीच्या मर्यदा:

१. प्रश्नकुंडलीवरुन जातकाच्या दोन किंवा तीन प्रश्नांचीच उत्तरे देता येतात. संपुर्ण जीवनचा फलादेश सांगता येत नाही.

२. जातकाच्या जीवनाशी निगडीत अशाच प्रश्नांची उत्तरे देता येतात.

प्रश्नकुंडलीसाठी इष्टकाळ कसा ठरवावा ?

१. एखाध्या प्रश्नाचा उद्बोध ज्यावेळी जातकाच्या मनामध्ये प्रथम होतो ती वेळ. परंतु व्य्वहाराच्या दृष्टीने अशी वेळ लक्षात ठेवणे किंवा लक्षात येणे अत्यंत कठीण असते. ही वेळ जातकास माहिती नसते. त्यामुळे त्या इष्ट कालावरती ज्योतिषास विसंबुन राहता येत नाही.

२. ज्यावेळी जातक जोतिषास प्रश्न विचारतो ती वेळ.

३) एखादा प्रश्न पत्राव्दारे विचारला गेला असल्यास. नेमका मजकूर ज्यावेळी ज्योतिषी वाचतो ती वेळ.

४. हरवलेल्या वस्तुं संबंधी प्रश्न असल्यास ती वस्तु नेमकी कधी हरवली ती वेळ. काहीवेळा वस्तु हरविल्यानंतर काही तासांनी किंवा काही दिवसांनी जातकाच्या लक्षात येते ती वेळ.

जातक किंवा पृच्छक ज्यावेळी ज्योतिषाला एखादा प्रश्न विचारतो त्यावेळी त्यांच्या चेहर्यातकडे पाहून किंवा त्याच्या हालचाली बघून तो खरोखरच निगडीत असे प्रश्न विचारीत आहे का ते प्रथम ठरवावे. त्यासाठी पुढिल गोष्टी पहाव्यात. जातकाच्या तीन अवस्था असतात.

१. आंनदी अवस्था := ज्यावेळी जातक आनंददायक गोष्टीसंबधी प्रश्न विचारतो त्यावेळी तो ज्योतिषाच्या नजरेला नजर लावून प्रश्न विचारीत असतो.

२. दु:खी अवस्था := या अवस्थेत जातक जनिनीकडे नजर लावून केविल वाण्या अवस्थेत प्रश्न विचारीत असतो

३. विचारी अवस्था := या अवस्थेत पृच्छक आकाशाकडे नजर लावून प्रश्न विचारीत असतो.

प्रश्नकुंडलीवरुन फलादेश देण्यासाठी कोणत्या गोष्टीचे ज्ञान आवश्यक असते.

१. ग्रह, भाव, राशी व नक्षत्रे फलादेश.

२. ग्रह, राशी व भावांचे नैसर्गिक कारकत्व.

३. भावात असलेला ग्रह, भावाचा धिपति, भावाचा कारक ग्रह.

४. भावावर दृष्टी टाकणारे ग्रह.

५. राशी, ग्रह व स्थाने ह्यांच्या दिशा.

६. नक्षत्राच्या लोचनसंज्ञा.

प्रश्नकुंडली वरुन उत्तरे कसे देतात त्याचे नियम :=

१. प्रथम आपल्याला ज्या गोष्टीविषयी किंवा ज्या वस्तुविषयी प्रश्न विचारला असेल ती गोष्ट किंवा वस्तु कोणत्या भावावरुन पाहावे ते ठरविणे.

२. नंतर नेहमीच्या फलादेशाच्या पद्धतीप्रमाणे त्या भावामध्ये असलेला ग्रह, त्या स्थानामध्ये असलेली राशी, त्या स्थानाचा भावेश, भावावरती दृष्टी टाकणारे ग्रह आणि त्या भावाचा कारक ग्रह ह्यांचा विचार करुन फलादेश सांगणे.

३. या सर्व गोष्टींचे लग्नाचे लग्नाशी व लग्नेशाशी होणारे शुभ / अशुभ योग, बलवान / बलहीन स्थिती, शत्रु / मित्रत्व तसेच चंद्राशी होणारे योग यांनाही महत्व द्यावे.

प्रश्नकुंडलीची विश्वसनीयता :=

१. प्रश्नकुंडलीवरुन फलादेश सांगताना इष्टकालावरुन जी कुंडली मांडली जाते ती कुंडली पृच्छकाची असते. या कुंडलीतील लग्नस्थानावरुन पृच्छ्काची असते. या कुंडलीतील लग्नस्थानावरुन पृच्छकाची शरिरयष्टी बांधा व रंग-रुपाचा बोध होतो. जर हे वर्णन जुळत नसेल तर ती कुंडली विश्वसनीय नसते. याउलट जर वरील माहिती जुळली तर प्रश्न्कुंडली विश्वसनीय ठरते.

२. पृच्छकाचा प्रश्न एखाद्या व्यक्तिशी संबधित असेल व ती व्यक्ति कुंडलीतील त्या स्थानावरुन दर्शविली जात असेल; तर त्या स्थानाचा अभ्यास करुन त्या व्यक्तिचे वर्णन करावे ( जमल्यास राफेलच्या अंशाचा वापर करावा जास्त अचूकता येते ) हे वर्णन संबंधित व्यक्तिशी जुळले तर प्रश्नलुंडली विश्वसनीय आहे असे समजावा.

पुढील भाग प्रश्नकुंडलीची कार्यक्षमता, नक्षत्रे, अपेक्षापूर्तियोग. कृष्ण्मूर्ति पध्दतील काही झालेल्या चुकाची सुधारणा.....

संदर्भ :- श्री रविंद्र दत्ताराम धुरी सचिव- संजीवनी वैद्यक ज्योतिष्य संशोधन मंडळ मुंबई. ज्योतिर्विवेक. कृष्णमूर्ति पद्धतीचा बेसिक अभ्यासक्र ( श्री सुनील गोंधळेकर )





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: