मंगळवार, २७ एप्रिल, २०१०

कालसर्पयोगावर प्रभावी तोडगे

१. नियमित शिवाआराधना आणि प्रत्येक महिन्यातून एकदा रुद्रभिषेक करणे.

२. एखाद्या जागृत शिवमंदिरात जाऊन चांदिचा सर्प विधिपूर्वक चढवणे.

३. महाशिवरात्रीला आपल्या वजनाएवढे अन्नदान करणे.

४. कालसर्प॑ ( नागपाश ) यंत्राची प्राणप्रतिष्ठापना करुन त्याचे रोज नियमित पूजन करणे.

५. महामृत्युंजय मंत्राचा सव्वा लाख जप करणे.

६. बटुकभैरव मंत्राचा सव्वा लाख जप करणे.

७. महाशिवरात्री, नागपंचमी, श्रावणी सोमवार वा सोमवती अमावस्येला एखाद्या मंदिरात सोने, चांदि वा पितेळाचा नाग दान करणे.

८. काले तीळ व काळा कपडा बत्तीस भिकार्या,ला दान करणे.

९. ॐ नमः शिवाय या महामंत्राचा रोज १०८ वेळा जप करणे.

१०. सोने, चांदी, तांबे वा अष्टधातूची कालसर्पाची ( सर्पाकृती ) अंगठी धारण करणे.

११. नागपंचमी, महाशिवरात्री तसेच प्रत्येक महिन्यातील दोन पंचम्यांना उपवास व शिवपूजन करणे.

१२. कालसर्प यंत्र गळ्यात धारण करणे.

१३. गोमेद रत्न बसवलेली पंचमुखी रुद्राक्षांची माळ धारण करणे.

१४. नवनाग स्तोत्राचे रोज २१ वेळा पठण करणे.

१५. नवनाग गायत्री मंत्राचे रोज १०८ वेळा पठण करणे.

१६. सर्पमंत्राचे रोज १०८ वेळा पठण करणे.

१७. रोज १०८ वेळा राहूकवच सलग २१ दिवस व रोज एकदा १ वर्षै पठण करणे.

१८. राहूमंत्राचे १०८ वे़ळा पठण करणे.

१९. कालभौरव स्तोत्राचे रोज तीन वेळा रात्री पठण करणे.

२०. रोज राहू यंत्राचे मंत्रसहित पूजन करणे.

२१. कालसर्पदोष मुद्रिका धारण करणे.

२२. कालसर्प निवारक लॉकेट गळ्यात धारण करणे.

२३. रोज रात्री कुंजली स्तोत्राचे पठण करणे.

२४. रोज रात्री तीन वेळा कालीकवच पठण करणे.

२५. राहूचे दान - १ मीटर काळे कापड, अर्धा किलो काळे उडीद, लोखंडाचा तुकडा, काळे तीळ, मूग, तांदूळ, दुर्वा, तीळ्पोळी, खिचडी, गूळ, मुळा, कापूर या वस्तू एका काळ्या कपड्यात गुंडाळून दर अमावस्येला शिवमंदिरात जाऊन ॐ नमः शिवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करुन दान देणे. मंदिर एकच ठेवावे.

२६. मातीच्या तीन भांड्यात क्रमशः काळे उडीद, काळे तीळ आणि दूध-पाणी घेऊन प्रतेक आमावस्येला पिंपळाच्याबुंध्यात ठेवणे व परत येताना मागे वळून न बघणे. घरी आल्यावर आंघोळ करणे.

२७. प्रत्येक बुधवारी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला काळे तीळ, काळे उडीद व दूध ठेवणे.

२८. २१ अमवस्येला तीन केळीच्या पानांवर तीन मूठ भात ठेवणे व त्यावर वरण, मध, दहि, तूप, काळे तीळ आणि तुळसीचे पान ठेवून दक्षिण दिशेला कावळ्याला खायला ठेवणे.

२९. प्रत्येक महिन्याला येणार्याळ दोन पंचम्यांना शिवमंदिरात जाऊन ११ वेळ सर्पसूक्ताचे पठण करणे.

३०. प्रत्येक सोमवारी तांब्याच्या छोटा नाग शिवपिंडीवर ठेवून सर्पसूत्काचे तीन वेळा पठण करणे आणि शिवलिंगाची दूध, पाणी, ११ बेल भस्म व चंदनान्बे विधिवत पूजा करणे.

असे अनेक उपाय आहेत. परंतु उपाय योजना करताना आपल्याला योग्य असा उपाय निवडावा काही कालसर्प योग अतिशय चांगले असतात. ह्याची वाचकानि नोंद घावी.

काही मंडळी हे उपाय न सागता कालसर्प योगाची शांती करण्यास सांगतात. त्या अगोदर आपण वरिल उपाय करुन बघावे किंवा अधिक तोडग्या साठी संपर्क साधावा.

रविवार, १४ मार्च, २०१०

॥ श्री गणेशाय नमः ॥ श्री सरस्वत्यै नम : ॥

श्रीमद्पति शालिवाहन शके १९३२ विकृतिनाम संवत्सर सर्व कार्याची सिध्दी होण्याकरिता श्रीगणेशाची ब्रम्हा, विष्णू आणि महेश्वर यांना नमस्कार करुन संवत्सर फल मी आपणस माझ्या व गुरुच्या आशीर्वादाने कथन करत आहे.

आपण पंचांग हातात घेतले की लगेचच शाली वाहन शक १९३२ विकृति नाम संवत्सर असे आहे. वैदिक वाड्मयात चार वर्षाचे एक युग मानलेले आहे. कृत, त्रेता, द्वापार आणि कली अशी चार युगे अशा ७१ चतुयुगांचे शेवटी 'मनू' आपल्या कालखंडाची समाप्ती करतो. सध्याचे युग कलियुग आहे. या कलियुगात नामजपाला महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच दानधर्माला महत्त्व आहे.

हिंदू धर्मातिल नूतन संवत्सर दर गुडीपांडव्या पासुन प्रांरभ होतो. आपणास माहित असेल किंवा नसेल एकदरीत ६० संवत्सरे आहेत. त्या मधिल विकृतिनाम संवत्सर दिनांक १६ मार्च २०१०, ( शिवराज्याभिषेक शके ३३६-३३७, विक्रम संवत् २०६६-२०६७ शुभकृतनाम संवत्सर कलियुगाची ३१७९ वर्ष झाल्यावर हा शक सुरु झाला. चैत्र शुक्ला प्रतिपदेला शकारंभ झाला. शालिवाहन शकात ७८ किंवा ७९ मि़ळविले तर इ.स. येतो. व इ. सनात १३४ किंवा १३५ मि़ळविले की विक्रम संवत मि़ळतो. ) मंगळवार या दिवसा पासून सुरु होत आहे. या दिवशी घरोघरी ध्वज व तोरणे उभारावी मंगल स्नान करुन नविन वस्त्र अंलकांर परिधान करावे. देव पूजन, गुरुपूजन, ब्राम्हणपूजा करावी. ह्या दिवशी कडुलिंबाच्या पुष्पासह कोवळ्या पानांचे चुर्ण करुन पुढे सांगितलेल्या कृतिने भक्षण करावे म्हणजेच व्याधिचा नाश होऊन सुख्य समृध्दि, विद्या, आयुष्य व लक्ष्मीचा लाभ होतो. कृति मिरे, हिंग, मीठ, अजमोद ( ओवा ) व साखर याच्यांसह कडूलिंबाच्या पुष्पासहित कोवळ्या पानांचे चुर्ण चिंचेत भिजवून / कालवुन भक्षण करावे म्हणजे रोग शांती होते.

अथ श्री शालिवाहन शके १६३२ विकृतिनाम संवत्सर हे २४ वे संवत्सर म्हणून ओळखले जाते ह्याचे गुण म्हणजे निर्धन, वाईट बुध्दिचा, नेहमी भांडण करणार असा शास्त्रात उल्लेख आढळतो. या वर्षी विकृति नावाचे संवत्सर असल्याने राज्यकर्ते जनता यांच्या स्वभावात वरिल प्रमाणे बद्ल होण्यात वेळ लागणार नाही यांची प्रचिती आपणास काल झालेल्या महिला आरक्षणात बघण्यास मिळत आहे. जे विद्यायक विधुर / कुमार होते ते आता लग्नच्या मार्गाने ( स्व:स्वार्थाच्या ) स्वताची खुर्चि व हुकुमत चालवण्यासाठी दुसरे लग्न करण्यास तयार झाले आहेत.

शालिवाहन शके १९३२ विकृति संवत्सर चैत्र २०६७,

शुक्लपक्ष म्हणजे प्रतापी, शीलवान, निर्बल, कलहप्रिय, सुंदर व चपळ पुत्र असलेला. यापक्षात चंद्र सतत वृद्धिंगत होत असतो व पंचमी नंतर बलवान होतो. चंद्राच्या कारकत्त्वात ज्या गोष्टी येतात त्यात नक्किच फरक पडतो.

प्रतिपदा :- सरकारकडून धनप्राप्ती, रुपावान, गुणवान, विद्यासंपन्न, चांगल्या व विविध आभूषणांनी युक्त अशी व्यक्ती या तिथीस जन्मते.

मंगळवार :- क्षीण शरीराचा, सत्वगुणी, पराक्रमी, रणशूर, धनवान, जमीनजुमला असलेला असा होतो.

चैत्र मास :- या महिन्यात जन्म होणारी व्यक्ती लोकहित साधणारी, रुपवान, नम्र आणि अनेक मित्र असलेली.

योग :- शुभ सकाळी १०:२४ पर्यंत आकर्षक वाणीचा, शुभलक्षणी, चांगले कार्य करणारा, चांगला सल्ला देणारा मनुष्य जन्मतो.

त्यानंतर योग शुक्ल :- जितेंद्रिय, सत्यवचनी, रणांगणात विजय मिळवणारा, शुभ्रवस्त्र व फूलमाला धारण करणारा.

करण १ - किंस्तुध्न :- दुसर्या च्या उपयोगी पडणारा, चंचल बुद्धिचा, हास्यप्रिय मनुष्य जन्मतो.

करण २ - बव :- शिलवान, बलवान, कामी, दयाळू, चतुर, भरभर चालणारा व भग्यवंत असा मनुष्य जन्मतो.

नक्षत्र - उत्तराभाद्रपदि :- मीन रास गुरुच्या अंमलाखाली तर हे नक्षत्र शनीच्या अधिपत्याखाली आहे. या नक्षत्रावर जन्म शुभ - समजला जातो. कुलभूषण, श्रद्धळू, परोपकारी धार्मिक, शत्रूंजय, विपूल संतती, उतावळा, सुखी, भाषाचतुर, बोलका, सत्वगुणी, विद्वान, दाता, धनिक, शुभ कर्मे आचारणारा याच्या चेहर्यारवर कुलीनपणाची छाप दिसते. त्या बिद्धिमान व हुशार असतात. हे जलतत्वाचे सुलोचन व मनुष्य गणी नक्षत्र आहे. देवता- आहिर्बुध्न्य, आराध्य वृक्ष कडुलिंब या नक्षत्राला त्यांचे फल उत्तराधीत मिळते.
उत्तरभाद्रपदा हे ४॥ नक्षत्रा पैकी एक पंचक नक्षत्रातील नक्षत्र आहे.

वत्सराधिपती :- मंग़ळ ग्रह आहे. ह्या संवत्सराचा पती मंगळ राजा असल्याने धन, धान्य, वस्त्र आणि द्रव्य यांचा तुटवडा भासेल. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल. पर्जन्य तुरळक होईल. मंत्री बुध असल्याने धनधान्याची वाढ होईल. चतुष्पाद प्राणी पुष्ट होतील. सरकारी वर्ग आनंदी राहील. सरकारी खजिन्यात वाढ होईल. मेद्याधिपती मंगळ असल्याने सोसाट्याच्या वारा सुटेल. आगीची भीती निर्माण होईल, धनधान्य कमी होईल. पाण्याचा तुटवडा भासेल. खरीपाचा स्वमी शुक्र असल्याने पर्जन्य जास्त होईल, धान्य उत्तम पिकेल, दुग्धजन्य पदार्थाची रेलचेल होईल. रशेश रवि असल्याने विहिरी, तळी, धरणे यांमध्ये पाणी कमी राहील. ऊसम तेल, सातू कापूस यांचा नाश होण्याची शक्यता आहे. जनतेत थंडीपासून विकार उत्पन्न होतील.

आपण गुंडीपाडवा शुभ समजुन नविन वास्तुत प्रवेश करतो. तसेच नविन वाहन खरेदि करतो पण ह्या वेळे तसे हा पाडवा काही शुभ नाही. कारण गृहप्रवेश रविवारी व मंगळवारी करुनये असे शास्त्र सांगत आले आहे. त्या मुळे गृहप्रवेशाला हा पांडवा शुभ नाही यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. तसेच नविन वाहन सुदा ह्य दिवशी खरेदि किंवा विकत घेऊ नये असे माझे प्रामाणिक मत आहे.

वाहन खरेदिसाठी मुहुर्त व वास्तुप्रवेश मुहुर्त :-

वाहन विकत घेणे :-
तिथी:- २,३,५,६,७,८,१०,११,१३ व १५ शु. कृ. (१)
वारः- सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार
नक्षत्रे :- अश्विनी, म्रुग,पुनर्वसु, पुष्य, हस्त, चित्रा, स्वाती, श्रवण, धनिष्ठा, शततारका, रेवती.
लग्न : २,३,४,६,७,१२ राशीचे असावे.
रवि व चंद्र यांची नक्षत्रे खरेदीचे दिवशीचे नक्षत्रापासून १०,११,१२,१३,१४,२५,२६,२७
उत्तम. बाकीचे घेऊ नयेत.

वास्तुशांती-गृहारंभ आणि गृहप्रवेश

उक्त महिने - श्रेष्ठ - वैशाख, श्रावण, मार्गशीर्ष, पौष आणि फाल्गुन मध्यम - ( नारद मते ) जेष्ठ, कार्तिक अशुभ फल चाकराचा नाश माघ अशुभ फल अग्निभय मुख्यघर पौष महिन्यात वर्ज्य.

उक्त वार - रविवार, मंगळवार वर्ज्य.
रवि मंगळाच्या राशीची ( १,५,८, ) लग्ने व नवांश वर्ज्य.
शुभ तिथी :- श्रेष्ठ शुद्ध पक्ष २,३,५,७,१०,११,१३,१५
मध्यम कृष्ण पक्ष २,३,५,७,१०,११
रिक्ता तिथी त्याज्य आहेत ( ४,९,१४ )
उक्त नक्षत्रे - श्रेष्ठ - रोहिणी, मृग, उत्तरा, चित्रा, अनुराधा, उत्तराषाढा, उत्तरभाद्रपदा
आणि रेवती एकूण ८ नक्षत्रे.
मध्यम नक्षत्रे - अश्विनी, पुनर्वसु, पुष्य, हस्त, स्वाती, अभिजित, श्रवण, धनिष्ठा,
शततारका एकूण ९ नक्षत्रे.
अशुभ नक्षत्रे - १. धनिष्ठा पंचकातील नक्षत्रे - धनिष्ठा, शततारका, उत्तरा भाद्रपदा,
रेवती यावर खांब उभा करु नये.
२. बाकीची निंद्य नक्षत्रे - भरणीम कृत्तिका, आर्द्रा, आश्लेषा, मघा, पुर्वा (३), विशाखा,
ज्येष्ठा, मूळ एकूण ११ नक्षत्रे.
३. वृषचक्र, कलशचक्र यातील अशुभ नक्षत्रे वर्ज्य, कुर्मचक्रही पाहावे.
४. तिक्ष्ण, उग्र व मिश्र नक्षत्रे सर्वथैव वर्ज्य.
तीक्ष्ण नक्षत्रे - मूळ, जेष्ठा, आर्द्रा, आश्लेषा एकूण चार.
उग्र नक्षत्रे - पूर्वा ३, भरणी, मघा, एकूण पाच.
मिश्र नक्षत्रे - कृत्तिका, विशाखा.

कूर्म चक्र - (१) ज्या तिथीस गृहारंभ करावयाचा त्या तिथीस ५ ने गुणावे (२) कृत्तिका नक्षत्रापासून त्या दिवशीचे नक्षत्र मोजावे व ते वरील गुणाकारात मिळवावे (३) त्या बेरजेत आणखी १२ मिळवावे (४) आलेल्या संख्येस ९ ने भागावे बाकी जर १,४,७, राहिली तर कूर्म जलस्थानी आहे - फल लाभ; २,५,८, राहिली तर कूर्म पृथ्वीवर आहे - फल हानी; ३,६,९, (०) राहिली तर कूर्म आकाशी आहे - फल मरण.

योग व करण - अशुभ योग व करण टाळावे. त्याचा सर्वथैव त्याज्य भाग टाळावा. दु:पंचाग - हे सर्व २१ महादोष वर्ज्य, मृत्युपंचक नसावे.

लग्न शुद्धी -
(१) प्रवेश काळी स्थिर लग्न असावे ( २,५,८,११)
(२) चर लग्न सर्वथैव वर्ज्य ( १,४,७,१० ) आहे.
(३) ३,६,११ स्थानी पाप ग्रह नसावे.
(४) १,४,७,१० स्थानी पाप ग्रह नसावे.
(५) ६,८,१२, ह्या स्थानाखेरीज अन्य स्थानी शुभ ग्रह असावेत ( १,२,५,७,९,१० )
(६) ४,८, स्थानी कोणताही ग्रह नसावा.
(७) लग्नी व ७,८,१२ स्थानी चंद्र नसावा.
(८) गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, बल असावे.
(९) गृहकर्त्याचे जन्म लग्न किंवा जन्म राशीपासून ८ वे लग्न नसावे.
(१०) द्विस्वभाव लग्न मध्यम आहे.

गृहकर्ता - रवि हा गृहकर्ता असतो. चंद्र ही त्याची पत्नी असते. गुरु हे त्याचे सुख असते. शुक्र हे त्याचे घन असते. तेव्हा गृहारंभी, गृहप्रवेशी गृहकर्त्यास रवि, चंद्र, गुरु, शुक्र हे १) अनिष्ट असतील, २) निर्बली असतील, ३) अस्तंगत असतील, ४) नीच असतील तर शुभ फलाचा नाश होतो. गृहसंबधी सर्व कामे कार्ये दिवसा करावीत रात्री करु नयेत.

अधिक मास, क्षय मास, गुरु शुक्र अस्त, सिंहस्थ आणि सर्व अशुभ दिवस वर्ज्य आहेत. गृहप्रवेशाच्या दिवशी काहीजन होम हवण करतात त्यावेळी अग्नि पाहाणे फार महत्त्वाचे आहे तो कसा पाहावा.
अग्नि पाहाणे - शुध्द प्रतिपदादी वर्तमान तिथीपर्यंत मोजून त्यात वाराचा अंक ( रविवार १, सोम २, मंगळ ३... ) आणि १ मिळवावा. त्या संखेस ४ ने भागावे४. बाकी जर ० अगर ३ उरल्यास अग्निवास पृथ्वीवर आहे. शुभफल मिळेल २ उरल्यास अग्निवास पाता़ळात आहे. फल अर्थ नाश होतो. १ उरल्यास अग्निवास आकाशात फल्-प्राण नाश होतो.

वृषचक्र - हे गृह प्रवेश व गृहारंभास अवश्य आहे. ते शुभ असावे. वृषचक्र हे रवि नक्षत्रापासून खालीलप्रमाणे वृषाचे कोणते भागावर ती नक्षत्रे पडतात व त्याचे फल काय हे पाहावे. येथे अभिजित सह २८ नक्षत्रे विचारात घ्यावी.

वृषभाच्या शिर १ ते ३ अशुभ अग्निभय, ४,५,६,७, पुढील पाय अशुभ, उजाड शून्य, ८,९,१०,११ मागील पाय स्थिरता शुभ, १२,१३,१४ पाठ शुभ लक्ष्मी प्राप्ती, १५,१६,१७,१८ उजवी कुस शुभ लाभ, १९,२०,२१, शेपूट अशुभ नाश, २२,२३,२४,२५ डावी कुस अशुभ दारिद्र्य, २६,२७,२८ मुख अशुभ पिडा, म्हणजे रविपासून ८ ते १८ पर्यंत नक्षत्रे शुभ असतात तीच घ्यावीत.

कलश चक्र :- गृहप्रवेशा च्या वेळी आपण जो कलश पुजन करतो तो कलश व त्याचे चक्र ज्या नक्षत्री रवि असेल त्या नक्षत्री कलश ठेवावा, रवि पुढे पहिले नक्षत्र आग लागेल, अशुभ २,३,४,५, पुर्व घर रिकामे पडेल, अशुभ, ६ ते ९ दक्षिण लाभ, १० ते १३ पश्चिम धनप्राप्ती शुभ, १४ ते १७ उत्तर गृहकलह अशुभ १८ ते २१ गर्भ विनाश अशुभ, २२ ते २४ गुद कायम वास होतो. शुभ २५ ते २७ कंठ स्थिरता प्राप्त होते. शुभ गर्भ नक्षत्रावर प्रवेश गर्भातील बालकांचा नाश, म्हणजे ६ ते १३ व २२ ते २७ अशा एकूण १४ नक्षत्रांवर गृहप्रवेश करावा. गृहप्रवेशा वे़ळी शुभ कालश चक्र असावे. सांराश :- रविपासून ८,९,१०,११,१२,१४ ही नक्षत्रे असता त्यावेळी वृष व कलश चक्र असते.

घराचे मुख कोठे करावे - चंद्र ज्या दिशेकडे असेल ती व त्याचे समोरची दिशा वर्ज्य करुन चंद्राचे मुख पहाणेसाठी घराचे द्वाराने प्रवेश करावा.

घराचे मुख १. गृहारंभ समयी असलेल्या नक्षत्रावरुन चंद्र ज्या दिशेला येईल ती दिशा व त्या समोरीची दिशा यांकडे मुखद्वार केले असता किंवा त्यातून प्रवेश केला असता चंद्र त्या द्वाराचे पुढे व मागे येतो. तो अशुभ असतो. त्या दोन्ही दिशा वर्ज्य करुन प्रवेश करावा.

२. जसे कृत्तिका ते आश्लेषा ही सात नक्षत्रे व अनुराधा ते श्रवण ही सात नक्षत्रे असता चंद्र पुर्व व पश्चिम असतो म्हणून प्रवेश दक्षिण किंवा उत्तर द्वाराने करावा.

३. मघा ते विशाखा ही सात नक्षत्रे व धनिष्ठा ते भरणी ही सात नक्षत्रे असता चंद्र दक्षिण व उत्तरेस असतो म्हणून पूर्व किंवा पश्चिम द्वाराने प्रवेश करावा. असे केले असता चंद्र मागे किंवा पुढे येत नाही.
वामार्क - नूतन गृह प्रवेशाचे वेळी सुर्य वामार्क ( डावे हाताकडे ) असावा.

१) गुह प्रवेश मुर्हूर्ताची लग्न कुंडली मांडावी, २) त्यात रवि कोणत्या स्थानी आहे हे पाहावे, ३) तो जर ८,९,१०,११,१२ या स्थानी असेल तर पूर्व द्वाराने गृह प्रवेश करावा. म्हणजे रवि आपले डावे हाताकडे येईल म्हणजेच 'वामार्क' झाला. ४) रवि जर ११,१२,१,२,३, या स्थानी असेल तर उत्तर द्वाराने प्रवेश करावा. ५) रवि जर २,३,४,५,६, या स्थानी असेल तर पश्चिम द्वाराने प्रवेश करावा, ६) रवि जर ५,६,७,८,९, या स्थानी असेल तर दक्षिण द्वाराने प्रवेश करावा.

वरिल नियमावरुन ८,९ स्थानी पूर्व व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात. ११,१२ स्थानी पूर्व व उत्तर असे दोन्ही प्रवेश येतात, २,३, स्थानी उत्तर व पश्चिम असे दोन्ही प्रवेश येतात. ५,६ स्थानी पश्चिम व दक्षिण असे दोन्ही प्रवेश येतात.

द्वार - शुभ द्वार करण्यासाठी ही शुभ नक्षत्रे बघतात. त्यासाठी द्वार चक्रामधील शुभ नक्षत्र घ्यावे त्याची पध्दत अशी - सूर्य नक्षत्रापासून पहिली ४ नक्षत्रे शुभ त्यापुढील ८ नक्षत्रे शुभ त्यापुढील ३ नक्षत्रे अशुभ व शेवटीची ४ नक्षत्रे शुभ होत. स्य्र्य नक्षत्रापासून पहिली नक्षत्रे शिरावर शुभ फल लक्ष्मी प्राप्ती, त्यापुढील ८ नक्षत्रे ४ कोनावर ( प्रत्येक कोनावर ) अशुभ, फलघर ओसाड पडते. त्यापुढील ८ नक्षत्रे द्वाराशयावर म्हणजे द्वाराच्या बाजूस प्रत्येकी ४ शुभ फल घरात सुख पावते, त्यापुढील ३ दहेलीवर ( उंबरठ्यावर ) अशुभ, फल मृत्यू येणे व शेवटची ४ नक्षत्रे मध्यभागी शुभ फल- सुख पावणे.

म्हणून प्रत्येक पंचागात दिलेला शुभ दिवस शुभ असतो असे समजणे फार चुकीचे आहे. तसे पाहीले तर अमावस्येचा दुसरा दिवस हा कर दिन म्हणून सुध्दा समजला जातो. आपण आपल्या सर्व आयुष्याची कमाई आपल्या स्व:ताच्या घरासाठी खर्च करतो आणि सर्वाना सोईचे जाईल म्हणून साडेतीन मुहूर्ता पैकी एक दिवस निवडून किंवा सर्वांना सुट्टी असते म्हणून रविवार निवडतो तेच फार चुकीचे आहे. गृहप्रवेश किंवा वास्तुशांती साठी आपण गाव गोळाकरण्याचा सल्ला मी देत नाही. पहिल्यादा योग्य दिवस व मुहूर्त पाहून वरिल दिलेल्या सुचनाचे पालन करा. सर्व पुजा व्यवस्थित योग्य दिवशी करुन घ्या नंतर आपल्याला हवातो दिवस निवडून सर्वाना खूश करा आणि पाहा आपल्या वास्तुतील आपल्या कुंटुबीयावर झालेला चांगला परिणाम.

हे संवत्सरफल जो श्रवण करील तो वर्षभर सुखी होईल.
॥ इति संवत्सरफलम् ॥ श्रीगणेशार्पणमस्तु ॥ शुभं-भवतु ॥

संजीव नाईक वास्तु आणि ज्योतिष समोपदेशक
बी/३०१ वंदना संदन, मनवेल पाडारोड, विरार पुर्व ४०१३०५
दुरध्वनी क्रंमाक ०२५०-२५२१७९७ / ९४२३०८६७६३ / ९८६९००८२६३

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

५. पंचमदुर्गादेवता श्रीकमलजादेवी - कमलांबा

स्थळ - नृसिंहमंदिर, बलभीम बँकेसमोर, शोवाजी पेठ

परिचय :- भीमाशंकर क्षेत्रावर महादेवांनी दुर्गासुराशी युद्ध आरंभले. तेव्हा आपल्या योगिनीगणासह महागौरी सिंहावर बसून युद्धास आली आणि तिने दुर्गासुराचा नाश केला

म्हणून ब्रह्मदेवाने देवीची कमलपुष्पाने महापूजा केली. तेव्हापासून ही गौरी कमलजा नावाने प्रसिध्द झाली.

मूर्तिवर्णन :- कमळावर बसलेली, चतुर्भुज २ फूट उंचीची प्रासादिक मूर्ती.

परिवार देवता:- श्रीनृसिंह , विठ्ठल-रुक्मिणी, महादेव इ.

यात्रा पद्धती :- श्रीदेवीचे विधिवत् दर्शन घेऊन आरती व स्तोत्र म्हणून, नृसिंहदेवाचे दर्शन घेऊन इतर परिवाराचे दर्शन घ्यावे. आपल्या गेलेल्या पितरांच्या मुक्त्तीसाठी देवीची प्रार्थना करावी.

विशेष माहिती :- तत्तीर्थप्रवरं किंतु वर्ण्यते विरजं मया । यत्रेयं विद्यते देवी पद्मजा नाम विश्रुता ॥ विरजतीर्थ तदेव लवणालयं ( लोणारतळे ) तदेव विष्णूगया तत्र पद्मजा । ( कमलजादेवी ) पूर्वी येथे असलेल्या तळ्यास विरजरर्तीर्थ ( लोणारतळे ) म्हणत. हे स्थान लवणालय तसेच पवित्र विष्णूगया म्हणून प्रसिद्ध आहे. येथे देवकर्मे व पितरांची कर्मे विशेष फलदायी आहेत.

