मंगळवार, ४ मे, २०१०

श्री वि. श्री. देशिंगकर, जन्म :- गोकुळ अष्टमी, जन्मतारीख ०६/०९/१९२० जन्मवेळ रात्री ०९.३० वाजता जन्मस्थळ सप्तसावर ( बेळगाव ).

श्री वि.श्री.देशिंगकर हे माझे ज्योतिषशास्त्रातील पुस्तुकी गुरु, मेष लग्नात केतू मुळे लाहन पणी पहिल्यादा माधुरी मागितली, याच केतूनी त्यांना उत्तर आयुष्यात उर्जितावस्था दिली, मिरज संस्थानचे कारभारी, फलज्योतिशी, विठ्ल मंदिर बाधले, सामाजिक कार्य केले.



चंद्र राशी-मिथुन, तिथी कृष्ण-९, नक्षत्र-मृग(३), योग-सिध्दि, करण्-तैतिल, वार-सोमवार,

ग्रहांचे अंशः- रवि-सिंह २०.५८.३०, चंद्र-मिथुन- ०२.२७.३६, मंगळ-वृश्चिक- ०८.२४.३०,

बुध-सिंह-१८.४३.१२, गुरु-सिंह-०९.३०.५१, शुक्र-कन्या-०८.४१.३६, शनि-सिंह-२२.०५.३०,

राहू-तुळ-१६.२४.२८, केतु-मेष-१६.२४.२८, हर्षल(व)-कुंभ-१०.३१.३२, नेप्-कर्क-१९.४३.४३.


1. लग्नि केतू मुळे जातकाचा जन्म बहुदा नवसाने किंवा गुरु-प्रसादाने जन्म झालेला अहे.

2. लग्नि केतू मुळे ज्योतिषविद्या साध्य झाली.

3. तृतिय स्थानातील चंद्र मुळे कलाकौशल्याची लेखनाची आवड निर्माण झाली. तृतीय स्थान मनाचे कारकस्थान आहे तसेच पंचमाचे खालोखाल हे तृतीय स्थान विद्येचे आहे त्यामुळे त्याच्या हातून ज्योतिषशास्त्राचे लिखाण झाले. तृतीय स्थानाचा अधिपती बुध पंचमात विराजमान आहे म्हणून बुध्दिपूर्वक लेखन हातूनघडणारच.

4. जन्मता विंशोत्तरी मंगळाची दशा भोग्यदशा मंगळ०२ वर्ष, ०२ महिने, १५ दिवस, त्यांनतर ती २२/११/२९२२ पर्यंत होती. पुढे राहुची महादशा २२/११/१९२२ ते २२/११/१९४० पर्यंत जिवन हालाकीचे गेले. नंतर खर्‍या अर्थाने जिवनाला सुरुवात झाली ती म्हणजे गुरुच्या दशेत २२/११/१९४० ते २२/११/१९५६ पर्यंत बुध, केतु च्या अंतरदशेत त्यांना चंद्र मुळे पुष्कळ प्रवास करावा लागला आहे. त्या प्रवासात त्यांनी आपल्या कीर्तीला सुरुवात केली ह्याकाळात त्यांनी खर्‍या अर्थानि आपल्या बुध्दिला चौकस पणादिला नाना विषयची वाचन, अनेक विषयाची माहीती, विद्येचा व्यासंग चंद्रा मुळे त्याच्या जिवन कालचक्रात घडली आहे.


5. मिथुनराशी च्या चंद्रामुळे भावंडाचे सुख व त्यांना मोठे करण्याची जबाबदारी आली.

6. तृतीय स्थानातील चंद्रमुळे त्यांना अनेक नोकर्‍या कराव्या लागल्या. कायम स्वरुपी एकाच ठिकाणी त्याचे वास्तव्य नव्हते.

7. अष्टमस्थानातील वृश्चिकेचा अनुराधा नक्षत्रातील मंगळ फार चांगली फले जातकाल दिली आहेत. वाचन, गूढविद्या आणि आध्यात्माचा नाद ह्या नक्षत्रा मुळे लागला आहे.

8. सामान्य स्थिती, बालपण गरिबीत गेले. शिक्षण- मराठीत त्यात राहूच्या दशेमुळे राजश्रित होऊन जीवन जगले. त्याच ठिकाणी खाजगी कारभार निष्णात वकिला प्रमाणे केला. राजेसाहेबांनी कामगिरीचे पारितोषिक म्हणून जमिन-जुमला, घरदार व पेशन वगैरे दिली. हे सर्व वयाच्या ५० वर्षात केतूच्या दशेत मिळाले. पंचमस्थानातील रवी, शनी, गुरु, बुध या चार ग्रहा योगांमुळे त्याणा हे सर्व प्राप्त झाले आहे.

गुरु सेवक संजीव

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: