एक विलक्षण अनुभव मंगळ आणि वास्तुशास्त्र, मंगळाचा दोष, मंगळाची पत्रिका, मंगळ आणि कलर थेरपी, मंगळाच्या अष्टमात शनी,
नाव:- वैभव जन्म तारीख १० फ़्रेब्रुवरी १९९५, वेळ संध्याकाळी ०५.५५ मुंबई ( परेल ).
जन्म: चंद्र राशी वृषभ, तिथी शुक्ल -११, नक्षत्र मृग, योग वैधुति, करण वणिज.
वृषभ रास :- मॄगशीर्ष नक्षत्राचा पहिला चर या राशीत येत आहे. आकाशात प्रत्यक्ष दिसणा-या बैलाच्या आकृतीस वृषभ राशी म्हणतात, ही रास कष्टाळूपणा, सोशीकपणा, सतत कार्य करण्याची धमक व दीर्घोद्योग हे बैलाचे नैसर्गिक गुण वृषभ राशीत असतात.
वृषभ राशी नेहमी दोन आकड्याने दाखवितात. जन्मकुंडलीतील ज्या भावात २ आकडा मांडलेला असतो त्या भावात वृषभ राशी आहे असे समजावे ही सम राशी आहे. जन्म कुंदलीतील समस्थानात सम राशी सामान्यत: बलवान असते. ही स्थिर राशी आहे.
सम राशी या सौम्य राशी आहेत. त्यामुळे निरुपद्रवता, दुस-याचे ऐकून घेणयाची वृत्ती, समजुतदरपणा, व शांतपणा हे गुण सामान्यत: दिसतात. तसेच स्त्री राशी म्हणून लज्जा, विनय, ममता, वात्सल्य, संगोपन, संसारासक्ती, घर करुन राहण्याची प्रवृती, परावलंबित्व, दुस-याच्या मदतीने पुढे येणे, कोमलता हळवेपणा, वगैरे स्त्रीचे ठिकाणी असणारे नैसर्गिक गुण स्त्री राशीत असतात. चंद्र व शुक्र हे ग्रह कोणत्याही स्त्री राशीत सामान्यत: बलवान असत्तत स्त्री राशी समभाव व समग्रह यांछे साहचर्य परस्परास पोषक असते. म्हणून समभावात समराशीत स्त्री ग्रह असता ते विशेष बलवान.
ही स्थिर राशी असल्याने स्थैर्य, प्रवासाची नावड, हिंडण्या-फ़िरण्याचा कंटाळा वस्तु व वास्तु ( राहण्याची जागा ) आणि व्यवसाय स्थिर ठेवण्याची प्रवृत्ती हे गुण या राशीत प्रमुखपणे दिसतात.ही चतुष्पाद राशी आहे. माणसाचे चालण्यावरुन या राशीचा असलेला तिरपे चालणेचा गुण दिसून येतो. चतुष्पाद राशी दशमात बलवान असतात.
वृषभ राशी ही पुथ्वीतत्वाची राशी असल्याने सुबकपणा, प्रमाणशीर अवयव रचना, निटनेटकेपणा, व्यवस्थितपणा, सह्नशिलता, सौंदर्य योग्य जुळणी करणे व योग्य मांडणी करणे वगैरे पृथ्वीतत्व प्रधान ग्रह आहे. तो या राशीत बलवान होतो. त्यामुळे पृथ्वीतत्वाचे गुण उत्कट स्वरुप धारण करतत. राशी व भाव यामध्ये पौष्यपोषकपणा असतो. त्यामुळे भाव व राशी गुण वाढतात. म्हणून समभावात सम राशीचे गुण प्रकर्षाने दिसतात.
वृषभ ही राशी पृष्ठोदय राशी आहे. ही रात्रीबली राशी आहे. ही मध्यम प्रसव राशी असल्याने ज्या भावात ती बलवान असते त्या भावने दाखविलेल्या व्यक्तिअची संख्या मध्यम असते.
जन्म नक्षत्र :-
मृगशीर्ष नक्षत्र पावचे नक्षत्र मृग नक्षत्र होय, हे नक्षत्र द्विपाद आहे. नक्षत्राचा आरंभ सिंह नवमांशाने होतो. सिंहेचा रवि व कन्येचा बुध, तुळेचा शुक्र, वृश्चिकेचा मंगळ यांचा अमंल असतो. हे नक्षत्र तीर्यमुखी,मंदलोचनी व देवगणी नक्षत्र आहे. या नक्षत्राचा राशीस्वामी शुक्र आहे, त्यामुळे कलाकौशल्य असते. नक्षत्र स्वामी मंगळ म्हणून चपळता असते व देवता चंद्र म्हणून अवखळपणा असतो. या सर्व गोष्टींचा एकत्रिपणा या नक्षत्राच्या लग्नावर दिसून येतो. ७ जूनला रवि या नक्षत्रात आला की पावसाला सुरवात होते. या नक्षत्रावर जन्मणारे जातक कुरळे केस, रेखीव भुवयांचे, बुध्दिमत्ता चांगली असलेले व पायाचा भाग निमुळता, हरणासारखा असलेले असते. शारीरिकदृष्या हे नक्षत्र बलवान नाही. या व्यक्ती उंच, मध्यम बांध्याच्या व नाजूक प्रकृतीच्या असतात.
या नक्षत्रात ११ तारे असून मार्गशीर्ष महिन्यात ते रात्रभर दिसते. अतिशय मोठे नक्षत्र आहे. या नक्षत्राची व्याप्ती वृषभेत २३° २०’ ते ३०° व मिथुनेत ६° ४०’ आहे. या नक्षत्राचा शर दक्षिण १३°२२’ आहे. यांना शरीरिक श्रम झेपत नाहीत. इंग्रजीत या नक्षत्राला ’ओरायन” म्हणतात. शारीरिक शक्ती व जीवनशक्ति कमी असते. हे नक्षत्र देवगणी असल्याने या नक्षत्रावर जन्मलेली जातक सुशील, ईश्वरभक्त, परोपकारी, संतुष्ट, रसिक, बुध्दिमान, व्यवहारी व न्यायी असते. कलाकौशल्यात नैपुण्य असते. नीटनेटकेपणा व स्वच्छतेची आवड असते. नक्शत्र जरी बिघडले तरी या व्यक्ती व्यसनाकडे वळत नाही. या नक्षत्रात अतिशय चांगले गुणधर्म आहेत परंतु ग्रह तसे लाभल्यास त्याचे परिणाम दिसून येतात. किंवा गोचरीचा ग्रहाचा परिणाम दिसून येतो.
मृग नक्षत्राचा भाव हा सिंह नवमांशवरुन आरंभ होतो. सर्वतोभद्र चक्राप्रमाणॆ मृग नक्षत्राचा चौथ्या चरणाला नीचांश प्राप्त झाला आहे.
या नक्षत्रात जातकाणी खालील गोष्टीत शिक्षण घेतले पाहिजे. आर्किटॆक्ट, इंजिनिअर, ड्राफ़्ट्स्मन, पत्रकारिता, प्रिटिंगप्रेस व्यवसाय, चार्टर्ड अकौंटट, मशीन विकणारे कमिशन एजंट, सेल्समन, बँकींग क्षेत्रातील आँडीटर, पेंटर, चित्रकार, डाँक्टर्स या प्रकारचा व्यवसायात हे नक्षत्र फ़ार मोठ्या पदावर नेणारे किंवा नावलौक मिळवून देणार नाही. त्यामुळॆ राजवैभव किंवा अधिकार योग मिळणार नाही.
या नक्षत्र नाजूक असल्याने हवामानातील बदलाप्रमाणे साथीजन्य रोग होऊ शकतात. तसेच शीत विकारामुळे सर्दी, कफ़, खोकला, थंडीताप या प्रकारे त्रास होतो,
मृगशीर्ष नक्षत्राच्या जातकाची लक्षणे :- मगृशीर्ष नक्शावर जन्मलेल्या व्यक्ति गंभीर, वाक्पटू, चंचल आणि स्वाभिमानी असतात. त्यांना अपमान खपत नाही. दुस-यांच्याविशयी मनात अढी व ईर्ष्या असत. आपल्या जीवनात नाव मिळवून उच्च स्थान मिळवतात.
मृगशीर्ष नक्षत्राच्या व्यक्ति शस्त्रकलेत पारंगत असत्तत. नम्रस्वभाव व आदरणीय व्यक्तिंच्या बाबतीत आदराची भावना यांच्यात असते. राज्या-पक्षाकडून अनुकूलता प्राप्त होते. मंत्र्याशी मैत्री असते. धार्मिक वृत्तीचे व सन्मार्गावर चालणारा असणार. भोगविलासात विशेष रस त्यांना असतो. नवनवीन अनुभवांचा संग्रह यांच्याकडे असतो. स्वभावाने भावूक असल्याने चटकन प्रभावित होतात. पैशाची बचत करण्याची कला यांना अनुयायी असणार. व आपले विचार प्रकट करताना हाव-भाव करण्यांछी सवय असते. आपल्य अप्रगतीसाठी निरंतर झटण्याची वृत्ती असते. आंतरिक प्रेरणेमुळे सामान्यपणे भाग्यशाली असतात. मनोवैज्ञानिकाच्या रुपात प्रसिध्दी याला मिळेल.
प्रथम स्थान ( लग्न स्थान / प्रथम भाव / ग्रह / नक्षत्र ) याचा विचार सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे :-
१. लग्न कर्कराशीत आश्लेषा नक्षत्राच्या प्रथम चरणात धनु नवमांशात आहे. हा सर्वतोभद्र चक्र १८:५८:३९ अंशावर (अवकहडा चक्र) प्रमाणे ३३ व्या उत्पनांशावर आहे. आश्लेषा नक्षत्राचे जे गुणधर्म आहेत त्याप्रमाणे जातकास उत्पनांश हा सूक्ष्मांश प्राप्त झाला किंवा जातकाच्या कुंडलीमध्ये गुरु, चंद्र, रवि यासारखा ग्रह त्या स्थानी असेल किंवा गोचरीच्या भ्रमणा तुन येईक तर जातकास अतिशय उत्कृष्ट फ़ले मिळू शकतात आणि जातक प्रगतिपथावर विराजमान होतो. ह्या नक्षत्राचे गुणधर्म पाहून कोणात्या प्रकारचा व्य्वसाय करावा व या उन्नतीस तो पात्र असेल हे या नवमांशात असलेल्या ग्रहांवरुन ठरवावे लागेल, जातकाचा धनु नवमांश आहे. धनुचा गुरु हा जातकाच्या पत्रिकेत पंचमात वृश्चिक राशीत जेष्ठा नक्षत्राच्या प्रथम चरणात आहे. हा सुध्दा सर्वतोभद्र चक्रा प्रमाणे ६९ उत्पन्नांश.
२. आश्लेषा नक्षत्रातील प्रथम चरणातील लग्न :- शेष आपल्या डोक्यावर पृथ्वीचा भार घेतो. यालाच आश्लेषा म्हणतात. कर्तृत्ववान व्यक्तिच्या अंगावर जबाबदार्या पडणे व ते यशस्वीपणे पार पाडण्याचे सामर्थ्य असणे हा गुण आश्लेषा नक्षत्रात आहे. मराठी ९ या अंका सारखे दिसणारे हे नक्षत्र अधोमुखी मंदलोचनी, जीवाग्नी तत्त्वाचे आहे. ते तीक्ष्ण, दारुण फलदायक आहे. राक्षकगणी, मार्जार योनीचे आहे. नक्षत्राची अमृतनाडी असून, नक्षत्रस्वामी बुध व नक्षत्रदेवता सर्प आहे. गंडातर योगातले हे नक्षत्र अमृतनाडीत आहे. कुंडलीत या नक्षत्रात शुभ ग्रह असल्यास व ते शुभ ग्रहयुक्त नक्षत्र १, ५, ९, १० या स्थानात असल्यास मनुष्य कर्तव्यदक्ष असून आपले कर्तृत्व सिध्द करतो व अमृतमय फले प्राप्त करतो. हे नक्षत्र वरील स्थानत असता जातक महत्त्वाकाक्षी, निग्रही सुविचारी असून समाजात मान प्रतिष्ठा प्राप्त करतो.
३. लग्नी मंगळ :- लग्नी प्रथमस्थानी मंगळ असता जातक अत्यंत चपळ, उत्साही असतो. या व्यक्ति कुठलाही निर्णय झटपट घेतात. झटकण राग येतो. दुसव्यावर वर्चस्व गाजवण्याची वृत्ती असते. वयाच्या २८ नंतर भाग्योदय होतो. २८ नंतर त्यांची तामसी वृत्ती कमी होते. नोकरीत भाग्योदय होतो. भाऊ-बहिणी याच्या बरोबर पटणार नाही. मातृसौख्यात कमतरता असणार. मातेला दिर्घ मुदतीचा आजाराची शक्यता आहे. मैदानी खेळाची आवड, कौटुंबीक सौख्य कमी. दुसर्याने दिलेला सल्ला जातकाला कमी पणाचा वाटतो. दुसर्याने कुणी दोष दाखवून दिल्यास ते कधीच पटत नाही.
४. कुंडलीत प्रथमस्थानी मंगळ व सप्तमात रवि:- रविमंगळ युति, प्रतियुती अथवा क्रेंद्रयोग तीव्र स्वरुपाची फळे या जातकाला देताना दिसतात. रविमंगळ युती अधिकार योग देताना दिसत आहे.
प्रथमस्थानी असणारा मंगळ दुसर्यावर वर्चस्व निर्माण करतो. तामसी स्वभावामुळे वैवाहिक जीवनात वैवाहिक साथीदाराशी पटणॅ मुश्किल होते. हा मंगळ चवथ्या दृष्टीने चतुर्थ स्थानाकडे पहातो त्यामुळे घरात कलहाचे वातावरण निर्माण होते वैवाहिक स्वास्थ हरवून जाते. प्रथमस्थानी असणारा मंगळ सातव्या दृष्टीने सप्तमस्थानाकडे पहतो. त्यामुळे सत्तमस्थान दुषित होते. वैवाहिक साथीदाराशी कुठलीही तडजोड स्विकारण्याची मनोवृती नसल्याने वैवहिक जीवनातील गोडी निघून जाते. अष्टमस्थानाकडे आठव्या दृष्टीने पहाणारा मंगळ प्रकृतीविषयी अनिष्ट फळ देतो त्यामुळे वैवाहिक जीवनातील शरीरसुखात बाधा निर्माण होते.
वृश्चिकेचा सहाव धनु नवमांष व जेष्ठा नक्षत्राचे पहिके चरण म्हण्जे उत्पान्नांश या नक्षत्रावर असलेले गुरु, रवि, मंगळ हे ग्रह जातकास धन वृध्दि करुन देतात. परंतु या नक्षात्राचे वैशिष्ठ्य असे आहे की जेव्हा एखादा क्रुर ग्रह कालांतराने वेध घेईल तेव्हा धनाच्या बाबतीत अनेक त-हेच्या समस्या उत्पन्न करून जातकाची धनहानी होईल. तसेच उत्पन्नाच्या मार्गामध्ये खंड पडेल म्हणून या सूक्ष्मांशाबद्दल जातकास काळजीपूर्वक मार्गदर्शन करावे.
जातकाच्या कुंडलीत मंगळ कर्क राशीत २९:४४:३४ अंशावर असल्याने कर्क राशीत तो २८ अंशावर नीचेचा असतो. कर्क राशीत त्याचे बल हे निकृष्ट असते. मंगळ ०६ अंशाच्या पुढे असल्याने मंगळास बाल अवस्था प्राप्त झाली आहे. त्यामुळे तो थोडे फ़ळ निश्चित जातकाला देईल या शंका घेंण्यास जर सुध्दा जागा नाही.
मंगळ हा ग्रह ४, ७, ८ दृष्टीने चतुर्थ स्थानातील तुळ राशीत राहू वर पाहात आहे. चतुर्थ स्थानाल मंगळ पूर्ण दृष्टीने पाहत असल्यने मातापित्याचे सुख मिळत नाही, शारीरकष्ट भोगणारा, पणा वयाच्या २८ व्या वर्षाच्या अवस्थेपर्यंत अत्यंत दु:खी, पाश्चात सुखी, परिश्रम न करता अंगचुकारपणाने काम करणारा. तसेच त्याची स्व:रास वृश्चिक पंचमात गुरु ग्रहा बरोबर आसल्याने त्याच्या निर्णयाला उत्तम चालणा गुरु ग्रह देऊन मंगळ त्याला प्रोहसान देईल. सातवी दृष्टी सप्तमावर बुध, नेप, रवी वर असल्याने रवी त्याचा मित्र गृह असल्याने कोणत्याही कामात त्याल आळस व शारीरिक थकवा येणार नाही. तसेच सप्तम स्थानावर मंगळ पुर्ण दृष्टीने बधत असल्याने परस्त्रीरत, कामी, प्रथम भार्येचा वियोग होऊन त्यायोगे दु:ख पावणारा पण रवी बुध ( रवी+बुधा आदित्ययोग ) मुळे यांची शक्यता कमी आहे. त्याची आठवी दृष्टी अष्टमात शनिवर असल्याने अपघात होण्याचा संभव आहे. ज्या ज्यावेळी गोचरीचा ग्रह ह्या स्थानावरुन जाईल त्यात्यावेळी जातकाला शारीरिक पिडा संभवतात. आठव्यास्थानावर मंगळ पूर्ण दृष्टीने पाहील तर धन व कुटूंब यांचा नाश परंतु जातकाच्या कुटूंबा मधिल मात्यापित्याची पत्रिका पाहिल्या शिवाय हे निवेदन करणे चुकीचे आहे कारण जर मात्या पित्याच्या कुंडलीत चंद्र राशी मकर व कुंभ असल्यास शनि त्याचा राशी स्वामी आहे व जातकाच्या कुंडलीत अष्टमात मकरेचा शनि आहे त्या मुळे हा योग होणार नाही ह्या योगाची नोंद आवशक घेण्यासारखी आहे.
कर्केतील मंगळ हट्टी स्वभाव व मानसिक अस्थिरता हा कर्क राशीत मंगळाचा गुणधर्म आहे. चंद्राच्या ह्या जलराशीत मंगळ फ़लीताच्या दृष्टीने मोठे कोडे आहे. कर्केतील मंगळची फ़ले फ़ार विचार करुन वर्तवावी लागतात. कित्येक वेळा कर्क राशीतील मंगळ आत्यंतिक शुभ फ़ले देताना सापडतो. काही वेळा तितकीच अशुभ फ़ले मिळतात. आश्लेषा नक्षत्रातील मंगळा मुळे जातक व्यापारात फ़सल्या जातात. ह्या जातकानी व्यापार करूनये.
मंगळाच्या पंचमात गुरु या योगात बायको वांझ मिळण्याचा संभव असतो. अगर तिला संततीप्रतिबंधक रोग होतात. योग्य उपचार केल्यास रोग जातो व संतती होण्याचा संभव असतो. रविच्या उपासनेने संतती टिकत. सर्व प्रकारच्या एंजिनियरींग शिक्षण पुर्ण होते. साहित्य फ़ार होते. चांगले लिखाण लिहिले जाते. हा प्रसिध्दि योग आहे. फ़क्त कर्क, वृश्चिक, मीन राशीत हा योग झाल्यास संतती भरपुर होते व संततीनियमन करण्याची पाळी येते.
एक विलक्षण अनुभव :- आकाशातल्या ग्रहात नवराबायकोची दोन जोडपी आहेत. १ले रवि-चंद्र, २रे मंगळ-शुक्र, रविचंद्र ही नवराबायको अत्यंत जुन्या पद्धतीतली आहेत. आणि शुक्र-मंगळच्या युतीतसुध्दा रविच्या पुढे ( सायंकाळी पश्चिमेकडे दिसणारी युती ) ६० अंशावर ज्या वेळी पुर्वाश्चिम, दक्षिणोत्तर अंतर शून्य असेल तर शुक्राचे मनोहर तेज मंगळावर पडते. त्या वेळी मंगळाचा तांबूस वर्ण कमी होऊन एक प्रकारचा मनोहर पांढुरका वर्ण दिसू लागतो. म्हणजे ही युती फ़ार मनोहर दिसते आणि –
ज्या वेळी रविच्या मागे शुक्र असेल ( सकाळी पुर्वेकडे दिसणारी युती ) त्या वेळी चारी दिशांचे अंतर शून्य असेल तर मंगळ तेज शुक्रावर पडते व शुक्र त्या वेळी थोडास गुलाबी वर्णाचा दिसू लागतो, या वेळी शुक्र अगदी मनोहर दिसतो.