क्रमंश :............

मंगळवार, १६ फेब्रुवारी, २०१०

३. तृतीय दुर्गादेवी- श्रेपद्मावतीदेवी ( पद्मांबा )

स्थळः- पद्मावती मंदिर, जयप्रभा स्टूडिओजवळ.

परिचयः- पद्मा, पद्मालया नावाने प्रसिद्ध. पूर्वी येथे पद्माळे नावाचे तळे होते. येथे भक्त प्रल्हादाने घोर तपश्चार्या करुन नृसिंहास प्रसन्न करवून पितृदोहाचे पाप नष्ट केले. पापाचा नाश करणारे स्थान. जैनधर्मीयांचे श्रद्धास्थान. अनेकांचे कुलदैवत.

मूर्तिवर्णन :- अडीच फूट उंचीची शेंदूर लावलेली चित्ताकर्षक मूर्ती.

परिवार देवता:- श्रीविष्णू. नाईकबा, नागराज, हनुमान, सटवाई, गजेंद्रलक्ष्मी, गणेश, अगस्तिलोपामुद्रा, प्रल्हादेश्र्वर इ.

यात्रा पद्धती :- देवीचे दर्शन घेऊन स्वतःच्या पापमुक्तीची प्रार्थना करुन परिवार देवतांचे दर्शन घ्यावे.

४. चतुर्थदुगदिवी - श्रीप्रियांगी ( प्रत्यंगिरा )

स्थळ :- फिरंगाई मंदिर, प्रि, पद्माराजे हायस्कुल जवळ.

परिचय :- मुक्तात्मा अंगिरस ऋषींकडे भवसागरास विटून मुक्त्तीची इच्छा धरणारा एक भक्त गेला. ऋषी ध्यानस्थ असलेले पाहून शेवटी त्याने मोठा घंटानाद केला. ऋषी समाधी भंगून जागे झाले व त्या भक्त्तास 'तू शिळा ( दगड ) होशील असा शाप दिला, पण त्याची मोक्षजिज्ञासा पाहून आपल्या तपोबळाने ' कल्पांती तुझ्यात बदल होऊन तू शक्त्तीदेवता होषील असे वरदान दिले, हीच प्रत्यंगिरा होय. भक्त्तांस पापभोगामुळे होणारे रोग-पीडा या देवतेच्या उपासनेने नष्ट होतात.

सपरिवारं मे रक्ष । पूजाजपयात्रासेवदिकं कृतं यन्यूनमधिकं वा परिपूर्ण कुरु । संमुखी वरद भव, क्षमस्वापराधमितिप्रार्थयेत् । माझे व कुटुंबाचे रक्षण कर, पूजा, जप, यात्रा, सेवेमधील कमी-जास्त त्रुटी निरसन करून सेवा परिपूर्ण करून घे, माझ्या अपराधाची क्षमा करुन कृपादायी, वरदायी हो'. अशी प्रार्थना करावी. आरतीस्तोत्र म्हणावे. ही कर्मभोगात बदल करणारी सामर्थ्यवान देवता आहे. होला पीठ, मीठ अर्पण करतात.

मूर्तिवर्णन :- १० इंच उंचीचा, उभ्या अवस्थेत, शेंदूर लावलेला निर्गुण तांदळा ( शिला ).

परिवार देवता :- कानकोबा, खोकलोबा.

यात्रा पद्धती :- देवीदर्शन घेऊन परिवाराचे दर्शन घ्यावे.

विशेष माहिती :- येथील खोकलोबा देवास, पीठ-मीठ दहिभात ठेवण्याने खोकला जातो व कानकोबाची पूजा करुन २१/११ कानवल्याची मा़ळ देवास घालून देवाचा तीर्थ-अंगारा घेतल्यामुळे समूळ कानाचे रोग नष्ट होतात असा भक्त्तांचा विश्वास आहे.

क्रमशः--

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१०

कोल्हापुरातील नवदुर्गांचे महत्त्व

कोल्हापूर ही दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे. भोग व मोक्ष देणारे आदिमातेचे प्राणप्रिय सिद्धस्थान आहे. या परमपवित्र प्रासादिक क्षेत्रामध्ये अनेक देवता, सत्पुरुष व दानवांनी देखील तपश्चर्या करुन, आपले साध्य व या क्षेत्रात सिद्धता, महत्त्व वाढविले आहे. आपण सर्वजन कोल्हापूरला गेलो तर कोल्हापुरची महालक्ष्मी चे दर्शन घेतल्या शिवाय येत नाही. परंतु कोल्हापुरात महालक्ष्मी शीवाय आणखीन नवदुर्गा आहेत त्याचे सुध्दा दर्शन महत्त्वाचे आहे. त्याची माहीती खाली देत आहे.

श्रीकरवीर महाक्षेत्रातील नवदुर्गांची माहीती.

१. श्रीएकवीरा ( शीदकांबिका ) शक्तिप्रधान, श्री दुर्गेचे पालकस्वरुप सर्वेच्छा पूर्ण करणारी व सर्वशक्तिगणातील प्रधानदेवता.

स्थळः- दत्तभिक्षालिंगस्थानाजवळ, कॉमर्स कॉलेज, आझाद चौक, कोल्हापूर.

परिचयः- रेणुका, यल्लमा, रामजननी अशा विविध नावांने प्रसिद्ध. जमदग्नीऋषींची पत्नी व परशुरामाची माता, साडेतीन महाशक्तिपीठातील माहुरगडची देवता, देवीशक्तीतील प्रधान देवता, फक्त मुखवट्याची ( चेहर्‍याची ) पूजा होते. मात्र या स्थानी ती निर्गुणरुपात आहे. अनेकांची कुळदेवता.

मूर्तिवर्णन :- सुमारे फुटाचा भूमिलगत निर्गुण्-स्वयंभू तांदळ ( शिळा ) परिवार देवता:- भैरव, जोतिबा. यात्रा पद्धती:- एकवीरा, भैरव, जोतिबा दर्शन करुन मंदिराबाहेरील प्रदक्षिणेच्या वाटेवर श्रीदत्तगुरुंचे दर्शन घेऊन निघावे.

२. श्रीमूकांबा ( मुक्तांबिका ) :- ज्ञानशक्ती श्री दुर्गेचे ज्ञानमय, मुक्तस्वरुप ज्ञानलाभ करुन संसारचक्रातून मुक्त करणारी

स्थळः- साठमारीमागे, रामकृष्ण्परमहंस मार्ग, विवेकानंदवाचनालय वास्तु, मंगळवार पेठ, कोल्हापूर, शिवाजी स्टेडियम मुख प्रवेश द्वाराजवळ.

परिचयः- मोकांबा नावाने प्रसिद्ध, संसारचक्रातुन मुक्त करते. आद्यशंकराचार्यांची उपास्यदेवता, परशुरामाने स्थापन केलेल्या ७ मुक्तिस्थानातील देवता.

मूर्तिवर्णन :-दिड फूट उंचीची काळ्या पाषाणाची चतुर्भज बैठी मूर्ती, बाजूच्या दोन हत्तींनी देवीच्या मस्तकावर चवर्‍या धरल्या आहेत.

परिवारदेवता:- मुक्तेश्वरमहादेव, वराह-नृसिंह-वामन, मत्स्यावतार व कूर्मावतार, भैरावनाथ, काळभैरव.

यात्रा पध्दती:- देवीचे दर्शन घेऊन परिवारदेवतांचे दर्शन घ्यावे व भैरवनाथ, काळभैरवांचे दर्शन घ्यावे.

३. श्रीपद्मवती ( पद्मांबिका ) :- नसिंहशक्ती, श्री दुर्गेचे मुक्तिकार स्वरुप भक्तास सर्वभोग देणारी व पापनाश करणारी.

क्रमश:-

बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

कलियुगातील कल्पतरु
कलियुगात भक्ताला सत्संग व गुरुसेवा या दोन्हीची प्राप्ती कशी होऊ शकते, या बाबतचा कोणता उपाय श्रीपाद वल्लभांनी सुचविला आहे. हा उपाय श्रद्धा व भक्ती या दोन्हीवर आधारीत असल्यामुळे अर्जुनाला भक्ती व भक्तीमार्ग किती श्रेष्ठ आहे हे सांगताना भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात हे जाणून घेण्यासाठी ज्ञानेश्वरी ती १० वा अध्याय प्रथम आपण पाहावा. भक्तीचे महत्वाने दैत्याने देवांनाही मागे टाकले. या भक्तीच्या महिम्याकरिता मला नरसिंह अवतार घ्यावा लागला. ज्या भक्त प्रल्हादाला जो मोठेपणा मिळाला तो इंद्रालाही प्राप्त झालेला नाही. जात वर्ण, कुळ कुठले ही असो मला प्राप्त करुन घेण्यास एक भक्ती पुरेशी आहे.
या नरसिंह अवताराच्या प्रसंगी जेव्हा नरसिंह हिरण्यकश्यपूचे पोट फाडतात त्यावेळेस त्यांच्या नखांना हिरण्यकश्यपूच्या पोटातील विष लागते. त्यामुळे नरसिंहाना तीव्र दाह होऊ लागतो. तो शांत करण्यासाठी त्याण्च्या मागोमाग आलेली लक्ष्मी त्यांना औदुंबराची फळे आणून देते. नरसिंह आपली दाह शांत वाटू लागते. त्यांचा दाह शांत होतो. दाह शांत झाल्यामुळे त्यांना खूप आनंद होतो. आनंदाच्या भरात ते लक्ष्मीला आलिंगन देतात, दोन्ही देव औदुंबरवर प्रसन्न होतात व उभयता औदुंबराला आर्शीवाद देतात.
तया समयी औदुंबरासी ! देती वर हषीकेशी । "सदा फळित तू होसी । 'कल्पवृक्ष' तुझे नाम ।
जे जन भजती भक्तीसी । काम्य होय त्वरितेसी । तुज देखतांचि परियेसी । ऐ
उग्र विष शांत होय । जे सेवितील मनुष्य लोक । आखिल काम्य ( सर्व इच्छा ) पावोनी ऐक ।
फळ प्राप्त होय निके ( निश्चित ) । पापवेगळा होय नर । वांझ नारी सेवा करितां । पुत्र होतील तिसी त्वरिता ।
जे नर असतिल दैन्यपिडीता । सेवितां होतील श्रेयायुक्त ( श्रीमंत ) । तुझे छायी बैसोन । जे जन करिती जपानुष्ठान ।
अनंत फळ होय ज्ञान । कल्पिले फळ होय त्यासी । तुझे छायी जळांत । स्नान करितां पुण्य बहुत । भागीरथी स्नान करित ।
तितके पुण्य परियेसा । तुज सेविती त्या नरासी । व्याधि नव्हती कवणे दिवसी । ब्रह्महत्यादि महादोषी । परिहार होई परियेसा ।
जे जे कल्पूनि मानसी । तुझ सेविती भावेसी । कल्पना पुरती भरंवसी । कलियुगी कल्पवृक्ष तुंचि । सदा वसो तुझपाशी । लक्ष्मीसहीत शांतीसी ।
म्हणोनी वर देती हर्षी । नरसिंहमूर्ति तये वेळी । ऐसा वृक्ष औदुंबरु । कलियुगी तोची कल्पतरु ।
त्यानंतर म्हणजे सद् गुरु दत्तात्रय अवताराच्या वेळी सुध्दा जेव्हा जेव्हा त्यांना संताप होत असे त्यावेळेला ते औदुंबराच्या खाली वसल्यामुळे त्यांना शांत वाटत असे. दत्तात्रय अवतारात ब्रह्मा, विष्णु, मेहश भक्तजनांच्या मार्गदशेनासाठी तीर्थाटन करताना त्याचा वास नेहमी औदुंबरखाली असे त्यांच्यामुळे ह्या वृक्षाचे फारच महत्व आहे.
गुरु दत्तात्रयाप्रमाणेच गुरु श्रीपाद वल्लभाचे वास्तव्यही नेहमी औदुंबर वृक्षखालीच असे. अवतार काळी कृष्णा नदीच्याकाठच्या नरसोबाचीवाडी या ठिकाणी अशाच एका औदुंबर वृक्षाखाली त्यांचे वास्तव्य असताना, दररोज दुपारच्यावेळी ६४ योगीनी ( जलदेवता ) नदीचे पात्र दुभंगून अवतीर्ण होत असत. त्या श्रीपाद वल्लभांची प्रथम आरती करुन नंतर ह्या नदीच्या पात्राखाली असलेल्या एका नगरात नेत असत. तेथील लोकही त्यांची पुजाअर्चा करुन नंतर त्या योगिनी गुरुंना वेगवेगळ्या पदार्थाचे भोजन देत व नंतर त्यांची पूजा अर्चा करुन परत त्यांना औदुंबर वृक्षाखाली आणून सोडत. असा क्रम बरेच दिवस चालला होता. काही दिवसानंरत गुरु श्रीपाद वल्लभांना आपल्या पुढील कार्यासाठी गाणगापूरला जाण्याची वेळ जवळ आली. त्यावेळेस या जलदेवातांना फार दु:ख झाले. आपल्या हातून घडणारी गुरुसेवा आता खंडीत होणार, ही कल्पनाच त्यांना सहन होईना. त्या सर्व गुरुचरणी रडू लागल्या. त्यावेळेस त्यांचे सांत्वन करताना श्रीपादवल्लभांनी त्यांना सांगितले, "मी जरी लौकिक दृष्ट्या गाणगापूरला जात असलो तरी माझा इथे सदैव वास असेल. माझ्याप्रमाणेच तुम्हीही इथे वास करावा व जे भक्त येथे काही इच्छा घेऊन येतील त्यांना तुम्ही सहाय्यभूत व्हावे. त्याच्या दर्शनासाठी मी माझ्या पादुका इथे ठेवत आहे. भक्तांनी त्याचे व औदुंबराचे पूजन करुन औदुंवराला अभिशेक करावा."