मंगळाच्या अष्टमात शनी :- या योगात संतती, संपती, मानमरातब, ऐश्वर्य यांनी युक्त होतो. धंदा नोकरी उत्तम चालते, नावलौकिक उत्तम मिळवितो. परंतु शांततेने समाधानाने आयुष्य घालविणारे असतात. त्यांचे प्रकृती इतकी नाजूक असते व हे मनाने इतके नेभळट असतात की यांना ज्वलत्जहाल क्रांतिकारकांचे तेज सहन होत नाही.हे चमडी दमडी बचावून राजकरण करण्याचा तृतीय प्रकृतीचा मार्ग पत्करतात. उदा. हिंदूमहासभा, लिकशाही स्वराज्य पक्ष, असले नादान पंथ दुस-या ख-या कार्यकर्त्यांना अपशकून कर्ण्याकरताच काढलेले आहेत. यातल्या शूर वीरांना तुरूंगात जायाला नको, दंड भरावयाला नको, व्यासपीठावर मोठ्यामोठ्याने गाढवासारखे बडबडून टाळुआ मिळवून गळ्यात मोठाले हार घालून घरी मिरवत जाणे व घरी जाऊन गरम शिरा खाऊन वर चहाचे डिकाँक्शन पिऊन निष्काळजीपणॆ झोपी जाणे हाच योग पुण्याचे श्री न, चिं. केळकर, अमरावतीचे दादासाहेब खापर्डे यांच्या कुंडल्यात होता.
मंगळाच्या महादशेत फ़ळे :- ही दशा मृग, चित्रा, धनिष्ठा नक्षत्रात येते. या महादशेतील धनयोग होतो. जर मंगळ वक्रि असल्याने बंधू-वैमनस्य, हा केंद्रात असल्याने जमीनजुमला, घरदार देतो व शेतीपासून फ़ायदा, मानसिक शांती. जातकाल जन्मता: ७ वर्षाची मंगळाची महादशा होती. त्यांनतंर राहूची महादशा सुरु झालेली आहे.
कर्क राशीचा मंगळ जमीनजुमला, धरदार, नोकरचाकर, वाहने, भूमी यांची अतिकष्टाने प्राप्ती नतलग व स्त्रीपुत्रांचा वियोग, मानसिक दुर्बलता, क्लेश व चिंता देतो.
प्रथम स्थानी कर्केचा मंगळ
१.प्रथम स्थानी कर्केचा मंगळ क्रोधी मनाची कमतरता, मोठे आशावादी, भांडण –तंट्याच्या मोठमोठ्या योजना आखतात.
२.आरोग्याच्या तक्रारी.
३.प्रथम स्थानी मंगळ असता व्यवसायात नुकसानी, व्यापारास लागणारे गुण यांचे अंगी नसतात. ह्या जातकानी नोकरी करणे फ़ार चांगले आहे.
४.पण ह्यानी व्यापारा संबधी मोठमोठ्या योजना आखाव्यात पण दुस-यासाठी स्व:तासाठी नाहीत.
५.कर्केचा मंगळ प्रथम स्थानी वाडवडिलांचे सुख प्राप्त होत नाही व संततीसुखात कमतरता असते असे ज्योतिषशास्त्रात म्हटले आहे तरी अष्टमातील शनी व वडिल-आईची कुंभ-मकर रास ही या योगाला संपुष्टात आणते.
भाव बल :-
जातकाच्या कुंडलीत कर्क लग्नात मंगळ (व) आश्लेशा नक्षात्राच्या चतुर्थ चरणी ( २९:४४:३४ ) अंशावर आहे. मीन नवमांशात आहे. ह्या तील मंगळ जलभय सूचक व शस्त्रकियासूचक समजावा. कुंडलीत वक्री मंगळ या नवमांशी पायात दोष वा पायाचे विकार उद्भवण्याची संभावना आहे. या नवमांशांतील मंगळ द्रवपदार्थांच्या व्यापारास अनुकुल आहे.