त्याचप्रमाणे चंद्र सूर्य ग्रहणाच्या दिवशी किंवा संक्रातीच्या महिन्यात भक्तीभावपूर्वक स्नान केल्यावर अनंत अश्र्वमेघ केल्याचे पुण्य मिळेल त्याच प्रमाणे सोमवती अमावस्येला या क्षेत्रात स्नान केल्यामुळे खुर व शिंगे सोन्याने मढवीन सहस्त्र कपिल गायी ब्राम्हणाला गंगातीरी दान केल्याचे फळ मिळेल. त्याचप्रमाणे एका ब्राम्हणाला आपण जेवू घातल्यास एक कोटी ब्राम्हणाना भोजन दिल्याचे फळ मिळेल्.औदुंबर वृक्षतळी जप अथवा होम केल्यास ( या ठिकाणी अग्निहोत्रासारखा सोपा होम करावा. ) रुद्र जपोनी - एकादशी ( एकादशिनीचा विधी बहुतेक वे़ळा ब्राम्हण बोलवून करतात ) रुद्र जपसाठी रुद्र गायत्री मंत्र ॐ श्री तत्पुरुक्षाय विदमहे महादेवाय धिमही तन्नो रुद्रा प्रचोदयात.' रुद्र हा प्राणवाचक शब्द आहे. या जपाला सुरवात करावयाच्या आधी जम्त असल्यास कपालभाती व प्राणायाम करावा. जप झाल्यावर फक्त प्राणायाम करावा. त्याच प्रमाणे मंदगतीने प्रदक्षिणा घातल्यास पदोपदी वाजपेय यज्ञ केल्याचे फळ मिळते. असे गुरु श्रीपाद वल्लभांनी चौसष्ट योगिनींना औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले व नंतर ते औदुंबर वृक्षाखालीच गाणगापूरात प्रकट होण्यासाठी अंतर्धान पावले.
आधिच्या प्रकरणार शेवटी सांगितल्याप्रमाणे कलियुगातील भक्ताला सत्संग व गुरु सेवा प्राप्त करुन घेण्याचा उपाय गुरुचरित्रातील १९ व्या अध्यायात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत निर्देश केलेला आहे. तो म्हणजे गुरु श्रीपाद वल्लभांच्या नरसोबाच्या वाडीतील औदुंबराअचे प्रतिक म्हणून औदुंबर वृक्षाचे छोटेसे रोप रोपवटिकेमधून विकत आणणे हा होय.
स्वातंत्र्यपूर्व काळात गुरु श्रीपाद वल्लभांनी थोड्याशा सूक्ष्मांत दिलेल्या सुचनेचा अवलंब लगेचच करण्यात आला होता. त्या काळी बहुतेकांच्या अंगणात, शेतामध्ये, अथवा जागा असेक तेथे हा वृक्ष औदुंबर क्षेत्राचे प्रतिक म्हणून, गुरु दत्तात्रयाचा वास असतो या भावनेने त्याची पूर्जाअर्चा होऊ लागली होती.
कालांतराने नोकरी धंद्याच्या निमित्ताने मुंबई, पुणे सारख्या शहरांची वस्ती वाढू लागली. विभक्त कुटुंब पध्दती प्रचलित होऊ लागली. शहरात जागेची टंचाई असल्यामुळे औदुंबर वृक्षाकडे दुर्लक्ष होऊ लागले. कलीच्या प्रभावाने तर हळूह्ळू हा वृक्ष फारच दुर्मिळ होऊ लागला. परंतु आता सत्संग व गुरुसेवेची प्राप्ती करुन घेण्यासाठी, आपण जसे प्रत्यक्ष गणपतीलाच घरी आणत आहोत या भावनेने गणेशेउत्सवाच्या वेळी जसा आपण गणपती आणतो. त्याचप्रमाणे आपण प्रत्यक्ष सद् गुरु दत्तात्रयांना श्रीपादवल्लभांना विभूती रुअपाने म्हणजेच औदुंबरच्या रुपाने घरी घेऊन येत आहोत या भावनेने छोटे रोप नर्सरीमधून आणावयाचे आहे.
नर्सरी मधून या रोपाबरोबरच बिना खत मिश्रीत माती व शेणखत घेऊन यावे. औदूंबराचे रोप घरात आणल्यावर त्याची माती बदलून टाकावी व मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये नवीन आणलेल्या मातीमध्ये थोडे शेणखत मिसळून हे औदुंबराचे छोटे रोप लावावे. आपल्या इतर इन डोअर फ्लॅट प्रमाणे त्यास सकाळ संध्याकाळ अर्धा तास ऊन द्यावे. ( दोन्ही वेळा ऊन जमत नसल्यास एक वेळ तरी ऊन द्यावे किंवा ऊन येईल अशा ठिकाणी ठेवावे ) हे छोटे रोप बोनसाय वगैरे करण्याचा कुठलाही प्रयोग न करता मध्यम आकाराच्या कुंडीमध्ये ज्याप्रमाणे आपण हल्ली नारळाचे इन डोअर फ्लॅट ठेवतो, त्याप्रमाणे तीन चार वर्षे पर्यंत हा छोटा कल्पतरु वास्तूमध्ये सहज ठेवू शकतो. तीन वर्षानंतर फारच मोठे होत आहे असे जाणवू लागल्यास; आपल्या गावाकडील घरात, अथवा एखाद्या मंदिरात वगैरे व्यवस्थित लावून टाकावे आपल्या घरासाठी नवीन रोप घेऊन यावे. रोप घरी आणल्यानंतर चार आठ दिवसांनी शुद्ध प्रतिपदा, सोमवार, गुरुवार, संकष्टी अशा एखाद्या चांगल्या दिवशी या वृक्षाची आपल्या घरातील देवाबरोबर प्रथम पूजा करावी. त्या दिवशी ही औदुंबराची कुंडी एखाद्या थाळी अथवा ट्रे मधे ठेवून त्यास पळीने अभिषेक करावा, तुपाचे निरांजन ओवाळून कापूर, उत्तबत्ती वगैरे लावून गणपतीची, पांडुरंगाची व दत्ताची अशा आरत्या म्हणाव्यात.
कामाच्या गडबडीत, बाहेर गाची जाताना, जेव्हा जेव्हा आपल्या घरातील देवच्या पूजेला दांडी असेल, त्या दिवशी व इतर दिवशीही ज्या प्रमाणे आपण आपल्या इतर इन डोअर फ्लँटची काळजी घेतो त्याप्रमाणे काळ्जी घ्यायची आहे. या वृक्षासाठी काही कडक सोव्ळे ओवळ वगैरे न पाळता मनात श्रध्दा भाव व सहजता ठेवावी. शक्यतो गुरुवारी संध्याकाळी किंवा जेवणाच्या आधी गणपतीची व दत्ताची आरती म्हणावी, जमल्यास सणावाराला अभिषेक करावा. पाने स्वच्छ करावीत दोन मिनिटे शांत बसून नंतर चार पाच मनाचे श्लोक म्हणावे एवढ्या उपायांनीही सत्संगाचा लाभ मिळेल. अभिषेक आरते या साधनानी सद् गुरु सेवा घडेल.
गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुझा न लागे दोषु । धैर्य धरोनी अंतकरण । शुध्द बुध्दी वर्तती जन । दोष न लागती कधी जाण । गुरु सेविती निरंतरेसी । त्यासी तुला न लागे दोषु ( गुरु २ रा )
वर ब्रह्मदेवांनी कलीला सांगितल्याप्रमाणे एकादा घरात गुरुसेवा सुरु झाली की, त्याघरात कलीचा प्रभाव पडू शकत नाही. आपल्या व आपल्या कुटुंबियाच्या अंतकरणात धैर्य आपोआप निर्माण होऊ लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. आपली वास्तू प्रसन्न वाटू लागेल. वास्तूशास्त्र ज्याकडे आपण वास्तूची प्रसन्नता व शांती या हेतूने वळतो तो हेतू कुठलीही भींत न फोडता, स्वयंपाकाचा ओटा कुठेही न हालवता साध्य करता येईल.
ज्याच्या घरात पाळणा हलत नसेल त्यांनी आपल्या घरात जरुर औदुंबर लावावा व त्यास रोज १०८ प्रदक्षिणा घालाव्यात, तसेच श्री गुरुचरीत्राच्या २२ व्या अध्यायाचे रोज पारायण रावे. सुख आणि समृद्धी साठी ह्या वृक्षा समोर गुरुचरित्राचे पारायण करावे.

मंगळवार, २ फेब्रुवारी, २०१०

श्रीपाद श्रीवल्लभस्वामींनी विशेष पुरस्कारिलेले ॥ श्रीअनघादत्तव्रत ॥ सर्व स्त्री-पुरुषांनां संतती, संपत्ती, विवाहसौख्य व शांतीसाठी प्राचीन व शास्त्रशुद्धव्रत. अनघाष्टमीव्रत श्रीदत्तसंप्रदायातील एक अप्रकाशित व्रत आहे. फारच कमीजणांना त्याची माहिती आहे. ॥ श्री अनघादत्तव्रताची माहिती ॥ व्रत कोणी व केव्हा करावे :- मार्गशीर्ष व माघ कृष्ण अष्टमीस, तसेच प्रत्येक महिन्याच्या कृष्णाष्टमीस ( किंवा शुद्धाष्टमीस ) " अनघाष्टमी" मानुन सकाळी हे व्रत करावे, शक्य नसल्यास सायंकाळी स्नान करुअन करावे. व्रताच्या दिवशी उपवास करावा, दिवसभर केवल फलाहार अथवा उपवासाचे पदार्थ खावेत. सायंकाळी आरतीनंतर भोजन करावे. हे व्रत का करावे :- ही अष्टमी 'अघ म्हणजे पाप' नाहीसे करते, त्यामुळे हे व्रत करणार्‍याने पापनिरसन व दारिध्रनाश होऊन त्याला दैगीसंपत्ती, अष्टैश्र्वर्यलाभ व सर्व सुखप्राप्ती होते. सर्वपुण्यकर्मफळांची प्राप्ती होते. मनोकानापूर्ती व निर्मलकीर्तीलाभ होतो. सर्व रोगनिरसन होऊन, सातजन्म आरोग्यलाभ होतो, कुमारिकांना सद्दगुणी वरप्राप्ती व सर्वत्र निर्मल यशलाभ होतो. स्त्रीयांना सौभाग्यलाभ होऊन त्यांची कुटूंबसंतती वाढते, तसेच गृहकलहनिवृत्ती होऊन सुखशांती लाभते. सर्वत्र कल्याण होऊन, श्रीअनघामाता व श्रीदत्तात्रेयांचा अनुग्रह होऊन, अंती मोक्षलाभ होतो. व्रताची मांडणी :- घराची जमीन ( जाडेमीठ, हळद, गोमुत्र किंवा हिंग, गुलाबपाणी ) स्वच्छकरुन घ्यावी. यानंतर स्नान करुन, नित्यकर्म झाल्यानंतर देवासमोर अथवा सुद्धस्थानी चौरंग अथवा पाटावर वस्त्र घालुन, त्याभोवती रांगोळी काढावी. त्यावर मध्यभागी एकमूठ तांदूळ घालुन पूर्वेपासून आठदिशेस एक एक मूठ तांदूळ घालावे, त्यानंतर मध्यभागी शुद्धपाण्याने भरलेला कलश ठेऊन, त्याला पाच हळदी, कुंकवाची बोटे ओढावीत. त्यामध्ये गंध, अक्षता, फूल, सुपारी-नाणे व आंब्याचा डहाळा घालावा, त्याव्र तांदळाने भरलेले ताम्हाण ठेऊन त्यात अनघदत्तमूर्ती ठेवावी, ( श्रीअनघादत्त पूजायंत्र व मुर्ती मिळवण्यासाठी संपर्क क्रंमाक श्री सुहास जोशी 9850966297 0231-2624792, पत्ता:- २९१४ ए, वॉर्ड, वांगीबोळ, महाव्दार मार्ग, कोल्हापूर ४१६०१२. श्रीअनघादत्तव्रत मूल्य रु. ३०/-, श्रीदत्तानघालक्ष्मीव्रत मूल्य रु. १५/-, शास्त्रशुध्द श्रीअनघादत्तप्रतिमा मूल्य रु. ५०/-, पंचधातूची मुर्ती रु. ५००/- अधिक टपाल खर्च ) या दत्तपीठाच्या डावीकडे ( आपल्या उजव्या हातास ) चौरंगावर एकमूठ तांदूळ घालून त्यावर गणपतीची सुपारी, समोर पाच विडे ( २ पाने, १ नाणे, १ सुपारी म्हणजे एक विडा ) केळे, फळ इ. मांडावे तसेच गूळसाखर व २ नारळ ठेवावे. व्रतसूत्र :- श्रीअनघदत्तात्रेयांच्या मीर्तीजवळ लालदोरा ( व्रतसीत्र ) ठेवावा. ( व्रतसमाप्तीनंतर तो पुरुषांनी उजव्या मनगटात तर स्त्रियांनी डाव्या मनगटात बांधावा. आपल्या सगेसोयर्‍यांनाही व्रतसूत्र द्यावयाचे असल्यास तितके दोरे ठेवावेत, व्रत झाल्यानंतर स्वीकारणार्‍यांनी हे व्रतसूत्र प्रसाद म्हणुन अन्यथा स्वतःस व्रतासंभ करण्यास अनुमती व परंपरा स्वरुपात व्रतसूत्र स्वीकारावे व स्वतःच्या घरी हे व्रत आरंभावे व इतरांनाही आपल्या व्रताचे सूत्र द्यावे. पुढील अनघाष्टमीपूजेवेळी पहिल्यापूजेचे सूत्र काढून निर्माल्यात विसर्जित करावे. ) व्रतपूजा :- यानंतर शास्त्रविधानानुसार मध्यभागी ताम्हणातील मूर्तीवर श्रीसनघादत्ताचे आवाहन करावे, कलशाभोवती आठदिशेस ठेवलेल्या तांदळाच्या पुंजावर अणिमादि अष्टसिद्धीस्वरुप अष्टदत्तपुत्रांचे आवाहन करावे. यानंतर श्रीअनघासहित श्रीअनघदत्ताय नमः ॥ या मंत्राने श्रीअनघादत्त, अणिमादि दत्तपुत्र व व्रतसूत्र इ. देवतांचे पूजन करावे व श्रीदत्तदेवासं तु़ळ्सीपत्राने व श्रीअनघामातेस कुंकवाने शतनामार्चन करावे. पूजाविधीची अधिक माहीती हवी असल्यास वरील दूरध्वनी क्रंमाकावर संपर्क करावा दत्तभक्त संजीव