मंगळ आणि वास्तुशास्त्र :-
ज्याच्या पत्रिकेतील चंद्र, लग्न अथवा चतुर्थस्थान मंगळाने दुषित आहे त्याने स्ततःच्या नावावर घर घेऊ नये अशा व्यक्तिने घरात उत्तरेकडील भिंतीवर मारुतीच्या फोटो लावावा. तसेच गृहसौख्य लाभण्याच्या दृष्टीने श्री गणपती उपासना करावी. मंगळवारचा उपवास कराव. घरात चाकू, विळी सारख्या धारदार वस्तू तसेच अग्नि यापासून सावधगिरी बाळगावी. मंगळाच्या पत्रिका असंआर्यांनी श्री गणपती उपसना करावी. मंगळवारचा उपास करावा. संकष्टी अंगारकीचा उपास धरावा. " उपेम हुं श्री मंगलाय नमः ह्या मंगळाच्या बीजधार मंत्राचा ( लक्ष्याचा जप ७ दिवसात पुर्ण करावा, रोज १०८ वेळा " ॐ अंगाकराय नमः किंवा ऋग्वेदातील श्री सुव्या रोज म्हणावे. किंवा अंगाकराय विघ्नहे शक्ती: हस्ताय | धीमही, तन्मो भौम प्रचोदयात || हा गायत्री मंत्र १०८ वेळा रोज म्हणावा.
मंगळाचा दोष, दाहकता, तीव्रता कमी करण्यासाठी मंगळाची पत्रिका असणार्यांनी अंगारक कवच, अंगारक स्त्रोत्र, मंगळ चंडिका स्तोत्र, ऋणमोचल स्तोत्र यपैकी जे जमेल ते कवच रोज म्हणावे.
मंगळाची पत्रिका असणार्या स्त्रियांना पाळीचा त्रास खूप होतो. तसेच बाळंतपणात अशक्तपणा येण्याची शक्यता असते. गर्भधारणॅच्या प्रक्रियेत ही अडथळे निर्माण होतात. आणि म्हणून मंगळाची पत्रिका असणार्या तरुण मुलींनी, महिलांनी पुढील मंत्र रोज म्हणावा.
" या रक्त वसना देवी या रक्तः रजसूया | रजोस्वला महातेजा उमा कँगु वासिनी || " मंगळ दुषित पत्रिका असणार्यांनी विवाह लवकर ठरण्यासाठी पुढील मंत्र रोज म्हणावा " ॐ पत्नी मनोरमा देही मनोवृत्तानुसारिणी | तारिणी दुर्गसंसार सागरस्य कुलोद् भवाम् || हा मंत्र॑ दररोज ७ वेळा म्हणावा.
मंगळ आणि कलर थेरपी :-
ज्याच्या पत्रिकेत मंगळ बलवान आहे.मंगळ स्वराशीचा, मित्रराशीचा अथवा उच्च राशीचा आहे. अथवा मंगळाला नवमांश बळ आहे त्याने आपल्या आयुष्यात महत्त्वाच्या प्रसंगी निर्विवाद यश मिळण्याकरिता कलर थेरपीचा वापर करावा. अतिशय महत्त्वाचे काम असेल आणि त्या कामात हमखास यश मिळवायचे असेल तर अशा प्रसंगी पुरुषांनी अंगात लाल शर्ट अथवा लाल टोपी/ रुमाल चा वापर करावा. महिलांनी लाल ड्रेस अथवा लाल साडी धारण करावी. श्री गणपतीला लाल फूल वाहून दर्शन घ्यावे, डोळे मिटून या मंडळीनी लाल रंगात आपल्या कुलदेवतेची मानसपूजा करावी. स्वसंमोहनाचे तंत्र ज्यांना माहिती आहे त्यांनी भिंतीवर एखादा पुठ्ठा टांगून त्यावर एक लाल ठिंपका काढावा व त्या ठिंपक्यावर आपली एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करावा. ज्यांना रेकीचे तंत्र माहिती आहे. त्यांनी स्वतःसाठी रेकीचा वापर करताना डोळे मिटून मनातल्या मनात लाल छटा संकल्पीत करुन रेकी घ्यावी. संकट प्रसंग आल्यास डोळे मिटून लाल छटा संकल्पीत करुन श्री गणपतीची ही मानसपूजा करावी.
संजीव